
७ जून २०२५
लेख क्र. ४
भारतीयत्वाचे चिरंतन, निष्पक्ष सूत्र : संस्कृत भाषा आणि वाङ्मय असे संस्कृत बद्दल अभिमानाने सांगताना प्रा. कृष्ण श्री. अर्जुनवाडकर यांनी संस्कृतची महती सांगणारे एक गीत रचले आहे. त्याची रचना व चाल ‘वन्दे मातरम्’ प्रमाणे आहे. त्यामध्ये कोटी कोटी मनांवर जिने चिरस्थायी संस्कार केले. जी गुणवती, रसवती, अलंकृता आहे अशा मातेला मी वंदन करतो. असे वर्णन केले आहे.
प्रा. अर्जुनवाडकर यांनी केलेल्या या पद्याकडे पाहताना अतिशयोक्तीची भावना काहींच्या मनात येऊ शकते कारण संस्कृत भाषेला किती व कसे महत्त्व द्यावे याबद्दल अनेक मतमतांतरे आहेत. अर्थात असे असतानाही काही संस्कृतप्रेमी संस्कृतला व्यवहारोपयोगी व आनंदी भाषेचे स्थान देण्यासाठी प्रयत्नरत आहेत. समाजमाध्यमांद्वारा तंत्रज्ञान व संस्कृत यांचा सुसंगत मेळ घालत संस्कृतचा प्रचार व प्रसार करीत आहेत.
श्री. अर्जुनवाडकर यांचे वन्दे मातरम् पद्य व त्याचे ध्वनिमुद्रण पाठवीत आहोत ते आवश्य ऐकावे.
ज्ञान प्रबोधिनी : संस्कृत-संस्कृति-संशोधिका
वन्दे मातरम् । | मी मातेला वंदन करतो, |
वन्दे मातरम् । सुवदां सुहितां जनगणपूजितां देवभारतीं मातरम् ।। शास्त्रनिष्ठाकवचितधीबलां काव्यभावनमधुरितमानसां शुचिस्मितां महितमनस्वितां सुखदां शमदां मातरम् ।।१।। कोटिकोटिकण्ठमुखरितपदार्थनिधाने कोटिकोटिधीविहितोत्कटसंस्कारे के ब्रूयुर् मातस् त्वमबला ? अमितबलान्वितां नमामि तारिणीम् अशुभनिवारिणीं मातरम् ।।२।। त्वं विद्या त्वमु भक्तिः, त्वं भुक्तिस् त्वं मुक्तिः, त्वं चैतन्यं शरीरे, त्वं प्रेरणा त्वं धृतिः, त्वं मनस् त्वं बुद्धिः, तवैव प्रतिमा ननु मानवे मानवे ।।३।। त्वं हि वाणी कोमलवीणावादिनी त्वं चोमा सकलकलाविलासिनी त्वं दुर्गा दारुणशस्त्रविधारिणी नमामि त्वां, नमामि कमलाम्, अतुलां सुवदां सुहितां मातरम् ।।४।। सगुणां सरसां सुपथां भूषितां करुणां वत्सलां मातरम् ।। वन्दे मातरम् । कृष्ण श्री. अर्जुनवाडकर | मी मातेला वंदन करतो, जी बोलण्याला सुखकर आहे, कल्याणकर आहे. समाजाला पूज्य आहे, अशा देववाणी मातेला मी वंदन करतो. बुद्धीच्या शक्तीला जिने शास्त्रनिष्ठेचे कवच घातले आहे, काव्यभावनेने जिने मनाला मधुरता दिली आहे, निर्मळ हास्य करणारी, स्वाभिमान उंचावणारी, सुखकरी, शांतिदायिनी अशा मातेला मी वंदन करतो. कोटी कोटी कंठांतून शब्द आणि अर्थ यांचे भांडार जिने प्रकट केले, कोटी कोटी मनांवर जिने चिरस्थायी संस्कार केले, अशा हे माते, कोण म्हणेल तू अबला आहेस ? अमित शक्ती धारण करणारी, तारण करणारी, अशुभनिवारण करणारी, अशा मातेला मी वंदन करतो. माते ! तू विद्या आहेस, तू भक्ती आहेस, तू भोगदायिनी, तू मोक्षदायिनी, तू शरीरातला प्राण आहेस, तू प्रेरणा, तू धारणा, तू मन, तू बुद्धी, माणसामाणसांत खरोखर तुझीच मूर्ती वास करते. कोमल वीणा वाजवणारी वाणी तूच, सकल कलांचा विलास करणारी उमाही तूच, भीषण शस्त्रे धारण करणारी दुर्गाही तूच. तुला मी वंदन करतो, कमलेला वंदन करतो. अतुलनीय, मधुरभाषिणी, कल्याणकारिणी अशा मातेला मी वंदन करतो. गुणवती, रसवती, सुमार्गवती, अलंकृता, कारुण्यपूर्णा, प्रेमला अशा मातेला मी वंदन करतो, मी मातेला वंदन करतो. |