स्त्री शक्ती प्रबोधन

त्रिदशकपूर्ती यशोगाथा १८

ज्ञान प्रबोधिनी स्त्रीशक्ती प्रबोधन विभागाचे ग्रामीण महिलांसाठी स्वयंरोजगार प्रशिक्षणाचे जे काम चालते ते सगळ्यात प्रभावी आणि परिणामकारक आहे… गेली १० वर्ष स्वयंरोजगाराचे काम करणाऱ्या भारतीताई यांनी आधी केले… मग सांगितले! काम करताना स्वतःच उदाहरण झाल्या… यशस्वी उद्योग करुन दाखवला… कर्ज घेऊन चोख फेडून दाखवलं…. अशी ‘कधीतरी’ लाभार्थी असणारी ताई स्वानुभवानंतर तेच काम करायचे ठरवते तेव्हा कामाची परिणामकारकता बदलते. अशा अनेक जणी आज कामात आहेत… भारतीताई त्यापैकीच एक! मग आर्थिक उपक्रमातून ग्रामीण महिलांमध्ये होणारे बदल त्या अधिकारवाणीने सांगू शकतात… ऐका त्यांच्याच शब्दात

त्रिदशकपूर्ती यशोगाथा १८ Read More »

त्रिदशकपूर्ती यशोगाथा १९

गेल्या आठवड्यात शिवापूरला असणाऱ्या राम सीता पुराणिक महिला तंत्रनिकेतनाची क्लिप पाहिली. तिथली प्रमुख स्वाती, गेली १५ वर्ष स्थिर राहून शिवण शिक्षिका म्हणून काम करते आहे. जेव्हा ती शिक्षिका झाली तेव्हा फँशन डिझाईन शिकवणारी शिक्षिकाही शिवापूरत नव्हती. मग प्रशिक्षक प्रशिक्षणापासून आपण सुरुवात केली !! तिने घर/ मुलं सगळं सांभाळून केलं आणि टिकली.. हजारो जणींना तिने कमवते केले. कुटुंबातून पाठिंबाही मिळवला!! स्वातीमुळे अनेक जणींनी उंबरा ओलांडला!! तिच्याच शब्दात ऐकूया यशोगाथा १९

त्रिदशकपूर्ती यशोगाथा १९ Read More »

त्रिदशकपूर्ती यशोगाथा २०

ही सविता, बचत गटात आली आणि बदलूनच गेली. नियमित बैठकीला आल्यामुळे तिला सामाजिक कामाची संधी मिळाली… गट घेतले, कर्ज वाटप केले.. व्यवहार शिकली, मेळावे घेतले.. बोलायला शिकली, सहलींना गेली… कवाडे उघडली…प्रत्येक संधी तिने घेतली! गावातच राहून बचत गटामुळे तिचं बदलत गेलेलं आयुष्य आता अनेकींना प्रेरणादायी ठरलं आहे! एका उद्योगाच्या व्यवस्थापक गटात सविता आहे, अनेकींची पोषणकर्ती आहे!! एवढेच नाही तर आईच्या पाठींब्यामुळे दोन्ही मुलीं इंजिनिअर झाल्या..ऐका यशोगाथा २०..

त्रिदशकपूर्ती यशोगाथा २० Read More »