प्रबोधिनीत यायचे समर्थ व्हावया
समर्थ मायभूमीला जगी करावया ।। ध्रु. ।।
खेळ खूप खेळुनी सतेज व्हायचे
रोज नवे ज्ञानदिवे चेतवायचे
सुरेख लेखना, उदंड वाचना
स्फूर्ती घेऊ या, या यशाकडेच जाऊ या ।। १ ।।
फूल फूल गुंफुनीच माळ होतसे
थेंब थेंब झेलुनी झरा वहातसे
मोकळ्या मनी, प्रेम फुलवुनी
माळा गुंफू या, या साखळी जोड्या ।। २ ।।
हातचे न हात हे कधी सुटायचे
बिकट वाट ही तरी पुढेच जायचे
ना रुसायचे, सदा हसायचे
गीता गाऊ या, या प्रेरणा घेउया ।। ३ ।।
मान मायभूमिची जगात उंचवू
जेथ जाऊ तेथ तेथ विजय मेळवू
जिद्द जागवू, मशाल पेटवू
ही हाक ऐकून या, या ज्योत घेऊन या ।। ४ ।।