हा उंच लहरतो गगनावरी ध्वज हिंदुत्वाचा|
सर्व दिशांनी मुक्त घोष ये हिंदू एकतेचा ॥ ध्रु.॥
उज्ज्वल इतिहासाला स्मरून भविष्य रचताना
ध्येयपथावर निरलसतेने सेवा करताना
विजिगीषू प्रतिभेला नूतन स्फूत देताना
एक तत्त्व अन् एक सत्य हा सुमंत्र हिंदुत्वाचा ॥१॥
ज्ञानाच्या नित प्रबोधनाची आकांक्षांच्या पूतची
पिढ्या पिढ्यांनी अंगीकारल्या हिंदू जीवन रीतींची
हिन्दुभूमी ही नाही कुणाही द्रोही उपऱ्यांची
सवाल नाही अन्य कुणाच्या उसन्या स्वामित्वाचा ॥२॥
उत्साहाचे वाहू देत हे उफाळणारे झरे
कधी न थकल्या पंखांची ही भरारू द्या पाखरे
ब्रह्मशक्तीची उपासनाही उमटू द्या शतस्वरे
टणत्कारू द्या, घुमू द्या गगनी नाद धनुष्यांचा ॥३॥
या युवजनहो साद ऐकुनी पूज्य आर्यभूमीची
ज्योत पेटवूनी अंतरात मातेच्या अभिमानाची
विचार कसला? आता केवळ वाटचाल विजयाची
एक ध्यास हा निजभूमीच्या स्वत्व जागृतीचा ॥४॥