त्रिदशकपूर्ती यशोगाथा २३

ही विद्या वेल्ह्यातल्या छोटाशा गावात रहाणारी… बचत गट सुरु केले. बाईला आंघोळीचे पाणी तापवायला सरपण कमी लागावे, धूर कमी व्हावा म्हणून गटाला कर्ज घेऊन त्यातून प्रत्येक सभासदाला बंब घेतला… अनेकींनी त्यावर स्वतःचं नाव घालून घेतलं! मग गटाच्यामुळे विद्याचा विश्वास वाढला, तसे आरोग्याचे काम केले.. रक्त पाहून घाबरणाऱ्या महिलांना हिमोग्लोबीनची माहिती देऊन रक्त तपासायला लावले. मग ‘आतले प्रश्न’ केवळ ‘सगळ्याच महिला’ असल्याने बोलले गेले..त्यामुळे उपाय झाला. विद्या जसजशी कामे करत गेली तसतसा तिचा आत्मविश्वास वाढत गेला. आता घरची कामे विचारुन ऐवजी सांगूनच व्हायला लागली… कारण कुटुंबातील विधायक बदलामुळे तसं चालायलाही लागलं!