प्रकट चिंतन

भाग २ – ६ ज्ञान प्रबोधिनीची कार्यपद्धती

हिंदुस्थानची चित्रमुर्ती अक्षय्य तृतीयेच्या दिवशी प्रबोधिनीच्या सोलापुरमधील वास्तूच्या उपासना मंदिरात्त हिंदुस्थानच्या चित्रमुर्तीची प्रतिष्ठापना झाली. वीस वर्षांपूर्वी सर्वप्रथम पुण्याच्या वास्तूत अशीप्रतिष्ठापना झाली. त्यानंतर १९८८ साली निगडीला मातृमंदिरात चित्रमुर्तीची प्रतिष्ठापना झाली. पहिली प्रतिष्ठापना एका चांगल्या कल्पनेच अनुकरण होती

भाग २ – ६ ज्ञान प्रबोधिनीची कार्यपद्धती Read More »

भाग २ – ५ प्रबोधिनीच्या कामातील विशेष दृष्टीकोन

मागील महिन्यात सर्वसाधारण प्रबोधिनीपण कशात आहे हे पाहिले. हे सर्वसाधारण प्रबोधिनीपण प्रबोधिनीच्या सर्व सदस्यांच्या दैनंदिन कामातून व्यक्त व्हायला पाहिजे. याशिवाय प्रत्येकाच्या विभागाच्या कामाच्या स्वरूपानुसार जे वेगळेपण असेल ते त्याचे प्रबोधिनीच्या कामातील वेगळेपण आहे. समजत असले पाहिजेत पण आज नाहीत असे जे गुण आहेत केवळ त्यांचाच आग्रह आपण सर्वसामान्य प्रबोधिनीपणामध्ये धरत असतो. परंतु, विशेष प्रबोधिनीपण हे

भाग २ – ५ प्रबोधिनीच्या कामातील विशेष दृष्टीकोन Read More »

भाग २ – ४. अमूर्त उद्दिष्ट आणि लौकिक मापदंड

एका शाळेत विज्ञान अध्यापकांची बैठक चालू होती. त्याला मी उपस्थित होतो. प्रत्येकजण आपापल्या कामाचे निवेदन करत होते. किती धडे शिकविले, किती घटक शिकवून झाले. प्रश्नोत्तरांची तयारी कशी करवून घेतली. प्रश्नोत्तरे पाठ करण्याचे फायदे कसे होतात, असे निवेदन चालले होते. व्याख्यानपद्धतीने शिकवण्यापेक्षा चर्चापद्धतीने तास घेतो, काही भाग विद्यार्थ्यांना शिकवायला सांगतो अशी ही निवेदने झाली. बैठकीचा वेळ

भाग २ – ४. अमूर्त उद्दिष्ट आणि लौकिक मापदंड Read More »

भाग २ – ३. देशसेवा हे साध्य, लौकिक काम हे साधन

ज्ञान प्रबोधिनी आयुर्विज्ञान संस्थेचे गॉस्पेल : खा. अटलबिहारी वाजपेयी यांच्या भेटीच्या निमित्ताने संजीवन रुग्णालयाच्या उद्दिष्टांबद्दल बराच विचार झाला. खा. अटलजींच्या सकाळच्या भेटीनंतर त्याच दिवशी दुपारी संजीवन रुग्णालयातील आपल्या डॉक्टरांची बैठक लातूरचे डॉ. कुकडे, डॉ. सौ. कुकडे व डॉ. भराडिया यांच्याबरोबर झाली. ‌‘मेडिसीन इज द राइट हॅण्ड ऑफ गॉस्पेल‌’ हे घोषवाक्य कै. आप्पा वैद्यकीय सेवेच्या संदर्भात

भाग २ – ३. देशसेवा हे साध्य, लौकिक काम हे साधन Read More »

भाग २ – २. देशसेवकाची सामान्य लक्षणे

कृतीने व्यक्तीची ओळख पटते : इंग्रजांचे राज्य हिंदुस्थानात नुकतेच सुरू झाले होते तेव्हाची गोष्ट आहे. लष्करातल्या काही इंग्रज अधिकाऱ्यांना भारतीयांची वेदविद्या जाणून घ्यावी अशी इच्छा झाली. त्यासाठी संस्कृत शिकायला पाहिजे. नेहमीच्या पोशाखात गेलं तर कोणीही पंडित आपल्याला त्यांची देववाणी संस्कृत शिकवणार नाही याची त्यांना खात्री होती. त्यामुळे त्यांनी केस कापून घेऊन मुंडण केले. गळ्यात जानवे

भाग २ – २. देशसेवकाची सामान्य लक्षणे Read More »

भाग १ – १. देशसेवेची विविध रूपे

बुद्ध्याची वाण धरिले एखाद्या आंब्याच्या झाडाला भरपूर मोहोर आला, तर नंतर आंबेही भरपूर मिळतील असा अंदाज आपण करतो. पण समजा, फक्त एकच फळ लागले आणि बाकी सगळा मोहोर गळून गेला. नंतर ते एकच फळ चांगले पिकले आणि त्याचा स्वादिष्ट आंबा तयार झाला, तर मग या एका फळावरून सुद्धा या झाडाचे फळ फार उत्तम असते असे

भाग १ – १. देशसेवेची विविध रूपे Read More »

प्रकट चिंतन १ -पुस्तिकेविषयी थोडेसे …….

प्रबोधिनीचे संचालक माननीय वाच. गिरीशराव बापट यांचे ‌‘प्रकट चिंतन‌’ गेली तीन वर्षे सातत्याने मासिक वार्तापत्राच्या निमित्ताने विविध सदस्यांपर्यंत पोहोचत आहे. ज्या सदस्यांना हे लेखी प्रकट चिंतन नुकतेच मिळायला लागलेले आहे किंवा अधून-मधून मिळालेले आहे, त्यांच्यासाठी काही निवडक लेखांचे संकलन करून या पुस्तिकेद्वारे त्यांचे विचार प्रकाशित करीत आहोत. एकूणच प्रबोधिनीच्या सर्व कार्यकर्त्यांपर्यंत प्रबोधिनीतला अलिकडचा महत्त्वाचा विचार

प्रकट चिंतन १ -पुस्तिकेविषयी थोडेसे ……. Read More »

परिशिष्ट २ – घटना-परिशिष्ट २ (अंशतः)

सहविचारात्मक नेतृत्वपद्धती प्रबोधिनीच्या नियमावलीत नियम १७.३ मध्ये संचालक हे सहविचारात्मक नेतृत्वपद्धतीने काम करतील असे म्हटले आहे. याचा नेमका अर्थ काय? या प्रश्नाचे उत्तर देण्यापूर्वी नेतृत्व करणाऱ्याने मुख्यतः ज्या दोन जबाबदाऱ्या पार पाडावयाच्या असतात, त्यांचा स्थूलमानाने विचार करणे उपयुक्त होईल. ध्येय निश्चिती : नेत्याने, उपस्थित झालेल्या प्रश्नांच्या अनुरोधाने, आपल्या गटासमोरील अथवा संघटनेसमोरील, अथवा कार्यासमोरील ध्येय निश्चित

परिशिष्ट २ – घटना-परिशिष्ट २ (अंशतः) Read More »

परिशिष्ट १ – ज्ञान प्रबोधिनीचा संस्थानिर्मित लेख

नाव १. या संस्थेचे नाव ‘ज्ञान प्रबोधिनी’ असे राहील. तिला अशा नावाने दावा लावता येईल व तिच्यावर अशा नावाने दावा लावता येईल. कार्यालय २. संस्थेचे मुख्य कार्यालय पुणे येथे राहील. हे कार्यालय सदाशिव पेठ घरांक ५१० (नवा) पुणे शहर येथे राहील. उद्देश व कार्य ३. या ज्ञान प्रबोधिनीचे खालील उद्देश राहतील:- ३.१ ज्ञान प्रबोधिनी म्हणजे

परिशिष्ट १ – ज्ञान प्रबोधिनीचा संस्थानिर्मित लेख Read More »

१२. घटनेतील कार्यचिंतन आणि वैचारिक मूलतत्वे

समारोप दोन गटांच्या विचारपद्धती त्या त्या महिन्यातील प्रबोधिनीतील काही प्रसंग, देशातील काही घटना, आंतरराष्ट्रीय घडामोडी किंवा व्यक्तिगत अनुभव यांच्या निमित्ताने प्रबोधिनीतील कामाच्या धोरणांवर व भूमिकांवर प्रकाश टाकण्यासाठी प्रकट चिंतन वेळोवेळी प्रकाशित केले होते, त्याचे आत्तापर्यंत संकलन झाले. प्रबोधिनीच्या स्थापना-लेखातील म्हणजेच घटनेतील उद्देशांवरती काही ऊहापोह त्यानिमित्ताने सर्वांच्या चिंतनासाठी एकत्रित मांडून झाला. एके दिवशी सहजच प्रबोधिनीच्या ‘ज्ञान

१२. घटनेतील कार्यचिंतन आणि वैचारिक मूलतत्वे Read More »