ही कुंदा… २/३०० लोकसंख्येच्या छोट्या धनगर वाडीतली! तिने बचत गटापासून कामाला सुरुवात केली… तिचा स्वतः वरचा विश्वास वाढत गेला मग माझ्या मुलीचं आयुष्य बदललं पाहिजे असा आग्रह धरुन मुलीला ५वी पासून आपल्या वेल्हे निवासात ठेवले… तिच्या गावात ती म्हणजेच ज्ञान प्रबोधिनी.. म्हणून १० वर्षापूर्वी द्वितीय प्रतिज्ञा घेतली. देश सुधारायचा तर सुरुवात गावापासून केली पाहिजे म्हणून ग्राम पंचायत सदस्य झाली आणि वस्तीवर तिच्या प्रयत्नाने वीज आली.. मुलांचं लहानपणापासून शिक्षण झालं पाहिजे म्हणून गावात ७ वर्ष बालवाडी चालवली (आता त्या वयातली मुलेच नसल्याने थांबावे लागले..) खूप धाडस करुन स्वतः यशवंतराव मुक्त विद्यापीठाची १२ वी समकक्ष परीक्षा अभ्यास करुन दिली…पासही झाली!!