ज्ञान प्रबोधिनी स्त्रीशक्ती प्रबोधन विभागाचे ग्रामीण महिलांसाठी स्वयंरोजगार प्रशिक्षणाचे जे काम चालते ते सगळ्यात प्रभावी आणि परिणामकारक आहे… गेली १० वर्ष स्वयंरोजगाराचे काम करणाऱ्या भारतीताई यांनी आधी केले… मग सांगितले! काम करताना स्वतःच उदाहरण झाल्या… यशस्वी उद्योग करुन दाखवला… कर्ज घेऊन चोख फेडून दाखवलं…. अशी ‘कधीतरी’ लाभार्थी असणारी ताई स्वानुभवानंतर तेच काम करायचे ठरवते तेव्हा कामाची परिणामकारकता बदलते. अशा अनेक जणी आज कामात आहेत… भारतीताई त्यापैकीच एक! मग आर्थिक उपक्रमातून ग्रामीण महिलांमध्ये होणारे बदल त्या अधिकारवाणीने सांगू शकतात… ऐका त्यांच्याच शब्दात