क्षितिज नवे मज….
क्षितिज नवे मज सतत बोलवी, साथीला सन्मित्र हवे आज एकटा, अनघड जरि मी, मनात अंकुर हा उगवेक्षितिज नवे रे, क्षितिज नवे ।। ध्रु. ।। निद्रेमधुनी जागा होता नवाच मी मजला दिसतो उलगडणारी दुनिया भवती मी मध्ये माझा नसतो साखरझोपेमधली हसरी स्वप्नमालिका अवतरते कठोर अवघड सारे सरुनी आसमंत होती हिरवे ।। १ ।। चुटकीसरशी सुटती गणिते […]