त्रिदशकपूर्ती यशोगाथा २१

ही विहीर गावची मंगल… ज्ञान प्रबोधिनीची कार्यकर्ती, गावात बचत गटाचं काम केलं. आरोग्यासाठी काम केलं… उपचार म्हणून अनेक महिलांची (गर्भाशयाशी निगडीत) दीनानाथला पूर्ण निःशुल्क ऑपरेशन करायला मदत केली. गावातल्या मुलींच्या शिक्षणाला मदत केली, काही नर्स झाल्या. विश्वास वाढत गेला तसं बँक कर्ज घेतलं त्यातून चिखलणीचा ट्रँकर घेतला.. हे सगळं करताना स्वतःमध्ये कुटुंबामध्ये विधायक बदल झाले… हिची मुलगी गावातली पहिली जिने कॉँम्युटर इंजिनिअरिंग पूर्ण करुन पदवी मिळवली!!