लेख क्र. ४९
२३/०७/२०२५

संत्रिकेचे आणखी एक महत्वाचे सामाजिक कार्य म्हणजे हिंदू बौद्ध समन्वय यात्रा. आग्नेय आशियात भारताचे स्थान मध्यवर्ती असून आर्थिक, सामरिक, राजनैतिक दृष्टीने अशासकीय प्रयत्नातून ते बळकट करण्याच्या दृष्टीने या कामाचा प्रारंभ २००५ साली विश्व बौद्ध संस्कृति प्रतिष्ठान, विश्व हिंदू परिषद, आरोग्य निकेतन व ज्ञान प्रबोधिनी या संस्थांनी एकत्र येऊन ‘हिंदू-बौद्ध एकता’ या संदर्भात विचार विमर्श केला. त्यासाठी नेपाळ, भूतान, बांग्लादेश व म्यानमार या बहुसंखीय बौद्धधर्मीय देशात दौरे केले. संत्रिकेशी संबंधित असलेले डॉ. संदीपराज महिंद या दौर्यात सहभागी झाले होते. तसेच पुढचे दोन टप्पे सुद्धा त्यांनी पूर्ण केले, त्यात सिंगापूर, इंडोनेशिया, मलेशिया, जपान, तैवान इ. २३ देशांमध्ये प्रबोधिनीचा परिचय देणे व त्या देशांत स्नेहभाव उत्पन्न करणे हे काम केले. डॉ. संदीपजी यांच्याकडून त्या दौर्याबद्दल ऐकूया.

(डावीकडून) भदंत ज्ञान जगत महाथेरो, आ. महाराजाधिराज श्री. जिग्मे सिंगे वांगचुक् भूतान, डॉ. संदीपराज महिंद, स्वामी विज्ञानानंद, श्री. बाळकृष्ण नाईक