गेल्या आठवड्यात शिवापूरला असणाऱ्या राम सीता पुराणिक महिला तंत्रनिकेतनाची क्लिप पाहिली. तिथली प्रमुख स्वाती, गेली १५ वर्ष स्थिर राहून शिवण शिक्षिका म्हणून काम करते आहे. जेव्हा ती शिक्षिका झाली तेव्हा फँशन डिझाईन शिकवणारी शिक्षिकाही शिवापूरत नव्हती. मग प्रशिक्षक प्रशिक्षणापासून आपण सुरुवात केली !! तिने घर/ मुलं सगळं सांभाळून केलं आणि टिकली.. हजारो जणींना तिने कमवते केले. कुटुंबातून पाठिंबाही मिळवला!! स्वातीमुळे अनेक जणींनी उंबरा ओलांडला!! तिच्याच शब्दात ऐकूया यशोगाथा १९