उरात अमुच्या अदम्य ईर्ष्या, चैतन्याला गगन थिटे
सामर्थ्याची ही ललकारी, लक्षमुखातुन आज उठे ।। ध्रु. ।।
ध्येयासाठी उसळत जाता, या देहाचे भान कुठे?
तरुणांच्या धमन्यांत आजला, समर्पणाची आस उठे ।। १ ।।
हनुमंताची अभेद्य काया, इंद्राचेही वज्र तुटे
खांद्यालागी भिडवा खांदा, संघटनेची साद उठे ।। २ ।।
रिपुरक्ताचा ठाव नेमका, श्रीरामाचा बाण सुटे
मनात घुमती वादळवारे, ‘हरहर’ गंभीर नाद उठे ।। ३ ।।
पिचून गेल्या अस्मानावर, तारुण्याचे तेज फुटे
‘पराक्रमाचा विझतो वणवा’, ही मातेची खंत मिटे ।। ४ ।।