पद्य

जीवन कणाकणाने घडे…..

विद्यालय हे सगळे त्रिभुवन विद्यार्थीपण हे आजीवन त्यास न पुस्तक शिक्षक पदवी स्वयंश्रमाने सारे शिक्षण ग्रंथान्तरिचे ज्ञानामृत जर जगण्या अपुरे पडे भवतालीच्या जीवनकलहामधुनि घेऊ या धडे जीवन कणाकणाने घडे ।। ध्रु. ।। निश्चित समयी घडेल निश्चित, नियत ठिकाणी वस्तु सापडत स्थलकालाचा असा भरवसा ज्याच्यायोगे होई अवगत वळण असे जो देइल मजला तो सद्‌गुरु सापडे भवतालीच्या जीवनकलहामधुनि घेऊ या धडे ।। १ ।। परपस्परांशी घेइल जमवुन मना गवसणी मृदमधु बोलुन उदंड वाचन मार्मिक लेखन जना जोडण्या करि आवाहन कौशल्यांची अशा शिकवणी अवचित पदरी पडे भवतालीच्या जीवनकलहामधुनि घेऊ या धडे ।। २ ।। मनीं कणव अन् शरीर सक्षम, सेवाभावी तसा युद्धरत प्रतिभेचा जणु निर्झर वाहत, निधरि व्रत करी अखंडित निर्भय हसरा लोकजयिष्णू संकटास जो भिडे भवतालीच्या जीवनकलहामधुनि घेऊ या धडे ।। ३ ।।

जीवन कणाकणाने घडे….. Read More »

अंतरिच्या एका स्वप्नाने…….

अंतरिच्या एका स्वप्नाने मूर्तरूप घेतले कलश-विराजित या वास्तूने यशोनील देखिले ।। ध्रु. ।। रचिले पायी संकल्पांचे अभंग उत्कट चिरे सहज मागुती उभी राहिली सिद्धीची गोपुरे प्राकारांची किमया येथे प्रतिभेलागी स्फुरे श्रमयज्ञातुनि साफल्याचे पायस हे लाभले ।। १ ।। रसरसणाऱ्या चैतन्याचे झरे इथे खेळती आकांक्षी श्वासांच्या वेली गगनाला भिडती समर्पणाच्या भगव्या ज्वाला होमातून उठती चित्रशक्तीच्या अवतरणास्तव पुण्यतीर्थ निर्मिले ।। २ ।। मातृभूमि हे दैवत येथे स्थापियले-पूजिले त्याग, पराक्रम, सेवा यांचे त्रिदल पदी वाहिले कर्मसुमातुन ज्ञान-भक्तिचे परिमळ दरवळले चहू दिशांनी आज विकसती या कमलाची दले ।। ३ ।। पूर्तीला जातील येथुनी जनमनिची ईप्सिते घडतिल येथे द्रष्टे, चिंतक, नवयुगनिर्माते प्रखर तयांची प्रज्ञा वेधिल विश्वरहस्याते देवत्वाप्रत खचित पोचतिल पथिकसंघ येथले ।। ४ ।।

अंतरिच्या एका स्वप्नाने……. Read More »

एक आम्ही होऊ…..

अभिमानाने, अनासक्तीने, विश्वासाने, विनयवृत्तीने एक विचारे, एक मताने, एक आम्ही होऊ ।। ध्रु. ।। वारस आम्ही मैत्रेयीच्या, सरस्वती विदुषी गर्गींच्या कणाकणाने ने ज्ञान वेचुनि आत्मोन्नति घडवू ।। १ ।। शिवसंकल्पे प्रसन्न तन-मन, सजगतेत हो गुणसंवर्धन उत्कट अस्फुट मनःशक्तीचा शोध नित्य घेऊ ।। २ ।। लक्ष्मी अहिल्या स्फूर्तिदायिनी, आत्मबलाने बनु तेजस्विनी पराक्रमाच्या कृति घडविण्या जिद्द मनी जागवू ।। ३ ।। उंबरठ्याचे बंधन त्यजुनि, स्त्रीसमाज हा जागृत करुनि किरणशलाका होऊन जगती, ज्ञानदीप चेतवू ।।४।। स्त्री शक्ति हे शस्त्र बनू दे, अनीतीचा भ्रष्टासूर वधु दे बुद्धि, शक्ति अन् सामर्थ्याने जगन्मान्य होऊ ।।५।।

एक आम्ही होऊ….. Read More »

आव्हानांच्या गगनामध्ये

आव्हानांच्या गगनामध्ये मुक्त आम्ही फिरणार कर्तृत्वाचे पंख आमुचे कधीच ना थकणार ।। ध्रु. ।।अभ्यासाशी दोस्ती करूनी हिरव्या डोंगरवाटा फिरूनी चुस्त तनाने मस्त मनाने गीत नवे रचणार ।। १ ।।प्रतिभाशाली प्रज्ञा अमुची ज्योत अंतरी विश्वासाची शास्त्र कलांची करून साधना वीरव्रती बनणार ।। २ ।।असोत रस्ते बिकट, वाकडे परंपरांची अंध झापडे जन्मजात भेदांच्या सीमा उल्लंघून जाणार ।। ३ ।।एकाकी ही वाट नसावी सन्मित्रांची साथ असावी स्वप्न उद्याचे सत्य बनविण्या शर्थ आम्ही करणार ।। ४ ।।

आव्हानांच्या गगनामध्ये Read More »

पद्य निरूपणाची भूमिका

निरूपण – गेले चार महिने प्रत्येक रविवारी एका पद्याचे निरूपण लिहून व वाचून मी व्हॉट्स ॲप द्वारे व प्रबोधिनीच्या संकेत स्थळावर प्रसारित करत आहे. या काळात अनेकांनी दोन प्रश्न विचारले. (पहिला प्रश्न) निरूपणे का लिहायला घेतली ? (दुसरा प्रश्न) पद्यांची निवड कशी केली ? पहिल्या प्रश्नाचे उत्तर असे — सुमारे अकरा-बारा वर्षांपूर्वी ‌‘स्वतःला घडविण्यासाठी उपासना‌’ हे माझे पुस्तक प्रकाशित झाले. त्यात स्वतःला घडविण्याच्या चार पायऱ्या मी मांडल्या आहेत. कै. आप्पांनी १) चित्तशुद्धी, २) चित्त उल्हास आणि ३) चित्त प्रेरणा अशा तीन पायऱ्या मांडल्या होत्या. माझ्या समजुतीप्रमाणे व अनुभवानुसार मी चित्तशुद्धीचे पुन्हा १.१) चित्तप्रकाशन व १.२) चित्तविस्तार असे दोन भाग केले. चित्तप्रकाशनावर लिहिताना मी माझ्या परदेश वास्तव्यातला एक अनुभव सांगितला होता. घर व विद्यापीठ यामधले चार-पाच किलोमीटर अंतर बऱ्याच वेळा मी पायी ये-जा करायचो. रस्त्यावर पादचारी कोणी नसायचेच. निर्मनुष्य रस्त्यावर चालत असताना मला म्हणता येणारी व आवडणारी पद्ये मोकळ्या आवाजात व मोठ्याने म्हणत जायचो. सुरुवातीला केवळ चाल व शब्दयोजनेमुळे आवडणारी पद्ये म्हणता म्हणता, त्यांच्या अर्थावर विचार होत गेला. अर्थ समजत गेला तशी ती पद्ये अधिक आवडत गेली. तीन वर्षांमध्ये दोनशे वेळा तरी असे चालत पद्यगायन केले असेल. पद्यांचा अर्थ जसा मनात ठसत गेला तसे राष्ट्रभक्तीची अस्फुट भावना व आधीपासून केलेले राष्ट्रकार्याचे संकल्प मनात अनुक्रमे स्पष्ट व दृढ होत गेले. त्या प्रक्रियेला व तिच्या परिणामाला चित्तप्रकाशन असे नाव मी नंतर दिले. पुस्तकातील हा भाग वाचलेल्या काही जणांनी, करोनाच्या पहिल्या लाटेनंतर मी अभंगांची निरूपणे लिहिली, त्याच पद्धतीने मला समजलेल्या अर्थाप्रमाणे या पद्यांचे निरूपण मी लिहावे, असे सुचवले होते. त्याला आत्ता वेळ मिळाला. दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर — मी परदेशात वारंवार म्हणत असलेली ३६ पद्ये अजून आठवतात. त्यातली प्रबोधिनीतल्या कवींची बहुतेक पद्ये, त्या कवींना अभिप्रेत असलेल्या अर्थापेक्षा, माझ्याकडून वेगळा अर्थ लिहिला जाऊ नये म्हणून, मी वगळली. उरलेल्या पद्यांपैकी मला जी जास्त अर्थपूर्ण वाटली ती पद्ये मी निरूपणासाठी निवडली. आज त्यातल्या शेवटच्या पद्याचे निरूपण करून ही निरूपणमाला संपवतो आहे. पद्य क्र. १७ – वंदना के इन स्वरों में या निरूपणमालेतले आजचे शेवटचे पद्य म्हणजे मातृभूमीला केलेले वंदन आहे. या पद्याचा प्रबोधिनीत जो पाठ रूढ आहे त्याच्याच अर्थाचे निरूपण आज करत आहे. खुलभर दुधाची कहाणी अनेकांनी ऐकली असेल. एका राजाने शिवमंदिराचा गाभारा भरण्यासाठी गावातील सगळ्यांना घरचे दूध आणून गाभाऱ्यात घालायला सांगितले. सगळ्यांनी तसे केले, पण गाभारा भरला नाही. दुपारी एक म्हातारी खुलभर (चुळकाभर किंवा चूळ भरता येईल एवढे) दूध घेऊन आली. तिने दूध ओतताच गाभारा भरून गेला. तिने तिच्याकडे होते ते सर्व दूध प्रामाणिकपणे दिले हे त्याचे महत्त्व आहे. इतरांनी किती दूध दिले, दूध दिले की त्यात काही पाणी होते, याची चौकशी तिने केली नाही. इतरांनी त्यांचे काम केलेच असेल हा विश्वास आणि मी माझे काम केले पाहिजे ही भावना त्या म्हातारीची होती. तीच भावना या पद्यात व्यक्त झाली आहे. वंदना के इन स्वरों में एक स्वर मेरा मिला लो ॥धृ.॥ सर्व जण मनोभावे मातृभूमीचे स्तवन करत तिला नमस्कार करत आहेत. त्या स्तवनामध्ये माझाही आवाज मिसळून घ्या. मीही तुम्हा सर्वांबरोबर या स्तवनामध्ये सहभागी होतो. श्रेष्ठ जीवन को न भूलो, राग में जब मस्त झूलोअर्चना के रत्नकण में, एक कण मेरा मिला लो ॥१॥ राग म्हणजे आवडीची गोष्ट मिळाल्यावर किंवा झाल्यावर येणारा सुखद अनुभव. त्या सुखद अनुभवात तुम्ही जेव्हा मनोमन मस्त डोलत असता, तेव्हा तुम्हाला तुमची प्रिय गोष्ट म्हणजेच तुमचे प्रेयस मिळालेले असते. अशा वेळी आपण आवडीच्या गोष्टींच्या मागे लागणे एवढेच करायचे नसून, आयुष्यात त्यापेक्षा श्रेष्ठ असेआपल्याला व सर्वांना श्रेयस्कर म्हणजेच श्रेयसही मिळवायचे आहे हे विसरू नका. समुद्रमंथनाच्या वेळी ज्यातून चौदा मौल्यवान वस्तू निघाल्या तो रत्नाकर समुद्र आपल्या मातृभूमीचे पाय सतत धूत असतो. या पूर्वी होऊन गेलेले अनेक ब्रह्मर्षी व राजर्षी म्हणजे आपल्या देशातली मानवी रत्नेच होती. ही रत्ने मातृभूमीसाठी जगली. त्यांनी आपल्या मौल्यवान आयुष्याने मातृभूमीची पूजा केली. माझे आयुष्य एक रत्नकण नसले तरी एक धूलीकण निश्चितच आहे. रत्नाकर समुद्र, ब्रह्मर्षी आणि राजर्षी यांच्याप्रमाणे माझा धूलीकणही मला मातृभूमीच्या चरणांवर वाहू द्या. सगळे जण करत असलेल्या पूजेत मलाही सहभागी करून घ्या. तेच माझे व सर्वांचे श्रेयस आहे. जब हृदय के तार बोले, शृंखला के बंध खोलेचढ रहे हैं शीश अगणित, एक सर मेरा चढा लो ॥२॥ तार म्हणजे उच्च स्वर. हृदय म्हणजे अंतःकरण. अंतःकरणापासून उच्च स्वरात म्हणजे व्याकुळतेने परमेश्वराला साद घातली की तो आपल्या बंधनातून आपली सुटका करतो. भागवतात गजेन्द्रमोक्षाची कथा आहे. सरोवरात गेलेल्या हत्तीचा पाय मगरीने पकडला. हत्तीने कितीही जोर लावला तरी त्याला तो पाय सोडवता येईना. शेवटी त्याने व्याकुळ होऊन विष्णूची प्रार्थना केली. तेव्हा त्याच्या अंतःकरणातील विष्णूने त्याची सुप्त शक्ती जागी केली. त्याला मग आपला पाय सोडवता आला. आपल्यामधील शक्तीच्या अमर्याद राखीव साठ्याची जाणीव होऊन तो साठा वापरता येण्यासाठी मरणवेळ येऊन ठेपावी लागते. जगण्याची तीव्र इच्छा असली तर त्या मरणासन्न वेळी ‌‘हृदयाचे तार बोलायला‌’ लागतात. मग आपल्या मर्यादांची बंधने ओलांडून आपण कल्पनातीत पराक्रम करून जातो. मातृभूमीसाठी अनेक जण मरणाच्या दारापर्यंत गेले. त्यांनी मातृभूमीला जणू आपले शिर वाहिले. तसे माझेही शिर मी वाहायला तयार आहे. शिर हे आपले उत्तमांग. ते वाहायला तयार असणे म्हणजे आपला अहंकार किंवा ‘मी कोणीतरी श्रेष्ठ, कोणीतरी विशेष’ ही भावना विसरायला तयार असणे. ती विसरल्यावरच आपण व्याकुळतेने आपल्यातील सुप्त शक्तीला आवाहन करू शकतो. मातृभूमीला आपले जीवन म्हणजे सर्व शक्ती व अहंकार अर्पण करायचा तो सर्व देशांमध्ये सुसंवाद असलेले एक आदर्श जग निर्माण करण्यासाठी. त्याबाबत मदुराई येथे मानपत्राला दिलेल्या उत्तरात विवेकानंदांनी सांगितलेल्या वाक्याने या निरूपणाचा आणि एकूण निरूपणमालेचा समारोप करतो. विवेकानंद म्हणतात — ‌‘उद्याच ती अवस्था (सामाजिक परिपूर्णता) येईल अशा कल्पनेने व ती आपल्याच परिश्रमांवर अवलंबून आहे असे समजून प्रत्येकाने काम केले पाहिजे. आपल्यापैकी प्रत्येकाने अशी श्रद्धा बाळगली पाहिजे की जगातील प्रत्येकाने आपले कार्य पार पाडले असून, जगाला पूर्णता प्राप्त करून देण्याचे उर्वरित कार्य आपल्यालाच करायचे आहे. आपण घ्यायची जबाबदारी अशा स्वरूपाची आहे‌’. म्हणूनच ‌‘एक स्वर मेरा मिला लो । एक कण मेरा मिला लो । एक सर मेरा चढा लो ।’ असे म्हणत राहिले पाहिजे. पद्य – वंदना के इन स्वरों में एक स्वर मेरा मिला लो ॥धृ.॥श्रेष्ठ जीवन को न भूलो, राग में जब मस्त झूलोअर्चना के रत्नकण में, एक कण मेरा मिला लो ॥१॥जब हृदय के तार बोले, शृंखला के बंध खोलेचढ रहे हैं शीश अगणित, एक सर मेरा चढा लो ॥२॥

पद्य निरूपणाची भूमिका Read More »

पद्य क्र. १६  अब तक सुमनों पर चलते थे

निरूपण – अनेक जणांमध्ये काही उपजत गुण असतात. त्या गुणांच्या जोरावर ते अनेक कामे यशस्वी करतात. अनेक कामगिऱ्या पार पाडतात. पण कधीतरी एखादे काम असे येते की उपजत गुण पुरेसे पडत नाहीत. काही प्रशिक्षण घेतल्याशिवाय, काही सराव केल्याशिवाय, नवे आव्हान पूर्ण करता येत नाही. शिक्षणक्षेत्रात बऱ्याच वेळा अनुभव येतो की उपजत स्मरणशक्तीच्या जोरावर सुरुवातीच्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण होता येते. पण नंतरच्या अवघड परीक्षांसाठी अभ्यासकौशल्ये स्वतंत्रपणे शिकावी लागतात. मी गणित शिकवताना अनुभव घेतला आहे, की काही विद्यार्थी अवघड गणितेही वेगाने विचार करत तोंडी सोडवू शकतात. पण त्यांना विचाराच्या पायऱ्यांनुसार उत्तर लिहिणे जमत नाही. मग त्यांना लेखनाच्या कौशल्यांचा वेगळा सराव करावा लागतो. ज्याला वक्तृत्व चांगले जमते, त्याला वादविवादाची कौशल्ये शिकावी लागतात. ज्याला स्वतःला कोणतेही काम उत्तम करता येते, त्याला इतरांकडून काम करून घेणे शिकावे लागते. उपजत गुणांच्या जोरावर जे काम करता येत नाही, ते करणारच नाही असे प्रत्येक वेळी म्हणून चालत नाही. वेगळ्या प्रकारचे काम, आतापर्यंत केलेल्या कामांपेक्षा अवघड काम करायला, नेटाने शिकावे लागते. या संबंधी आजच्या पद्यामध्ये सांगितले आहे. अब तक सुमनों पर चलते थे, अब काँटों पर चलना सीखें ॥धृ.॥ कोणत्याही अडचणी न येता एखादे काम सहज, सुरळीत करता येणे म्हणजे जणू फुलांच्या पायघड्यांवरून चालत जाणे. त्याची सवय झाली की कामातली कोणतीही अडचण, कोणताही प्रश्न नकोसा वाटतो, काट्यांसारखा वाटतो. अशा अडचणी आल्यावर आतापर्यंत फुलांवरून चालायचा अनुभव घेतला, आता काट्यांवरून कसे चालायचे ते शिकूया, असे म्हणता आले पाहिजे. प्रत्येक समस्येकडे शिकण्याची संधी म्हणून पाहिले पाहिजे. खडा हुआ है अटल हिमालय, दृढता का नित पाठ पढाता;बहो निरंतर ध्येय-सिंधु तक, सरिता का जल-कण बतलाता;अपने दृढ निश्चय से पथ की, बाधाओं को ढहना सीखें ॥१॥ काट्यांवरून चालत जायला शिकायचे म्हणजे आपल्यामधले धीर धरता येणे आणि चिकाटीने काम करणे, हे दोन गुण वाढवावे लागतात. धीर धरणे म्हणजे कामाचे परिणाम दिसायची वाट पाहता येणे. मानवी आयुष्याच्या कालावधीत हिमालयात काही बदल झालेले दिसत नाहीत. शतकानुशतके तो आहे तसाच अटल म्हणजे अढळ – न ढळणारा, न हलणारा – दिसतो आहे. तो जणू ठामपणे, अधीर न होता, वाट पाहायला शिकवतो आहे. डोंगरमाथ्यावरून झरा वाहायला लागला की त्यातला प्रत्येक थेंब समुद्राकडे जायला लागतो. वाटेत कितीही अडथळे आले तरी नदीला आणि तिच्यातल्या प्रत्येक थेंबाला समुद्रापर्यंत जाण्याचा मार्ग काढत जावे लागते आणि तसे करूनच नदीतले सर्व थेंब शेवटी समुद्राला जाऊन मिळतात. ही चिकाटी आपण ध्येयापर्यंत पोचण्यासाठी मिळवली पाहिजे असे जणू ते थेंब आपल्याला सांगत आहेत. दृढता म्हणजे न ढळता थांबण्याचा धीर धरणे आणि निश्चय म्हणजे ध्येयापर्यंत पोचणारच, त्यासाठी लागेल ते सर्व करणारच, अशी चिकाटी. या दोन गुणांच्या आधारे ‌‘बाधाओं को ढहना‌’ म्हणजे वाटेतल्या अडचणींना उद्ध्वस्त करायला शिकूया. अपनी रक्षा आप करे जो, देता उसका साथ विधाता;अन्यों पर अवलंबित है जो, पग-पग पर वह ठोकर खाता;जीवन का सिद्धान्त अमर है, उस पर नित हम चलना सीखें ॥२॥ इतरांवर विसंबून राहिले की पावलोपावली परिस्थितीच्या थपडा खाव्या लागतात, ठरवल्याप्रमाणे काम होत नाही हे लक्षात ठेवले पाहिजे. आणि आपण हातपाय हलवल्याशिवाय परमेश्वरही आपल्याला टेकू देत नाही हे पण लक्षात ठेवले पाहिजे. या लक्षात ठेवायच्या दोन्ही गोष्टी जीवनाचे शाश्वत सिद्धान्त आहेत. त्याला अनुसरूनच नेहमी काम करायला शिकूया. हममें चपला सी चंचलता, हममें मेघों का गर्जन है;हममें पूर्ण चन्द्रमाचुंबी, सिंधु तरंगों का नर्तन है;सागर से गंभीर बनें हम, पवन समान मचलना सीखें ॥३॥ चपला म्हणजे आकाशात चमकणारी वीज. चंचलता म्हणजे चपळपणा. वीज जशी क्षणात आकाशाच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत चमकताना दिसते, तसा चपळपणा आपल्यामध्येही आहेच, (तो प्रकट करायला शिकले पाहिजे.) ढगांच्या गडगडाटासारखे आपल्या शक्तीचे प्रकटन करण्याइतका आत्मविश्वास आपल्यामध्येही आहेच, (तो जाहीर करायला शिकले पाहिजे). पौर्णिमेच्या दिवशी भरतीच्या लाटा जणू पूर्ण चंद्राला स्पर्श करायला उसळत असतात. तसे ध्येयाला स्पर्श करण्यासाठी पुन्हा पुन्हा उसळी मारण्याचा उत्साह आपल्यामध्येही आहेच. (त्याचे प्रात्यक्षिक दाखवायला शिकले पाहिजे). इतरांचे भले-बुरे सर्व काही पोटात घेऊन त्याचा स्वतःवर काही परिणाम समुद्र होऊ देत नाही. त्याला समुद्राची गंभीरता म्हणतात. तसे कामात येणारे सर्व कटू-गोड अनुभव गिळून टाकण्याची गंभीरता आपण मिळवली पाहिजे. डोंगरातल्या काही कड्यांना नेढं असते. म्हणजे वाऱ्याच्या दीर्घकाळ सततच्या माऱ्याने पडलेले भोक असते. कड्याच्या पलीकडे जाण्यासाठी भोक पडेपर्यंत वारा त्या कड्याला धडका देत असतो. वाटेतले अडथळे दूर होईपर्यंत त्यांना हट्टाने धडका द्यायलाही आपण शिकले पाहिजे. उठें उठें अब अंध:कारमय, जीवन-पथ आलोकित कर दें;निबिड निशा के गहन तिमिर को, मिटा, आज जग ज्योतित कर दें;तिल-तिल कर अस्तित्व मिटा कर, दीपशिखा सम जलना सीखें ॥४॥ अडचणी आणि आव्हानांपुढे हताश आणि अगतिक होऊन निष्क्रिय बसणे, पुढची वाट न दिसणे, म्हणजे जीवन अंध:कारमय होणे. आपण कामासाठी उठल्याशिवाय पुढची वाट दिसणार नाही. अंधार संपवून पुढची वाट प्रकाशित करण्यासाठी आधीच्या तीन कडव्यांमध्ये सांगितलेले गुण मिळवले पाहिजेत. त्या साठी आता उठा, जागे व्हा. निबिड म्हणजे घनदाट. निबिड निशा म्हणजे काळोखी रात्र. अशा रात्रीचा तिमिर, म्हणजे अंधार, गहन म्हणजे तीव्र असतो. मनाला भिववणारा असतो. मनातली भीती काढून टाकली की रात्रीचा घनदाट काळोख दूर होतो. अडचणींच्या भीतीमुळे आलेली निराशा, उत्साह गळून जाणे, हे भीती गेली की जाते. निर्भयतेमुळेच प्रकाश दिसायला लागतो. मृत्यूच्या घटकेपर्यंत तिल-तिल, म्हणजे कणाकणाने, अस्तित्व मिटाकर, म्हणजे शरीर झिजवत, ध्येयसिद्धीसाठी काम करत राहा. तसे केल्यानेच जीवनज्योत अखंड तेवती राहील आणि पुढचा मार्ग प्रकाशित करत राहील. पद्य – अब तक सुमनों पर चलते थे, अब काँटों पर चलना सीखें ॥धृ.॥खडा हुआ है अटल हिमालय, दृढता का नित पाठ पढाता;बहो निरंतर ध्येय-सिंधु तक, सरिता का जल-कण बतलाता;अपने दृढ निश्चय से पथ की, बाधाओं को ढहना सीखें ॥१॥अपनी रक्षा आप करे जो, देता उसका साथ विधाता;अन्यों पर अवलंबित है जो, पग-पग पर वह ठोकर खाता;जीवन का सिद्धान्त अमर है, उस पर नित हम चलना सीखें ॥२॥हममें चपला सी चंचलता, हममें मेघों का गर्जन है;हममें पूर्ण चन्द्रमाचुंबी, सिंधु तरंगों का नर्तन है;सागर से गंभीर बनें हम, पवन समान मचलना सीखें ॥३॥उठें उठें अब अंध:कारमय, जीवन-पथ आलोकित कर दें;निबिड निशा के गहन तिमिर को, मिटा, आज जग ज्योतित कर दें;तिल-तिल कर अस्तित्व मिटा कर, दीपशिखा सम जलना सीखें ॥४॥

पद्य क्र. १६  अब तक सुमनों पर चलते थे Read More »

पद्य क्र. १५  दिव्य ध्येय की ओर तपस्वी

निरूपण – साध्या सोप्या चालीतले आजचे पद्य अनेक संघटनांमध्ये म्हटले जाते. आपल्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या कार्यकर्त्याचे त्यात एक साधक आणि तपस्वी म्हणून वर्णन केले आहे. मी १९८६ साली कोलकाता येथे काही दिवस मुक्कामी असताना योगसाधना करणाऱ्या तेथील एका महाराष्ट्रातील कार्यकर्त्याने या पद्यासंबंधी माझ्याशी बोलताना ज्ञानेश्वरीतल्या एका ओवीचे उदाहरण दिले होते. ज्ञानेश्वरीच्या सहाव्या अध्यायात योगमार्गाचे वर्णन करताना ‌‘जिये मार्गीचा कापडी | महेशु आझुनी॥‌’ असे दोन चरण एका ओवीच्या शेवटी आले आहेत (ज्ञानेश्वरी ६.१५३). कापडी म्हणजे यात्रेकरू किंवा प्रवासी. महेशु म्हणजे श्री शंकर. या योगमार्गावर श्रीशंकरही अजून चालतच आहेत, मुक्कामावर पोचलेले नाहीत. म्हणजे हा निरंतर चालत राहण्यचा मार्ग आहे, असा या चरणांचा अर्थ आहे. ध्येयाकडे जाण्याचा मार्ग पण कधी संपणार नाही असे वाटेल, इतक्या लांब प्रवासाचा आहे असे या पद्यात म्हटले आहे. दिव्य ध्येय की ओर तपस्वी, जीवन भर अविचल चलता है ॥धृ.॥ व्यक्ती आणि समाज दोन्ही पूर्ण विकसित करणे हेच देशासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्याचे दिव्य ध्येय आहे. दिव्य म्हणजे प्रकाशमान आणि अवघड असे ध्येय. यदाकदाचित ते एका पिढीसाठी गाठता आले, तरी पुढच्या पिढीत तीच स्थिती राहील याची शाश्वती नाही. अतिप्रयत्नाने डोंगराच्या शिखरावर ढकलत नेलेला दगड, ढकलणाऱ्याने हात बाजूला करताच खाली घरंगळायला लागतो. तसे कार्यकर्ता थोडा जरी काम करायचा थांबला तरी त्याच्या संपर्कातील व्यक्ती व समाजात अस्थिरता निर्माण होऊ शकते. त्यामुळे कार्यकर्त्याचे जीवन तपस्व्यासारखे आहे. तो न डगमगता आयुष्यभर ध्येयाच्या दिशेने चालत राहतो म्हणजे काम करत राहतो. म्हणून त्याच्या पिढीतील व्यक्ती व समाज विकासाच्या एका टप्प्यावर निदान टिकून राहतात व काही प्रमाणात आणखी विकसित होऊ शकतात. सज-धज कर आयें आकर्षण,पग-पग पर झूमते प्रलोभन,होकर सबसे विमुख बटोही,पथ पर सँभल-सँभल बढता है ॥१॥ बटोही म्हणजे वाटसरू. ध्येयमार्गावर वाटचाल करणारा कार्यकर्ता. वाट सोडून जाण्याचा मोह होईल, असे कमी कष्टाचे पर्याय, लवकर साध्य होणारी उद्दिष्टे, समाजात मान्यता, प्रसिद्धी किंवा प्रतिष्ठा मिळेल असे कार्यक्रम, त्या कार्यकर्त्याला पावलोपावली समोर दिसत असतात. पण या आकर्षणांकडे तो विमुख होतो, म्हणजे पाठ फिरवतो आणि आपल्या मार्गावर सावधपणे पुढे जात राहतो. वाटेतल्या सगळ्या आकर्षणांपेक्षा आणि प्रलोभनांपेक्षा माणसाचा देवमाणूस करणे आणि समाजाला देवमानवांचा समाज बनवणे हे ध्येयच त्याला जास्त लक्ष वेधून घेणारे वाटत असते. अमर तत्त्व की अमिट साधना,प्राणों में उत्सर्ग कामना,जीवन का शाश्वत व्रत लेकर,साधक हँस कण-कण गलता है ॥२॥ व्यक्ती व समाजाने देवत्वाप्रत पोचण्याचे तत्त्व हे कायमसाठी मानवी उत्क्रांतीची दिशा दाखवणारे असे अमर तत्त्व आहे. त्यासाठीचे प्रयत्न कधीही निष्फळ होणार नाहीत किंवा मिटणार नाहीत, अशी अमिट साधना आहे. शरीरात प्राण असेपर्यंत ही साधना करण्याची इच्छा खऱ्या साधकामध्ये असते. प्राणांचा उत्सर्ग होईपर्यंत म्हणजे प्राण शरीर सोडून जाईपर्यंत, चेहऱ्यावरचे हसू हरवू न देता, प्रसन्नपणे, कणाकणाने आपले शरीर झिजवत, साधक शाश्वत म्हणजे आजीवन पाळायचे व्रत पाळत असतो. जणू त्याचे प्राण एकेका श्वासाबरोबर शरीरातून गळून पडत असतात. पण तो प्रसन्नतेने आपले व्रतपालन शेवटच्या श्वासापर्यंत, शरीरातील शक्तीच्या शेवटच्या कणापर्यंत करत असतो. सफल-विफल और आस निराशा,इसकी ओर कहाँ जिज्ञासा,बीहडता में राह बनाता,राही मचल-मचल चलता है ॥३॥ राही म्हणजे ध्येयपथावरचा प्रवासी कार्यकर्ता. या प्रवासात यश मिळते आहे की अपयश, परिस्थिती आशादायक आहे की निराशाजनक, याची तो जिज्ञासा म्हणजे चौकशी करत नाही. म्हणजेच यशापयशाचा, आशा किंवा निराशाजनक परिस्थितीचा, तो स्वतःवर परिणाम होऊ देत नाही. बीहड म्हणजे एकमेकींशी कशाही वेड्यावाकड्या जोडलेल्या, वाट चुकायला लावणाऱ्या घळींचा प्रदेश. बीहडता म्हणजे अनेक समस्या व संकटांनी भरलेला मार्ग. त्यातून तो मचल-मचल म्हणजे, हट्टाने, किंवा निग्रहाने, मार्ग काढत पुढे जात असतो. कोणत्याही अडचणींपुढे तो हात टेकत नाही. पतझड के झंझावातों में,जग के घातों – प्रतिघातों में,सुरभि लुटाता, सुमन सिहरता,निर्जनता में भी खिलता है ॥४॥ पानगळीच्या काळातले जोराचे वारे, झाडांचे खराटे करतात. झाडे जणू त्यापुढे अगतिक होतात. असे गती रोखणारे वारे आले, अनेक जणांनी मार्गात अडथळे आणले, त्यांच्याशी दोन हात करण्यात वेळ आणि शक्ती गेली, तरी साधक जगावर आणि परिस्थितीवर रागावत नाही. उलट ‌‘सिहरता सुमन‌’, म्हणजे पूर्ण उमलून सुकायला लागलेले फूल, शेवटपर्यंत जसे सुगंध लुटत असते, वाटत असते, तसे साधक जगाचे कल्याणच इच्छित आणि करत असतो. असे सुगंध लुटणारे फूल, राना-वनात, माळरानावर कुठेही फुलत असते. तसे हा साधक, राही, बटोही, तपस्वी कार्यकर्ता निर्जनतेत म्हणजे कोणी बघत नसताना, दखल घेत नसतानाही, ‌‘खिलता है‌’, फुलत असतो, उत्साहाने आणि प्रसन्नतेने काम करतच असतो. पद्य – दिव्य ध्येय की ओर तपस्वी, जीवन भर अविचल चलता है ॥धृ.॥सज-धज कर आयें आकर्षण,पग-पग पर झूमते प्रलोभन,होकर सबसे विमुख बटोही,पथ पर सँभल-सँभल बढता है ॥१॥अमर तत्त्व की अमिट साधना,प्राणों में उत्सर्ग कामना,जीवन का शाश्वत व्रत लेकर,साधक हँस कण-कण गलता है ॥२॥सफल-विफल और आस निराशा,इसकी ओर कहाँ जिज्ञासा,बीहडता में राह बनाता,राही मचल-मचल चलता है ॥३॥पतझड के झंझावातों में,जग के घातों – प्रतिघातों में,सुरभि लुटाता, सुमन सिहरता,निर्जनता में भी खिलता है ॥४॥

पद्य क्र. १५  दिव्य ध्येय की ओर तपस्वी Read More »

पद्य क्र. १४ – मातृ-भू की मूर्ति मेरे …

निरूपण – काही पद्यांमध्ये एखादा विचार प्रभावीपणे व्यक्त होतो. आतापर्यंत निरूपण केलेली बहुतेक पद्ये तशीच होती. पद्यातील विचारावर पुन्हा पुन्हा चिंतन केले की तो मनात खोलवर जाऊन रुजतो व त्याचे भाववृत्तीत रूपांतर होते. आजच्या पद्यामध्ये विचारापेक्षा भावनाच जास्त व्यक्त होतात. यातली मुख्य भावना देशभक्तीची आहे. मातृ–भू की मूर्ति मेरे हृदय मंदिर में विराजे ॥धृ.॥ एखाद्या मूर्तीची षोडशोपचार पूजा करणे ही भक्तीची प्राथमिक अवस्था आहे. समोर मूर्ती नसताना मनात तिची कल्पना करून तिला पूजेचे सर्व उपचारही कल्पनेनेच वाहणे याला मानसपूजा म्हणतात. ही जास्त श्रेष्ठ मानली जाते. कारण यामध्ये मूर्तीला कोणी धक्का लावू शकत नाही. आणि पूजेची सर्व द्रव्येही कल्पनेनेच वाहायची असल्यामुळे ती उपलब्ध नाहीत असेही कधी होत नाही. मातृभूमीच्या चित्रमूर्तीची किंवा तिच्या मनुष्याकृतीतील मूर्तीची पूजा ज्यांना करता आली ते म्हणत आहेत की बाहेरील मूर्तीची पूजा करता करता आता मातृभूमीची मूर्ती माझ्या अंतःकरणात कायमसाठी स्थापन झाली आहे. जशी हनुमंताच्या हृदयात श्रीरामाची मूर्ती प्रतिष्ठापित झाली होती. कोटि हिंदू हिंदवासी, मातृ-मंदिर के पुजारी,प्राण का दीपक संजोए, आरती माँ की उतारी,लक्ष्य के पथ पर बढें हम, स्वार्थ का अभिमान त्यागे ॥ १॥ एकदा मातृभूमीची मूर्ती हृदयात स्थापन केल्यावर तिची पूजा करण्यासाठी कुठे दगडा-विटांच्या मंदिरापर्यंत जावे लागत नाही. कोट्यवधी हिंदूंपैकी प्रत्येक जण जिथे आहे तिथून आपापल्या अंतःकरणाच्या मंदिरात तिची पूजा करू शकतो. त्यामुळे प्रत्येक भारतीय त्या मंदिरातील पुजारी आहे. आपले पंचप्राण आपल्याला कार्यशक्ती देतात. शक्ती ही तेजाची निदर्शक आहे. त्यामुळे आपल्या कार्यशक्तीचेच निरांजन करून, ‌‘संजोए‌’ म्हणजे त्या निरांजनाची ज्योत नीट सांभाळून, सर्वजण मातृभूमीची आरती करत आहेत. आपल्या कार्यशक्तीने मातृभूमीला जगात श्रेष्ठ पदावर नेण्याच्या उद्दिष्टापर्यंत पुढे जात राहणे, हीच मातृभूमीची आरती आहे. ती करताना स्वार्थाचा अभिमान म्हणजे अशी आरती करणारा मी कोणीतरी श्रेष्ठ आहे हे विसरून जायचे आहे. स्वर लहरियाँ उठ रही है, मातृ तव आराधना की,कोटि हृदयों में उठी है, चाह तेरी साधना की,शंख ध्वनि संघोष करती, आज रण का साज साजे ॥२॥ अनेक जण मातृभूमीला जगात श्रेष्ठ करण्याच्या प्रयत्नांनी तिची आरती करत आहेत. त्याने वातावरणात चैतन्य भरून राहिले आहे. जणू आरतीचे स्वर समुद्राच्या लाटांसारखे सतत उमटत राहत आहेत. मातृभूमीची अशी आराधना किंवा साधना आपणही करावी अशी उत्कट इच्छा एकाचे पाहून दुसऱ्याच्या मनात, अशा तऱ्हेने कोट्यवधी लोकांच्या हृदयामध्ये निर्माण झाली आहे. महाभारताच्या युद्धात भीष्मांनी आपला शंख फुंकल्यानंतर इतर सर्व योद्ध्यांचे शंख वाजायला लागले व इतर सर्व ‌‘रण का साज‌’ म्हणजे रणवाद्येही वाजायला लागली. तसे मातृभूमीला श्रेष्ठ करायला एक जण सज्ज झाल्यावर कोट्यवधी लोक उभे राहिले असे दृश्य आमच्या मनःचक्षूंसमोर उभे राहिले आहे.  शंखनाद आणि रणवाद्यांचा उल्लेख पुढच्या कडव्यातील शत्रू विरुद्धच्या लढाईची प्रस्तावना म्हणूनही केला आहे असे वाटते. हाथ में हो अरुण केतु, और पावों में प्रभंजन,शत्रु शोणित विजयश्रीसे, आज कर ले मातृ अर्चनविजयश्री का मुकुट फिरसे, मातृ मस्तक पर विराजे ॥३॥ अंधाराला नष्ट करायच्या मोहिमेवर आम्ही अरुण-केतु म्हणजे उगवत्या सूर्याच्या रंगाचा ध्वज घेऊन निघालो आहोत. पायांमध्ये प्रभंजनाचे अर्थात झंझावाताचे बळ घेऊन, म्हणजे अतिशय वेगाने, आम्ही शत्रूवर मात करायला निघालो आहोत. पारतंत्र्यामध्ये इंग्रज सरकार व त्यांचे सैन्य आपले शत्रू होते. स्वातंत्र्यामध्ये विषमता, दारिद्र्य, फुटीरता या वृत्तीच आपल्या शत्रू आहेत. विषमतेतील वीष काढून टाकणे, दारिद्र्याला दरिद्री करणे, फुटीरता फोडून टाकणे म्हणजे या शत्रूंना ठार करून जणू त्यांचे शोणित म्हणजे रक्त सांडणे. असे करणे म्हणजेच जणू त्यांच्या रक्ताने मातृभूमीला अभिषेक करून तिची पूजा करणे आहे. विषमता, दारिद्य्र, फुटीरता या शत्रूंना म्हणजेच अंधाराला घालवण्यासाठी समता, समृद्धी, एकात्मता यांचा प्रकाश आम्हाला आणायचा आहे. या प्रकाशाचे प्रतीक हा उगवत्या सूर्याच्या रंगाचा ध्वज आहे. या शत्रूंना नष्ट करूनच मातृभूमी श्रेष्ठ होणार आहे. या शत्रूंना नष्ट करून, जणू श्रेष्ठत्वाचा मुकुट मातृभूमीच्या मूर्तीला घालून, तिची शोभा वाढलेली आम्ही पाहू इच्छितो. पद्य – मातृ-भू की मूर्ति मेरे हृदय मंदिर में विराजे ॥धृ.॥कोटि हिंदू हिंदवासी, मातृ-मंदिर के पुजारी,प्राण का दीपक संजोए, आरती माँ की उतारी,लक्ष्य के पथ पर बढें हम, स्वार्थ का अभिमान त्यागे ॥१॥स्वर लहरियाँ उठ रही है, मातृ तव आराधना की,कोटि हृदयों में उठी है, चाह तेरी साधना की,शंख ध्वनि संघोष करती, आज रण का साज साजे ॥२॥हाथ में हो अरुण केतु, और पावों में प्रभंजन,शत्रु शोणित विजयश्रीसे, आज कर ले मातृ अर्चनविजयश्री का मुकुट फिरसे, मातृ मस्तक पर विराजे ॥३॥

पद्य क्र. १४ – मातृ-भू की मूर्ति मेरे … Read More »

पद्य क्र. १३ अविरत श्रमणे हेच जिणे

निरूपण – प्रबोधिनीतल्या विद्यार्थ्यांच्या व कार्यकर्त्यांच्या भावनिक व प्रेरणात्मक विकासासाठी त्यांच्यामध्ये responsive, responsible, co-operative, creative आणि  regenerative  हे गुण विकसित झाले पाहिजेत असे कै. आप्पांनी म्हटले होते. ‌‘कार्यकर्ते बनूया‌’ या पुस्तिकेत या गुणांचे मराठी भाषांतर अनुक्रमे प्रतिसादी, उत्तरदायी, सहयोगी, नवनिर्मितीक्षम आणि प्रेरणासंक्रामक असे केले आहे. प्रेरणासंक्रामक म्हणजे इतरांमध्ये स्वतःच्या प्रेरणेचे संक्रमण करणारा. प्रेरणेचे संक्रमण म्हणजे एकाकडून दुसऱ्याकडे प्रेरणेचे हृदयांतर करणे. स्वतःच्या हृदयातील प्रेरणा दुसऱ्याच्या हृदयात सुद्धा जागी करणे. आजचे पद्य प्रेरणासंक्रामकाने काय काय केले पाहिजे हे सांगणारे आहे. अविरत श्रमणे हेच जिणे,स्वप्नीही ध्येयपुनीत मने ॥धृ.॥ जे सतत ध्येयाचे चिंतन करतात, त्यांच्या मनातील इतर सर्व विचार बाजूला सारले जातात. जणू त्यांची मने ध्येयचिंतनाने पुनीत म्हणजे धुऊन निघालेली असतात. त्यांना झोपेतही ध्येयसाधनेचीच स्वप्ने पडतात. मग जागेपणीचे त्यांचे जगणे तर ध्येयसिद्धीसाठी विश्रांती न घेता सतत काम, काम, काम असेच असते. ईश्वरे अर्पिली अमोल काया,विमुक्त व्हाया मन जिंकायागतवैभव अपुले मिळवाया,जागणे जना जागविणे ॥१॥ आपल्याला ईश्वराने आपले शरीर दिले आहे. ते अतिशय मौल्यवान आहे. त्याचा उपयोग शरीर सतत कामात जुंपून आपल्या मनावर नियंत्रण आणण्यासाठी, देशाला पुन्हा वैभवसंपन्न करण्यासाठी आणि आपण शरीर नसून आत्मा आहोत हे ओळखण्यासाठी, म्हणजे मुक्त होण्यासाठी करायचा आहे. हे जाणून घेऊन स्वतः आपल्या कर्तव्याच्या बाबतीत जागे व्हा आणि इतरांनाही जागे करा. दुर्बलतेचा घाव जिव्हारी,शल्य तयाचे खुपे अंतरीकृतिने कोरुनिया हेतु उरीवागणे स्वये वागविणे ॥२॥ आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी आपले शरीर पुरेसे बलवान नाही, आपल्या मनावर आपले पुरेसे नियंत्रण नाही हे लक्षात आले, की शरीर-मनाच्या दुबळेपणाची ती जाणीव सलत राहते. इच्छा असून कामात कमी पडतो आहोत, या जाणिवेने जणू मर्मावरच आघात केला आहे असे वाटते. अशा वेळी असेल त्या शक्तीनिशी काम करत, आपले कर्तव्य पूर्ण करायचेच आहे, हे मनावर बिंबवायचे आहे. काम करत करतच शरीरात त्यासाठी आणखी बळ येणार आहे, हे लक्षात ठेवून स्वतः तसे वागायचे आहे आणि इतरांना तसे वागायला प्रोत्साहन द्यायचे आहे. सदोदित मुखी अमृतवाणी,घे स्वजनांचे मन जिंकोनीमृत ईर्ष्या फुलवी वचनांनी,बोलणे स्वये बोलविणे ॥३॥ इतरांना आपल्यासारखे कर्तव्याच्या बाबतीत जागे करायचे असेल, त्यांना आपल्यासारखे अविरत श्रम करायला प्रोत्साहन द्यायचे असेल, याबाबतीत त्यांनी आपले ऐकायचे असेल, तर त्यांची मने जिंकली पाहिजेत. त्या साठी ते स्वजन, म्हणजे आपुलकीच्या नात्याने आपल्याशी जोडलेले आहेत, असे आपल्याला व त्यांनाही वाटले पाहिजे. या साठी विझलेल्या कर्तव्यभावनेला संजीवनी मिळून ती जिवंत होईल, सतत प्रेरणा मिळेल, अशा प्रकारचे हृद्य बोलणे सर्वांशी केले पाहिजे. आपण असे बोलायचे लक्षात ठेवले पाहिजे. आपल्या सहकाऱ्यांनाही तसे बोलायला शिकवले पाहिजे. कर्णपथावर येतिल वार्ता,सुगम याहुनी सहस्र वाटानिर्धारे पुढती नच ढळता,चालणे दुजा चालविणे ॥४॥ आपल्याला आपली शक्ती कशात आहे हे माहीत असते आणि आपल्यातील उणिवा ही लक्षात येत असतात. उणिवांवरच कुढत राहिलो तर आपल्या मार्गातील अवघडपणाच मनात ठसत राहतो. अशा वेळी इतर मार्ग जास्त सोपे आहेत असे वाटायला लागते. अनेक जण कामाच्या पर्यायी पद्धती सांगतात. त्या ऐकल्यावर आपली पद्धत सोडून इतर मार्गांनी जावे असा मोह होतो. ते ‌‘हातचे सोडून पळत्याच्या मागे‌’ जाण्यासारखे आहे. अशा वेळी आपला मार्ग न सोडता, निश्चयाने पुढे चालत राहिले पाहिजे. इतरांनाही धीर देत आणि त्यांच्यामध्ये उत्साह भरत त्यांना आपल्याबरोबर नेले पाहिजे. कार्यमग्नता फळ चिंतेचे,असंतोष हे बीज फळाचेपुरवुनिया जल सहवासाचे, फुलविणे मळे बहरविणे ॥५॥ ध्येयासाठी अविरत श्रमणे हीच कार्यमग्नता, म्हणजे कामात बुडून जाणे आहे. ध्येयसिद्धीसाठी आणखी काय केले पाहिजे हा विचार म्हणजेच कामाची चिंता करणे. काम होईल की नाही? कसे होईल? असा चिंतेचा नकारात्मक अर्थ इथे अपेक्षित नाही. तर कसे करूया? काय करूया? अशी येथील चिंता होकारात्मक आहे. चालले आहे ते काम पुरेसे नाही, काम पुरेशा वेगाने चालू नाही, याबद्दलच्या असंतोषाने किंवा असमाधानाने, ही चिंता किंवा चिंतन सुरू होते. असंतोष हे बीज, त्यातून चिंता किंवा चिंतन हा अंकुर फुटतो आणि त्यातून कार्यमग्नता हे फळ येते. म्हणून असंतोष हे कार्यमग्नता या फळाचे बीज आहे. असंतोषातून नकारात्मक चिंता उत्पन्न होऊ नये, सकारात्मक चिंतनच निघावे, या साठी ज्यांच्या मनात असंतोष आहे, त्यांना सकारात्मक व विजयेच्छेने विचार करणाऱ्यांची साथसंगत लागते. असा विजयेच्छेने विचार आपण केला, आपल्या सहवासाची संधी इतरांना दिली, तर त्यांच्या असंतोषातून कार्यमग्नता फुलेल. अनेकांनी असा विजयेच्छेने विचार केला तर कार्याचे मळेच्या मळे पिकतील. म्हणजे भरपूर कार्य होईल. राष्ट्रकारणी सर्व समर्पून ,वीरव्रताचे करी आवाहन,स्वार्थाचे सागर उल्लंघुन, ध्येयदेव नयनी बघणे ॥६॥ ‌कार्यमग्नतेतून अखेर समृद्धी निर्माण व्हायला पाहिजे. या साठी आपले ध्येयच जणू काही आपल्याला वीरव्रत घेण्याचे आवाहन करत आहे. वीरव्रत म्हणजे यश मिळेपर्यंत कितीही वेळा अपयश आले तरी त्या अपयशांवर मात करत राहण्याचे व्रत. हे व्रत केवळ स्वतःच्या समृद्धीसाठी स्वीकारायचे नाही. तसे करणे स्वार्थीपणाचे होईल. ‌‘राष्ट्रार्थ पराक्रमाची भव्य कृती‌’ करणे, त्यासाठी अविरत श्रम करून शरीर झिजविणे, अशा वीरव्रताचे आवाहन ध्येयदेव म्हणजे ध्येयाच्या रूपातील देव करत आहे. ‌‘रूप पालटू देशाचे‌’ हे ध्येयच सतत आमच्या डोळ्यांसमोर असावे. त्याच्या सिद्धीसाठी सर्वस्व पणाला लावायची बुद्धी आम्हाला व्हावी. ज्याला इतरांना पेटवायचे आहे, त्याने या पद्यामध्ये म्हटल्याप्रमाणे स्वतः कर्तव्याच्या बाबतीत जागे राहिले पाहिजे, कृतीने प्रेरणा जागी राहील असे वागले पाहिजे, इतरांची विझू पाहणारी प्रेरणा पुनरुज्जीवित होईल असे बोलले पाहिजे, ठामपणे ठरवलेल्या मार्गाने चालत राहिले पाहिजे, इतरांना कार्यमग्न करण्यासाठी त्यांच्याबरोबर राहून त्यांच्यापर्यंत सकारात्मक व विजयेच्छू विचार सहवासातून पोचवले पाहिजेत आणि राष्ट्रकार्यासाठी वीरव्रत पालनाचे आवाहन केले पाहिजे. जागणे, वागणे, बोलणे, चालणे, सहवासात राहणे आणि वीरव्रताचे पालन करण्याचे आवाहन करणे, हे सर्व स्वतः करणे व इतरांकडून करवणे म्हणजे प्रेरणासंक्रमण. प्रेरणा संक्रामक बनण्यासाठी हे सर्व करायचा निश्चय केला पाहिजे. पद्य – अविरत श्रमणे हेच जिणे,स्वप्नीही ध्येयपुनीत मने ॥धृ.॥ईश्वरे अर्पिली अमोल काया,विमुक्त व्हाया मन जिंकायागतवैभव अपुले मिळवाया,जागणे जना जागविणे ॥१॥दुर्बलतेचा घाव जिव्हारी,शल्य तयाचे खुपे अंतरीकृतिने कोरुनिया हेतु उरीवागणे स्वये वागविणे ॥२॥सदोदित मुखी अमृतवाणी,घे स्वजनांचे मन जिंकोनीमृत ईर्ष्या फुलवी वचनांनी,बोलणे स्वये बोलविणे ॥३॥कर्णपथावर येतिल वार्ता,सुगम याहुनी सहस्र वाटानिर्धारे पुढती नच ढळता,चालणे दुजा चालविणे ॥४॥कार्यमग्नता फळ चिंतेचे,असंतोष हे बीज फळाचेपुरवुनिया जल सहवासाचे, फुलविणे मळे बहरविणे ॥५॥ राष्ट्रकारणी सर्व समर्पून,वीरव्रताचे करी आवाहन,स्वार्थाचे सागर उल्लंघुन, ध्येयदेव नयनी बघणे ॥६॥

पद्य क्र. १३ अविरत श्रमणे हेच जिणे Read More »

पद्य क्र. १२ – जननी जगन्मात की…

निरूपण – आजचे पद्य हे संकल्प-गीत आहे. ‘जगाने हम चले’ हे त्याचे पालुपद आहे. स्वतःमध्ये आणि इतरांमध्ये प्रेरणाजागरण करण्यासाठी आधी काय काय करायला हवे याच्या पायऱ्याच जणू काही त्यात सांगितल्या आहेत. जननी जगन्मात की, प्रखर मातृभक्ति की,सुप्त भावना जगाने हम चलें ॥धृ.॥ जगन्माता म्हणजे परमेश्वर. जननी म्हणजे जन्मदात्री आई. आपण परमेश्वरालाही जगन्माता म्हणजे जगाची आईच मानतो. या दोन्ही आईंशी आपण एकरूप आहोत, कारण आपण त्यांच्यापासूनच जन्मलो आहोत. ही एकरूपता अनुभवणे म्हणजेच मातृभक्तीची भावना. ही एकरूपता सर्वांना सतत जाणवते असे नाही. जाणवत नसते तेव्हा तिला ‘मातृभक्ति की सुप्त’ म्हणजे झोपलेली ‘भावना’ म्हटले आहे. सर्वांमध्ये ही एकरूपतेची भावना जागी करण्याचे काम आम्ही स्वीकारले आहे. सदैव से महान जो सदैव ही महान हो,कोटि-कोटि कंठ से अखंड वंद्य गान हो,मातृ-भू की अमरता, समृद्धि और अखण्डता कीशुभ्र कामना जगाने हम चलें ॥१॥ कामना म्हणजे अमुक एक गोष्ट व्हावी किंवा मिळावी, ही इच्छा. स्वतःला मिळावे, स्वतःसाठी व्हावे अशी, इच्छा असली की ती स्वार्थाने डागाळलेली किंवा कलंकित कामना. अनेकांना किंवा सर्वांना मिळावे, किंवा सर्वांसाठी व्हावे, ही शुभ्र किंवा निष्कलंक कामना. शुभ्र म्हणजे स्वार्थरहित.आपली मातृभूमी पूर्वीपासून महान आहेच. ती या पुढेही सर्व काळ महान राहावी ही शुभ्र कामना. कोट्यवधी लोकांनी महान मातृभूमीची स्तोत्रे सतत गावीत, ही शुभ्र कामना. आम्ही ‘देशजननी रूप में ही विश्वजननी दीखती’ असे म्हणतो. मातृभूमीला आम्ही जगन्मातेचे प्रतीक मानतो. ही मातृभूमी अमर म्हणजे तिचे अस्तित्व चिरंजीव व्हावे, तिची समृद्धी किंवा भरभराट होत राहावी आणि तिची अखंडता म्हणजे फाळणी आणि फुटीरता नष्ट व्हावी, हीच शुभ्र कामना आहे. ही कामना धृपदात म्हटल्याप्रमाणे जगन्मातेपर्यंत पोचावी आणि मातृभूमी प्रमाणे अखिल पृथ्वीच्या रूपातील जगन्माताही चिरंजीवी, समृध्द व अखंड व्हावी याकरिता आम्ही सरसावलो आहोत. एक माँ के पूत, एक धर्म, एक देश है,फिर भी प्रेम के स्थान ईर्षा और द्वेष है,सुबन्धुता व स्नेह की, सुकार्य और सुध्येय कीस्वच्छ भावना जगाने हम चले ॥२॥ सारे भारतवासी हे एकाच भारतमातेचे कन्या-पुत्र आहेत. सर्वांचा देश आणि मातृभक्तीचा धर्म एकच आहे. झोपेतून उठल्यावर डोळे, तोंड धुवून, प्रातर्विधी व स्नान करून शरीर स्वच्छ करावे लागते. तसे मातृभक्तीची सुप्त भावना जागी केल्यावर त्याबरोबर डागाळलेल्या, म्हणजे स्वतःपुरते बघायच्या, कामना आणि परस्पर प्रेमाऐवजी ईर्षा म्हणजे एकमेकांशी स्पर्धा आणि त्यातून येणारा मत्सरही प्रकट होतात. या अस्वच्छ भावना धुवून काढायला हव्यात. आपण एका आईचे कन्या-पुत्र आहोत, या नात्याने आपण प्रेमाने जोडले गेलेले आहोत, हे एकदम लक्षात येत नाही. त्यासाठीच ईर्षा आणि द्वेषाच्या जागी परस्परांमध्ये सुबन्धुता, म्हणजे राम-लक्ष्मण किंवा राम-भरतासारखा बंधुभाव व स्नेह, म्हणजे राम-सुग्रीव किंवा कृष्ण–सुदामा सारखी मैत्री, या स्वच्छ भावना जागवायला आम्ही निघालो आहोत. स्वच्छ म्हणजे अहंकाररहित. अस्वच्छ भावना समूळ जाण्याकरिता व स्वच्छ भावना कायम टिकण्याकरिता मातृभूमीची अखंडता, समृद्धी आणि अमरता यासाठी प्रयत्न करणे हे सुकार्य आहे. ती शुभ्र कामना मनात सदैव असणे हेच सुध्येय आहे. सुबन्धुता, स्नेह, सुकार्याची तळमळ आणि सुध्येयाची आस याच स्वच्छ भावना आम्हांला सर्वांमध्ये जागृत करायच्या आहे. प्रान्त-भेद, भाषा-भेद, भेद भी अनेक हैं,छिद्र –छिद्र राष्ट्र का शरीर देख खेद है,अनेकता व भेदता से एकता अभेदता कीश्रेष्ठ भावना जगाने हम चले ॥३॥ सुबन्धुता व स्नेह या स्वच्छ भावना. त्या जाग्या व्हाव्यात या साठी वर वर दिसणाऱ्या वेगळेपणाच्या आतला सारखेपणा जाणवणे व आपण शंभर आणि पाच नसून एकशे पाच आहोत हे जाणवणे, म्हणजेच स्वच्छतेच्या पलीकडच्या, श्रेष्ठ भावना जागवायच्या आहेत. श्रेष्ठ भावना म्हणजे स्व-केंद्रित ऐवजी राष्ट्र्केंद्रित भावना. जाती, पंथ, प्रान्त, भाषा, खान-पान हेच बघायला लागले तर अगदी दोन व्यक्तींमध्ये सुद्धा भेद दिसतील. कापडाकडे कावळ्याच्या नजरेने पाहिले तर आडव्या-उभ्या धाग्यांच्या ऐवजी त्यांच्या मधली छिद्रे किंवा भोकेच दिसतात. कापड ज्याचे बनले आहे ते उभे-आडवे धागे एकाच कापसाचे आहेत हे बघणे, ही श्रेष्ठ भावना. राष्ट्राचे शरीर म्हणजे इथला समाज. त्यातली छिद्रे, म्हणजे वेगळेपणा, शोधण्याऐवजी, देशातील व्यक्तींच्या नात्यामधला घट्टपणा वाढवणे, एकता आणि अभेदतेच्या मुद्‌द्यांची जाणीव व त्याबद्दलचा अभिमान या श्रेष्ठ भावना वाढवणे हेच आमचे काम आहे. व्यक्ति-व्यक्ति के हृदय समष्टि भाव को जगा,सकामता व स्वार्थता के हेय भाव को मिटा,परहितों सुखों मे निज के हित-सुखों को देखने कीश्रेष्ठ चाह को जगाने हम चले ॥४॥ काही तरी मिळावे असे वाटणे म्हणजे सकामता. मलाच मिळावे असे वाटणे म्हणजे स्वार्थता. मनाच्या या दोन्ही वृत्ती हेय म्हणजे तुच्छ व त्याज्य आहेत. त्या टाकून द्यावेसे वाटणे म्हणजेच श्रेष्ठ चाह किंवा श्रेष्ठ इच्छा. त्या कशा टाकायच्या? तर ‘परहितों सुखों में’ म्हणजे इतरांच्या हिताच्या व सुखाच्या गोष्टींमध्ये, ‘निज के हित-सुखों को’ म्हणजे स्वतःचे हित आणि सुख पाहण्याची सवय लागली, तर त्या टाकता येतील. इतरांच्या हितात स्वतःचे हित असल्याचे कधी वाटते? तर व्यक्ती-व्यक्तीमध्ये समष्टि-भाव म्हणजे आपण सर्वजण मिळून एकच मोठा जीव आहोत, असे सर्वांना वाटू लागले तर. प्रत्येक व्यक्तीला असे वाटू लागावे हीच श्रेष्ठ चाह. आपण कोणाचे चाहते असतो तेव्हा त्यांच्याबद्दल आपल्याला प्रेम असते. इथेही श्रेष्ठ चाह म्हणजे राष्ट्र्केंद्रित चाह आहे. ती निर्माण करायला आम्ही निघालो आहोत. निज सुखों की एक ओर छोड कर के लालसा,चल पडे हैं मातृभू-उत्थान का ले रास्ता,श्रम से, तप से, त्याग से ध्येय-दीप जगमगा केमहान चेतना जगाने हम चले ॥५॥ समष्टि-भाव म्हणजे मी माझ्या शरीरापुरता मर्यादित नसून मी साऱ्या देशाला व्यापून आहे असे वाटणे. निज सुख म्हणजे माझ्या शरीराचे सुख. त्या एका शरीराला सुख मिळावे ही लालसा किंवा इच्छा आम्ही कधीच सोडून दिली आहे. साऱ्या देशाचे, राष्ट्राचे उत्थान म्हणजे राष्ट्राने झडझडून, अभिमानाने व सामर्थ्याने ताठ उभे राहणे, यातच आमचे सुख आहे. त्या सुखाच्या प्राप्तीच्या मार्गावर आम्ही पुढे निघालो आहोत. या मार्गाचा शेवट क्षितिजावर असल्याने अजून स्पष्ट दिसत नाही. आमच्या श्रमाने, तपाने आणि राष्ट्राच्या मोठ्या देहाच्या सुखाची धून लागल्यावर, आमच्या प्रत्येकाच्या छोट्या देहाची आस सुटल्यामुळेच, आमचा मार्ग आणि त्याच्या क्षितिजावरचे आमचे ध्येय, प्रकाशित होणार आहे. ते प्रकाशित करून, आता राष्ट्र-उत्थानाच्या मार्गावर वेगाने पुढे जाण्याची चेतना म्हणजे प्रेरणा मिळवून, आम्ही वाटचाल करत आहोत. आपापल्या सुखाची फिकीर कोणीही करत नसून, सर्व मिळून सर्वांच्या उत्थानाचे चिंतन करत असल्याने, आमची चेतानाही महान व्हावी. महान प्रेरणा म्हणजे राष्ट्रकेंद्रित प्रेरणा. सुरुवातीच्या काळात या पद्यातील भावना, इच्छा, इत्यादी नामांकडे लक्ष न जाता त्या नामांच्या सुप्त, स्वच्छ, शुभ्र, श्रेष्ठ अशा विशेषणांकडेच लक्ष जाते. त्याच नामांना वेगवेगळी विशेषणे लावल्याची गंमत वाटते. कवीला वेगळी नामे सुचली नाहीत का अशी थट्टाही करावीशी वाटते. महाविद्यालयीन काळात मीही अशी थट्टा केली आहे. नंतर हळूहळू पद्यातील भाव कळत गेला. इच्छा किंवा कामना ही मूळ भावना. नैसर्गिक इच्छा बहुतेक वेळा स्वतःसाठी काही मिळावे किंवा व्हावे अशा असतात. स्वार्थ कमी करून ईश्वरासाठी किंवा मातृभूमीसाठी काही केले पाहिजे असे वाटू लागले की त्या इच्छेला इथे भावना म्हटले आहे. केवळ कर्तव्य म्हणून नाही तर ईश्वराबद्दलचे किंवा मातृभूमीविषयी प्रेम वाटू लागल्यावर भक्तिभावनेचे रूपांतर ‘चाह’मध्ये होते. त्या ’चाह’ला स्थिर व तीव्र केल्यावर त्यातून चेतना किंवा प्रेरणा निर्माण होते. सुप्त भावना जागी होण्यापासून महान चेतना जागरण होईपर्यंतचे

पद्य क्र. १२ – जननी जगन्मात की… Read More »