ज्ञान प्रबोधिनी सोलापूर
सोलापूरचा पूर्व प्राथमिक विभाग गेले ७७ वर्ष चालू आहे. मुलांच्या मूलभूत क्षमतांचा विकास करत आनंददायी शिक्षणाची रचना उभी करण्यात शाळेचे महत्त्वाचे योगदान आहे. याच अनुभवावर आपण शिशु अध्यापिका विद्यालय चालवले. सध्या विद्यालयाची ६६ वी तुकडी चालू आहे.
पूर्व प्राथमिक शाळेत आपले अध्यापक प्रयोग करत असतातंच. कामाच्या नोंदीही ठेवल्या असतात. या वर्षी पूर्व प्राथमिक विभागाने असे ठरवले की आपले कृती संशोधन अन्य शाळेतील शिशु शिक्षकांसमोर मांडावे, ज्यायोगे शैक्षणिक गुणवत्ता विकास करण्यास मदत होईल.
या हेतूने शिशु अध्यापकांनी जी मांडणी केली त्या गटांचा तपशिल खाली तक्त्यामध्ये देत आहे. बदलापूर, आंबेजोगाई, निगडी केंद्र व स्त्री शक्ती प्रबोधन ग्रामीण विभागाची याला मदत झाली. या निमित्ताने ६ गटातील २९१ शिशु शिक्षकांपर्यंत आपण पोचलो
बाल शिक्षण कृती परिषद – २०२४-२५
अ. क्र. | दिनांक | विषय | ठिकाण | कोणासाठी | संख्या |
१. | २३/११/२०२४ | भाषा विकास – (शब्द संग्रह वाढ), कारक कौशल्य | ज्ञान प्रबोधिनी पूर्व प्राथमिक विभाग सोलापूर | सोलापूर शहरातील २६ शाळांमधील शिक्षक | १२६ |
२. | १८/०१/२०२५ | कारक कौशल्य विकास | ज्ञान प्रबोधिनी पूर्व प्राथमिक विभाग सोलापूर | अंगणवाडी शिक्षिका | २५ |
३. | २२/१२/२०२४ | कारक कौशल्य विकास | निवेदन | निगडी पूर्व प्राथमिक गट | १८ |
४. | ०७/०२/२०२५ | भाषा विकास, कारक कौशल्य | बदलापूर | बदलापूर परिसरातील पूर्व प्राथमिक शिक्षक | ४७ |
५. | ११/०४ व १२/०४/२०२५ | भाषा विकास (शब्द संग्रह वाढ), कारक कौशल्य | मूधोळकर बालक मंदिर फलटण शिक्षक | फलटण एज्युकेशन सोसायटीच्या पूर्व प्राथमिक विभागाच्या सर्व शिक्षिका | ३५ |
६. | ०१/०३/२०२५ | भाषा विकास, कारक कौशल्य | अंबाजोगाई | पूर्व प्राथमिक शिक्षक | ४० |
एकूण | २९१ |

