गर्जोन उठे कथण्याते….

गर्जेन उठे कथण्याते जल आज सप्तसिंधूंचे
आ सिंधु सिंधु धरतीचे हे राष्ट्र हिंदू हिंदूंचे ।। ध्रु. ।।

रडल्या त्या धायी धायी अबला नरनारी जेव्हा
थरथरली तीर्थे गायी धर्मनीति बुडली जेव्हा
तलवार भवानी आई होती ना उठली तेव्हा
धर्माच्या आपत्काळी खड्गाचे कंकण ल्याली
रुधिराची चढली लाली राखिण्या स्वत्व हिंदूंचे ।। १ ।।

स्मरतो ना तेग बहादूर, धर्मवीर नरशार्दुल
गोविन्द गुरू तो शेर पुत्रास घालुनी मोल
‘सर दिया ना दिया सार’ तेजस्वी केले बोल
हा लेख असे रक्ताचा वज्रलेप झाला साचा
हृदयात नित्य जपण्याचा उद्घोष कोटी कंठीचे ।। २ ।।

जखडून शिवाचा छावा औरंगा बोले त्याला
इस्लाम करी स्वीकार झेल वा मृत्यूच्या धावा
जाणून दुष्ट तो कावा प्राणास अर्पिता झाला
ते तेजस्वी बलिदान तुज करिते बघ आव्हान
शाहिरा तुला रे आण गा गीत मुक्त कंठाने ।। ३ ।।

हिंदुत्व घोष जो उठला घनगर्जित झाली वाणी
ध्वज हिंदूंचा फडफडला पुलकित ही झाली अवनी
सन्यस्त वीर धर्माला विभवास नेईया जगती
हे वीर विवेकानंदा हे मूर्तिमंत पुरुषार्था
ही शौर्याची तव गाथा सांगते सप्त खंडात ।। ४ ।।