प्रकट चिंतन

बांधिलकीच्या फुलाचा क्रम-विकास

जगात अनेक गोष्टी, वस्तू, ठिकाणे, माणसे आहेत किंवा नाहीत याचे आपल्याला भानही नसते. आपल्याला भूतकाळाची आणि पृथ्वीवरील जितक्या जागांची जी काही जाणीव असते, ती काही वस्तू, प्रसंग, घटना, व्यक्ती यांच्यामुळे, असते. अनेकांचा ओझरता उल्लेख ऐकलेला किंवा पाहिलेला असतो. ते आपल्याला आठवतेच असे नाही. दूरदर्शनवर वेगवेगळ्या वाहिन्यांच्या कार्यक्रमात चांदीची नाणी वाटायचा एक कार्यक्रम असतो. सूत्रधार गावोगाव […]

बांधिलकीच्या फुलाचा क्रम-विकास Read More »

आमचे व्यवहार्य आदर्श – ५. सनातनी आणि आधुनिक

गावोगाव इंटरनेटची केंद्रे तयार व्हावीत व कोणालाही स्वस्तात कुठलीही माहिती कोठूनही त्वरित उपलब्ध व्हावी हा Taking informa-tion revolution to the masses चा आपला अर्थही तिथे समजला. जनमनी विपुल ज्ञान करावे Taking information revolution to the masses असा संकल्प जाहीर करून गुढी पाडव्याला Prabodhan Infosys Pvt. Ltd. च्या नावाच्या पाटीचे पूजन झाले. जानेवारी १९९६ मध्ये संगणक

आमचे व्यवहार्य आदर्श – ५. सनातनी आणि आधुनिक Read More »

आमचे व्यवहार्य आदर्श – ४. हिंदुभूमी आणि मी

मा. पंतप्रधानांनी घेतलेल्या निर्णयामुळे शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञांच्या कष्टाचे चीज तर झालेच, परंतु या देशाच्या गौरवातच माझा गौरव आहे याचा सहज साक्षात्कार कोट्यवधी भारतीयांना झाला. दि.११ आणि १३ मे या दोन दिवशी भारतीय अणुऊर्जा आयोगाने राजस्थानात पोखरण येथे अणुस्फोटाच्या चाचण्या घेतल्या आणि देशातले वातावरण एकदम बदलून गेले, ‘गर्व से कहो हम हिंदू है।’ हे न सांगताही

आमचे व्यवहार्य आदर्श – ४. हिंदुभूमी आणि मी Read More »

आमचे व्यवहार्य आदर्श – ३. मूल्यांचा ऱ्हास

वर्ष लिहिताना फक्त दोनच आकडे लिहायची सवय मुरलेली असल्यामुळे तीस-पस्तीस वर्षांनी या सवयीमुळे अडचण येईल हे कोणाच्या लक्षातही आले नाही. अमेरिकेत स्थायिक झालेल्या आपल्या एक कार्यकर्त्या अमेरिकेत एका संगणक कंपनीमध्ये ‘वाय टू के’ नावाच्या प्रकल्पात काम करत आहेत. वाय म्हणजे इअर, टू के म्हणजे टू थाउजंड ‘वाय टू के’ म्हणजे इसवी सन दोन हजार. या

आमचे व्यवहार्य आदर्श – ३. मूल्यांचा ऱ्हास Read More »

आमचे व्यवहार्य आदर्श – २. भावनेचे आवरण

रामदास, दयानंद, विवेकानंद, अरविंद हे प्रबोधिनीसमोरचे आदर्श राष्ट्रपुरुष. मनात राष्ट्रपुरुषांचे विचार आणि समोर ही परिस्थिती, दोन्हीची सांगड कशी घालायची? सज्जनगडावर इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसमवेत असताना समर्थ रामदासांच्या विचारांची उजळणी मनात झाली. संक्रांतीला युवती विभागाचा एक गट आर्य समाजाच्या शोभायात्रेमध्ये बरच्यांचा खेळ करायला गेला होता. या गटाच्या प्रमुखांना ‘या मिरवणुकीत सहभागी का व्हायचे?’ हे सांगण्याच्या निमित्ताने महर्षी

आमचे व्यवहार्य आदर्श – २. भावनेचे आवरण Read More »

आमचे व्यवहार्य आदर्श – १ पानी तेरा रुप

वरवर जाणे हा वाफेचा गुणधर्म आहे. खाली वाहात जाणे हा पाण्याचा गुणधर्म आहे. आहे तिथेच स्थिर राहणे हा बर्फाचा गुणधर्म आहे. एक ग्लास पाण्याचे निमित्त उन्हाळ्यामध्ये बऱ्याच वेळा एक दृश्य बघायला मिळते. थंडगार सावली असलेल्या खोलीमध्ये टेबलावर एक स्टीलचा ग्लास ठेवलेला आहे. ग्लास काठोकाठ बर्फाच्या खड्यांनी भरलेला आहे. हळूहळू बर्फ वितळून त्याचे थोडे पाणीही झाले

आमचे व्यवहार्य आदर्श – १ पानी तेरा रुप Read More »

घडविता, मिळविता, विकसावे – ६. निवेदन भाव

आपल्या कामाची नोंद राहते म्हणून, वाचणारा कामात सुधारणा सुचवतो म्हणून, आपल्याच प्रगतीचा आलेख कळतो म्हणून, आपण संचालकांचा एक हात आहोत म्हणून, स्वकर्मकुसुम म्हणून, अशी निवेदन लिहिण्याची माझी भूमिका क्रमाने बदलत गेली. निवेदन याचा मूळ अर्थ आहे समर्पण. वृत्तनिवेदन याचा अर्थ आहे वृत्त सांगण्याच्या निमित्ताने केलेल्या कामाचे समर्पण करणे. दैनंदिन काम करताना आपण आपल्या वरिष्ठांना कामाचे

घडविता, मिळविता, विकसावे – ६. निवेदन भाव Read More »

घडविता, मिळविता, विकसावे- ५. करुच करु

आपण जिद्दीने कामाला लागतो तेव्हा ‘करुच करु‘ किंवा ‘करुन दाखवूच’ यांपैकी एक भावना आपल्या मनात असते. या जिद्दीचा जन्म कशात आहे हे शोधू लागलो की त्यातला मोठा फरक जाणवू लागतो. करुच करु आणि करुन दाखवूच या महिन्यात छात्र प्रबोधनच्या उपक्रम केंद्रांना संचालक भेटीचे कार्यक्रम झाले. शेवटची भेट डोंबिवलीला होती. तिथून पुण्याला परतण्यासाठी कल्याण रेल्वे स्थानकावर

घडविता, मिळविता, विकसावे- ५. करुच करु Read More »

घडविता, मिळविता, विकसावे – ४. बुद्धी सूक्ष्म – मन व्यापक

विद्रोहाची आग विझविण्याचे काम जसे एकात्मतेसाठीचे तसे विद्रोहाची गरजच राहाणार नाही असे काम करणे राष्टीय एकात्मतेसाठीचेच काम आहे. विवेकानंद केंद्राचे अरुणाचल प्रदेशातील एक कार्यकर्ते मध्यंतरी दोन महिने पुण्यात राहात होते. अरुणाचल प्रदेशातील इद्रु जमातीच्या रीति-रिवाजांचे चित्रण केलेली एक चित्रफीत त्यांनी तयार केली आहे. चित्रफितीच्या संकलन-संपादनाच्या कामात प्रबोधिनीतील काही सदस्यांनी लक्ष घातले होते. नॉर्थ-ईस्ट स्टुडंट्स्‌‍ सोसायटीचे

घडविता, मिळविता, विकसावे – ४. बुद्धी सूक्ष्म – मन व्यापक Read More »

घडविता, मिळविता, विकसावे – ३ महत्कार्याचे कंकण

सर्व राष्टीय नेते देशप्रश्नांपेक्षा – शेळीच्या प्रश्नांना महत्त्व देणारे गांधीजी विलक्षणच दिसतात, अशा नजरेने एकमेकांकडे बघत हताश होऊन गांधीजींची वाट पाहू लागतात. महात्मा गांधींच्या जीवनावरील ‌‘गांधी‌’ या चित्रपटात एक दृश्य आहे. गांधीजींच्या आश्रमात नेहरू, पटेल, राजाजी, आझाद अशी सर्व पुढारी मंडळी महत्त्वाच्या राजकीय प्रश्नांवरती चर्चा करण्यासाठी एकत्र जमली आहेत. बोलणी सुरू होणार तेवढ्यात आश्रमातील एक

घडविता, मिळविता, विकसावे – ३ महत्कार्याचे कंकण Read More »