रूप पालटू व्याख्यानमाला

कै. वा. वि. वि. तथा आप्पासाहेब पेंडसे यांच्या यांनी शिक्षण, नेतृत्वविकसन, संघटन, उद्योग, ग्रामीण विकास यांसह मानसशास्त्र, इतिहास, संगीत, अध्यात्म अशा विविध क्षेत्रांत प्रयोग केले. त्यांच्या प्रेरणेतून घडलेली कार्यकर्त्यांची परंपरा देशाच्या सामाजिक अवकाशात विस्तारली. या कार्यपरंपरेतील माजी विद्यार्थ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी त्यांच्या क्षेत्रात उभे केलेले कार्य समाजासमोर मांडणे, हे आप्पांचे अत्यंत अर्थपूर्ण पुण्यस्मरण ठरेल, अशी आमची भावना आहे.
 
याच भावनेतून ‘रूप पालटू व्याख्यानमाला’ आयोजित करण्यात आली आहे. या व्याख्यानमालेत प्रबोधिनीशी विविध प्रकारे जोडलेल्या व्यक्तींनी आपल्या जीवनातील अनुभव, प्रबोधिनीमधून मिळालेल्या प्रेरणा आणि त्यातून आपापल्या कार्यक्षेत्रात उभे केलेले काम याबद्दल संवाद साधावा, अशी या उपक्रमामागील कल्पना आहे. प्रबोधिनीमध्ये शिकलेली मूल्ये, विचारपद्धती आणि कार्यपद्धती यांचा समाजासाठी कसा उपयोग झाला आणि त्या माध्यमातून राष्ट्राच्या महत्त्वाच्या प्रश्नांना भिडण्याचा प्रयत्न कसा झाला, हे पुढील पिढीसमोर यावे, हा या व्याख्यानमालेचा हेतू आहे.

पुष्प ११: नव्या आंतरराष्ट्रीय व्यवस्थेसाठी भारताचे : जनरल (नि.) मनोज नरवणे यांच्याशी संवाद साधतील श्री सारंग दास्ताने

पुष्प १०: अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान व सर्वांसाठी

पुष्प ९: अमृत काळातील भारत: अर्थव्यवस्थेची भरारी आणि देशांतर्गत आव्हाने: श्री वामन पारखी

पुष्प ८: स्वातंत्र्याची ७५ वर्षे आणि संघराज्याची संरक्षण सिद्धता: ले. जनरल(नि.) सुदर्शन हसबनीस