पुणे केंद्र

ज्ञान प्रबोधिनी प्रशाला

१. नवीन जागेत अधिक सुसज्ज व सुनिर्मित वास्तू उभारून स्थलांतर करणे व भौतिक सुविधा व आस्थापना अधिक सुसज्ज व गुणवत्तापूर्ण करणे.
२. सर्व प्रकारच्या वंचित गटांतील विद्यार्थ्यांचा समावेश होईल अशा रचना (कार्यपद्धती, अध्यापन पद्धती व आस्थापना) उभ्या करणे.
३. विद्यार्थ्यांमध्ये अभिजात अभिरूची-अभिव्यक्तीचे संवर्धन करणे.
४. प्रत्येक विद्यार्थ्याच्या सर्वांगीण व्यक्तिघडणीला पूरक असणारी अधिमित्र रचना बसवणे.
५. व्यक्तिमत्त्व विकसनाची प्रक्रिया अधिक सखोल व विस्तृ करण्यासाठी नियोजित क्रमिक अनुभवांची रचना बसवणे.

स्पर्धात्मक क्षमता संवर्धन केंद्र

१. या केंद्राच्या जगभरात कार्यरत असलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचे जाळे सक्षम करणे.
२. युवक गटासाठी स्पर्धात्मक अभिवृत्ती मापन व उचित व्यवसाय / सेवा निवड करण्यासाठी सल्ला मार्गदर्शन देणारी आवश्यक रचना बसवणे.

छात्र प्रबोधन

१. शहरी व ग्रामीण भागातील कु मार वयोगटासाठी नियतकालिकांद्वारा मराठी, इंग्रजी व हिंदी भाषांमधून साहित्यनिर्मिती करणे.
२. शालेय विद्यार्थ्यांसाठी नेतृत्वगुण विकसन, स्त्री शक्ती प्रबोधन, राष्ट्रीय एकात्मता व उद्योजकता या विषयासंदर्भातील साहित्य प्रकाशित करणे.
३. आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे मासिकातील पूर्वप्रकाशित साहित्य दरवर्षी शहरी, ग्रामीण आणि वंचित गटातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे.

शैक्षणिक उपक्रम संशोधिका

१. विविध भौगोलिक / आर्थिक / सामाजिक क्षेत्रातील विद्यार्थी गटाच्या व्यक्तिविकासासाठी व्यक्तिमत्त्व विकसन, कौशल्यप्रशिक्षण, प्रज्ञा विकास व नेतृत्वविकसन या सारख्या शैक्षणिक रचनांची व अनुभवसंचांची विद्यार्थ्यांसाठी योजना करणे
२. सामाजिक जाणीव संवर्धन व प्रेरणा जागरण या संकल्पनांच्या अभ्यासासाठी शैक्षणिक प्रयोग करणे

शैक्षणिक साधन केंद्र

१. आभासी प्रयोगशाळा विकसित करून ६ वी ते १० वीतील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ई-प्रात्यक्षिकांची निर्मिती करणे.
२. उपलब्ध साहित्यातून सर्व वयोगटातील व्यक्तींच्या भावनिक, सामाजिक, वैचारिक, नैतिक व प्रेरणेच्या विकसनास पूरक अभ्यासक्रम दृक् -श्राव्य माध्यम केंद्राद्वारेनिर्माण करणे.

नेतृत्व संवर्धन केंद्र

१. वेल्हे येथेप्रशिक्षण कें द्र उभारून शहरी, ग्रामीण व वंचित गटातील किमान ७०० युवक-युवतींसाठी निवासी नेतृत्व प्रशिक्षण कार्यक्रम राबवणे.
२. तरुण अध्यापकांमधून ‘अध्यापक नेतृत्व’ तयार होईल व त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुणविकसन करावे यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबवणे.
३. नेतृत्व विकसन वर्गांसाठी प्रशिक्षक प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम तयार करून त्याद्वारे ५० जणांच्या प्रशिक्षक गटाची उभारणी करणे.
४. केंद्रातील उपक्रम व प्रक्रिया यांवर दहा संशोधन निबंध व दोन प्रबंध तयार करणे.

प्रज्ञा मानस संशोधिका

१. भारतीय व पाश्चात्य मानसशास्त्राचे अद्ययावत व कालोचित ज्ञान विविध अभ्यासक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना देऊन गुणवत्तापूर्ण कामासाठी प्रेरित करणे.
२. संशोधनातून सिद्ध झालेल्या प्रमाणित मानसशास्त्रीय कसोट्या विविध भारतीय भाषांमधे उपलब्ध करून देणे व त्यांचा व्यापक उपयोग, प्रसार करणे.
३. विविध सामाजिक स्तरातील व वयोगटातील मुले आणि प्रौढ व्यक्तींच्या समस्यांच्या निराकरणासाठी प्रभावी समुपदेशनाची रचना बसवणे.
४. विविध आस्थापनांमध्ये संस्थात्मक वातावरण सक्षम करण्यासाठी आधुनिक मानसशास्त्रीय तंत्रे व पद्धतींच्या वापरासंबंधी रचना तयार करणे.

संस्कृत संस्कृति संशोधिका

१. विविध भाषिक, सामाजिक, सांस्कृतिक, प्रांतिक, धार्मिक समाजगटांना पौरोहित्य संस्कारांंद्वारे प्रभावी पद्धतीने जोडणे.
२. ‘धर्मसंस्थापना’ तत्त्वाची प्रभावी ओळख करून देणारे वीस अधिमित्र पुरोहित तयार करणे.


नैसर्गिक संसाधने केंद्र

१. सौर पॅनेल्स व सौर दिव्यांची निर्मिती करणे, प्रशिक्षण देणे व प्रसार करणे

सामाजिक शास्त्र अध्ययन केंद्र

१. सम्यक् विकासाचा परिप्रेक्ष्य / दृष्टीकोन देणारी विचारसरणी म्हणून आध्यात्मिक राष्ट्रयोगाची मांडणी करणे.

स्त्री शक्ती प्रबोधन – ग्रामीण

१. ग्रामीण स्त्रियांमध्ये स्वतःच्या आरोग्याविषयी जागरुकता येण्यासाठी वेल्हे तालुक्यात चालू असलेल्या कामाचा भोर तालुक्यात विस्तार करणे.
२. ग्रामीण भागातील वंचित स्त्रियांसाठी (एकल महिला, कातकरी समाज) सुरू असलेल्या कामाचा संख्यात्मक व गुणात्मक विस्तार करणे.
३. ग्रामीण भागातील मुली व युवतींचेकिशोरी / युवती विकास, नवचैतन्य दल इ. उपक्रमांद्वारे संघटन व समूहगुणविकसन करणे.

स्त्री शक्ती प्रबोधन – शहरी

१. संवादिनीच्या माध्यमातून संपर्कात येणाऱ्या महिलांचे संघटन करणे व त्यांची कार्यकर्ता ते नेतृत्व घडण ही प्रक्रिया अधिक समृद्ध करणे.
२. विविध वयोगटातील महिलांचे मानसिक आरोग्य जोपासण्यासाठी ठोस प्रयत्न करणे
३. सुदृढ समाजघडणीसाठी विविध वयोगटांसाठी जीवनकौशल्य विकासाची आणि प्रबोधनात्मक उपक्रमांची मांडणी व प्रसार करणे.

नागरीवस्ती अभ्यासगट

१. महिला सहविचार गटामार्फत विविध वस्त्यांतील १०,००० महिलांशी संपर्क व संवाद करणे व त्यातील ३००० महिलांचे संघटन करणे.
२. विविध वस्त्यांमधील युवतींशी संपर्क साधून त्यातील किमान ५०० जणींना कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांना कामाच्या संधी उपलब्ध करून देणे.

युवक विभाग

१. पुढील दहा वर्षांमध्ये शालेय व महाविद्यालयीन दलांवर मिळून १२००० सक्रिय युवक विभागाच्या नियमित कामात आणणे
२. विविध मार्गांनी विभागात आलेल्या युवकांच्या नेतृत्व प्रशिक्षणाची रचना बसवणे व त्यांना नेतृत्वाच्या संधी उपलब्ध करून देणे.
३. दलांवर वा उपक्रमांत सहभागी होणारे युवकांतून किमान ७५ उत्तरदायी व प्रतिज्ञित कार्यकर्ते तयार व्हावेत अशा रचना व वातावरण तयार करणे.

युवती विभाग


१. महाविद्यालयीन युवतींसाठी दलाच्या विविध माध्यमांचे (पर्यावरण, कला, क्रीडा, विज्ञान, अभ्यास इ.) प्रयोग करून ती दले स्थिर करणे.
२. दलात सहभागी शालेय, महाविद्यालयीन व प्रौढ युवतींचे परिस्थितीज्ञान, सामाजिक जाणीव व राष्ट्रीयत्वाची जाणीव वाढवणे.