आम्ही जाऊच जाऊ

अदम्य अपुल्या आकांक्षांचे गीत आजला गाऊ
जिथे जायचे ठरले तेथे, तेथे जाउच जाऊ, आम्ही जाउच जाऊ ।। ध्रु. ।।

नवतेजाप्रत नवक्षितिजांच्या दौडत दौडत जाऊ
क्षणभर सांगुनी मनिचे हितगुज स्वप्ने नव रंगवू
नवीन कवने, नव्या कहाण्या नवस्फूर्तीने गाऊ ।। १ ।।

नसति भाषणे जीवन ध्येये ही तर अमुची सारी
यत्न शिंपुनी फुलवू क्षेत्रे कर्तृत्वाची न्यारी
इतिहासाची दिशा पालटू महान मानव घडवू ।। २ ।।

कधी न रुसणे, कधी न रडणे,
ना कधी थकणे, सदा पुढे चालणे
एकचि निश्चय झाला अमुचा राष्ट्र पुन्हा उभविणे
दुर्गमतेची तमा न आम्हा पाऊल पुढेच ठेवू ।। ३ ।।

निश्चय, निष्ठा, नीती यांचे कंकण बांधुन हाती
व्रतस्थ होउनि व्यापुनि टाकू विश्वाच्याही मिती
विश्वविजेते हिंदुराष्ट्र ते पुन्हा जगाला दावू ।। ४ ।।