ग्रामविकसन

हराळी कृषी पदविका विद्यालय

वा. लताताई भिशीकर कृषी विद्यालयाची सुरुवात फेब्रुवारी २००४ मध्ये मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. वि. मो. पवार हराळीची शेती पाहायला नि शेतकरी मेळाव्यात मार्गदर्शन करायला आले होते. तेव्हा चर्चेत आपण कृषी पदविका विद्यालय सुरू करावं असं बोलणं झालं. त्यानुसार आपण सर्व पूर्तता करून विद्यापीठाकडे अर्ज पाठविला. पदविका विद्यालय सुरू करण्यासाठी संस्थेकडे ५० एकर जमीन लागते. […]

हराळी कृषी पदविका विद्यालय Read More »

कृषी तांत्रिक विद्यालय, शिवापूर

संजीव तागडे रोजगाराच्या शोधात शहराकडे स्थलांतर : भारत हा कृषिप्रधान देश आहे. देशातील ७०% जनता खेड्यांमध्ये राहते. खेड्यांमध्ये बहुसंख्य लोक शेती आणि शेतीवर आधारित व्यवसायावर अवलबून आहेत. खरीपाच्या हंगामात पावसाने कृपा केली तर वर्षाचं अन्नधान्य तरी मिळतं; पण उरलेल्या वर्षात उद्योग काय करणार? मग चला वाहतूक व्यवसायात ड्रायव्हर म्हणून! नाही तर शहरात मिळेल ते काम

कृषी तांत्रिक विद्यालय, शिवापूर Read More »

भावी प्रशासकीय अधिकाऱ्यांचा ग्राम अभ्यास

विवेज कुलकर्णी पार्श्वभूमी : स्पर्धा परीक्षा केंद्र हा ज्ञान प्रबोधिनीच्या शिक्षण प्रभागातील एक विभाग. केंद्र व राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचे मार्गदर्शन या विभागातून केले जाते. गेल्या १७ वर्षांत या परीक्षा केंद्राचे शेकडो विद्यार्थी अधिकारपद मिळवून परदेशात, विविध राज्यांमध्ये व महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये उत्तम काम करीत आहेत. सुशासनाच्या माध्यमातून विषमता कमी करून समतोल व सर्वसमावेशक विकास

भावी प्रशासकीय अधिकाऱ्यांचा ग्राम अभ्यास Read More »

साळुंब्रे : शिक्षणातून ग्रामविकासाचा प्रयोग

व्यंकटराव भताने शाळेची सुरुवात : जून १९९१ मध्ये प्रबोधिनीच्या ग्रामविकसन कार्याला आणखी एक धुमारा फुटला, तो म्हणजे ग्राम प्रबोधिनी विद्यालय, साळुंब्रे. प्रबोधिनीच्या पुण्यातील शैक्षणिक कार्याचा नैसर्गिकरित्या ग्रामीण विस्तार जसा शिवगंगा आणि गुंजवणी नद्यांच्या खोऱ्यांमध्ये झाला तसाच निगडी येथील शैक्षणिक कार्याचा नैसर्गिक ग्रामीण विस्तार पवना नदीच्या खोऱ्यात साळुंब्रे व अन्य खेड्यांमध्ये झाला. पुणे जिल्हयाच्या मावळ तालुक्यात

साळुंब्रे : शिक्षणातून ग्रामविकासाचा प्रयोग Read More »

अपारंपरिक उर्जा – सौर उर्जा प्रकल्प

सौर दिव्यांचा प्रचार विवेक गिरिधारी पार्श्वभूमी : संपूर्ण महाराष्ट्रात वर्ष २००८ व २००९ मध्ये विजेच्या भारनियमनाने उच्चांक गाठला होता. मुंबई-पुण्यात जरी भारनियमन नसले तरी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात मात्र किमान ८ तास ते कमाल १२ तास इतके जीवघेणे भारनियमन होत होते. एकीकडे ग्रामीण जनता अनिर्बंध व निरंकुश भारनियमनाला वैतागली होती तर दुसरीकडे पुढारी मात्र जनतेला स्वावलंबी

अपारंपरिक उर्जा – सौर उर्जा प्रकल्प Read More »

विहीर खोदाई व झरे विकास

विवेक गिरीधारी दुष्काळाची परिस्थिती व तीव्र पाणी टंचाई असणाऱ्या अन्य गावांची परिस्थिती यात खरे तर फारसा फरक नसतो. उन्हाळा चालू झाला की पाणी टंचाईच्या झळा अनेक गावांमध्ये जाणवायला सुरुवात होते. उन्हाळ्यातल्या शेवटच्या एप्रिल व मे या दोन महिन्यांत तर पाणी टंचाईची भीषणता तीव्र असते. गावातील विहिरीत पाणी नसले तर शेजारच्या गावातून किंवा जवळपासच्या डोंगर-दऱ्यातील झऱ्यातून

विहीर खोदाई व झरे विकास Read More »

पाणलोट क्षेत्र विकासातील विविध उपचार

विवेक गिरिधारी गावातील ओढ्यास ज्या क्षेत्रातील पाणी गोळा होऊन मिळते त्या क्षेत्रास त्या ओढ्याचे पाणलोट क्षेत्र म्हणतात. गावातील ओढ्याचे पाणलोट क्षेत्र कधी गावापुरते मर्यादित असू शकते तर एखाद्या नदीच्या पाणलोट क्षेत्रात नदीखोऱ्यातील अनेक गावे असू शकतात. प्रबोधिनीने पुणे जिल्ह्यातील हवेली, भोर आणि वेल्हे तालुक्यांतील शिवगंगा व गुंजवणी नद्यांच्या खोऱ्यातील विविध गावे टप्प्याटप्प्यात पाणलोट क्षेत्र विकासासाठी

पाणलोट क्षेत्र विकासातील विविध उपचार Read More »

शिवगंगा खोरे पाणलोट विकास योजना

सुभाष देशपांडे पाणलोट क्षेत्र विकास योजनेची पार्श्वभूमी : पाण्याची उपलब्धता खऱ्या अर्थाने संपत्ती निर्माण करते. गरिबी आणि श्रीमंती यांमधली रेषा पाणी ठरवते. ज्या भागात पाणी मुबलक आहे तेथेच कृषिविकास व औद्योगिक विकास झपाट्याने होतो. जो भूभाग पाण्यापासून वंचित असतो अथवा जेथे पाण्याची उपलब्धता अपुरी असते तेथे विकासाची प्रक्रिया मंदगतीने पुढे सरकत राहते. महाराष्ट्राच्या प्रादेशिक असमतोलाचे

शिवगंगा खोरे पाणलोट विकास योजना Read More »

एका भव्य स्वप्नाचा साक्षीप्रवास

विद्या हर्डीकर – सप्रे ऐतिहासिकतेपासून वास्तवापर्यंत : जवळ जवळ साडे तीनशे वर्षे झाली! पुण्याहून पंचवीस एक मैलांवरची सह्याद्रीची गावरान कूस. रांगड्या आडदांड पहाडांच्या पायांशी वसलेली मूठ मूठ झोपड्यांची खेडी. कोरभर भाकरी आणि कांदा हे तिथले ऐश्वर्य! सुलतानी जुलुमामुळे हैराण झालेली तिथली मावळी माणसं. त्यांच्या मनाच्या तळापर्यंत जाण्याचं धाडस केलं ते एका शिवरायानं आणि एका रामदासानं

एका भव्य स्वप्नाचा साक्षीप्रवास Read More »

सणसवाडी प्रकल्प

माधव देशपांडे पार्श्वभूमी : आर्वी येथील माजी सरपंच श्री. रामभाऊ नवघणे यांच्याकडील लग्न समारंभाच्या निमित्ताने पारावर काही मंडळी गप्पा मारत होती. तेवढ्यात श्रीहरी वाडकर, सुदाम चोर, विठ्ठल भोईट असे सणसवाडीमधील ३-४ जण परिचित भेटले. ‘प्रबोधिनीने आमच्या वाडीत थोडं लक्ष घालावं, आम्ही ग्रामस्थ व तरुण मंडळ सदैव तयार आहोत. आमच्याकडे पाण्याचा मोठा प्रश्न आहे. ऐन उरसालासुद्धा

सणसवाडी प्रकल्प Read More »