नमस्कार,
ज्ञान प्रबोधिनी स्पर्धा परीक्षा केंद्राच्या त्रिदशकपूर्ती निमित्त आपण आपले अधिकारी आणि इतर क्षेत्रात उत्तम काम करणाऱ्या विद्यार्थ्यांचे Good Practices Document तयार करत आहोत.
स्पर्धा परीक्षा केंद्राची सुरुवात १९९५ साली झाली आणि पहिल्या काही वर्षातच केंद्राचे विद्यार्थी उत्तम गुण संपादन करून UPSC मध्ये यशवंत होऊ लागले. यातील एक विद्यार्थी म्हणजे १९९७ मध्ये IPS आणि १९९८ मध्ये भारतात १२ वा क्रमांक पटवून IAS झालेले श्री. संतोष वैद्य.
श्री. संतोष वैद्य म्हणजे प्रशासकीय सेवेतील एक स्वच्छ, कुशल आणि दूरदृष्टी असणारे अधिकारी. एक प्रकारे Crisis Manager सुद्धा म्हणता येईल. कारण भारतातील अनेक दुर्गम आणि आव्हानात्मक भागात, विभागात अतिशय मोलाचं, धोरणात्मक आणि परिणामकारक काम त्यांनी केलं आहे. इतकंच नसून, भारताच्या दोन पंतप्रधानांसोबत पंतप्रधान कार्यालयात त्यांनी देशपातळीवर काम केले. जागतिक बँकेचे कार्यकारी अधिकारी म्हणून अमेरिकेत जाऊन आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांनी उल्लेखनीय कार्य केलं आहे.
या सगळ्यातही अजून एक जमेची बाजू म्हणजे इतक्या महत्वाच्या जबाबदाऱ्या असतानासुद्धा कामातून नेहमी वेळ काढून श्री. संतोष वैद्य प्रबोधिनीत येत असतात. विद्यार्थ्यांशी विविध विषयांवर संवाद साधत असतात. प्रबोधिनीच्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत असतात.
त्यांचे अनुभव, कार्य, बजावलेल्या महत्वाच्या जबाबदाऱ्या आपण सर्वानी जरूर वाचावे, अनुभवावे असे आवाहन आणि शुभेच्छा!
पूर्ण लेख वाचण्यासाठी – click here
Namaskar,
On the occasion of the Tridashakpurti of Jnana Prabodhini Competitive Examination Center, we are preparing a Good Practices Document of our officers and students who have done excellent work in other fields. The competitive examination center was started in 1995 and within the first few years, the students of the center started scoring well and becoming successful in UPSC. One of these students is Mr. Santosh Vaidya, who became IPS in 1997 and IAS in 1998 by clearing 12th rank in India.
Mr. Santosh Vaidya is a clean, skilled and far-sighted officer in the administrative service. In a way, he can also be called a Crisis Manager. Because he has done very valuable, strategic and effective work in many remote and challenging areas and departments in India. Not only that, he has done remarkable work at the Prime Minister’s Office with two Prime Ministers of India at the national level and as an Executive Officer of the World Bank at the United States. Despite having such important responsibilities, Mr. Santosh Vaidya always takes time out of his work to come to Prabodhini. He interacts with the students on various topics. He guides the officers of Prabodhini.
We urge all of you to read and experience their experiences, work, and important responsibilities!
To read full article – click here