प्रकट चिंतन

१. सर्व शक्तींच्या विकासाकरिता विशेष शिक्षण

नवे मार्ग शोधताना : रोजच्या सवयीच्या रस्त्याने जायचे असेल तर अंधारातही चालत जाता येते. व्यवस्थित आखलेला, खाणाखुणा दाखवणारा, प्रकाशित असलेला रस्ता असला तर नव्या रस्त्यानेही न चुकता जाता येते. रुळलेली, मळलेली वाट जिथे संपते तिथून पुढे अंदाज घेत घेतच जावे लागते. स्वतः वाट तयार करत जावे लागते. एखादा मोठा गट किंवा एखादी महत्त्वाची व्यक्ती कुठे […]

१. सर्व शक्तींच्या विकासाकरिता विशेष शिक्षण Read More »

संस्थेच्या घटनेतील उद्देश – प्रकट चिंतन ६

प्रस्तावना एखाद्या संस्थेचा संस्थानिर्मिती लेख (मेमोरॅण्डम ऑफ असोसिएशन) आणि तिची नियमावली (रुल्स रेग्युलेशन्स्) मिळून तिची कायदेशीर घटना होते. ज्ञान प्रबोधिनीच्या सदस्यांनी दर पंधरा वर्षांनी आपल्या घटनेचा आमूलाग्र आढावा घेऊन बदलत्या काळानुसार तिच्यात आवश्यक वाटल्यास समूळ बदल करावेत अशी तरतूद ज्ञान प्रबोधिनीच्या नियमावलीत प्रथमपासूनच होती. त्यानुसार नियमावलीत व संस्थानिर्मिती लेखातील उपक्रमांच्या परिच्छेदात वेळोवेळी काही बदल झाले,

संस्थेच्या घटनेतील उद्देश – प्रकट चिंतन ६ Read More »

७. असा वारसा पेलायास्तव वज्राचे बल दे

वंश आणि वारसा एका निवृत्त न्यायाधीशांशी बोलताना मृत्युपत्रांमधील वेगवेगळ्या गंमती-जंमती ते सांगत होते. मृत्युपत्रांसंबंधीचे अनेक वाद त्यांच्या समोर निवाड्यासाठी आलेले होते. त्यातले अनुभव सांगता सांगता त्यांनी एक सूत्र सांगितले. ते म्हणाले की “तुम्ही स्वतः मिळवलेली संपत्तीं तुम्ही तुमच्या मुला-मुलींना, नातेवाईकांना, मित्रांना, सहकाऱ्यांना, नोकरांना, कोणालाही देऊ शकता. परंतु आधीच्या पिढीतील कोणीतरी तुम्हाला अधिकृत वारसदार म्हणून दिलेली

७. असा वारसा पेलायास्तव वज्राचे बल दे Read More »

६. विमल हेतु स्फुरो नवनीत

राष्ट्रीयत्वाचे शिक्षण उत्तम इंग्रजी लिहायला – वाचायला शिकविणे, उत्तम इंग्रजीत भाषण – संभाषण करायला शिकविणे म्हणजे समाजाला सेवा पुरविणे आहे असे मी मागच्या लेखात लिहिले होते. आपण सेवा पुरविण्यापेक्षा समाजाची सेवा अधिक केली पाहिजे असेही मी लिहिले होते. हे लिहून झाल्यावर गेला महिनाभर ‘विद्या’ आणि ‘अविद्या’ हे दोन शब्द माझ्या डोक्यात घोळत होते. विचार मांडण्यात

६. विमल हेतु स्फुरो नवनीत Read More »

५ . तयामागुनी धावणे हे ततः किम् ?

सेवा करणे आणि पुरविणे काही दिवसांपूर्वी एका बी.एड्. महाविद्यालयाच्या प्राचार्यांची भेट झाली. ते प्रबोधिनीचे हितचिंतक आहेत. ओळख झाल्या झाल्याच त्यांनी प्रश्न विचारला, “प्रबोधिनीची इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करण्याची काही योजना आहे का ?” मी उत्तर दिले, “नाइलाज झाला तर योजना बनविण्याचा विचार करू.” त्यांनी त्यावर अतिशय आस्थेने मला समजावले, “तुम्ही नकारात्मक विचार करू नका. नाइलाज

५ . तयामागुनी धावणे हे ततः किम् ? Read More »

४. सर्व समाज माझा, मी सर्व समाजाचा

आदरणीय आणि आत्मीय आपल्या समाजाची सभ्यता, संस्कृती, परंपरा आणि वारसा या संबंधी काही चिंतन गेले दोन-तीन महिने मांडत आहे. सर्व भौतिक आणि संस्थात्मक रचनांमधून समाजाच्या सभ्यतेची पातळी निश्चित होते. ‘इंडियात गुणांची कदर नाही’, ‘इंडियात प्रमाणिकपणे काम करणाऱ्याला काही स्कोप नाही’, असे म्हणत विदेशाची वाट धरणारे काही जण असतात. त्यांच्या मनातल्या उत्तमतेच्या स्वप्नांशी जुळणारे वास्तव त्यांना

४. सर्व समाज माझा, मी सर्व समाजाचा Read More »

३. समाज – संस्थापनेचे ध्येय

सद्यःस्थिती आणि राजकारण गेले तीन महिने वर्तमानपत्रातून आलेल्या बातम्यांच्या आधारे कार्यकर्त्यांच्या काही गटांनी केलेले टिपण व त्यावरील चर्चेची एक दिशा प्रकट चिंतनामधून मांडली होती. त्याचे वाचन करून काही गटांनी चर्चा केल्याचेही कळले. सद्यः स्थितीमध्ये अनेक तपशील येतात. बाजारभाव आणि हवामानातले बदल, बँकांचे व्याजदर आणि शेअरबाजारातील निर्देशांकांतील बदल, आंदोलने, बंद, संप, नव्या कामांची उद्घाटने, स्मृतिसोहळे, सत्कार-समारंभ,

३. समाज – संस्थापनेचे ध्येय Read More »

२. भारतीय जीवनपद्धतीचा गाभा

बाहेरील सुधारणा म्हणजे सभ्यता सध्या सभ्यता (सिव्हिलायझेशन) आणि संस्कृती (कल्चर) असे दोन शब्द मानवी समाजाची प्रगती दर्शविण्यासाठी वापरले जातात. सभ्यता म्हणजे माणसांनी सामुदायिक रित्या नैसर्गिक शक्तींना नियंत्रणात आणून आपल्या सामुदायिक जीवनात घडवलेली सुधारणा. रानात उगवलेले धान्य वेचण्यापेक्षा बियाणे वापरून पाहिजे ती पिके घेणे ही सुधारणा. शेतात बियाणे विखरून टाकण्यापेक्षा शेत नांगरून बी जमिनीत पेरणे ही

२. भारतीय जीवनपद्धतीचा गाभा Read More »

१. विमल राष्ट्र घडो अभिजात

प्रबोधिनीचे विकसनशील चिंतन काळ बदलतो तसे शब्दांचे अर्थ बदलतात. प्राधान्यक्रम बदलतात. दीर्घ काळ काम करू इच्छिणाऱ्या संघटनांना त्यामुळे आपली उद्दिष्टे त्या त्या काळातील अर्थवाही शब्दांमध्ये मांडावी लागतात. ‌‘मनुष्यघडण‌’ ऐवजी ‌‘देशातील सुप्त मनुष्यशक्तीचा आत्मसन्मान वाढविणे‌’ अशी पुनर्मांडणी आपण या करताच केली. हे आपले मध्यंतर उद्दिष्ट आहे. त्याहून लांबच्या दीर्घकालीन उद्दिष्टाची नवीनभाषेत पुनर्मांडणी करावी लागेल का, असा

१. विमल राष्ट्र घडो अभिजात Read More »

प्रबोधकांची प्रेरणा – प्रकट चिंतन पुस्तिका ७

प्रस्तावना ज्ञान प्रबोधिनीचे संचालक माननीय डॉ. गिरीशराव बापट यांचा कार्यकर्त्यांशी सहसंवाद संस्थेच्या मासिक प्रतिवृत्तामधून नेहमी चालू असतो. अनेक प्रासंगिक घडामोडींना प्रतिसाद देताना प्रबोधकांनी कसा व कोणता विचार केला पाहिजे, प्रबोधिनीच्या मूळ तात्त्विक भूमिकेशी त्या प्रतिसादाचा धागा कसा पोहोचतो याचे मार्मिक विलेषण ते या प्रकट चिंतनातून करीत असतात. दरमहा मर्यादित वर्तुळात वितरित होत असलेल्या या लिखाणातील

प्रबोधकांची प्रेरणा – प्रकट चिंतन पुस्तिका ७ Read More »