कालाच्या स्पर्शाने मलिन होत नाहीत अशा काही शाश्वत संकल्पना असतात. सहस्त्रो वर्षांपूर्वी जीवनाला त्या जेवढ्या सामर्थदायी होत्या, तेवढ्याच त्या आज आहेत आणि उद्याही रहातील. अशा व्यापक आणि शाश्वत संकल्पनांपैकी धर्मसंस्थापना ही संकल्पना आहे. ज्ञान प्रबोधिनीच्या संस्थापक संचालकांनी ते ध्येय म्हणून कार्यकर्त्यांपुढे ठेवलेले आहे.’धर्मसंस्थापना’ या शब्दाचा संदर्भ भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्णाच्या […]
३.२ हिंदू जीवनदृष्टी हिंदुत्व हा ज्ञान प्रबोधिनीच्या स्फूर्तीचा अक्षुण्ण झरा आहे. या शब्दातून सहस्त्रावधी वर्षे अप्रतिहत वाहात असलेल्या भारतीय परंपरेत नि संस्कृतीत जे उत्तम, उदात्त, उन्नत आहे त्याचे संजीवक स्मरण होते. १९५२ मध्ये डॉ. आप्पाजी पेंडसे यांनी लिहिलेल्या ‘विवेकानंद काय म्हणाले?’ या पुस्तकात हिंदुत्वाची चतुःश्लोकी व्याख्या केली आहे. लोकमान्य टिळक,…
जनी जनार्दन ऐसा भाव भगवान श्री रामकृष्ण परमहंसांच्या जीवनातील एक गोष्ट सांगतात. १८८४ मध्ये एकेप्रसंगी वैष्णव पंथाबद्दल चर्चा निघाली. चैतन्यांनी स्थापित केलेल्या पंथाची वैशिष्ट्ये सांगून अखेर रामकृष्ण म्हणाले, ‘यात तीन गोष्टी मुख्य आहेत, एक म्हणजे नामोच्चार, दुसरे सर्वांभूती दया, तिसरे वैष्णवांची म्हणजेच परमेश्वराच्या भक्तांची सेवा. या तीन तत्त्वांचा अर्थ काय…
३.४ संघटना एकतेची शक्ती भगिनी निवेदितांनी संघटनेविषयी म्हटले आहे, ‘आज संघटना करून सामुदायिकरीत्या अनेक प्रश्न हाती घेतले पाहिजेत. ते प्रश्न आपली वाट पाहात आहेत. मी एकटा दुनियेला हलवीन या भ्रमात, या पोकळ घमेंडीत अतःपर कोणी राहू नये. लावलेला प्रत्येक शोध, लिहिलेले प्रत्येक काव्य, कल्पनेत खेळवलेले प्रत्येक स्वप्न, संपादिलेली कोणतीही गोष्ट…
विकास हा शब्द विविध संदर्भात उपयोगात आणला जातो. जीवसृष्टीचा विकास, मानवजातीचा विकास, राष्ट्राचा वा समाजाचा विकास, एखाद्या बीजभूत संकल्पनेचा विकास, कार्याचा विकास, संघटनेचा विकास, व्यक्तीचा विकास असे काही संदर्भ सांगता येतील. विरोधातून विकास, सहकार्यातून विकास अशाही विकासाच्या संकल्पना मांडल्या गया आहेत. स्वामी विवेकानंद यांनी म्हटल्याप्रमाणे मनुष्यात आधीच असलेले पूर्णत्व आणि…
उत्तमता हा ज्ञान प्रबोधिनीच्या कार्यातील एक स्थायी दृष्टिकोन आहे. प्रबोधिनीच्या प्रार्थनेत ‘राष्ट्रार्थ भव्य कृति काहि पराक्रमाची’ करण्याचा संकल्प आहे. उपासना पुस्तिकांमध्ये ‘जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आम्ही उतुंग यश मिळवू असे होऊ दे’ अशी ईश्वराची प्रार्थना आहे. प्रबोधिनीच्या प्रारंभापासून कै. आप्पांनी प्रत्येक कामात गुणवत्तेचा आग्रह धरलेला असे. नवीन उपक्रम सुचणे, ते उत्तम…
प्रबोधिनीचा दुसरा स्थायी दृष्टिकोन म्हणजे विज्ञानाभिमुखता.’अध्यात्म आणि ईश्वरचिंतन या बाबतीत चिरंतनाचे साधक आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान या बाबतीत आधुनिकाचे उपासक’, अशी प्रबोधिनीची धारणा आहे. प्रबोधिनीच्या प्रार्थनेत-‘विज्ञान ज्ञान अमुचे परिपूर्ण होवोअभ्यास देशास्थितीचा समतोल चालो’असे म्हटले आहे. त्यात विज्ञान आणि ज्ञान असे दोन शब्दप्रयोग केलेले आहेत.तसेच प्रबोधिनीच्या ध्येयवाक्यात’अविद्यया मृत्युं तीर्वा विद्यया अमृतम्…
३.८ तत्त्वसप्तक समारोप सिंहावलोकन ज्ञान प्रबोधिनीच्या वैचारिक भूमिकेची काही मांडणी आधीच्या सात प्रकरणांमधून करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात ‘धर्मसंस्थापना’ हे व्यापक ध्येय म्हणून मांडलेले आहे. धर्मसंस्थापना याच अर्थ अध्यात्मप्रधान संस्कृतीसाठी अनुकूल अशी समृद्ध, मूल्यसंपन्न आणि न्यायाधिष्ठित समाजरचना घडविणे असा केलेला आहे. यासाठी म्हणून ‘हिंदू जीवनदृष्टी’ आणि ‘जनी जनार्दन ऐसा भाव’…
धर्मसंस्थापना : भारतीय राष्ट्राच्या विकासासाठी समर्थांचे विचार आज ही मार्गदर्शक होऊ शकतील असे वाटते, म्हणून हे संकलन
प्रबोधिनीचे अंतिम ध्येय म्हणून धर्मसंस्थापना हा शब्द प्रबोधिनीचे पहिले वैचारिक मूलतत्त्व म्हणून तत्व स तप्त लेखामध्ये मांडले आहे. धर्मसंस्थापना हा शब्द सर्व प्रथम भगवद्गीतेमध्ये आलेला आहे. त्यामुळे तो प्रबोधिनीला प्रिय आहे. आधुनिक काळात धर्म या शब्दाचे भाषांतर religion आणि religion या शब्दाचे भाषांतर धर्म असे व्यवहारात रूढ झाले आहे. त्यामुळे…