प्रस्तावना
ज्ञान प्रबोधिनीचे संचालक माननीय डॉ. गिरीशराव बापट यांचा कार्यकर्त्यांशी सहसंवाद संस्थेच्या मासिक प्रतिवृत्तामधून नेहमी चालू असतो. अनेक प्रासंगिक घडामोडींना प्रतिसाद देताना प्रबोधकांनी कसा व कोणता विचार केला पाहिजे, प्रबोधिनीच्या मूळ तात्त्विक भूमिकेशी त्या प्रतिसादाचा धागा कसा पोहोचतो याचे मार्मिक विलेषण ते या प्रकट चिंतनातून करीत असतात.
दरमहा मर्यादित वर्तुळात वितरित होत असलेल्या या लिखाणातील काही निवडक विषय सर्वच वाचकांसाठी उपयुक्त वाटल्याने त्यांचे वर्गीकरण करून पुस्तिकेच्या स्वरूपात प्रकाशित केले जातात. त्या मालिकेतील हे 7 वे पुष्प वाचकांच्या हाती देताना आनंद होत आहे. कार्यकर्त्यांना वारंवार मनन करण्यासाठी तर ही पुस्तिका उपयोगी पडेलच, परंतु सर्वच वाचकांना ज्ञान प्रबोधिनीचे वैचारिक अंतरंग त्यामुळे अधिकाधिक सखोलपणे परिचित होईल यात शंका नाही.
वि.शं. /सुभाष देशपांडे
कार्यवाह