चैतन्याचे नवे धुमारे
लक्ष-लक्ष हृदयी निर्मू
निवेदितांचे स्वप्न जयस्वी वास्तव होण्या अथक श्रमू॥ध्रु.॥
स्वदेशभाषा, स्वदेशभूषा
आग्रह स्वदेशवृत्तीचा
प्रखर अस्मिता हिंदुभूमीची
गौरव निज आदर्शांचा
कला-शास्त्र अन् साहित्यातून सखोल दृष्टी प्राप्त करू॥१॥
‘परिस्थतीला शरण जाऊनी
कोण कधी विजयी झाले?
एकरूप-एकात्म भारती
हेच एक दैवत अपुले’
निवेदितांचे शब्दतेज हे जन जागविण्या नित्य स्मरू॥२॥
दुर्बलतेला दूर सारूनी
अन्यायाशी झुंज हवी
चिंतन-शिक्षण-प्रबोधनातून
वाट सापडे नित्य नवी
कितीही असूदे प्रवाह बळकट उलट पोहूनी पार करू॥३॥
निवेदितांची अर्पण वृत्ती
अमोघ वाणी-अपार भक्ती
गुरू शिष्येचे नाते उत्कट
अखंड प्रेरक स्त्री शक्ती
अंत:करणी रुजवून सारे संघवृत्तीने मार्ग क्रमू॥४॥