हराळी केंद
केंद्रस्तरावरील उद्दिष्टे
केंद्रस्तरावरील उद्दिष्टे १. मणिपूर येथील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सोयीसाठी सहनिवास चालवणे.२. चैतन्य भुवन येथे विविध शैक्षणिक व क्षमता विकसनाच्या उपक्रमांचे प्रयोग व स्थिरीकरण करणे.३. शेळगी येथील प्रबोधिनीच्या जागेचा विकास करणे व तेथे विविध कार्यदिशांचे उपक्रम सुरू करणे.४. सामाजिक उद्योजकता – किमान 100 विडी कामगार महिलांना आरोग्यास हानिकारक नसलेला रोजगार उपलब्ध करून देणे.५. किशोरी विकास प्रकल्प – वंचित गटांतील विद्यार्थिनींची अध्ययनक्षमता अभिवृद्धी व व्यक्तिमत्त्व विकासासाठी नियमित उपक्रमांची योजना करणे. इतर विभागांची उद्दिष्टे ६. पूर्व-प्राथमिक विभाग – शिक्षण संकल्पातील गुण विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यासाठी अभ्यासपूर्वक मांडणी करून पालक प्रबोधनाची योजना करणे.७. शिशु अध्यापिका विद्यालय – माजी विद्यार्थिनींचे संघटन करणे व त्यांच्या माध्यमातून पूर्व प्राथमिक शाळांचे संपर्क जाळे तयार करणे.८. प्राथमिक विभाग – ८.१ विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कार व मूल्ये जोपासण्यासाठी कृ ती कार्यक्रमाची रचना करणे. ८.२ बालशिक्षण या विषयातील संशोधनासाठी प्रोत्साहनात्मक रचना, क्षमता व व्यवस्था निर्माण करणे.९. माध्यमिक विभाग – नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील आकृ तीबंधाला अनुसरून उच्च माध्यमिकच्या टप्प्याचे वर्ग सुरु करणे.
केंद्रस्तरावरील उद्दिष्टे १. परिसरातील अन्य संस्था व व्यक्तींच्या साहचर्याने विद्यार्थ्यांसाठी अनुभव शिक्षणाचा अभ्यासक्रम तयार करून तो राबवणे.२. पिंपरी–चिंचवड शहरात पर्यावरणविषयक जागृती आणि प्रत्यक्ष उपक्रम राबविणे.३. प्रबोधिनीच्या साळुंब्रे व चिखली येथील केंद्रांवर औपचारिक शिक्षणात आवश्यक ते सहकार्य करणे.४. माध्यमिक आणि महाविद्यालयीन वयोगटाच्या उद्योजकता विकसनाची रचना निर्माण करणे.५. अंतर्गत गुणवत्ता – प्रशासन, व्यवस्थापन व जनसंपर्काच्या रचना स्थिर करणे व व्यावसायिक उत्तमतेसाठी आवश्यक प्रशिक्षण रचना बसवणे. इतर विभागांची उद्दिष्टे ६. प्राथमिक विभाग – शिक्षण संकल्पव्रतातील बारा गुणांच्या विकसनासाठीची रचना प्रयोग करून स्थिर करणे.७. पूर्व-माध्यमिक विभाग – विद्यार्थ्यांचे अध्ययन क्षमतेप्रमाणे गट करून त्यानुसार अध्ययन-अध्यापन व मूल्यमापन पद्धती बसवणे.८. माध्यमिक मराठी विभाग – इ. ८ ते १०वीच्या वर्गांसाठी उदयोन्मुख तंत्रज्ञान या विषयाचा स्वत:चा अभ्यासक्रम तयार करून शिकविणे.९. गुरुकु ल – पंचकोश शिक्षण प्रणालीमधील विविध कोशांच्या मूल्यमापन पद्धतींचे प्रयोग करून त्या रूढ करणे.१०. क्रीडाकु ल – नवीन जागेवर स्थलांतर करून भव्य प्रशिक्षण व संशोधन कें द्र उभारणे.११. अटल धडपडालय – STEM आधारित विना शिक्षक मुक्त प्रयोग केंद्राचेप्रयोग करून त्याची रचना स्थिर करणे.१२. मुक्तिसोपान कला विभाग – भारतीय संगीताच्या मूलभूत संकल्पनांनुसार संगीत व नाट्य या विषयांचा नवीन अभ्यासक्रम कार्यान्वित करणे.१३. युवक विभाग – पिंपरी–चिंचवडच्या दहा नवीन भागांत शालेय व महाविद्यालयीन दलांचा विस्तार करणे.१४. युवती विभाग – पिंपरी–चिंचवड मधील अन्य शाळांमध्ये युवती विभागाचे काम सुरू करणे.१५. पालक महासंघ – ‘प्रबोधक कु टुंब’ ही संकल्पना रुजवून त्या अंतर्गत कु टुंबांनी एकत्र येऊन करायचे विविध उपक्रम परिसरामध्ये रूढ करणे.
ज्ञान प्रबोधिनी प्रशाला १. नवीन जागेत अधिक सुसज्ज व सुनिर्मित वास्तू उभारून स्थलांतर करणे व भौतिक सुविधा व आस्थापना अधिक सुसज्ज व गुणवत्तापूर्ण करणे.२. सर्व प्रकारच्या वंचित गटांतील विद्यार्थ्यांचा समावेश होईल अशा रचना (कार्यपद्धती, अध्यापन पद्धती व आस्थापना) उभ्या करणे.३. विद्यार्थ्यांमध्ये अभिजात अभिरूची-अभिव्यक्तीचे संवर्धन करणे.४. प्रत्येक विद्यार्थ्याच्या सर्वांगीण व्यक्तिघडणीला पूरक असणारी अधिमित्र रचना बसवणे.५. व्यक्तिमत्त्व विकसनाची प्रक्रिया अधिक सखोल व विस्तृ करण्यासाठी नियोजित क्रमिक अनुभवांची रचना बसवणे. स्पर्धात्मक क्षमता संवर्धन केंद्र १. या केंद्राच्या जगभरात कार्यरत असलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचे जाळे सक्षम करणे.२. युवक गटासाठी स्पर्धात्मक अभिवृत्ती मापन व उचित व्यवसाय / सेवा निवड करण्यासाठी सल्ला मार्गदर्शन देणारी आवश्यक रचना बसवणे. छात्र प्रबोधन १. शहरी व ग्रामीण भागातील कु मार वयोगटासाठी नियतकालिकांद्वारा मराठी, इंग्रजी व हिंदी भाषांमधून साहित्यनिर्मिती करणे.२. शालेय विद्यार्थ्यांसाठी नेतृत्वगुण विकसन, स्त्री शक्ती प्रबोधन, राष्ट्रीय एकात्मता व उद्योजकता या विषयासंदर्भातील साहित्य प्रकाशित करणे.३. आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे मासिकातील पूर्वप्रकाशित साहित्य दरवर्षी शहरी, ग्रामीण आणि वंचित गटातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे. शैक्षणिक उपक्रम संशोधिका १. विविध भौगोलिक / आर्थिक / सामाजिक क्षेत्रातील विद्यार्थी गटाच्या व्यक्तिविकासासाठी व्यक्तिमत्त्व विकसन, कौशल्यप्रशिक्षण, प्रज्ञा विकास व नेतृत्वविकसन या सारख्या शैक्षणिक रचनांची व अनुभवसंचांची विद्यार्थ्यांसाठी योजना करणे२. सामाजिक जाणीव संवर्धन व प्रेरणा जागरण या संकल्पनांच्या अभ्यासासाठी शैक्षणिक प्रयोग करणे शैक्षणिक साधन केंद्र १. आभासी प्रयोगशाळा विकसित करून ६ वी ते १० वीतील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ई-प्रात्यक्षिकांची निर्मिती करणे.२. उपलब्ध साहित्यातून सर्व वयोगटातील व्यक्तींच्या भावनिक, सामाजिक, वैचारिक, नैतिक व प्रेरणेच्या विकसनास पूरक अभ्यासक्रम दृक् -श्राव्य माध्यम केंद्राद्वारेनिर्माण करणे. नेतृत्व संवर्धन केंद्र १. वेल्हे येथेप्रशिक्षण कें द्र उभारून शहरी, ग्रामीण व वंचित गटातील किमान ७०० युवक-युवतींसाठी निवासी नेतृत्व प्रशिक्षण कार्यक्रम राबवणे.२. तरुण अध्यापकांमधून ‘अध्यापक नेतृत्व’ तयार होईल व त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुणविकसन करावे यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबवणे.३. नेतृत्व विकसन वर्गांसाठी प्रशिक्षक प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम तयार करून त्याद्वारे ५० जणांच्या प्रशिक्षक गटाची उभारणी करणे.४. केंद्रातील उपक्रम व प्रक्रिया यांवर दहा संशोधन निबंध व दोन प्रबंध तयार करणे. प्रज्ञा मानस संशोधिका १. भारतीय व पाश्चात्य मानसशास्त्राचे अद्ययावत व कालोचित ज्ञान विविध अभ्यासक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना देऊन गुणवत्तापूर्ण कामासाठी प्रेरित करणे.२. संशोधनातून सिद्ध झालेल्या प्रमाणित मानसशास्त्रीय कसोट्या विविध भारतीय भाषांमधे उपलब्ध करून देणे व त्यांचा व्यापक उपयोग, प्रसार करणे.३. विविध सामाजिक स्तरातील व वयोगटातील मुले आणि प्रौढ व्यक्तींच्या समस्यांच्या निराकरणासाठी प्रभावी समुपदेशनाची रचना बसवणे.४. विविध आस्थापनांमध्ये संस्थात्मक वातावरण सक्षम करण्यासाठी आधुनिक मानसशास्त्रीय तंत्रे व पद्धतींच्या वापरासंबंधी रचना तयार करणे. संस्कृत संस्कृति संशोधिका १. विविध भाषिक, सामाजिक, सांस्कृतिक, प्रांतिक, धार्मिक समाजगटांना पौरोहित्य संस्कारांंद्वारे प्रभावी पद्धतीने जोडणे.२. ‘धर्मसंस्थापना’ तत्त्वाची प्रभावी ओळख करून देणारे वीस अधिमित्र पुरोहित तयार करणे. नैसर्गिक संसाधने केंद्र १. सौर पॅनेल्स व सौर दिव्यांची निर्मिती करणे, प्रशिक्षण देणे व प्रसार करणे सामाजिक शास्त्र अध्ययन केंद्र १. सम्यक् विकासाचा परिप्रेक्ष्य / दृष्टीकोन देणारी विचारसरणी म्हणून आध्यात्मिक राष्ट्रयोगाची मांडणी करणे. स्त्री शक्ती प्रबोधन – ग्रामीण १. ग्रामीण स्त्रियांमध्ये स्वतःच्या आरोग्याविषयी जागरुकता येण्यासाठी वेल्हे तालुक्यात चालू असलेल्या कामाचा भोर तालुक्यात विस्तार करणे.२. ग्रामीण भागातील वंचित स्त्रियांसाठी (एकल महिला, कातकरी समाज) सुरू असलेल्या कामाचा संख्यात्मक व गुणात्मक विस्तार करणे.३. ग्रामीण भागातील मुली व युवतींचेकिशोरी / युवती विकास, नवचैतन्य दल इ. उपक्रमांद्वारे संघटन व समूहगुणविकसन करणे. स्त्री शक्ती प्रबोधन – शहरी १. संवादिनीच्या माध्यमातून संपर्कात येणाऱ्या महिलांचे संघटन करणे व त्यांची कार्यकर्ता ते नेतृत्व घडण ही प्रक्रिया अधिक समृद्ध करणे.२. विविध वयोगटातील महिलांचे मानसिक आरोग्य जोपासण्यासाठी ठोस प्रयत्न करणे३. सुदृढ समाजघडणीसाठी विविध वयोगटांसाठी जीवनकौशल्य विकासाची आणि प्रबोधनात्मक उपक्रमांची मांडणी व प्रसार करणे. नागरीवस्ती अभ्यासगट १. महिला सहविचार गटामार्फत विविध वस्त्यांतील १०,००० महिलांशी संपर्क व संवाद करणे व त्यातील ३००० महिलांचे संघटन करणे.२. विविध वस्त्यांमधील युवतींशी संपर्क साधून त्यातील किमान ५०० जणींना कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांना कामाच्या संधी उपलब्ध करून देणे. युवक विभाग १. पुढील दहा वर्षांमध्ये शालेय व महाविद्यालयीन दलांवर मिळून १२००० सक्रिय युवक विभागाच्या नियमित कामात आणणे२. विविध मार्गांनी विभागात आलेल्या युवकांच्या नेतृत्व प्रशिक्षणाची रचना बसवणे व त्यांना नेतृत्वाच्या संधी उपलब्ध करून देणे.३. दलांवर वा उपक्रमांत सहभागी होणारे युवकांतून किमान ७५ उत्तरदायी व प्रतिज्ञित कार्यकर्ते तयार व्हावेत अशा रचना व वातावरण तयार करणे. युवती विभाग १. महाविद्यालयीन युवतींसाठी दलाच्या विविध माध्यमांचे (पर्यावरण, कला, क्रीडा, विज्ञान, अभ्यास इ.) प्रयोग करून ती दले स्थिर करणे. २. दलात सहभागी शालेय, महाविद्यालयीन व प्रौढ युवतींचे परिस्थितीज्ञान, सामाजिक जाणीव व राष्ट्रीयत्वाची जाणीव वाढवणे.
राष्ट्रीय एकात्मता कार्यदिशा (देशासमोर असलेल्या सामाजिक एकात्मतेपुढील आव्हाने समजून घेऊन त्यांवर संशोधन करण्यापासून (research in social studies), संवाद प्रस्थापित करू पाहणारा व त्यासाठी सामाजिक – सांस्कृतिक)देवाण-घेवाण (social and cultural exchanges) घडवणारा गट)१. समाजामधली राष्ट्रीय एकात्मतेची जाणीव जागृत, दृढ आणि वृद्धिंगत करण्यासाठी सांस्कृतिक देवाण-घेवाणीच्या व एकात्मतेच्या सामूहिक प्रकटीकरणाच्या रचना बसवणे व रूढ करणे.२. राष्ट्रीय एकात्मतेसाठी काम करणारे नेतृत्व विकसित करण्यासाठी कौशल्य व वृत्तीघडणीच्या प्रक्रिया विविध वयोगटांसाठी निर्माण करणे व राबवणे.३. ज्ञान प्रबोधिनीच्या ‘आध्यात्मिक राष्ट्रयोग’ या विचारसरणीचा अभ्यास करून त्या आधारे राष्ट्रकारणाच्या विविध आयामांची मांडणी करणे.४. प्रबोधिनीतील तसेच बाहेरील गटाची राष्ट्रीय एकात्मतेची समज उद्दिष्टप्रधान कार्य दिशा उद्दिष्टे प्रवास व प्रशिक्षण वर्गांद्वारे वाढवणे.५. सीमावर्ती राज्यांतील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी प्रबोधिनीच्या केंद्रांवर सुरक्षित व सुस्थिर रचना निर्माण करणे.६. भारताच्या विविध राज्यांतील संस्कृती, त्यांचा इतिहास व तेथील प्रश्न यांच्या अभ्यासाची रचना सुस्थिर करणे.७. राष्ट्रीय एकात्मता या हेतूने काम करणार्या अन्य संघटनांबरोबर साहचर्य वाढवणे व एकत्र कामाच्या संधी शोधणे.८. ज्ञान प्रबोधिनीतील विविध विभाग व केंद्रांच्या साहचर्याने तेथील लोकसंस्कृतीचा आणि विविध समाजगटांच्या संस्कृतीचा अभ्यास करणे.९. भारताच्या वेगवेगळ्या प्रांतातील सांस्कृतिक वैशिष्ट्ये आणि विविध भारतीय सण, उत्सव, संस्कार यांचा बृहद॒कोश तयार करणे. स्त्री-शक्ती प्रबोधन कार्यदिशा (महिलांचा आत्मसन्मान वाढावा, त्यांनी संपूरक समानतेच्या संधी कामाद्वारे मिळवाव्यात, यासाठी त्यांचे प्रेरणाजागरण व क्षमतासंवर्धन करणे. अशा प्रकारच्या कामाची धोरणनिश्चिती)१. प्रबोधिनीची स्त्री शक्ती प्रबोधन संकल्पना विभाग व केंद्र स्तरावर अभ्यासणे.२. बदलत्या सामाजिक परिस्थितीच्या परिप्रेक्षात स्त्रियांचे प्रश्न समजून घेणे व त्याबाबत प्रबोधिनीची भूमिका मांडणे.३. नव्याने सुरू होणार्या केंद्रांवर स्त्री शक्ती प्रबोधन संकल्पना रुजण्यासाठी विविध उपक्रम आयोजित करणे.४. ग्रामीण स्त्रियांचे आर्थिक स्वावलंबन व नेतृत्वाच्या क्षमता वाढवण्यासाठी उपक्रम व प्रशिक्षणाची सुनियोजित रचना बसवणे.५.शहरी स्त्रियांमधील आत्मभान आणि आत्मसन्मानाची भावना बळकट करण्यासाठी संवादिनीचे व्यासपीठ अधिक बळकट व समृद्ध करणे. युवशक्ती प्रबोधन कार्यदिशा (वय वर्षे १६ ते ३० या युवक वयोगटात प्रबोधिनीशी नाते जोडले जाणाऱ्या युवक-युवतींचे प्रेरणाजागरण व क्षमता संवर्धन करणे. अशा प्रकारच्याकामाची धोरणनिश्चिती)१. विविध समाजगटांमध्ये पोचून तेथील युवकशक्ती जागृत करणारी व तिला प्रबोधिनीच्या कामात आणू शकणारी संपर्क यंत्रणा निर्माण करणे.२. उद्योजकतेद्वारे नीतिमंत श्रीमंती निर्माण करणाऱ्या आणि त्यातून देशप्रश्न सोडवू पाहणाऱ्या युवकांचे साहचर्य जाळे बळकट करणे.३. युवा गटामध्ये देशप्रश्न व त्यांचे विविध आयाम याबाबत जाणीव -जागृती करणे व त्यावर काम करण्याची प्रेरणा देण्याची रचना बसवणे.४. अभिवृत्ती चाचणीच्या आधारे आवश्यक क्षमता आणि वृत्ती संवर्धनाचे प्रशिक्षण देऊन त्याद्वारे अर्थपूर्ण सामाजिक करियरच्या संधी देणे.५. प्रबोधिनीच्या नियमित संपर्कातील युवक-युवतींचे व्यक्तिमत्त्व विकसन आणि नेतृत्व संवर्धन यांसाठीच्या अभ्यासक्रमांची रचना बसवणे. नेतृत्वगुण विकसन कार्यदिशा (विविध वयोगटातील कार्यकर्त्यांमधील व विद्यार्थ्यांमधील नेतृत्वगुण (Leadership Qualities: Abilities & Attitudes) विकसित होणे, यात कोणकोणत्या अडचणी येतात, त्यांच्यावर उपाय कसे काढावे, यासाठी धोरणनिश्चिती)१. सामाजिक प्रश्नांवर जबाबदारी घेऊन काम करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी नेतृत्व विकसनाचा अभ्यासक्रम व त्याच्या प्रक्रिया निर्माण करणे व त्यातून सामाजिक क्षेत्रातील नेतृत्वाचे नमुने उभे करणे.२. विविध क्षेत्रांमध्ये संघटनात्मक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी प्रशिक्षणाची प्रारूपे तयार करून किमान पाच संघटनांमध्ये त्याचे प्रयोग करणे.३. ज्ञान प्रबोधिनीतील दुसर्या फळीतील कार्यकर्त्यांच्या नेतृत्वगुण प्रशिक्षणाची योजना मध्यवर्ती रचनेच्या मदतीने करणे.४. नेतृत्व विकसनाच्या संदर्भातील विविध विषयांवर अभ्यास व साहित्य निर्मिती करणे.५. प्रबोधिनीबाहेरील गटांसाठी नेतृत्वगुण विकसनाच्या अनुभव व प्रशिक्षणाची योजना करणे. समूहगुण विकसन कार्यदिशा (कार्यकर्त्यांना एकमेकांसह गटात दीर्घ काळ काम करणे, कार्य पद्धती समजून घेता येणे व प्रेरणा टिकवता येणे यात कोणकोणत्या अडचणी येतात, त्यांच्यावर उपाय कसे काढावे, यासाठी धोरणनिश्चिती)१. प्रबोधिनीतील विविध ठिकाणची नेतृत्व बदलाची प्रक्रिया सुरळीत व्हावी यासाठी विविध विभागांतील जबाबदार व नवीन सदस्यांच्या समूहगुण प्रशिक्षणांसाठी पथशोधक प्रकल्प करणे.२. विभागातील सदस्यांसाठी प्रबोधिनी परिचयाच्या (व्यक्ती / रचना / कार्य पद्धती / विचार) रचना बसवणे व त्या विभाग / केंद्रांकडे हस्तांतरित करणे.
उद्दिष्टप्रधान कार्यदिशा उद्दिष्टे Read More »
औपचारिक माध्यमिक शिक्षण कार्यदिशा (प्रबोधिनीच्या पाच माध्यमिक शाळांमधून चाललेल्या औपचारिक माध्यमिक शिक्षणाच्या (Formal Secondary Education) कामासाठी धोरणनिश्चिती)१. ज्ञान प्रबोधिनीच्या औपचारिक शिक्षण रचनांमध्ये त्रिवेणी शिक्षणपद्धतीचे प्रयोग करणे आणि प्रबोधिनीची शिक्षणप्रणाली सिद्ध करणे.२. ज्ञान प्रबोधिनीच्या शाळा त्यांची उद्दिष्टे व बदलती परिस्थिती यानुसार गुणवत्तेने समृद्ध करणे.३. विद्यार्थ्यांमध्ये स्वयं अध्ययन कौशल्य व वृत्ती विकसित करण्यासाठी प्रशिक्षण व सरावाची स्थिर रचना बसवणे.४. विद्यार्थ्यांसाठी विचारकौशल्यांचा बहुस्तरीय अभ्यासक्रम तयार करून कार्यान्वित करणे.५. विद्यार्थ्यांच्या व्यावहारिक व तांत्रिक कौशल्य विकसनासाठी गुणवत्तापूर्ण प्रशिक्षणाची रचना बसवणे.६. शालेय विद्यार्थ्यांच्या नेतृत्वगुण विकसनासाठी प्रशिक्षण व उपयोजनाच्या रचनाबद्ध संधी उपलब्ध करून देणे.७. विद्यार्थ्यांना त्यांच्या अभिरुची व क्षमतांनुसार शिकण्याच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी मुक्त शिक्षणातील विविध प्रयोग करणे.८. अध्यापन प्रक्रिया प्रभावी होण्यासाठी अध्यापकांच्या प्रशिक्षण व क्षमतासंवर्धनाच्या रचना बसवणे.९. प्रबोधिनीतील शैक्षणिक प्रक्रियांचे दस्तऐवजीकरण करून त्याच्या मूल्यमापन, संशोधन व उपयोजनाच्या पद्धती बसवणे. प्राथमिक व पूर्वप्राथमिक शिक्षण कार्यदिशा (प्रबोधिनीच्या तीन प्राथमिक शाळा व अनौपचारिक शैक्षणिक प्रयोगांमध्ये प्राथमिक व पूर्वप्राथमिक गटासाठीच्या (Formal and Informal Pre-Primary and Primary Education) कामासाठी धोरण-निश्चिती)१. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ‘पंचकोश विकसन’ या संकल्पनेवर आधारित शिक्षण प्रणालीचे प्रयोग करणे.२. या वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणसंकल्प व्रत आणि विद्यारंभ ह्या संस्कारांचे प्रयोग करून ते सिद्ध करणे.३. प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी सर्वंकष मूल्यमापनाचे निकष निश्चित करणे व त्यासाठीची साधने तयार करणे.४. या वयोगटातील मुलांच्या विकास प्रक्रियेत पालकांचा कृतिशील सहभाग वाढवणे.५. मूलभूत भाषिक कौशल्ये आणि गणितीय क्षमतांच्या वाढीसाठी उपक्रमांची रचना तयार करणे.६. अध्यापक प्रशिक्षणाच्या माध्यमातून प्रबोधिनीच्या शास्त्रशुध्द बालशिक्षण पद्धतीचा प्रचार व प्रसार करणे शिक्षण विस्तार कार्यदिशा (प्रबोधिनीच्या शैक्षणिक प्रयोगांचा वापर अन्य संस्था व शैक्षणिक रचनांनी अथवा अनौपचारिक गटांनी करावा, यासाठी धोरण निश्चिती.)१. संकल्पना अध्यापनासाठी, प्रक्रियाप्रधान शिक्षणाची रचना सिद्ध व्हावी म्हणून ज्ञान प्रबोधिनीमध्ये सिद्ध झालेले नाविन्यपूर्ण प्रयोग, अनुभव संच व शैक्षणिक रचना अन्य शाळांमध्ये ही सुरू व्हावेत यासाठी प्रशिक्षण व प्रसाराची योजना राबवणे.२. प्रबोधिनीच्या शाळांमधील शैक्षणिक प्रयोगांच्या प्रचारासाठी साहित्यनिर्मिती करणे.३. पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक शिक्षणात ज्ञान प्रबोधिनीत झालेल्या शैक्षणिक प्रयोगांचा अन्य शैक्षणिक संस्थांमध्ये विस्तार करणे.४. ‘पंचकोश विकसन’ या संकल्पनेवर आधारित शिक्षण प्रणालीच्या प्रचार व प्रसाराची रचना निर्माण करणे.५. कुमार वयोगटासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला पुढावा देणाऱ्या साहित्याची निर्मिती मराठी, इंग्रजी व हिंदी भाषांमधून करणे.६. विद्यार्थ्यांमध्ये स्वयंविकासाची प्रेरणा जागावी व समाजभान वाढावे यासाठी वाचनसाहित्या धारित सहा उपक्रमांचे विस्तारक्षम नमुने उभे करणे.७. शैक्षणिक साधन केंद्राद्वारा निर्मित विविध साधनांचा वापर वाढावा यासाठी त्यांच्या प्रशिक्षण व प्रसाराची यंत्रणा बळकट करणे.८. सात ते सोळा वर्षे वयोगटातल्या विद्यार्थ्यांच्या विविध क्षमतांचा सर्वांगीण विकास करणे व त्यासाठी त्यांच्या भोवतालचा परिवेष सक्षम करणे.९. वंचित समाजगटांतील उच्च क्षमतावान विद्यार्थ्यांच्या क्षमता अभिवृद्धीसाठीच्या ‘प्रज्ञा विकास’ उपक्रमाचा विस्तार व प्रसार करणे. संशोधन कार्यदिशा (प्रबोधिनीच्या दोन संशोधिका व अन्य विभागांमध्ये चाललेल्या वेगवेगळ्या संशोधनावरील आणि संशोधनाच्या प्रक्रियांसाठी धोरण निश्चिती)१. प्रबोधिनीच्या गाभ्याच्या विषयांतील संशोधन पुढे नेण्यासाठी सर्व संशोधिकांच्या सहभागाने संशोधनाची उद्दिष्टे (आशय व प्रक्रिया) ठरवणे.२. समान संशोधन विषयांत रुची असणाऱ्या बाहेरील संस्था व अन्य विद्यापीठे यांच्याशी समन्वय व साहचर्य करणे.३. मानसशास्त्रातील मूलभूत / उपयोजि त संशोधनाला आवश्यक वृत्ती व कौशल्ये वाढवण्यासाठी व्यासपीठ निर्माण करणे.४. प्रबोधिनीच्या अन्य विभागांमध्ये कामाशी संबंधित कृती संशोधन व्हावे यासाठी प्रोत्साहन व मार्गदर्श न देणारी रचना निर्माण करणे.५. ज्ञान प्रबोधिनीच्या संशोधन कामामागील भूमिका व प्रवास मांडणारा संशोधन खंड तयार करणे.६. विविधांगी बुद्धिमत्ता, सकारात्मक मानसशास्त्र, जीवनगुणवत्ता, प्रेरणा, मानवी विविधता या विषयांवरील मूलभूत व उपयोजित संशोधन करणे.७. भारतीय मानसशास्त्र व संत साहित्य यांच्या अभ्यासातून प्रौढांमधील जीवनविषयक सकारात्मक दृष्टी जोपासण्यासाठी प्रयत्न करणे.८. जैवतंत्रज्ञान विषयातील कामाचा संशोधनात्मक विस्तार करणे. प्रदेशविकसन कार्यदिशा (पाणी, शेती, सौरऊर्जा , कचऱ्याच्या जळणकांड्या (pellets) इ. नैसर्गिक व पुनर्नवीकरणासाठी योग्य अशा संसाधनांचा योग्य वापर होण्यासाठी उपक्रम कसे आखावेत व काम कसे वाढवावे यासाठी धोरणनिश्चिती)१. पाणी, शेती, उर्जा व तंत्रशिक्षण या विषयांवर प्रतिसादी व पुढाकार घेणाऱ्या गावांमध्ये प्रबोधिनीच्या विविध केंद्रांच्याद्वारे काम करणे.२. टंचाई ग्रस्त गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी विहीर खोलीकरण, फेरो-सिमेंट टाकी उभारणी इ. कामे करणे.३. सौर तंत्रज्ञानाद्वारे पॅनेल्स व सौर दिव्यांची निर्मिती करण्याचे प्रशिक्षण देणे व त्याचा प्रसार करणे.४. साळुंब्रे, शिवापूर व हराळी या केंद्रांवर स्थानिक परिस्थितीनुसार तंत्रशिक्षणाच्या रचना उभ्या करणे व चालवणे.५. भूजल विषयातील उपयोजित तज्ज्ञता मिळवून त्याआधारे गावांचा सहभागी भूजल व्यवस्थापनाचा कृती आराखडा तयार करणे.६. सामूहिक शेतीची संकल्पना शेतकऱ्यांनी स्वीकारावी यासाठी त्यांना प्रेरणा व प्रशिक्षण देणे.७. हवामान बदलाला प्रतिसाद म्हणून पर्यावरणपूरक शाश्वत शेतीतील विविध तंत्रांचे प्रयोग करून त्यांचा परिसरात प्रसार करणे.
कार्यप्रधान कार्यदिशा उद्दिष्टे Read More »
विस्तार साध्यसूत्रात म्हटल्याप्रमाणे ज्ञान प्रबोधिनीच्या कामाचा देशात आणि राज्यातविस्तार हीच पुढील दहा वर्षांतील कामाची मुख्य दिशा राहणार आहे. हे साध्य करण्यासाठी पुढील उद्दिष्टे मांडली आहेत : १. महाराष्ट्राच्या सर्व प्रशासकीय विभागांतील प्रत्येकी तीन जिल्ह्यांमध्ये विस्तार केंद्रे सुरू करणे. यातील प्रत्येकी एका जिल्ह्यात मनुष्यघडणीचे केंद्र आस्थापनेसह स्थिर करणे.२. देशातील सहा राज्यांमध्ये स्थायी संपर्क केंद्र निर्माण होणे. २.१ युवक विभाग, पुणे – सहा राज्यांमध्ये (जम्मू-काश्मीर, पंजाब, लडाख, छत्तीसगड, ओडिशा, मध्य प्रदेश, झारखंड, आसाम, अरुणाचल, मणिपूर, कर्नाटक, गुजरात यापैकी) संपर्क व उपक्रमांच्या रचना बसवणे. २.२ सोलापूर केंद्र – कर्नाटक राज्यामध्ये कलबुर्गी या गावी प्रबोधिनीचे विस्तार केंद्र उभे करणे. २.३ सीमावर्ती व समस्याग्रस्त राज्यांमध्ये अन्य भारतीयांशी चांगला संपर्क प्रस्थापित करणे.३. सीमावर्ती व समस्याग्रस्त राज्यांमधील कामांसाठी प्रबोधिनीच्या सर्व केंद्रांवर संपर्क यंत्रणा निर्माण करणे.४. संकल्पना अध्यापनासाठी ज्ञान प्रबोधिनीतील अनुभवसंचाचा आणि शैक्षणिक रचनांचा देशभरातील अन्य शैक्षणिक संस्थांमध्ये स्थानिक गरजांनुसार विस्तार करणे.५. आरोग्य क्षेत्रातील प्रबोधिनीच्या प्रदीर्घ अनुभवाच्या आधारे आरोग्य आणि स्वास्थ्य या नवीन कार्यदिशेने काम सुरू करून त्याच्या माध्यमातून काही पथदर्शक प्रकल्प करून पाहणे.६. उद्योजकता विकास या नवीन कार्यदिशेने काम सुरू करून त्या अंतर्गत युवक – युवती गटांमध्ये उद्योजकतेसाठी आवश्यक क्षमता, कौशल्ये, वृत्ती आणि प्रेरणेचे संवर्धन करणे, तसेच नव्याने उद्योजक बनू इच्छिणाऱ्या युवक-युवतींचे कल्याणमि त्रांच्या माध्यमातून मार्गदर्शन करणे. समावेशकता ७. सर्व जाति धर्म आणि समाजगटांतील विविध प्रकारच्या उच्च क्षमतावान व्यक्तींचा शोध घेणे, त्यांच्या क्षमताचे संवर्धन करणे आणि त्यांना राष्ट्रउभारणीसाठी प्रेरित करणे ही प्रक्रिया अधिक व्यापक व गतिमान करणे. ७.१ विविध वंचित समाज गटातील (नागरीवस्ती, कातकरी वस्ती, तांडे, इ.) मुले-मुली (५वी ते १०वी युवक-युवती, महिला/ पुरुषांच्या व्यक्तिमत्त्व विकसन आणि आर्थिक स्थैर्यासाठी संधी व रचना निर्माण करणे. ७.२ समाजात विविध कारणांनी वंचित राहिलेल्या महिलांची जीवन गुणवत्ता सुधारणे. ७.३ किशोरी विकासप्रमाणे १२ ते १६ वर्षे वयोगटातील ग्रामीण भागातील मुलांसाठी किशोर विकास कार्यक्रम प्रयोग आणि संशोधनाने सिद्ध करून त्याचा विस्तार करणे.८. विविध भौगालिक / आर्थिक / सामाजिक क्षेत्रातील विद्यार्थी गटासाठी काम करणाऱ्या शैक्षणिक रचनांमध्ये ज्ञान प्रबोधिनीचे व्यक्तिमत्त्व विकसनाचे उपक्रम रुजवणे.९. आत्मसम्मान, प्रतिनिधित्व, संधींची समानता या संदर्भातील स्त्री प्रश्नांविषयीची युवकांची जाणीव व संवेदनशीलता वाढवणे.१०. ग्रामीण व निमशहरी भागातील रोजगाराच्या संधी ओळखून परिसरातील युवक-युवतींसाठी व्यवसाय प्रशिक्षण केंद्राद्वारा नियमित गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण उपलब्ध करून देणे. नवोन्मेषता ११. नवीन राष्ट्रीय धोरणात दिलेल्या आकृति बंधानुसार प्रबोधिनीतील माध्यमिक शाळांमध्ये ९वी ते १२वी या टप्प्यासाठीची पूर्वतयारी करणे.१२. मुक्त शिक्षण’ या संकल्पनेचा अभ्यास करणे व पथदर्शक प्रकल्प करून त्याची देशकालसुसंगत आवृत्ती तयार करणे.१३. अध्यापकांच्या व्यक्तिमत्त्व विकसनासाठी आचार्य व्रताची संकल्पना रुजविणे.१४. गुणवत्तापूर्ण, आंतर-सांस्कृतिक, अत्याधुनिक, समकालीन, संदर्भपूर्ण, भविष्यवेधी, आंतरविद्याशाखीय / बहुविद्याशाखीय / क्रांतविद्याशाखीय संशोधनासाठी प्रोत्साहनात्मक रचना, क्षमता व व्यवस्था निर्माण करणे.१५. प्रदेश विकसनासाठी गावसमूह हे एकक धरून त्याअंतर्गत केल्या जाणाऱ्या विकास कामांचे नियोजन व कार्यवाही करण्यासाठी सक्षम व प्रेरणासंपन्न स्थानिक कार्यकर्त्यांचे गट उभे करणे. प्रभाव १६. ज्ञान प्रबोधिनीची प्रक्रियाप्रधान शिक्षण पद्धती, भारतीय शिक्षण विचारासह भारतभरातील विद्यार्थ्यांच्या वृत्ती घडणीसाठी व प्रेरणा जागरणासाठी वापरली जावी, यासाठी अंतर्गत प्रयोग, सैद्धांतीकरण आणि प्रचार करणे.१७. विद्यारंभ, विद्याव्रत, वीरव्रत या विद्यार्थी घडणीच्या संस्कारामध्ये वेगवेगळे प्रयोग करून वीरव्रताची प्रक्रिया दृढ करणे.१८. शुभगुणांच्या जोपासनेतून भारतीय मानसशास्त्रातील विचारशील स्वावलंबी व्यक्ती, संस्कारित कुटुबं , सुगठित समाज याविषयीचे संशोधन व उपयोजन करणे.१९. प्रबोधक कुटुबं ही सकंल्पना सरुुवातीला पालक व सदस्य गटामध्ये आणि नंतर परिसरातील इतर परिवारांमध्ये रुजवणे. अंतर्गत गुणवत्ता २०. प्रत्येक विभाग व केंद्रात स्थानिक कार्यकर्त्यांच्या पुढील दोन फळ्या कायम तयार करण्यासाठीची कार्यपद्धती बसवणे.२१. प्रबोधिनीच्या संस्थात्मक कामाच्या गुणवत्तेचे आणि परिणामकारकतेचे स्वतःचे निकष सिद्ध करून त्या आधारे अंतर्गत आणि बाह्य परीक्षणाची नियमित रचना बसवणे.२२. कार्यविस्तारासाठी आवश्यक भौतिक सुविधा सुनियोजित आराखड्यानुसार उभारणे व विस्तारणे.२३. आधुनिक तंत्रज्ञान व समाजमाध्यमे यांच्या प्रभावी वापरासाठी प्रशिक्षण व उपयोजनाची मध्यवर्ती व्यवस्था करणे . आणि बाह्यपरीक्षणाची नियमित रचना बसवणे .
मध्यवर्ती उद्दिष्टे Read More »
ज्ञान प्रबोधिनीच्या तिसऱ्या भवितव्यलेखाचे साध्यसूत्र महाराष्ट्राच्या सहा प्रादेशिक विभागांमध्ये ज्ञान प्रबोधिनीची मनुष्यघडणीची केंद्रे आस्थापनेसह सुस्थिर करणे आणि भारताच्या सहा राज्यांमध्ये विस्तार केंद्रे स्थापन करणे. साध्यसूत्राचे स्पष्टीकरण १. हा विस्तार करताना समावेशकता (inclusion), नवोन्मेषता (innovation), सेतुबंधन (integration) आणि प्रभाव (impact) ही मार्गदर्शक तत्त्वे असतील. २. मनुष्यघडणीचे केंद्र क्षमता आणि कौशल्यविकसनाच्या बरोबरीने वृत्तिघडण आणि प्रेरणाजागरण करणारे व त्यातून कर्तृत्व आणि नेतृत्व विकसित करणारे केंद्र. ३. विस्तार केंद्र स्थानिक संयोजक व कार्यकर्त्यांच्या गटातर्फे प्रबोधिनीचे अनौपचारिक पूरक शिक्षणाचे उपक्रम, युवक-युवतींचे संघटन, सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचे उपक्रम केले जातात असे केंद्र. ४. समावेशकता (Inclusion) – सर्व जाति धर्मांचे तसेच आर्थिक व रहिवासाचे समाजगट आणि सर्व वयोगटांमधील स्त्री-पुरुषांसाठी विस्तार करणे. ५. नवोन्मेषता (Innovation) – सर्वांमधील शैक्षणिक बुद्धिमत्तेच्या (academic intelligence) पलीकडच्या बुद्धिमत्तेच्या व व्यक्तिमत्त्वाच्या इतर पैलूंमधील उच्च क्षमतांचा शोध घेणे, त्यांचा विकास करणे आणि समाजपरिवर्तनासाठी त्यांना प्रेरित करणे. ६. सेतुबंधन (Integration) – व्यक्ती, काम, तत्कालीन उद्दिष्ट, उपक्रम या सर्वांमधील वैविध्य समजून घेत, जपत, त्याचा आदर करणे. मुळात एकच असलेल्या समान राष्ट्रीयत्वाची आठवण देणे राष्ट्र घडणीच्या समान ध्येयासाठी संवाद साधत, समन्वय करत, संघटित काम करणे ७. प्रभाव (Impact) – सध्याच्या आणि नवीन ठिकाणी प्रबोधिनीचे कार्य सुस्थिर होऊन सदस्यांचे वैयक्तिक व सामूहिक कर्तृत्व आणि नेतृत्व समाजाला आश्वासक, अभिमानास्पद तसेच स्वीकारार्ह वाटणे
ज्ञान प्रबोधिनीने स्वतःसमोर राष्ट्रघडणीचे मोठे आणि व्यापक ध्येय ठेवले आहे. त्यामुळे राष्ट्रजीवनाच्या विविध अंगांनी इथे काम केले जाते, त्यांना कार्य दिशा असे म्हटले आहे. सध्या अशा एकूण अकरा दिशांनी काम चालू आहे. कार्यप्रधान कार्यदिशा देशाच्या विकासात थेट योगदान देतात तर उद्दिष्टप्रधान कार्यदिशा व्यक्ती आणि समाज घडवण्याचे काम करतात. प्रबोधिनीच्या वेगवेगळ्या केंद्रांवर आणि विभागांत एकाच कार्य दिशेने काम करणारे सदस्य अनुभवांची देवाणघेवाण करण्यासाठी आणि पुढील कामाची दिशा ठरवण्यासाठी नियमित एकत्र चर्चा करतात.