संत्रिका सुवर्ण महोत्सव

औपचारिक शिक्षण प्रश्न क्रमांक २४

२४ : प्रबोधिनीच्या प्रशालां – मधून कार्यकर्ते का घडत नाहीत ? उत्तर :- “मी या प्रश्नाचा अर्थ ‘अपेक्षित गतीने, अपेक्षित संख्येने आणि अपेक्षित गुणवत्तेचे कार्यकर्ते का घडत नाहीत?’ असा घेतो”, असे म्हटल्यावर प्रश्नकत्यनि मला समजलेला प्रश्नाचा अर्थ बरोबर आहे असे सांगितले. गेल्या महिन्याभरात दोन तीन ठिकाणी मी प्रबोधिनीचा इतिहास सांगितला. तो सांगताना मी दोन शब्दसमूहांचा […]

औपचारिक शिक्षण प्रश्न क्रमांक २४ Read More »

औपचारिक शिक्षण प्रश्न क्रमांक २३

२३ : तुम्ही व विवेकराव पोंक्षे बऱ्याच वेळा ‘प्रबोधिनीची शाळा special school नाही, ती school with a purpose आहे’, असे म्हणता. या दोन्ही इंग्रजी वर्णनांचा नेमका अर्थ काय ? उत्तर :- २३ : ज्ञान प्रबोधिनी खंड २ मध्ये पृष्ठ २५ वर “Jnana Prabodhini is not a static body. It is a new experiment in purpose-oriented

औपचारिक शिक्षण प्रश्न क्रमांक २३ Read More »

औपचारिक शिक्षण प्रश्न क्रमांक २२

२२ : बुद्धिमान विद्यार्थ्यांसाठी प्रशाला ही कल्पना आता कालबाह्य झाली आहे का ? उत्तर :- प्रबोधिनीत बुद्धिमान विद्यार्थ्यांची प्रशाला सुरू झाल्यावर १) बुद्धिमान विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेचा विकास, २) बुद्धिमान विद्यार्थ्यांच्या चारित्र्यगुणांचा (प्रबोधिनीच्या घटनेत दिलेल्या गुणांचा) विकास आणि ३) बुद्धिमान विद्यार्थ्यांचे समान बुद्धिमत्तेच्या विद्यार्थ्यांबरोबर बौद्धिक शिक्षण व सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांबरोबर समूहजीवनाचे शिक्षण, अशी किमान तीन शैक्षणिक उद्दिष्टे

औपचारिक शिक्षण प्रश्न क्रमांक २२ Read More »

औपचारिक शिक्षण प्रश्न क्रमांक २१

२१ विद्याव्रत संस्कार हा प्रबोधिनीच्या शिक्षण-प्रणालीचे मुख्य सूत्र आहे असे आपण म्हणतो. पण तसे वाटत नाही. तो जास्तीचा, नंतर भर घातलेला, उपक्रम वाटतो. (मुख्य सूत्र कसे आहे ते समजावून सांगावे). उत्तर :- दि. ८ ऑगस्ट १९६२ ला प्रबोधिनीचे शैक्षणिक कार्य सुरू झाले, तेव्हा उत्तम विषय-अध्यापन, सामाजिक जाणीव निर्मितीसाठी विशेष उपक्रम व नेतृत्वगुणविकासासाठी सहली व शिबिरे

औपचारिक शिक्षण प्रश्न क्रमांक २१ Read More »

औपचारिक शिक्षण प्रश्न क्रमांक २०

२० : गुरुकुल शिक्षणपद्धती ही प्रबोधिनीची अधिकृत शिक्षणपद्धती आहे का ? उत्तर :- पंचकोशाधारित गुरुकुल हा प्रबोधिनीचा अधिकृत शैक्षणिक प्रयोग आहे. शैक्षणिक प्रयोगाचे शिक्षणपद्धतीत रूपांतर होण्यासाठी अ) लिखित हस्तपुस्तिका, आ) लिखित तत्त्वज्ञान, इ) तत्त्वज्ञानाच्या आधारे कार्यपद्धतीत स्थलकालानुसार बदल व ई) कार्यपद्धती बदलली तरी परिणामाचे सातत्य या गोष्टी घडायला हव्यात. पुण्यातील प्रशाला, गुरुकुल, क्रीडाकुल हे सर्वच

औपचारिक शिक्षण प्रश्न क्रमांक २० Read More »

औपचारिक शिक्षण प्रश्न क्रमांक १९

१९ : प्रबोधिनीच्या शाळांमध्ये वर्ग-शिक्षकाचे काम इतर शाळांपेक्षा वेगळ्या पद्धतीने निश्चित केले आहे का ? उत्तर :- वर्ग-शिक्षकांनी काय करावे या बाबत विविध बैठकी आणि प्रशिक्षण वर्गांमध्ये बोलणे होते. पण ‘प्रबोधिनीच्या शाळांमध्ये वर्ग शिक्षकांची कामे’ अशी काही यादी निश्चित केलेली नाही. मी वर्गशिक्षकांशी बोलताना पाच मुद्यांच्या आधारे बोलतो. औपचारिक नोंदी, निर्णय लावणे इ. कामांच्या पलीकडे

औपचारिक शिक्षण प्रश्न क्रमांक १९ Read More »

औपचारिक शिक्षण प्रश्न क्रमांक १८

१८ : प्रबोधिनीचे प्राथमिक शिक्षणाचे उद्दिष्ट काय आहे ? उत्तर :- आपण प्रबोधिनीत माध्यमिक शिक्षणाचा जेवढा विचार केलेला आहे तेवढा प्राथमिक शिक्षणाचा विचार केलेला नाही. साखरशाळांच्या निमित्ताने आपण प्राथमिक शिक्षणावर पाच सहा पुस्तिका प्रकाशित केल्या आहेत. परंतु त्यात अध्यापन तंत्र व मूल्यमापन तंत्रावरच जास्त भर आहे. पुस्तकी शिक्षणासाठी क्षमताधिष्ठित अध्ययनाचा विचारही त्यात आहे. परंतु प्रबोधिनीचे

औपचारिक शिक्षण प्रश्न क्रमांक १८ Read More »

औपचारिक शिक्षण प्रश्न क्रमांक १७

१७ : इंग्रजीशिवाय अन्य परदेशी भाषा शिकण्या-शिकवण्याबाबत प्रबोधिनीची भूमिका काय आहे ? उत्तर :- कोणतीही नवीन भाषा शिकली की ती भाषा बोलणाऱ्यांशी संवाद करता येतो. संघटनेमध्ये अधिकाधिक लोकांशी संवाद करायचा असतो. त्यामुळे नवीन भाषा येणे उपयुक्तच आहे. प्रबोधिनीचे एक खूप जुने माहिती-पत्रक फ्रेंच व जर्मन भाषांमध्ये छापलेले आहे. व्यक्तिशः कोणी परदेशी भाषा शिकत असेल तर

औपचारिक शिक्षण प्रश्न क्रमांक १७ Read More »

प्रबोधिनीविषयी सर्वसाधारण प्रश्न कमांक १६

१६ : प्रबोधिनीने किंवा प्रबोधिनीच्या एखाद्या विभागाने ISO 9000, ISO 9001, ISO 9002 किंवा ISO 14000 या सारखी गुणवत्ता प्रमाणपत्रे मिळवण्याचा प्रयत्न केला आहे का ? उत्तर :- ज्ञान प्रबोधिनी ग्रामोद्योग प्रतिष्ठान या सध्या निष्क्रिय असलेल्या स्वतंत्र न्यासातर्फे कनक उद्योग नावाचा, आता बंद पडलेला एक उद्योग चालवला जायचा. या उद्योगाने ISO 9002 प्रमाणपत्र मिळवण्याचा प्रयत्न

प्रबोधिनीविषयी सर्वसाधारण प्रश्न कमांक १६ Read More »

प्रबोधिनीविषयी सर्वसाधारण प्रश्न क्रमांक १५

१५ :प्रबोधिनीचे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इतर संस्था किंवा सरकारचे साहाय्य घ्यावे का ? उत्तर :- सर्व परवाच एक जुने टिपण मला सापडले. ‘बऱ्याच वेळा मोह कर्तव्याचे रूप घेऊन येतो. त्यापासून सावध राहिले पाहिजे.’ अशा स्वरूपाचे वाक्य त्यात होते. संदर्भ वेगळा होता. पण या प्रश्नाला ते बरोबर लागू पडते. कार्यक्रम यशस्वी करणे म्हणजे काय ? कार्यक्रम

प्रबोधिनीविषयी सर्वसाधारण प्रश्न क्रमांक १५ Read More »