संत्रिका सुवर्ण महोत्सव

ओंंकारस्वरूप गणरायाचे आगमन…

लेख क्र. ५५ २६/०८/२०२५ गणपती अखिल सृष्टीचे आराध्य दैवत आहे. नेहमीच त्याची पूजा-अर्चना केली जाते. परंतु भाद्रपदातील गणेश चतुर्थी वेगळेच चैतन्य घेऊन येते. सगळ्यांमध्ये उत्साह संचारतो, घराघरांत सजावट केली जाते, मिष्टान्न केले जाते. असा हा उत्साहवर्धक सण उद्या सुरू आहे. या उत्साहाबरोबरच गणपतीचे स्वरूपही आपल्याला माहित हवे. वेदकाळापासून अगदी आत्ताच्या काळापर्यंत अनेक ग्रंथांत, साहित्यात गणपतीचे […]

ओंंकारस्वरूप गणरायाचे आगमन… Read More »

काशूर भाषेतील रामावतारचरित–कश्मीरी रामायण

लेख क्र. ५३ १६/०८/२०२५ रामकथा भारतीयांसच नाही तर जगासही ज्ञात आहे. परंतू त्या कथेत स्थळ-काळानुसार काही बदल आपल्याला दिसून येतात. संत्रिकेत खूप मोठा व विविध रामायणे असलेला संग्रह आहे. त्या संग्रहातील पंप रामायण व मोल्ल रामायणाची माहिती आपण मागील लेखांमध्ये बघितली. आज आणखी एका वैशिष्ट्यपूर्ण रामायणाची माहिती येथे देत आहोत ते म्हणजे काशूर भाषेतील ‘रामावतारचरित’

काशूर भाषेतील रामावतारचरित–कश्मीरी रामायण Read More »

मोल्ल रामायणाचा संक्षिप्त परिचय

लेख क्र. ५२ ९/८/२०२५ रामायणसंग्रहातील अजून एक विशेष रामायण म्हणजे तेलगू कवयित्री ‘मोल्ल’ने रचलेले रामायण. म्हणूनच याला ‘मोल्ल रामायण‘ म्हटले जाते. अशा ह्या एका कवयित्रीरचित रामायणाचा अभ्यास डॉ. सुजाता बापट यांनी करून सामान्यांना या रामायणाची थोडक्यात ओळख करून दिली आहे. या लेखाचे ध्वनिमुद्रणही सोबत जोडले आहे. श्रीराम कथा ही देश-विदेशांत, विविध भाषांमधून, संस्कृतींमधून, विचारांमधून, साहित्याच्या

मोल्ल रामायणाचा संक्षिप्त परिचय Read More »

नागचंद्रकृत पंप रामायणाचा परिचय

लेख क्र. ५१ २/८/२०२५ १९९७ साली श्री. ग. न. साठे यांनी त्यांचा जवळजवळ ३७१८ ग्रंथे असलेला संग्रह संत्रिकेला दान दिला, त्यात रामचरित्रावर आधारित अनेक ग्रंथ होते. तेव्हा मा. श्री. यशवंतराव लेले व श्रीमती अमृता पंडित यांनी त्या पुस्तकांची सूची तयार केली. नंतर या संग्रहात वेळोवेळी भर पडत गेली. १९ – २२ जानेवरी २०२४ मध्ये अयोध्येत

नागचंद्रकृत पंप रामायणाचा परिचय Read More »

सुवर्ण महोत्सवानिमित्त वरिष्ठांची मनोगते

लेख क्र. ५० २४/०७/२०२५ संत्रिकेने २२ जुलै २०२५ मंगळवार या दिवशी ५० वर्षे पूर्ण केली. त्यानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन ज्ञान प्रबोधिनीत केले होते. या कार्यक्रमाला सर्वांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. प्रत्यक्ष व दूरस्थ पद्धतीने ३५० सदस्य या कार्यक्रमात सहभागी झाले. यामध्ये ज्ञान प्रबोधिनीमधील आजी व माजी सदस्य, आवर्जून निमंत्रित केलेले वेल्हा, नागरीवस्ती विभाग, जनता वसाहत व

सुवर्ण महोत्सवानिमित्त वरिष्ठांची मनोगते Read More »

हिंदू बौद्ध समन्वय यात्रा

लेख क्र. ४९ २३/०७/२०२५ संत्रिकेचे आणखी एक महत्वाचे सामाजिक कार्य म्हणजे हिंदू बौद्ध समन्वय यात्रा. आग्नेय आशियात भारताचे स्थान मध्यवर्ती असून आर्थिक, सामरिक, राजनैतिक दृष्टीने अशासकीय प्रयत्नातून ते बळकट करण्याच्या दृष्टीने या कामाचा प्रारंभ २००५ साली विश्व बौद्ध संस्कृति प्रतिष्ठान, विश्व हिंदू परिषद, आरोग्य निकेतन व ज्ञान प्रबोधिनी या संस्थांनी एकत्र येऊन ‘हिंदू-बौद्ध एकता’ या

हिंदू बौद्ध समन्वय यात्रा Read More »

अर्धशतकाची प्रगतीशील वाटचाल

लेख क्र. ४८ २२/०७/२०२५ आजच्याच दिवशी संत्रिकेला ५० पूर्ण होत आहेत, म्हणून संत्रिकेत झालेल्या कामांचा थोडक्यात आढावा घेतला आहे. संस्कृत भाषेच्या कुशीत भारतीय संस्कृतीचा समृद्ध वारसा विकसित करणे, संस्कृत मधील संशोधन अधिक समाजोपयोगी व विस्तृत पायावर आधारित होणे, अभ्यासाच्या जुन्या परंपरा व नवीन पद्धती यांचा मेळ घालता येणे, संशोधनास व्यापक पायावर आधारित बनवून समाजाच्या गरजा

अर्धशतकाची प्रगतीशील वाटचाल Read More »

संत्रिका-आयोजित व्याख्याने

लेख क्र. ४७ २१/०७/२०२५ आपण मागच्या काही लेखांमध्ये राष्ट्रवाद अभ्यास मंडळ, त्याचे बदललेले नाव व स्वरूप यांची माहिती घेतली. आजच्या लेखात संत्रिकेत होणार्‍या व्याख्यानमालांची थोडक्यात माहिती घेऊया. १९८७ पासून संत्रिकेत स्मृति व्याख्यानमाला सुरू झाल्या. कै. अरविंद मंगरुळकर स्मृती व्याख्यानमाला, कै. मंगलाबाई चितळे स्मृती व्याख्यानमाला (संत उपदेश-माला), कै. जानकीबाई चितळे स्मृती व्याख्यानमाला, कै. पांडुरंग आपटे स्मृती

संत्रिका-आयोजित व्याख्याने Read More »

कै. डॉ. भीमराव गस्तींंचे सामाजिक कार्य

लेख क्र. ४६ २०/०७/२०२५ ज्ञान प्रबोधिनीमध्ये कार्यकर्त्याची वैचारिक जडण-घडण व्हावी यासाठी व्याख्यानांच्या योजना केल्या गेल्या त्याचप्रमाणे कृतिशील कार्याचे आदर्शही निर्माण झाले आहेत. संत्रिकेतून मा. यशवंतराव लेले यांनी केलेले असे कार्य म्हणजे बेरड-रामोशी समाजाच्या विकासासाठी आणि देवदासी महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी ध्यासपूर्व काम करणार्‍या कै. डॉ. भीमराव गस्ती या मनस्वी कार्यकर्त्याला त्यांनी समरसून केलेली आत्मीय मदत. या

कै. डॉ. भीमराव गस्तींंचे सामाजिक कार्य Read More »

तत्त्वज्ञानातील मूलभूत व अत्यावश्यक संकल्पना

लेख क्र. ४५ १९/०७/२०२५ नुसत्या व्याख्यानमाला घेण्यापेक्षा सखोल अभ्यास व्हावा, विषयांतील आंतरसंबंध समजत जावेत, प्रबोधिनी मध्ये काम करणाऱ्या सदस्यांची देशप्रश्नाकडे पाहण्याची भूमिका तयार व्हायला हवी म्हणून जनतंत्र उद्बोधन मंचाचेही रुपांतर २०१७ मध्ये ‘आंतरविद्याशाखीय अभ्यासगटात’ करण्यात आले. मा. विवेक कुलकर्णी आणि मा. सुभाषराव यांनी पहिल्या सत्रात बहुशाखीय अभ्यासाचे महत्व स्पष्ट करून त्याची काही उदाहरणे दिली होती. त्या

तत्त्वज्ञानातील मूलभूत व अत्यावश्यक संकल्पना Read More »