विद्रोहाची आग विझविण्याचे काम जसे एकात्मतेसाठीचे तसे विद्रोहाची गरजच राहाणार नाही असे काम करणे राष्टीय एकात्मतेसाठीचेच काम आहे.
विवेकानंद केंद्राचे अरुणाचल प्रदेशातील एक कार्यकर्ते मध्यंतरी दोन महिने पुण्यात राहात होते. अरुणाचल प्रदेशातील इद्रु जमातीच्या रीति-रिवाजांचे चित्रण केलेली एक चित्रफीत त्यांनी तयार केली आहे. चित्रफितीच्या संकलन-संपादनाच्या कामात प्रबोधिनीतील काही सदस्यांनी लक्ष घातले होते. नॉर्थ-ईस्ट स्टुडंट्स् सोसायटीचे कार्यालय प्रबोधिनीत असणे व चित्रफीत संपादनाच्या कामातील साहाय्य या दोन्ही गोष्टी राष्ट्रीय एकात्मतेसाठीचे आपले अप्रत्यक्ष काम आहे. या वर्षाच्या सुरुवातीला काश्मीरच्या दौऱ्यावर आपल्या दोन विद्यार्थिनी सरहद्द संस्थेतर्फे गेल्या होत्या. ते ही अप्रत्यक्ष कामच झाले. प्रत्यक्ष काम जाणीवपूर्वक करणे आपल्याला जमले पाहिजे.
साखरशाळा चालविणे हे असे राष्ट्रीय एकात्मतेसाठीचे काम आहे. विद्रोहाची आग विझविण्याचे काम जसे एकात्मतेसाठीचे तसे विद्रोहाची गरजच राहाणार नाही असे काम करणे राष्ट्रीय एकात्मतेसाठीचेच काम आहे. आपण व आपल्यासारखे म्हणजेच आपला समाज असा आपल्याला भ्र होत असतो. आपल्यापेक्षा वेगळ्या परिस्थितीत राहाणारेही आपल्या समाजाचे घटक आहेत हे प्रयत्नपूर्वक बबवावे लागते. स्थलांतरित ऊस-तोडणी कामगारांच्या काही कुटुंबांना तरी आपल्या मुलांच्या शिक्षणाची काळजी कोणीतरी करते आहे हे समाधान आपण देऊ शकतो. हे शिक्षणाप्रमाणेच एकात्मतेसाठीचे प्रत्यक्ष काम आहे.
विद्रोहाची आग विझविण्याचे काम जसे एकात्मतेसाठीचे तसे विद्रोहाची गरजच राहाणार नाही असे काम करणे राष्टीय एकात्मतेसाठीचेच काम आहे.
विवेकानंद केंद्राचे अरुणाचल प्रदेशातील एक कार्यकर्ते मध्यंतरी दोन महिने पुण्यात राहात होते. अरुणाचल प्रदेशातील इद्रु जमातीच्या रीति-रिवाजांचे चित्रण केलेली एक चित्रफीत त्यांनी तयार केली आहे. चित्रफितीच्या संकलन-संपादनाच्या कामात प्रबोधिनीतील काही सदस्यांनी लक्ष घातले होते. नॉर्थ-ईस्ट स्टुडंट्स् सोसायटीचे कार्यालय प्रबोधिनीत असणे व चित्रफीत संपादनाच्या कामातील साहाय्य या दोन्ही गोष्टी राष्ट्रीय एकात्मतेसाठीचे आपले अप्रत्यक्ष काम आहे. या वर्षाच्या सुरुवातीला काश्मीरच्या दौऱ्यावर आपल्या दोन विद्यार्थिनी सरहद्द संस्थेतर्फे गेल्या होत्या. ते ही अप्रत्यक्ष कामच झाले. प्रत्यक्ष काम जाणीवपूर्वक करणे आपल्याला जमले पाहिजे.
आपली समाजाबद्दलची कल्पना त्यात नवीन नवीन गटांची भर घालत व्यापक करत जाणे म्हणजे ‘मिळविता मिळविता मिळवावे’ ही मनाच्या विकासाची दिशा झाली. या आपल्या मनात व्यापक होत जाणाऱ्या समाजासाठी काम करायचे म्हणजे स्वतःला घडवावे लागते. रात्री उशिरापर्यंत जागत बसून हिशेबातील एक पैशाची चूक शोधून काढणारे किशोरवयीन एकनाथ स्वतःला घडवत होते. हाती घेतलेले काम साधत नाही म्हणजे आपल्या कामाच्या पद्धतीत चूक असली पाहिजे. ती शोधून काढण्यासाठी धडपड करत बुद्धी सूक्ष्म करत जावे लागते. म्हणजे मार्ग सापडतो. ही धडपड करणे म्हणजे ‘घडविता घडविता घडवावे’.
आपल्या आरोग्य योजनेत गेली दोन-तीन वर्षे कुष्ठरुग्णांचे प्रमाण हजारी ०.०३ वर रेंगाळते आहे. तज्ज्ञ म्हणतात, याचा अर्थ सर्वेक्षणात काहीतरी त्रुटी आहे. ऑक्टोबर महिन्यात आठवडाभर आरोग्य योजनेतल्या सदस्यांनी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली काम केले. सकाळी नऊ-दहानंतर सर्वेक्षणासाठी गावात जायच्याऐवजी सकाळी सहा-साडेसहा वाजता गावकरी कामावर जाण्यापूर्वी गावात पोहोचले की सर्वेक्षण अधिक परिपूर्ण होते असे लक्षात आले. बुद्धी सूक्ष्म करून अपुऱ्या यशाचे कारण शोधण्याचाच हा वस्तुपाठ झाला. बुद्धी सूक्ष्म करणे आणि मन व्यापक करणे म्हणजे ‘घडविता मिळविता विकसावे’.
हाती घेतलेले काम साधत नाही म्हणजे आपल्या कामाच्या पद्धतीत चूक असली पाहिजे. ती शोधून काढण्यासाठी धडपड करत बुद्धी सूक्ष्म करत जावे लागते.