कार्यकर्ते बनू या

कार्यकर्त्याचा पाचवा गुण‌ ‘प्रेरणा-संक्रामक (रिजनरेटिव्ह) असणे‌’

“स्वतः प्रामणिकपणे, कष्टपूर्वक व निष्ठेने आयुष्यभर समाजासाठी काम करणे हे महत्त्वाचे आहेच. परंतु, ते पुरेसे नाही. आपले विचार व त्यामागील प्रेरणा दुसऱ्यापर्यंत पोहोचविता येणे व त्या व्यक्तीलाही समाजकार्य करावेसे वाटू लागणे, ही महत्त्वाची आवश्यकता आहे. त्यासाठी, स्वतःच्या बोलण्याने, वावरण्याने आजूबाजूच्या व्यक्तींमध्ये आपल्यासारखे वागावे, बोलावे अशी प्रेरणा निर्माण झाल्यास संघटना अधिक काळ टिकू शकते. तसे प्रेरक आणि प्रेरणावाहक होणे म्हणजे कार्यकर्ता होणे…” संघटना आणि समाजजीवनाचे सातत्य एखाद्या शाळेत, महाविद्यालयात किंवा विद्यापीठात शिक्षक जेव्हा विद्यार्थ्यांना शिकवत असतात तेव्हा ते आपल्या विषयातील माहितीचे विद्यार्थ्यांमध्ये संक्रमण करत असतात. अनेक शिक्षक केवळ माहितीच देतात, आणि अनेक विद्याथ केवळ ती माहितीच ग्रहण करतात. पण काही शिक्षक माहिती बरोबर अधिक ज्ञान मिळवण्याची प्रेरणा देखील विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करतात. अध्यापकांना स्वतःला सतत अधिकाधिक ज्ञान मिळवण्याची प्रेरणा असेल, तरच ते विद्यार्थ्यांमध्ये तशी प्रेरणा निर्माण करू शकतात. एका प्रेरित व्यक्तीने दुसऱ्यामध्ये प्रेरणा जागृत करणे म्हणजे प्रेरणेचे संक्रमण करणे. एखादा चांगला कलाकार जेव्हा आपल्या शिष्याला त्या कलेतले धडे देत असतो, तेव्हा तो केवळ कलेचे तंत्र आणि कलेचे मर्म ग्रहण करण्याची दृष्टी देत नाही, तो त्या कलेमध्ये उत्तमता गाठण्याची, नवे नवे प्रयोग करण्याची प्रेरणासुद्धा स्वतःच्या उदाहरणाने शिष्यामध्ये संक्रमित करत असतो. एखादा कुशल तंत्रज्ञ त्याच्याकडे उमेदवारी करणाऱ्या शिकाऊ उमेदवाराला अवजारे हाताळण्याचे व तंत्रज्ञान वापरण्याचे कौशल्य शिकवत असतो. तेव्हा नकळत आपले काम चोख आणि दोषरहित झाले पाहिजे हा आग्रह म्हणजे उत्तमतेची प्रेरणाच संक्रमित करता असतो. पी.एच्‌‍. डी.चे संशोधन करणारा विद्याथ आपल्या ज्येष्ठ मार्गदर्शकाकडून केवळ प्रश्न शोधण्याची शोधक दृष्टी आणि त्यावर उपाय शोधण्याची संशोधन पद्धतीच शिकत नाही. त्याचा मार्गदर्शक त्याच्यामध्ये त्याच्या संशोधन विषयाची सीमारेषा पुढे पुढे सरकवण्याची प्रेरणाही संक्रमित करत असतो. संघटनेमध्ये संघटनेतील ज्येष्ठ सदस्यांनी नवीन सदस्यांमध्ये ध्येयदृष्टीचे संक्रमण तर करावे लागतेच, त्याबरोबर ते ध्येय गाठण्यासाठी सतत सुबुद्ध कष्ट करण्याची ध्येयप्रेरणाही संक्रमित करावी लागते. माहिती, ज्ञान, कौशल्य, कार्यपद्धती, मूल्ये, विचारपद्धती आणि ध्येयदृष्टी या सगळ्याचे संक्रमण अनेक लोक आपापल्या शक्तीप्रमाणे आपल्या बरोबर काम करणाऱ्या नवीन लोकांमध्ये करत असतात. हे संक्रमण करता करता जे प्रेरणेचेही संक्रमण करतात, ते आपल्या कामाची परंपरा पुढे चालू ठेवतात. प्रेरणा संक्रमित करता येणे म्हणजेच प्रेरणा-संक्रामक होता येणे, हे संघटनेतील कार्यकर्त्याला संघटनेचे काम अनेक पिढ्या चालू राहण्यासाठी आवश्यक असते. आपणासारिखे करावे इतरांसी कार्यकर्त्याचा पाचवा गुण म्हणजे आपल्यासारख्याच आणखी प्रेरणासंपन्न व्यक्ती घडवण्याची क्षमता. समाजात जुन्या पिढ्या मागे पडतात, नवीन येतात. सामाजिक जीवनाचा एकत्र येण्याचा हेतू आणि प्रक्रिया आपले स्वरूप बदलतात पण त्या शाश्वत असतात. समाजातल्या प्रक्रिया, सामाजिक जीवनाचे हेतू हे पुढच्या पिढीपर्यंत पोचवण्याचं काम आधीच्या पिढीला करावं लागतं. तो त्या समाजाचा सांस्कृतिक वारसा असतो. पुढच्या पिढीत जैविक, आनुवांशिक वारसा संक्रांत होतच असतो. पण सामाजिक, सांस्कृतिक वारसा पुढे संक्रांत होणंही तितकंच महत्त्वाचं असतं. तो पोचवण्याची क्षमता असलेल्या व्यक्ती स्थिर समाजरचनेसाठी आवश्यक असतात. स्थायी संघटनांसाठी, कार्यांसाठीही अशा व्यक्तींची आवश्यकता असते. कार्यपद्धती, विचारपद्धती आणि अभिव्यक्ती यांतून तो वारसा प्रकट होतो. कार्यनिष्ठा, ध्येयवाद, मूल्ये आणि प्रेरणा संक्रांत करण्याची शक्ती सर्वांत महत्त्वाची असते. बदलता परिवेष, संघटना व कार्य यांतील बदलतं वातावरण ध्यानी घेऊन हे संक्रमण करण्यासाठी मोठ्या प्रतिभेची आवश्यकता असते. पेरते व्हा, प्रवर्तक व्हा वाद्यघोषासाठी भारतीय संगीतावर आधारित अनेक रचना बसवणारे, संगीताच्या तालावर सूर्यनमस्कार बसवणारे मा. बापुराव तथा श्री. ह. वि. दात्ये यांच्या अमृतमहोत्सवाच्या समारंभात श्री. बाबासाहेब पुरंदरे यांचे भाषण झाले होते. त्या भाषणात त्यांनी सांगितले की, ‌‘जाणता राजा‌’चे प्रयोग बसवताना त्या नाट्यसंचात जी शिस्त, नेटकेपणा, नियोजन, वक्तशीरपणा असे गुण आलेले आहेत, त्याचे मूळ कारण बाबासाहेबांनी श्री. दात्ये यांच्या देखरेखीखाली केलेला घोषाचा सराव हे होते. श्री. दात्ये यांनी काही गुण बाबासाहेबांमध्ये पेरले आणि ते ‌‘जाणता राजा‌’च्या संचातील सर्वांमध्ये बाबासाहेबांनी पेरले.प्रबोधिनीचे माजी अध्यक्ष कै. डॉ. वसंतराव गोवारीकर यांची ‌‘इस्त्रोची कथा‌’ ही लेखमाला ‌‘सकाळ‌’च्या सुट्टीच्या पानात क्रमशः येत होती. भारताच्या अंतरिक्ष क्षेत्रातील प्रगतीचे एक मोठे स्वप्न डॉ. विक्रम साराभाई यांच्या मनात होते. ते स्वप्न त्यांनी डॉ. वसंतराव गोवारीकरांच्या मनात कसे उतरवले याचे वर्णन डॉ. गोवारीकर यांनी एका लेखांकात केले होते. डॉ. गोवारीकरांनी स्वत: तेच स्वप्न विक्रम साराभाई अंतरिक्ष केंद्रातील हजारो शास्त्रज्ञांच्या मनात कसे उतरवले याचेही वर्णन एका लेखांकात होते. आपल्या आजूबाजूला असलेल्यांच्या मनात स्वप्ने पेरण्याविषयी बोलताना भरपूर नारळांनी लगडलेल्या झाडाचे उदाहरण कै. आप्पा सर्वांना देत. संघटनेतील ज्येष्ठ कार्यकर्त्यांभोवती नवे उमेदीचे तरुण कार्यकर्ते नेहमी असले पाहिजेत. कल्याणमित्र (Mentor) या भूमिकेतून त्यांनी संघटनेचा वैचारिक आणि कार्याचा वारसा हळूहळू या कार्यकर्त्यांकडे सुपूर्त केला पाहिजे. इतकेच काय दलावरच्या दलप्रमुखाभोवती मुलांचा लडिवाळ मेळा नेहमी असला पाहिजे आणि त्या दलप्रमुखाकडे, प्रतोद किंवा साहाय्यक प्रतोदाकडे पाहात मुलांनी देशाशी, समाजाशी नाते जोडले पाहिजे. प्रत्यक्षात दिसायला खेळ चालले आहेत, सहली चालल्या आहेत, प्रात्यक्षिके, फराळ वा राखी विक्री चालली आहे पण प्रत्यक्ष न दिसले तरी त्यातून संघटन चाललेले आहे असे व्हायला हवे.सर्व वयाच्या व्यक्तींना यावेसे वाटेल असे वातावरण आणि करावेसे वाटतील असे उपक्रम प्रबोधिनीत आहेत. त्यामुळे बालसंघटन, युवक संघटन, स्त्री संघटन, लोकसंघटनाचे अनेकानेक मार्ग आहेत. या विविध वाटांनी जे या कार्याच्या गाभ्यात येतील, दीर्घ कामासाठी सिद्ध होतील असे कार्यकर्ते घडण्यासाठी ज्येष्ठ कार्यकर्त्यांची व्यक्तिमत्त्वे प्रसन्न, स्नेहशील, स्वतः ध्येयधुंद आणि इतरांनाही ध्येयाची, कार्याची आस लावणारी असायला हवीत. याला म्हणायचे Regenerative असणे. नवे कार्यकर्ते सिद्ध करण्यासाठी प्रबोधिनीचा भाव, प्रबोधिनीची कार्यसंस्कृती आणि प्रबोधिनीचा ध्येयविचार इतरांमध्ये संक्रमित करण्याची प्रखर कृतिशीलता, सखोल चिंतनशीलता आणि निरपेक्ष प्रगाढ स्नेहशीलता लागते. भाव, कार्यसंस्कृती आणि ध्येयविचाराचे संक्रमण प्रबोधिनीचा भाव संक्रमित करणे म्हणजे सामाजिक किंवा राष्ट्रीय समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणे हे स्वतःचे कर्तव्य आहे असे समजून स्वयंस्फूतने आपल्याला सुचेल व जमेल ते काम, कोणाची वाट न पाहता सुरू करायला शिकवणे.पुण्याच्या नागरी वस्त्यांमध्ये कालव्याच्या पाण्याचे लोट शिरले, किंवा तिथे आगीने झोपड्या जळाल्या तर कुटुंबांच्या पुनर्वसनाला धावून जाणे हा प्रबोधिनीचा भाव आहे. जम्मू आणि काश्मिर मधल्या अकरावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आंतरजालावरून शिक्षण-व्यवसायाच्या त्यांना माहिती नसलेल्या वाटांचे मार्गदर्शन करणे हा प्रबोधिनीचा भाव आहे. या भावाचे म्हणजे प्रतिसादीपणाचे संक्रमण करायचे आहे. प्रबोधिनीची कार्यसंस्कृती संक्रमित करणे म्हणजे गटाने मिळून काम करणे, सहविचाराने काम करणे, कामे योजनापूर्वक वाटून घेणे, प्रत्येक टप्प्याला कामाचा शोधबोध घेणे, आपले मनोगत गटामध्ये मोकळेपणाने सांगणे, नियमित सामूहिक उपासना करणे. हे सर्व अभ्यासपूर्वक, प्रतिभेचा वापर करून, आधुनिक तंत्रे वापरून व अडचणींवर मात करून काम करायला शिकवणे. आपल्या कामाची समग्रता अनुभवण्यासाठी प्रबोधिनीतील इतर गटांना आपल्या कामाचे निवेदन करत राहणे व इतर गटांचे काम समजून घेत राहणे, ही देखील प्रबोधिनीची कार्यसंस्कृती. आपल्या गटामध्ये, प्रबोधिनीच्या इतर गटांबरोबर व समाजामध्ये आधी स्वावलंबन अनुसरायला शिकवणे आणि नंतर स्वावलंबनाकडून परस्परावलंबनाकडे जायला शिकवणे म्हणजे ही कार्यसंस्कृती संक्रमित करणे.खातेवाटप, नियोजन, आढावा, शोधबोध, भविष्यचिंतन, देशस्थितीचा अभ्यास या सर्वांसाठी सहविचाराच्या बैठकी, सेतूबंधन मेळावे, निवासी बैठकी, विभाग व केंद्रांचे संयुक्त कार्यक्रम यातून उत्तरदायित्व, सहयोगित्व व नवनिर्मितीक्षमता यांचे संक्रमण करायचे आहे. म्हणजेच प्रबोधिनीच्या कार्यसंस्कृतीचे संक्रमण करायचे आहे.प्रबोधिनीचा ध्येयविचार संक्रमित करणे म्हणजे देशाचे भौतिक रूप पालटणे, समाज उद्योगप्रिय, संघटित, विजिगीषू वृत्तीचा व आपले गुण इतरांमध्ये संक्रमित करू इच्छिणारा बनवणे, आध्यात्मिक

कार्यकर्त्याचा पाचवा गुण‌ ‘प्रेरणा-संक्रामक (रिजनरेटिव्ह) असणे‌’ Read More »

कार्यकर्त्याचा चौथा गुण‌ ‘नवनिर्मितीक्षम (क्रिएटिव्ह) असणे‌’

नव-विचारांचे प्रात्यक्षिक करणारी संघटना समाजातील व्यवहार चालू राहण्यासाठी किंवा संघटनेचे काम चालू राहण्यासाठी एकाच प्रकारचे काम सातत्याने करावे लागते. ते काम रोज जेवण्यासारखे आहे. जीवनासाठी आवश्यक, पण त्यात वेगळा आनंद मानण्यासारखे नाही. जे कोणी केले नाही ते करून पाहण्यामध्ये, जो प्रश्न कोणाला सुचलाही नाही तो सोडवण्यामध्ये, रुळलेली वाट सोडून केवळ जिज्ञासा म्हणून वेगळ्या वाटेने जाण्यामध्ये आनंद आहे. व्यक्तीचे, संघटनेचे किंवा समाजाचेही अस्तित्व, नवीन काही करता आले तर सार्थ होते. केवळ जगणे, टिकून राहणे, कंटाळवाणे आहे. रोजचे अध्यापन, संशोधन, वृत्तलेखन, वाङ्मय लेखन यात तर नावीन्य हवेच. उपक्रमांचे पण नावीन्य हवे. स्वच्छतेच्या साधनांमध्ये, संगणकाच्या उपयोगांमध्ये नावीन्य हवे. क्रीडा प्रात्यक्षिके, मिरवणुका, शिबिरे यातही कल्पकता हवी असा प्रबोधिनीत आग्रह असतो. युवतींनी एका प्रात्यक्षिकात कथ्थक, भरतनाट्यम्‌‍ आणि कराटे (मार्शल आर्ट्‌‍स्‌‍) यांचा मनोरम मेळ घातलेला होता, तो दृष्टी खिळवील असा होता! प्रबोधिनीचा कार्यकर्ता पहिल्या तीन लक्षणांत म्हटल्याप्रमाणे प्रतिसादी, उत्तरदायी आणि सहकार्यशील जसा असला पाहिजे, तसा तो नवनिर्माताही असला पाहिजे.‌‘त्रिमितीतील प्रतिकृती‌’ कागदापासून करण्याच्या मार्गदर्शन पुस्तिकेपासून बचत-गट संचालनाच्या मार्गदर्शक पुस्तिकेपर्यंत, शेतकऱ्यांना एकात्मिक शेतीच्या प्रशिक्षणापासून गावात घरटी एक विरजक (फिल्टर) पोचवण्यापर्यंत, डोंबिवली केंद्राच्या रात्र-शिबिरापासून प्रशासकीय अधिकारी म्हणून निवड झालेल्यांच्या समाज-दर्शन शिबिरापर्यंत, काश्मिरी युवकांना महाराष्ट्र-दर्शन घडविण्यापासून महाराष्ट्रातील दोनशे युवकांना ईशान्य भारत दर्शन घडविण्यापर्यंत, अभिक्षमता मापनाच्या संगणकीय चाचण्यांपासून संगीत शिक्षण व अभिव्यक्तीसाठी प्रेरणा-जागरणाच्या संशोधनापर्यंत, जवळच्या वस्त्यांमधील विद्यार्थ्यांच्या अभ्यासिकांपासून सीमावत राज्यांतील शाळांमध्ये ऑनलाईन तासिका घेण्यापर्यंत, भविष्यवेधशास्त्रातील प्रकल्पांपासून मातृभूमी पूजनाच्या कार्यक्रमांपर्यंत, विहीर लोकार्पणाच्या पोथीपासून वाड्या-वस्त्यांवर सौर दिवे पोहोचवण्यापर्यंत आणि उपासना-केंद्रापासून विज्ञान प्रयोगशाळेतील प्रकल्पांपर्यंतची दलांची विविध रूपे, यातून नवीन कल्पना, नवीन योजना आणि नवीन प्रात्यक्षिके यांचे आविष्कार प्रबोधिनीत सतत होत असतात. प्रतिभासंपन्नता प्रबोधिनीला केवळ चाकोरीतले काम करत राहण्याचे वावडे आहे. सातत्याबरोबर नाविन्याचाही आग्रह प्रबोधिनीत असतो. प्रबोधिनीच्या शिक्षणपद्धतीत प्रतिभाविकसनाला विशेष महत्त्व आहे. ‌‘जे दिसते ते असेच का हे उलगडण्याला शिका‌’ असे आपण लहान मुलांना देखील सांगत असतो. प्रश्न विचारणाऱ्यांचे आणि जुन्या प्रश्नांना नवीन उत्तरे शोधणाऱ्यांचे येथे नेहमी स्वागत असते. एखादी कृती किंवा संकल्पना रूपांतरित करणं (adaptation) – एका गावाच्या विकासाऐवजी खोऱ्याच्या विकासाची संकल्पना मांडणे म्हणजे संकल्पना रूपांतरित करणे. प्रश्नांची एकाहून अधिक समर्पक उत्तरं शोधणं (innovation) – रात्र-शिबिर, समाजदर्शन शिबिर, ग्रामीण परिचय शिबिर, सहजीवन शिबिर, साहस शिबिर, हे विविध प्रकार म्हणजे शिबिर हा एकच ढाचा हेतू प्रमाणे समर्पक रीतीने वापरणे. नवीन गोष्टी शोधून काढणं (divergent thinking) – त्रिमितीतील प्रतिकृती बनवण्याची मार्गदर्शक पुस्तिका किंवा सामाजिक जाणीव प्रशिक्षण पुस्तिका ही नवीनच गोष्ट शोधून काढण्याची उदाहरणे. संकल्पना रूपांतरित करणं, प्रश्नांची एकाहून अधिक समर्पक उत्तरं शोधणं आणि नवीन गोष्टी शोधून काढणे हा बदलत्या परिस्थितीला प्रतिसाद झाला. कालोचित बदल, रूपांतर हे बऱ्याच वेळा तात्कालिक उत्तर असतं. अभिनवता (इनोव्हेशन) अधिक स्थायी उत्तरं शोधू शकते – छात्र प्रबोधन दिवाळी अंकाच्या 50,000 प्रतींची प्रकाशनपूर्व नोंदणी ही दहा वर्षे स्थिर झालेली अभिनव कल्पना. कल चाचण्यांचे संगणकीकरण ही देखील आता रूढ झालेली अभिनव कल्पना.प्रतिभेबरोबर उद्योजकता देखील सर्जनशीलतेसाठी आवश्यक असते. नवा कारखाना, नवे दुकान, नवे उत्पादन, नवा व्यापार, नवी शाळा, नवी संशोधिका, नवे रुग्णालय, नवे बांधकाम, नवी कार्यालय व्यवस्था, नवी संदेशवहन व्यवस्था, नवी व्यायामशाळा, नवी प्रयोगशाळा, नवा मार्गदर्शन वर्ग, नवी वाहतूक व्यवस्था, नवी चळवळ, नवे अभियान, नवे आंदोलन, नवी सुरक्षा व्यवस्था अशा कितीतरी गोष्टी नव्याने सुरू करण्यासाठी उद्योजकता लागते. नवीन कल्पनांचा वापर फक्त स्वतःच्या समाधानापुरता मर्यादित न ठेवता त्या इतरांच्याही उपयोगी पडायला हव्यात, यासाठी प्रतिभेला उद्योजकतेची जोड देण्याची कल्पना प्रबोधिनीमध्ये सुरुवातीपासूनच आहे. सर्जनशीलता नवीन सुचणे म्हणजे प्रतिभासंपन्नता तर सुचलेले प्रत्यक्षात करून पाहणे म्हणजे उद्योजकता होय. जो प्रतिभावान आहे त्याला नवे सुचू शकते. मात्र केवळ नवीन कल्पना सुचणे पुरेसे नाही. त्याच्या पुढे जाणे म्हणजे प्रतिभेला उद्योजकतेची जोड देऊन सर्जनशील होणे. जो सर्जनशील आहे तो सुचलेल्या कल्पनांना मूर्त रूप देऊ शकतो. एखाद्याच्या मनातील कल्पना प्रत्यक्ष आकार घेण्यापूव त्या व्यक्तीला चिंता, अनिश्चितता आणि भावनिक खळबळीतूनही जावं लागतं. परंतु या तपस्येतून पुढच्या क्षितिजापर्यंत आपला प्रवास अडचणी ओलांडून झाला आहे याची आनंददायी जाणीव त्या व्यक्तीला होते. नकारात्मकतेमुळे, निरुपयोगी सामाजिक रचनांमुळे निर्माण झालेल्या सामाजिक प्रनांवर सर्जनशीलता समर्पक उत्तरं शोधून काढत असते. शतकानुशतके संस्कृत मंत्रांसह कर्मकाण्ड पद्धतीने केल्या जाणाऱ्या धार्मिक संस्कारांचे ताजे, टवटवीत, अर्थपूर्ण, कालोचित आणि सामूहिक रूप हा प्रबोधिनीतील सर्जनशीलतेचा एक विशेष आविष्कार आहे. एकाच प्रकारच्या कामातले विशेषीकरण झाल्याने जे आणि जेवढे केले तेच बरोबर मानण्याची वृत्ती बदलण्यासाठी सर्जनशीलता महत्त्वाची आहे. विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांमध्ये संग्रहात्मक, वगकरण, प्रतिकृती, भाषिक नवनिर्मिती, वैज्ञानिक संशोधन, सामाजिक शास्त्रे भविष्यवेध असा सर्जनयुक्त अभ्यासक्रम तयार झाला तो प्रकल्पपद्धतीने अध्ययनात तोचतोचपणा येऊ नये म्हणूनच. क्रिएटिव्ह म्हणजे नवनिर्माता कार्यकर्त्याला रोज नवीन-नवीन सुचणे आणि सुचलेले घडवून आणणे हे कसे साधेल? कामाचा ध्यास लागला असेल, म्हणजेच झाले ते थेंबाएवढे आणि राहिले ते समुद्राएवढे असा विधायक असंतोष असेल, आणि तरीही एकान्त साधून मनाला स्थिर व शांत करता येत असेल, तर उत्तम कल्पना निश्चितच स्फुरतील. आपण करत असलेल्या छोट्या-मोठ्या कामांची परिणामकारकता कशी वाढेल याचा सातत्याने विचार झाला पाहिजे, प्रयोग झाले पाहिजेत. आपल्यासारखी कामे करणारे आपल्या आजूबाजूचे वेगवेगळे कार्यकर्ते, अन्य संस्था-संघटना, अन्य देशांमधले इतर लोक ती कशा प्रकारे करतात याचा अभ्यास पाहिजे. साचेबंदपणात न अडकता प्रत्येक घटनेचा स्वच्छ मनाने-बुद्धीने ताजेपणाने विचार करता यायला हवा. या कल्पना जपून त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी झटणे म्हणजे कार्यकर्त्याने नवनिर्माता बनणे.1992 साली प्रबोधिनीच्या त्रिदशकपूतनिमित्त काढलेल्या स्मरणिकेत, “नेतृत्व म्हणजे त्या-त्या क्षेत्रात नवे सुचून ते प्रत्यक्षात आणता आले पाहिजे. नवे रुजवणे, नवे शिकविणे म्हणजे नेतृत्व!” असे आपण म्हटले आहे. ‌‘मी कल्पना सुचवतो, तुम्ही करा‌’ असे म्हणणारा प्रतिभावान कार्यकर्ता पुरेसा नाही. ‌‘मी एकदा करून दाखवतो‌’ किंवा ‌‘मी एकदा केले आहे‌’ असे म्हणणारा सर्जनशील कार्यकर्ताही पुरेसा नाही. कार्यकर्ता हा सुचलेली कल्पना स्वत: प्रत्यक्षात आणून इतरांनाही कसे करायचे ते दाखवणारा आणि अनेकांना जमले की पुन्हा पुढच्या टप्प्यावर जाण्यासाठी बदलाचा आग्रह धरणारा नवनिर्माता हवा. नवीन काही सुचले की झोकून देऊन करून पाहणे कार्यकर्त्याला जमायला हवे. निगडीतले लहान मुलांच्या खेळण्यांचे संग्रहालय व ग्रंथालयातील पुस्तकांप्रमाणे खेळण्यांची देवघेव करणारे जम्मतघर हे झोकून देऊन केलेली नव्या कल्पनेची नवनिर्मिती आहे.असे झोकून देऊन काम करत असताना, जे जुने आहे, परंपरेतून आणि अनुभवांमधून आपल्या-पर्यंत पोहोचले आहे, त्यावर विचार करून योग्य ते स्वीकारणे आणि जुना आशय व नव्या कल्पना यांची मूळ रचनेला, उद्दिष्टांना धक्का न लावता सांगड घालता येणे महत्त्वाचे आहे. एखाद्या उपक्रमाचे उद्दिष्ट समजून घेतल्यानंतर आपापल्या गटाच्या आवश्यकतेनुसार त्याच्या स्वरूपात बदल सुचणे ही देखील नवनिर्मिती आहे. विद्याव्रतातील विविध संकल्पना समजावताना विद्यार्थ्यांसाठी व्याख्याने किंवा तासिका योजणे, कृतिसत्रांद्वारे स्वतःच्या क्षमता जाणून घेण्याची संधी देणे, चित्रफिती दाखवणे, निवासी शिबिरे घेणे, दासबोधाचे वाचन करणे, व्यक्तिकार्ये सुचवणे इत्यादी वापरली जाणारी विविध माध्यमे ही त्या त्या कार्यकर्त्यांनी स्थानिक आवश्यकतांनुसार केलेली नवनिर्मिती आहे.गटात काम करत असताना सुचणाऱ्या कल्पना गटातील सहकाऱ्यांना सांगितल्याने, त्यांचे मत समजून घेतल्याने त्या कल्पनांवर चहूबाजूंनी विचार व्हायला मदत होते. एखादी कल्पना प्रत्यक्षात आणताना फसली, काही अडथळे आले तरी हार न मानता चिकाटीने नवे-नवे प्रयोग करत राहणे याने आपले कामासंबंधीचे चिंतन

कार्यकर्त्याचा चौथा गुण‌ ‘नवनिर्मितीक्षम (क्रिएटिव्ह) असणे‌’ Read More »

कार्यकर्त्याचा तिसरा गुण‌ ‘सहयोगी (को-ऑपरेटिव्ह) असणे‌’

समाजासाठी संघभावना कार्यकर्ता प्रतिसादी आणि उत्तरदायी असला पाहिजे हे आपण यापूवच्या लेखांमधून पाहिले. प्रतिसादी असणं आणि दायित्वाची जाणीव असणं या मुख्यतः भावनिक विकासाशी निगडित गोष्टी आहेत. जेव्हा एखादी व्यक्ती आपण भोवतालच्या व्यक्तींना उत्तरदायी आहोत असं समजू लागते त्या वेळी त्या इतर व्यक्तींनाही स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे, ती काही पटावरची प्यादी नाहीत हे तिला समजतं. ही व्यक्ती समाजजाणिवेच्या, भावनेच्या, इच्छाशक्तीच्या स्तरावर सुघटित असते. या टप्प्याला व्यक्ती इतरांशी बुद्धी, हृदय आणि कृती या स्तरांवर संवाद करू लागते आणि सहकृती करू लागते. जागतिक स्तरावर उत्तरदायी लोकांच्या बहुराष्ट्रीय कंपन्या किंवा युनोच्या विविध शाखासंस्था आणि त्यांना उपलब्ध असलेली साधने यांतून प्रचंड कार्यऊर्जा आणि प्रभावशक्ती सध्या उत्पन्न होत आहे. परंतु सामान्य लोकांच्या हितासाठी या ऊर्जा आणि शक्ती एकवटण्याकरिता जी सहकार्यशीलता आवश्यक आहे ती मात्र अगदी मोजक्या ठिकाणी दिसते. कारण उत्तरदायी व्यक्तींमध्ये संवादाचा अभाव आहे.काही वर्षांपूव पुण्यातील गिर्यारोहकांची एक नागरी मोहीम एव्हरेस्ट शिखरावरती गेली होती. सहा जणांनी एव्हरेस्टवर जाण्यासाठी बारा जण दोन वर्षे शारीरिक व मानसिक तयारी करत होते. त्यातून शेवटच्या सहा जणांची निवड झाली. परंतु इतर सहा जणांना त्याचे वैषम्य वाटले नाही. या बारा जणांची तयारी चालू असताना इतर अनेक जण मोहिमेसाठी लागणारे काही कोटी रुपये जमवत होते. साहित्य खरेदी करणे, त्याची तपासणी करणे, त्याची चाचणी घेणे, ते साहित्य पायथ्यापर्यंत घेऊन जाणे, मोहीम चालू असतानाची संदेशवहन यंत्रणा सांभाळणे, अशी सगळी कामे करणारे 100 जण तरी असतील. या सगळ्या मोहिमेचा प्रमुख होता, तो ऐनवेळी स्वतःहून मागे थांबला व इतर साथीदारांना त्याने एव्हरेस्टचा शेवटचा टप्पा सर करायला पुढे पाठवले. पुढच्या दोन-तीन वर्षांत त्यातल्या कित्येकांनी एव्हरेस्ट व हिमालयातील इतर अनेक शिखरे सर केली. ही नागरी मोहीम प्रबोधिनीच्या कार्यकर्त्यांसाठी सहयोगी असण्याचा एक वस्तुपाठ आहे. कारण त्यातले सर्वच जण स्वयंसेवी वृत्तीने काम करणारे होते. राष्ट्रघडणीसाठी अत्यंत कर्तृत्ववान, अत्यंत कार्यसमर्पित व्यक्तींनी एकत्र येऊन कार्य करण्याची गरज असते. प्रबोधिनीच्या कार्यकर्त्यांचे तिसरेे लक्षण हेच आहे की, तो सहयोगी अर्थात्‌‍‍ सहकार्यशील असला पाहिजे. संघभावनेसाठी सहयोगी असणे ज्ञान प्रबोधिनीत नेतृत्व शिक्षणावर मोठा भर असतो. परंतु एक गोष्ट आवर्जून सांगितली जाते, की एकच व्यक्ती सर्व क्षेत्रांत नेतृत्व करू शकत नाही. वेगवेगळ्या परिस्थितीत नेतृत्वाची धुरा वेगवेगळ्या व्यक्तींकडे असू शकते. चर्चिलचे युद्धकालीन नेतृत्व इंग्लंडला मान्य होते. पण शांतता कालात ते अन्य कोणी तरी घ्यावे असा कौल इंग्लंडने दिला आणि चर्चिलने तो शांतपणे मान्य केला. आपणहून पुढाकार घेणे जितके महत्त्वाचे असते तितकेच ज्या व्यक्तीकडे नेतृत्व आहे तिला सुजाण साथ करणेही महत्त्वाचे असते. त्यासाठी स्वतःची विचारशक्ती गहाण ठेवावी लागत नाही. मतभेद सौम्यपणे पण स्पष्टपणे व्यक्त करता येतात. मोठमोठ्या कार्यांना कर्तृत्ववान, विचारशील, प्रतिभाशाली अशा अनेक व्यक्तींचे संच लागतात. त्यांच्या कामात संघभावना (टीम स्पिरिट) असावी लागते. व्ङ्मक्ती-व्ङ्मक्तीङ्कधील आंतरक्रियांमध्ये प्रतिसादी असणं, नैतिक निर्णय आणि कृती जबाबदारीनं करणं, व्यक्ती आणि संस्था यांच्या सुप्त क्षमतांचा विकास होण्यासाठी परस्परांनी सहकार्यानं काम करणं, या उत्तमतेच्या तीन मिती आहेत. इतरांबरोबर सहकार्य करणं, मित्र, सहकारी, परिचित, अपरिचित, प्रतिस्पर्धी या सर्वांचं सहकार्य मिळवता येणं हे सहकार्यशीलतेचे म्हणजेच सहङ्मोगी असण्ङ्माचे काही पैलू आहेत. सहयोगी असण्याचे पैलू संघटनेमध्ये एकत्र काम करत असताना अनेकांबरोबर सहविचार करायचा असतो. अनेकांची मदत घ्यायची असते. एकत्र संकल्प करायचे असतात. कधी एकत्र अपयश पचवावे लागते. काही वेळा आपण केलेल्या कामाचे श्रेय दुसऱ्याला द्यावे लागते, तर काही वेळा न केलेल्या कामातील अपयशाचे धनी व्हावे लागते. असे काम करणारे जे असतात त्यांना परस्पर सहकार्याने काम करणे जमू लागले असे म्हणता येईल. हे जमवण्यासाठी काही वेळा एकत्र पद्ये गाण्याचा उपयोग होतो. सगळ्यांनी मिळून सहलीला गेल्याचा उपयोग होतो. सगळ्यांनी एकत्र बसून जेवल्याचा उपयोग होतो. एकत्र प्रवास करताना सहयोगी असण्याची वृत्ती घडू शकते. एकमेकांच्या कामापलीकडच्या आयुष्यात रस घ्यावा लागतो. हे सगळे करताकरता अनेकांना एकमेकांच्या सहयोगाने काम करणे जमू लागते. काही जणांना या सगळ्याशिवायच सहयोगी बनता येते.एखाद्या जोडीदाराबरोबर काम करताना किंवा गटात काम करताना सहयोगी असण्याची म्हणजे इतरांना सहकार्य करण्याची विशेष गरज असते. आपल्या अनेक प्रकारच्या वागण्यातून आपण इतरांना सहकार्य देऊ इच्छित असल्याचे व इतरांचे सहकार्य घेऊ इच्छित असल्याचे कळत असते. प्रत्येकाच्या छोट्याशा योगदानाची देखील दखल घेणे व त्याला दाद देणे यातून आपण सहयोगी असल्याचे कळते. स्वतःच्या मोठ्या योगदानाचाही कुणासमोर काहीच उच्चार न करण्यातही आपले सहयोगित्व दिसते. संकोचाने बाजूला थांबणाऱ्यांना चर्चेत किंवा कामात सहभागी करून घेणे हे सहयोगी असण्याचे लक्षण आहे. एखाद्या चालू कामात आपणहून ‌‘मी काय करू?‌’ किंवा ‌‘मी हे करतो/करते‌’, असे सांगणे व काही वेळा न बोलताच आपणहून चालू कामात सहभागी होणे, यातून आपण सहयोगी असल्याचे कळते. कामात नवखे सदस्य चुकल्यास त्यांना बरोबर कृती समजावून सांगणे, चालू काम अधिक चांगले करण्यासाठी सूचना करणे हे सहयोगी कार्यकर्ता सहजपणे करतो. दमलेल्या, थकलेल्या सहकाऱ्याला विश्रांती घ्यायला सांगून आपण त्याचे काम पूर्ण करणे हे सहयोगी कार्यकर्त्याला सहज सुचते. एकाच्या अनुपस्थितीत त्याचे दोष किंवा चुका इतरांना न सांगणे, इतरांची निंदा न ऐकणे, इतरांबद्दलची गैरचर्चा किंवा बाजारगप्पा (गॉसिप) आपण पुढे न वाढवणे व शक्यतो त्या थांबवणे, गटात कोणाचाही नामोल्लेख न करता काय चुकले आहे तेवढे सांगून सुधारणांबद्दल बोलणे, हे देखील सहयोगी असल्याचे लक्षण आहे. अनेक प्रकारचा अनौपचारिक संपर्क सहयोगित्व वाढवायला जसा उपयोगी पडतो, तसेच काम चालू असताना हे सर्व संकेत पाळणेही सहयोगी बनण्याला उपयोगी पडते. स्वतःच्या प्रेयापेक्षा कार्याचे श्रेय मोठे दैनंदिन कामातील सहकार्य आणि सहयोग आवश्यक आहे; परंतु एकत्र काम करताना इतरांच्या स्वभावाशी जुळवून घेणे जमावे लागते. तक्रार न करता स्वत: बदलणं किंवा शांतपणे इतरांना बदलण्याचा प्रयत्न करीत राहणं हे जमवावे लागतेे. केवळ बोलण्या-चालण्याच्या पद्धतीतून कोणाच्या स्वभावाचे एकदम मूल्यमापन करायचे नाही हे शिकावं लागतं. तसेच दीर्घकाळ एकत्र काम करायचे असेल तर दर्शनी व्यक्तिमत्त्वाने प्रभावित न होता सहकाऱ्याचे अंतर्मन जाणून घेण्यासाठी चिकाटीने प्रयत्नही करावे लागतात. सहयोगी बनण्यासाठी हे सगळे करायला लागेलच.सहकार्यशील व्यक्तीला स्वतःच्या गुण-दोषांची उत्तम जाण असायला हवी. आपण काय करू शकू आणि काय नाही याची उमज असायला हवी. आपण ज्या व्यक्तींबरोबर काम करतो त्यांच्याही गुणावगुणांची चांगली जाणीव असायला हवी. त्याचबरोबर हातात घेतलेल्या कार्याच्या आवश्यकता काय हेही दृष्टीपुढे सतत असायला हवे. त्या प्रकाशात, संचातील कार्यकर्त्यांच्या गुणांची व कर्तृत्वाची बेरीज कशी होईल ते ती पाहाते. व्यक्तिगत मोठेपणा, मानापमान, श्रेय या गोष्टींना ती काहीही किंमत देत नाही. पंडित नेहरू एका चर्चासत्रात डॉ. आंबेडकरांवर रागावले आणि त्यांना अपमानास्पद शब्द बोलले. डॉ. आंबेडकर हेही मानी होते, तरी त्यावेळी त्यांनी स्वतःचा क्षोभ होऊ दिला नाही. नंतर नेहरूंनी दिलगिरी व्यक्त केली तेव्हा ते म्हणाले, ‌‘राग तर मलाही येऊ शकतो. पण माझ्यामागे जो दलित समाज उभा आहे, त्यांच्यासाठी मी अशा प्रसंगी रागावता कामा नये. त्यांच्या हिताचे काम आपण सर्व मिळून करतो आहोत. त्यात अडथळा येता कामा नये म्हणून मी मौन राहिलो.‌’ व्यक्तिगत मानापमानांपेक्षा कार्याच्या हिताकडे लक्ष देणारा कार्यकर्ता चांगले सहकार्य करू शकतो. कामाच्या विभागणीत आपण अन्य कुणाच्या क्षेत्रात अकारण पाऊल घालत नाही ना, याविषयीही तो दक्ष असतो. परंतु कुठे न्यून दिसले तर गाजावाजा न करता हलकेच ते

कार्यकर्त्याचा तिसरा गुण‌ ‘सहयोगी (को-ऑपरेटिव्ह) असणे‌’ Read More »

कार्यकर्त्याचा दुसरा गुण – उत्तरदायी (रिस्पॉन्सिबल) असणे

“आपले तेच खरे असे मानून काम करण्याची सवय झाली, तर मी केले म्हणजे ते आवश्यकच होते आणि पूर्णपणे योग्यच आहे, असा विचार करणारे तयार होण्याची शक्यता असते. मात्र स्वतःला कळले, स्वतः केले ते आणि तेवढेच बरोबर असे न मानता कामाविषयी अधिकाधिक जणांशी संवाद साधता येणे, सकारात्मक भावनेने योग्य-अयोग्य समजून घेता येणे आणि हे सर्व फक्त माझे नाही असे समजणे म्हणजे कार्यकर्ता होणे… कामासंबंधी भविष्यचिंतन बऱ्याच वर्षांपूव प्रबोधिनीच्या वार्षिक सभेमध्ये प्रबोधिनीने काय काम करावे यासंबंधी मुक्तचिंतनाचे सत्र येोजले होते. सदस्य, कार्यकर्ते व हितचिंतक धरून सुमारे 120 जण सभेला उपस्थित होते. त्यापैकी 25 जणांनी मुक्तचिंतनात आपले विचार मांडले. वेळोवेळी होणारे हे सर्व मुक्तचिंतन सार्थ करायचे असेल तर ‌‘काय करावे‌’चा तात्पुरता शेवट व ‌‘केोणी करायचे‌’चा प्रारंभ याची साखळी जोडत राहिले पाहिजे. जे करायचे म्हटले, ते ‌‘का करायचे‌’ व ‌‘केोणी करायचे‌’ याचा सातत्याने विचार झाला पाहिजे. ‌‘केोणी करायचे‌’ ठरविताना ‌‘केोणी काय करायचे‌’ हे एकत्र चर्चेनेच ठरवता येईल; परंतु ‌‘ज्याने करायचे तो कसा पाहिजे‌’ याचे चिंतन प्रत्येकाला एकेकट्यानेही करता येईल. ते सतत होत राहायला हवे. रिस्पॉन्सिबल अर्थात्‌‍ उत्तरदायी काम करणारा कसा पाहिजे याचा विचार करताना शून्यातून सुरुवात करण्याची गरज नाही. प्रबोधिनीच्या कार्यकर्त्यांच्या लक्षणांची पंचसूत्रीच आत्मपरीक्षणासाठी आणि स्वयंविकासासाठी वापरता येईल. या पंचसूत्रीतील दुसरे सूत्र आहे – रिस्पॉन्सिबल. कार्यकर्ता जबाबदार असावा किंवा उत्तरदायी असावा असे रिस्पॉन्सिबलचे सोपे भाषांतर करता येते.उत्तरदायी असणे म्हणजे दायित्व स्वीकारणे. हाती घेतलेली गोष्ट जबाबदारीने पार पाडणे. प्रथम केवळ सदस्य म्हणून वा विद्याथ, युवक-युवती म्हणून संघटनेत आलेल्या व्यक्ती त्यांच्या अभिक्रमामुळे (इनिशिएटिव्ह्‌‍) किंवा त्यांच्या ज्ञानामुळे, गुणवत्तेमुळे विशेष दायित्वाला पात्र ठरतात. ते त्यांच्याकडे स्वाभाविकपणे येते. प्रतिसादात काही वेळा भावनिक आवेग असतो. परंतु उत्तरदायित्व समंजस, डोळस असते. सहल घेऊन गेलेला युवक कार्यकर्ता, अभ्यासदौऱ्याला गेलेला युवती संच, शिबिराचा संयोजक-प्रमुख, प्रशिक्षण वर्गाचा संयोजक या सर्वांना आपापल्या उत्तरदायित्वाची जाणीव असते. आपल्यावर एक विशिष्ट उपक्रम यशस्वी करण्याची जबाबदारी आहे, त्यात सहभागी व्यक्तींची काळजी आपण घेतली पाहिजे, उपक्रम परिणामकारक झाला पाहिजे, त्यातील संभाव्य धोक्यांपासून जपले पाहिजे, झालेल्या चुकांबाबत आपण दोषी ठरू शकतो, मुले बरोबर असतील तर पालकांना आपण उत्तरदायी आहोत, असे अल्पकालीन उत्तरदायित्वाचे अनेक प्रकार आहेत. असे दायित्व स्वीकारलेल्यांनी प्रश्नांची उत्तरे द्यायलाही तयार असावे लागते. विभागप्रमुखांना, केंद्रप्रमुखांना, संचालकांना किंवा गटातील/विभागातील सदस्यांनाही उत्तरदायी राहाता येते. विद्यार्थ्यांच्या उपक्रमांबाबत काही वेळा पालकांना उत्तरदायी राहावे लागते. सहविचाराने काम करताना सहकाऱ्यांना उत्तरदायी राहावे लागते. तसेच समाजाला उत्तरदायी राहणे म्हणजे समाजातील कोणीही आपल्या कामाबाबत प्रश्न विचारले तर उत्तरे द्यायला तयार असणे. त्या-त्या वेळी ते उपक्रम दायित्वपूर्वक करत असताना स्थिर उत्तरदायित्वासाठी आपली तयारी होत असते. जबाबदारीचे निवेदन आपण ज्यांना उत्तरदायी आहोत असे वाटते त्यांनी आपल्या कामाबद्दल आपल्याला प्रश्न विचारायचे असतील तर त्यांना आपल्या कामाची नीट माहिती पाहिजे. कामाचे उद्दिष्ट ठरवणे, कामाचे नियोजन करणे, नियोजनाची कार्यवाही करणे व झालेल्या कामाचा आढावा घेणे या चार गोष्टी आपण स्वतःच्या पुढाकारानेच करायच्या असतात. आपण काय व का ठरवले? काय व कसे करणार आहोत? काम कसे चालू आहे? व ठरवल्याप्रमाणे काम झाले का? हे चार प्रश्न आपल्याला कायमचेच विचारलेले आहेत असे समजून आपण ज्यांना उत्तरदायी आहोत त्यांना स्वतःहून प्रत्येक टप्प्याला त्याची माहिती देणे म्हणजे उत्तरदायी राहून काम करण्याची पहिली पायरी आहे. दुसरी पायरी त्यांच्या सर्व उपप्रश्नांना उत्तरे देण्याची. तिसरी पायरी जास्त अवघड आहे. आपले निवेदन ऐकून/वाचून आपण ज्यांना उत्तरदायी आहोत त्यांनी काही सूचना केल्या तर त्यांचा सकारात्मक भूमिकेतून विचार केला पाहिजे. आपले उद्दिष्ट, नियोजन व कार्यवाहीची पद्धत यात त्यांनी सुचवलेले इष्ट ते बदल करणे म्हणजे उत्तरदायी राहून काम करणे. त्यामुळे नियमित, सर्वंकष आणि अर्थपूर्ण निवेदन हा येथील कार्यकर्त्यांच्या उत्तरदायित्वाचा महत्त्वाचा भाग आहे. प्रबोधिनीच्या विविध केंद्रांच्या प्रमुखांनी मा. संचालकांना केलेल्या मासिक निवेदनात या ठिकाणचे उपक्रम, संख्याबळ, परिणामकारकता, आर्थिक स्थिती, तेथील कार्यकर्त्यांची प्रेरणा, मनःस्थिती या सर्वांचे चित्र उमटले पाहिजे. महत्त्वाचे निर्णय, त्यामागची कारणे याबद्दल लिहायला हवे. स्वतःच्या वागण्यातील दक्षता कार्याचा विस्तार आणि कार्याची प्रतिमा याबद्दल उत्तरदायी सदस्य सदैव जागृत असतो. स्वतःच्या जीवनाची संघटनेच्या ध्येयाला अनुकूल मांडणी करणे आणि आपल्या सहकाऱ्यांनाही तशा प्रकारची मांडणी करायला साहाय्य करणे हाही उत्तरदायित्वाचा भाग असतो. शिवाय कुठलीही महत्त्वाची जबाबदारी, विभाग, खाते नसतानाही उत्तरदायित्व व्यक्त करता येते. आपल्या रोजच्या कामाचे दिवसाच्या सुरुवातीलाच नियोजन केल्याने, तसेच ठरलेल्या वेळी, ठरलेल्या ठिकाणी बैठक, कार्यक्रम किंवा कामासाठी अनेकजणांना एकत्र जमायचे असते, तेव्हा आपण वेळेवर गेल्याने आपला व इतरांचा वेळ वाया जात नाही. बैठकींमध्ये आणि कार्यक्रमांच्या वेळी आवश्यक तेवढेच बोलणे केले आणि लक्षपूर्वक पाहणे आणि ऐकणे केले, तर आपला व इतरांचा वेळ आणि शक्ती वाया जात नाही. कामासाठी आवश्यक तेवढ्याच वापरायच्या वस्तू आणि साधने बरोबर ठेवली, तर त्यांचा पूर्ण वापर होतो आणि कोणतीही वस्तू वाया जात नाही. आवश्यक नसेल तेव्हा दिवे, पंखे बंद केले तर वीज वाया जात नाही. कोणतेही वाहन फक्त कामासाठीच वापरले तर इंधन वाया जात नाही. चार ठिकाणी चौकशी करून मग आवश्यक त्या व तेवढ्याच वस्तू खरेदी केल्या तर पैसे वाया जात नाहीत. वेळ, वापर वस्तू आणि साधने, वीज, इंधन, पैसे याबाबतीतही असे जागरूक राहून काम करणे, याला उत्तरदायी राहून काम करणे असेच म्हणतात. असे उत्तरदायी वागण्यासाठी सर्व कामांचे, प्रत्येक दिवसाचे, आठवड्याचे आणि महिनावार वर्षाचे सुद्धा नियोजन करण्याची सवय स्वतःला लावून घ्यावी लागते. ‌‘उत्तरदायी‌’ म्हणजेच दक्ष उत्तरदायी किंवा जबाबदार असा रिस्पॉन्सिबलचा अर्थ घेतला, तरी त्यापेक्षा अधिक अर्थ दक्ष या शब्दामध्ये आहे असे वाटते. दूरदर्शनच्या पडद्यावर क्रिकेटच्या सामन्याचे प्रक्षेपण चालू असताना कॅमेरा फक्त क्रिकेटच्या चेंडूवरही केंद्रित होऊ शकतो आणि प्रेक्षकांसकट संपूर्ण क्रीडांगणही आपल्या कक्षेत आणू शकतो. छोट्याशा चेंडूपासून संपूर्ण क्रीडांगणावर पाहिजे तेव्हा, पाहिजे तेवढा वेळ कॅमेरा रोखता येतो. पडद्यावर त्या वेळेपुरते तेच दृश्य दिसते. दृश्य कोणतेही दिसले तरी सामना चालूच असतो.एखादे काम करताना त्या कृतीवर लक्ष केंद्रित करणे, ते काम करत असताना स्वत:चे निरीक्षण करता येणे, आपल्याबरोबर काम करणाऱ्या सहकाऱ्यांकडे लक्ष देता येणे, आपल्या तसेच शेजारच्या विभागाचा विचार करता येणे, करत असलेल्या कामाचा संपूर्ण प्रबोधिनीवर कसा परिणाम हेोत आहे हे शेोधता येणे, ज्यांच्यासाठी काम करतो त्या समाजावर आणि सगळ्या देशावर काय परिणाम हेोईल याचा अंदाज करता येणे, हे सगळे काम करतानाच जमले पाहिजे. काम चालू असताना आपले लक्ष, हातातल्या कामापासून देशावरील त्याच्या चालू व संभाव्य परिणामापर्यंत पाहिजे तेव्हा, पाहिजे तेवढा वेळ ज्याला वळवता येतेत्यालाच ते काम उत्तम करता येईल. संदर्भाविना कामात लक्ष टिकून राहात नाही. सर्व संदर्भ लक्षात घेऊन केलेले काम उत्तमही होईल आणि अर्थपूर्ण झाल्यामुळे उत्साहही वाढवील. उत्तम काम केल्याने उत्साह वाढणे आणि परिणाम दिसायला वेळ लागला, तरी ससंदर्भ काम केल्यामुळे धीराने थांबता येणे, म्हणजे दक्ष राहून काम करणे असे वाटते. असे काम करणाऱ्यावर कोणतीही जबाबदारी टाकावी. काम पूर्ण होईपर्यंत तो उत्तरदायी राहीलच. सर्व संदर्भांसह काम करणे म्हणजेच स-अवधान काम करणे. स-अवधान काम करणारा जिथे आपले लक्ष केंद्रित करेल, हातातल्या कृतीपासून देशाच्या परिस्थितीपर्यंत जे आपल्या मनाच्या कॅमेऱ्यामध्ये आणेल त्यावरच त्याचे लक्ष एकाग्र हेोईल.

कार्यकर्त्याचा दुसरा गुण – उत्तरदायी (रिस्पॉन्सिबल) असणे Read More »

कार्यकर्त्याचा पहिला गुण‌ – ‘प्रतिसादी (रिस्पॉन्सिव्ह) असणे‌’प्रतिसाद देतो तो ‌‘माणूस‌’

काही देशांमध्ये अनोळखी माणसे सुद्धा सहज ‌‘सुप्रभात‌’ किंवा तत्सम प्रकारे साद-प्रतिसाद देतात. समोरच्या व्यक्तीला नुसते ‌‘माणूस‌’ म्हणून ओळखणे किंवा तिची दखल घेणे तिकडे मोलाचे मानले जाते. सभोवतालच्या व्यक्ती, त्यांच्या भावभावना, विचार, कृती यांना उचित आणि उत्स्फूर्त प्रतिसाद देण्याने माणसे जोडली जातात. गुणग्रहणाने जोडली जातात. अडचणीत तत्पर साहाय्य केल्याने जोडली जातात. अशा सहज केल्या जाणाऱ्या गोष्टींनी संघटन करण्यास अनुकूल वातावरण तयार होत असते. आई आणि मूल एकमेकांना साद-प्रतिसाद देत असतात. प्रारंभी तो उत्स्फूर्त असतो. त्यात मागणी, हिशेब इत्यादी नसतं. लहान मुलाला फक्त हसण्याची आणि रडण्याचीच भाषा वापरता येते. दुसऱ्या टप्प्याला भाषेच्या विकासामुळे या साद-प्रतिसादात बदल होतो. मुलाची स्वत्व कल्पना विकसित होते आणि स्थिर होते. इतर व्यक्ती आणि समूह यांच्या संबंधातून ते मूल नवीन संकल्पना शिकतं. आज्ञा, सूचना, देहबोलीतून केलेल्या सूचना, परिस्थितीचं गांभीर्य, त्वरित प्रतिसादाची आवश्यकता हे विकासाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर व्यक्तीला कळू शकतं. त्यानुसार प्रतिसाद लवचिक होतो. प्रतिसाद व्यक्तींना दिला जातो आणि परिस्थितीलाही दिला जातो.परिस्थितीचा अभ्यास आणि चिंतन करताना त्यातील प्रश्नांवर काही अभिनव उत्तरे सुचतात. महाराष्ट्रात विधवांच्या केशवपनाच्या प्रश्नाने अस्वस्थ झालेल्या ज्योतिबा-सावित्रीबाईंनी ते केशवपन करणाऱ्या नाभिकांनाच असहकार करण्याचे आवाहन केले! ते परिणामकारक ठरले. भारताच्या स्वातंत्र्यानंतर मुक्त श्वास सर्वांनी घेतला. तुरुंगवास भोगलेले खाजगी जीवनाकडे वळले. पण काहींना स्वातंत्र्यानंतरची आव्हाने-प्रश्न जाणवू लागले. महात्माजींना पत्रकार शार्लटन ब्रॉशबर्न यांनी यासंबंधात प्रश्न विचारला तेव्हा, त्यांना वाटलेले आव्हान त्यांनी सांगितले- ‌‘चारित्र्य घडवणारे शिक्षण!‌’ पुण्यात वा. आप्पा पेंडसे यांनाही तेच आव्हान जाणवले होते. त्यांचा प्रतिसाद म्हणजे ‌‘ज्ञान प्रबोधिनी!‌’ प्रतिसाद देण्यातील अडचणी आपली क्षमता, अनुभव, ज्ञान अपुरे आहे अशी कमीपणाची भावना मनात असेल, तर आपल्या वरिष्ठांना किंवा ज्येष्ठ सदस्यांना संकोचामुळे प्रतिसाद दिला जात नाही. मी प्रतिसाद दिलेला चालेल का? माझा प्रतिसाद आवश्यक आहे का? माझ्या प्रतिसादाचा उपयोग होणार आहे का? अशा शंका मनातल्या कमीपणाच्या भावनेमुळे मनात येतात, आणि त्यामुळे प्रतिसाद देण्याची टाळाटाळ होते. अशा संकोची लोकांकडून प्रतिसाद हवा असेल तर गटाच्या प्रमुखांनी कामाचे आवाहन करण्याची व प्रतिसाद देऊ इच्छिणाऱ्यांना प्रोत्साहन देण्याची आवश्यकता असते. अशांना उत्कट साद घालता आली तर अपेक्षित प्रतिसाद मिळण्याची शक्यता वाढते.बऱ्याच वेळा प्रतिसाद देण्याची इच्छा असते. पण तो किती तत्परतेने हवा आहे व तो कोणत्या स्वरूपात हवा आहे हे न कळल्यामुळे प्रतिसाद दिला जात नाही. गटाच्या प्रमुखाने सदस्यांना कोड्यात न ठेवता कोणत्या स्वरूपाचा प्रतिसाद कधीपर्यंत हवा आहे हे स्पष्ट सांगावे.प्रत्यक्ष सहभाग किंवा मदतीची गरज आहे, की फक्त सोबतीला बरोबर राहण्याची गरज आहे, की प्रोत्साहनपर पाठिंब्याचे शब्द बोलण्याची गरज आहे, हे अनुभवाने कळू शकते. शक्यतो कृतिरूप प्रतिसादच द्यावा व त्या प्रतिसादाचा कसा व किती उपयोग झाला याचा अंदाज घेत कृतिरूप, उपस्थितीरूप किंवा शाब्दिक प्रतिसाद द्यायचा हे हळूहळू ठरवता येऊ लागते. To be on safer side या म्हणीप्रमाणे प्रतिसादीपणा शिकण्याची सुरुवात कृतिरूप प्रतिसादातून व्हावी. एखाद्याच्या कामाबाबत, लेखाबाबत, भाषणाबाबत, वागण्याबाबत अनुकूल-प्रतिकूल अभिप्राय (feedback) विधायक वृत्तीने देणे हा सुद्धा आवश्यक प्रतिसाद आहे. दृश्य प्रतिसाद – अदृश्य उत्कटता तत्पर आणि नेमका प्रतिसाद देता येणे ही इतरांना ओळखू येण्याची खूण आहे. कार्यकर्त्याने स्वत:चे आत्मपरीक्षण करायचे असेल, तर आपली उत्कटता किती हे बघायला पाहिजे. उत्कटता म्हणजेच अत्यंत मन:पूर्वकता. उत्कटता दोन प्रकारे साधली पाहिजे असे वाटते.प्रतिसाद देताना उतावीळपणा व उत्कटता याची गल्लत होत नाही ना याची काळजी घ्यायला हवी. उत्तम प्रतिसाद देता येण्यासाठी उत्कटता, म्हणजे मनापासून भरभरून प्रतिसाद देण्याची वृत्ती महत्त्वाची आहे. शाब्दिक प्रतिसाद अनेक वेळा उत्कट असू शकतो. कृतिरूप प्रतिसाद बऱ्याच वेळा उतावळेपणाचा असू शकतो. पण परिस्थितीचा संदर्भ सोडून, उद्दिष्टाचे भान न ठेवता, मनात येईल तो प्रतिसाद देणे अशा उतावीळपणावर नियंत्रण ठेवता आले पाहिजे. Reactive असू नये, पण Responsive असावे असे व्यावहारिक भाषेत म्हणता येईल. उत्कट प्रतिसादसुद्धा मनात दहा आकडे मोजून द्यावा, नाही तर तो उतावीळपणा किंवा वरवरचा प्रतिसाद ठरू शकतो.प्रतिसाद उत्कट असेल तरी अभ्यासपूर्ण तसाच तो भावपूर्ण असायला हवा. केवळ औपचारिक नसावा. तात्कालिक प्रतिसाद आवाहनकर्त्याचा उत्साह वाढवितो. पण अभ्यासपूर्ण प्रतिसाद आवाहनकर्त्याचे बळ वाढवितो, उत्साह शुद्ध करतो. आवाहनकर्त्याचे आवाहन तात्कालिक आणि अपुऱ्या विचाराचे असेल तर प्रतिसाद धीम्या गतीने देणे गरजेचे असते. आवाहनकर्ता स्वार्थाने, दुर्बुद्धीने, विघातकवृत्तीने किंवा अपुऱ्या विचाराने आवाहन करीत असेल तर प्रतिसाद न देणे सुद्धा काही वेळा जाणतेपणाचे ठरेल. कृतिरूप प्रतिसाद कुणी हाक मारली की ‌‘ओ‌’ देणे, आवाहन केले की प्रतिसाद देणे म्हणजे रिस्पॉन्सिव्ह असणे असे वाटते. कुटुंबातील किंवा कामाच्या ठिकाणच्या ज्येष्ठांनी सूचना केली तरी ती आज्ञेसारखी मानणे, इच्छा व्यक्त केली तरी तो आदेश आहे असे मानणे, म्हणजे रिस्पॉन्सिव्ह असणे, हे अनेकांनी ऐकले असेल. देशांतर्गत असंतोष, नैसर्गिक आपत्ती, परचक्र, संभाव्य आणीबाणीची परिस्थिती यामध्ये हातातले काम सोडून वेगळे काही करायला पाहिजे हे कळणे म्हणजे रिस्पॉन्सिव्ह असणे असेही बऱ्याच जणांनी ऐकले असेल. काही वेळा परिस्थिती आणि प्रश्न यांच्याबाबतची संवेदना आणि कृती महत्त्वाची ठरते. ध्वज वर चढवला जाताना अडकला आणि कुणा युवकाने तत्परतेने खांबावर चढून तो सोडवला हा उत्स्फूर्त-तत्पर प्रतिसाद आहे. कोयनेच्या भूकंपाचे वृत्त कळताच महत्त्वाची सभा रहित करून आपत्ती निवारणाला धावणे हा उत्स्फूर्त, तत्पर, उचित प्रतिसाद होता. आंध्र वादळानंतर कोणी सुचवलेले नसताना प्रबोधिनीच्या युवकांनी तिथे जायचे ठरवणे, हा प्रतिसादी वृत्तीचा संस्कार आहे नवनिर्मिती आणि पूरक कृती प्रतिसाद काही वेळा परिस्थिती बदलण्याच्या तळमळीतून येतो. वंचित, दुःखितांच्या करुणेतून येतो. प्रश्न सोडवण्याचे आव्हान पुरुषार्थाला भिडले म्हणून येतो. सीमावत प्रदेशांमध्ये संघटन करण्याचे आव्हान विवेकानंद केंद्राच्या कार्यकर्त्यांना भिडले. त्यांनी सीमावत मुलांच्या शिक्षणासाठी काही रचना उभी केली. ज्ञान प्रबोधिनीच्या कार्यकर्त्यांनी ‌‘ज्ञानसेतू‌’च्या माध्यमातून नवी रचना उभी केली. ती अन्य संघटनेची आधीची रचना मजबूत, प्रभावी होण्यासाठी उपयोगी पडत आहे. प्रतिसाद हा स्वतंत्र कृतीच्या स्वरूपात असतो, तसा अस्तित्वात असलेली रचना अधिक परिणामकारक होण्यासाठीही प्रकट होतो.स्वामी विवेकानंदांनी परिस्थितीचे भेदक वर्णन आपल्या अन्यदेशीय आणि एतद्देशीय चाहत्यांपुढे, शिष्यांपुढे पत्रांमधून केले आहे आणि ‌‘माझिया सांगाती, वदा कोण येती?‌’ असे आवाहनही केले आहे. निवेदिता, जोसेफाईन मॅक्लिऑड, भगिनी ख्रिस्ताईन अशी प्रतिसादी व्यक्तींची कितीतरी गौरवशाली उदाहरणे आहेत. बुकर टी. वॉशिंग्टन यांनी जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांना पत्रातून केलेले आवाहन आठवावे. ‌‘मी तुम्हाला पैसे देऊ शकणार नाही… अमुक नाही.. तमुक नाही..‌’ पण टेक्सासमध्ये पिढ्यानपिढ्या शिक्षणाला वंचित असलेल्या अमेरिकेतील कृष्णवणयांना शिक्षण देण्याच्या कार्यात सहभागी होण्याचे ते उत्कट आवाहन होते. त्याला जॉर्ज कार्व्हर यांचा प्रतिसाद होता, ‌‘मी येत आहे..‌’. शब्द थोडे आणि कृती समर्पक, परिपूर्ण. ही खऱ्या प्रतिसादी वृत्तीची ओळख आहे. स्थळ-काळ-प्रसंगानुसार बदलणे हाही प्रतिसाद कितीही अवघड गोष्ट नियोजनानुसार-नियमानुसार चालू असेल तर त्यातून पुन्हा-पुन्हा नवीन शिकणे होत नाही. नियोजनानुसार काम करायला दक्षता लागते, तर नियोजन करायला व नियोजन बाजूला सारायला उत्कटता लागते. नवीन संधी समोर आली व त्यामुळे नवीन मार्ग दिसला किंवा नवीन अडचण समोर आली व त्यामुळे नवीन मार्ग शोधावा लागला, तर त्याला ध्येयसिद्धीसाठी परिस्थितीला प्रतिसाद देणे म्हणतात. उत्कटता असेल तर प्रतिसाद द्यावासा वाटेल. कार्र्यकर्त्याचा पिंड कोणावर विश्वास टाकायचा असेल तर ज्येेष्ठांच्या इच्छेलाही प्रतिसाद दिला जातो. स्वत:च सर्व ठरवायचा पिंड असेल तर परिस्थितीला प्रतिसाद दिला जातो. ध्येेयाबाबत दृढता आणि ध्येयसिद्धीच्या मार्गाबाबत लवचिकता व

कार्यकर्त्याचा पहिला गुण‌ – ‘प्रतिसादी (रिस्पॉन्सिव्ह) असणे‌’प्रतिसाद देतो तो ‌‘माणूस‌’ Read More »

कार्यकर्ते बनू या- प्रस्तावना

ज्ञान प्रबोधिनीचे संस्थापक कै. वि. वि. तथा आप्पा पेंडसे यांना 1975 मध्ये उपराष्ट्रपतींच्या हस्ते ‌‘एक्सलन्स्‌‍‌’ पुरस्कार मिळाला. तो स्वीकारताना उत्तरादाखल केलेल्या भाषणात त्यांनी प्रबोधिनीच्या उद्दिष्टांची तात्कालिक, मध्यंतर व दीर्घकालीन उद्दिष्टे अशी विभागणी करून प्रथमच प्रबोधिनीबाहेरील लोकांसमोर प्रकटपणे मांडली होती. क्रमिक अध्ययनातील उत्तम यशाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये एक तरी देशप्रश्न सोडवण्याची जबाबदारी स्वतःहून घेण्यासाठी प्रेरणाजागरण, वृत्तिघडण आणि नेतृत्वविकसन अशी चार तात्कालिक उद्दिष्टे मांडली होती. त्या भाषणातल्या आशयानुसार त्यांना विद्याथ म्हणजे शालेय, महाविद्यालयीन व पदवीधर युवक-युवती अपेक्षित होते. प्रबोधिनीची मध्यंतर व दीर्घकालीन उद्दिष्टे साध्य करण्यासाठी तर वयाच्या पंचविशीनंतर प्रौढ वयातही या युवक-युवतींनी प्रबोधिनीच्या कार्याचा भाग व्हावे अशी कै. आप्पांची अपेक्षा होती.वरील चार तात्कालिक उद्दिष्टांपैकी ‌‘वृत्तिघडण‌’ म्हणजे काय याचा विस्तार ‌‘सर्वसाधारण प्रबोधिनीपण‌’ या पुस्तिकेत नंतर बऱ्याच वर्षांनी केला आहे. ‌‘प्रेरणाजागरणा‌’साठी ध्येयप्रेरित व्यक्तींचा सहवास व प्रेरक वातावरण जसे लागते तसे व्यक्तीचे स्वतःचे प्रयत्नही लागतात. हे प्रयत्न कोणते करावेत याचा विस्तार ‌‘विशेष प्रबोधिनीपण‌’ या पुस्तिकेत नंतर केला आहे.‌‘एक्सलन्स्‌‍‌’ पुरस्कार स्वीकारल्यानंतर 1978 साली कै. आप्पांनी ‌‘प्रबोधिनीच्या शैक्षणिक तत्त्वज्ञानाचा व्यवहार‌’ या विषयावर मुंबईला एका शिक्षणसंस्थेत इंग्रजीतून व्याख्यान दिले. त्या व्याख्यानात त्यांनी प्रथमच प्रकटपणे विद्यार्थ्यांच्या भावनिक व प्रेरणात्मक विकासासाठी responsive, responsible, co-operative, creative, आणि regenerative हे गुण विकसित करण्याची आवश्यकता आहे असे मांडले. या व्याख्यानापूव काही काळ आणि नंतरही प्रबोधिनीच्या कार्यकर्त्यांच्या बैठकींमध्ये या गुणांचा उल्लेख ते करायचे. त्या वेळी उत्तम नेतृत्व करण्यासाठी हे गुण आवश्यक आहेत असे ते म्हणायचे.विद्यार्थ्यांनी देशप्रश्न सोडवणारे कार्यकर्ते व्हावे व कार्यकर्त्यांनी समाजजीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये आवश्यकतेप्रमाणे नेतृत्वाची धुरा स्वीकारावी ही तर प्रबोधिनीची नेहमीसाठीची अपेक्षा. ‌‘प्रेरणाजागरण‌’ व ‌‘वृत्तिघडण‌’ या दोन तात्कालिक उद्दिष्टांप्रमाणेच ‌‘नेतृत्वविकसन‌’ या तिसऱ्या तात्कालिक उद्दिष्टाचा विस्तार responsive, responsible इत्यादी वरील पाच गुणांवरती काही लेखन संकलित करून करता येईल असे वाटले.अनेक तज्ज्ञांनी नेतृत्वाचे विविध पैलू मांडले आहेत. नेतृत्वविकसनाचे अनेक अभ्यासक्रम जगभर बहुतेक ठिकाणी चालू असतात. त्यामध्ये प्रत्येकाचा वेगळा दृष्टिकोन असतो. संघटनेच्या कार्यकर्त्याला एखाद्या क्षेत्रात नेतृत्वाची जबाबदारी घ्यायला लागली तरी ‌‘संघटनेचा कार्यकर्ता‌’ ही भूमिका न सुटता नेतृत्व करण्यासाठी त्याच्यामध्ये कोणते गुण असले पाहिजेत हे कै. आप्पांनी मांडले आहे. त्यामुळे प्रबोधिनीतील नेतृत्वविकसनाच्या संकल्पनेचे वैशिष्ट्य म्हणून या गुणांवर सविस्तर लेखन झाले पाहिजे असे वाटत होते.मी स्वतः काही भाषणांमध्ये या गुणांची विस्ताराने मांडणी केली होती. प्रबोधिनीतील ज्येष्ठ कार्यकर्त्या वाच. लताताई भिशीकर यांनी ‌‘संघटना‌’ या विषयावरील प्रबोधिनीच्या संकल्पित खंडासाठी लिहिलेल्या लेखात या गुणांचा काही विस्तार केला आहे. हे सर्व लेखन एकत्रित करून तयार झालेल्या टिपणांवरती मा. कार्यवाह श्री. सुभाषराव देशपांडे यांनी काही संस्करण केले. प्रबोधिनीच्या पुणे केंद्राच्या केंद्रीय विस्तारित सहविचार समितीच्या पाच बैठकींमध्ये या पाच गुणांवरील टिपणांवर चर्चा झाली. त्या चर्चेनुसार टिपणांमध्ये काही बदल करून मग पुन्हा तृतीय प्रतिज्ञितांच्या मासिक बैठकींमध्ये सुधारित टिपणांवर चर्चा झाली. त्यातील सूचनांनुसार आवश्यक बदल करून सर्व टिपणे प्रबोधिनीतील सर्वांत ज्येष्ठ सदस्य मा. यशवंतराव लेले यांना वाचायला दिली. त्यांच्या सूचनांनुसार बदल करून या प्रस्तावनेच्या प्रारूपासह सर्व टिपणांचे संकलन प्रबोधिनीच्या मध्यवत सहविचार समितीच्या सदस्यांना वाचायला दिले. त्यांच्या प्रतिसादानंतर आवश्यक सुधारणा करून ही पुस्तिका प्रकाशित करत आहोत. कै. आप्पांनी स्वतः या पाच गुणावर पाच बैठकींमध्ये सविस्तर मांडणी केली होती. त्या बैठकींना उपस्थित असलेले श्री. शरदराव सुंकर व श्री. मोहनराव गुजराथी यांनी त्यांच्या स्मरणाप्रमाणे कै. आप्पांच्या मांडणीतील सर्व मुद्दे या पुस्तिकेत आले असल्याचा अभिप्राय दिला. त्यानंतर शीतलताई भालेराव यांनी या पुस्तिकेसाठी आशयाला समर्पक अशी चित्रे काढून दिली.या पुस्तिकेचा कोणी एक लेखक नाही. ‌‘कार्यकर्त्यांचे नेतृत्वगुण‌’ आज कार्यरत असलेल्या सदस्यांना जसे अनुभवायला आले व लक्षात आले, तशी त्यांची मांडणी या पुस्तिकेत झाली आहे. या पुढेही अनेक कार्यकर्त्यांना प्रसंगा-प्रसंगाने लहान-मोठ्या गटांचे अल्प किंवा दीर्घकाळ नेतृत्व करायला लागेल. त्यानंतर या पुस्तिकेतील पाच गुणांवर पुढील काळात कोणीतरी नव्याने लिहू शकेल. ‌‘नेतृत्व करणाऱ्या कार्यकर्त्यां‌’चा आणखी एखादा नवीन गुणही लक्षात येईल. त्याची भर या पुस्तिकेच्या नवीन आवृत्तीत पडू शकेल. तोपर्यंत स्वतःचे किंवा इतरांचे नेतृत्वगुणविकसन करू इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांना ही पुस्तिका मार्गदर्शक व्हावी हीच अपेक्षा. गिरीश श्री. बापट संचालक

कार्यकर्ते बनू या- प्रस्तावना Read More »