प्रबोधन गीते

शुभ्र सुगंधित…..

शुभ्र सुगंधित पुष्पे आणिक शुभ्र सुगंधित मने मातृभूमि तव चरणी याहुन अन्य काय अर्पिणे ? हे अमुचे सश्रद्ध समर्पण स्वीकारी वरदे अमुच्या शुभव्रतांना आई, तुझे शुभाशिष दे ।। ध्रु. ।। उपासनेला दृढ चालविणे ही अमुची साधना दिव्यद्युतीला अवतरणास्तव करितो आवाहना त्या तेजाने आई अमुचे अन्तर धवळू दे ।। १ ।। केसरिया जोहार येथले इथली बलिदाने […]

शुभ्र सुगंधित….. Read More »

यापुढे यशाकडे…

यापुढे यशाकडे अखंड झेप घ्यायची ।। ध्रु. ।। शक्ति-युक्ति-बुद्धिने सुजाण यत्न चालवूसंपदा समर्थता उदंड आम्ही मेळवू सावधान पाउले जयाप्रतीच जायची ।। १ ।। वज्रता विनम्रता तनूमनात बाणवू स्नेहशील एकता निजांतरात तेववू वीजवादळातही ज्योत ना विझायची ।। २ ।। अजिंक्य झेप आपुली अशक्य शब्द नेणते ‘मृगेन्द्रता स्वयं हि एव’ मंत्र एक जाणते सार्थ तो करू अशी

यापुढे यशाकडे… Read More »

पाखरे भरारली

पाखरे भरारली निळी नभे झळाळली पालवी नवी नवी तरूवरी थरारली हासऱ्या सुरातूनी चालत्या पदातूनी झेप घेऊन उसळली ही चेतना ।। ध्रु. ।। हिचे आम्ही शुभांशु रे सतेज रे, सुहास्य लास्य रे युवमनी जी, संचारते, प्रकाशते गती हिची, द्युती हिची, स्फूर्ती क्षितिज बाहते धरेस क्षेम द्यावयास या, या ।। १ ।।

पाखरे भरारली Read More »

नव्या युगाचे….

नव्या युगाचे पाइक आम्ही तारे नवक्षितिजावरचे निजरुधिराची आण वाहुनी रूप पालटू देशाचे ।। ध्रु. ।। आद्यकवींनी चित्रियलेली भूमी ही सुजला सुफला रूप तियेचे आज पाहुनी चीड चेतवी चित्ताला सुजल-सुफलता पुन्हा निर्मिण्या कोटि कोटि व्यापू गगने भागिरथीला प्रसन्न करण्या वाहू यत्नांची सुमने घराघरातून मनामनातुन दीप चेतवू स्फूर्तीचे ।। १ ।। यंत्रदेव तो पूज्य अम्हाला पूज्य अम्हाला

नव्या युगाचे…. Read More »

नव्या ताकदीने नवे स्वप्न पाहू

नव्या ताकदीने नवे स्वप्न पाहू लढाया नव्या जिंकण्या सज्ज बाहू आम्ही सूर्यकन्या, नव्हे फक्त छाया स्वये सर्व सामर्थ्य हे मेळवूया ।। ध्रु. ।। जिथे ज्योत तेवे स्वयंनिश्चयाची तिथे अंध तर्का मिळे मूठमाती विवेके विचारे कृती नित्य व्हाया स्वये सर्व सामर्थ्य हे मेळवूया ।। १।। जनी क्षेम चिंतीत सृजनी रमावे कशाला वृथा भंजनाला भजावे स्वयंप्रज्ञ तेजाळते

नव्या ताकदीने नवे स्वप्न पाहू Read More »

डोळस मोरपिसारा

डोळस मोरपिसारा फुलवू पंचेन्द्रिय मनबुद्धिचा नील नभांगणि मेघ बोलवू देशाच्या समृद्धीचा ।। धृ.।। अज्ञाताला अनुभवणारी अमूर्त समजुन देणारी तालसूर, शिल्पाचा, अभिनय, नाट्याचा रस घेणारी बहुविध प्रज्ञा अशी रूजावी शिक्षणातुनी मनोमनी उत्साहाचे सृजनामध्ये रूपांतर हो क्षणोक्षणी कुतूहलातुन जन्मा यावा झरा जिता नवसिद्धीचा ।।१।। सत्य शुभंकर जे जे त्याला अनुसरण्याचे धैर्य हवे ठरली चौकट पार कराया निर्भय

डोळस मोरपिसारा Read More »

डोळे उघडून बघा गड्यांनो

डोळे उघडून बघा गड्यांनो झापड लावू नका जे दिसते ते असेच का हे उलगडण्याला शिका ।। ध्रु. ।। भवतालीचे विश्व कोणत्या सूत्राने चाले कोण बोलतो राजा आणिक कुठले दळ हाले प्रारंभी जे अद्भूत वाटे गहन, भीतिदायी त्या विश्वाचा स्वभाव कळता भय उरले नाही या दुनियेचे मर्म न कळता जगणे केवळ फुका ।। १ ।। वाहून

डोळे उघडून बघा गड्यांनो Read More »

जे कर्तृत्वाने जिंकतील ही धरती

जे कर्तृत्वाने जिंकतील ही धरती ते अंकुर आम्ही वाढवितो तळहाती ।।ध्रु. ।। कुणि हसरे, रुसके, लाघवि कुणि लडिवाळ कुणि स्पर्श पाहती नभ हे नील-विशाल कुणि अबोल, उत्कट, कुणि तर्काची धार कुणि तिखट, तेज जणु शिवबाची तलवार परि सर्वारूपी नटला तो जगजेठी ते अंकुर आम्ही वाढवितो तळहाती ।।१।। फुलण्यास यांजला माती संस्कारांची प्रेमाचे पाणी, ऊब सूर्यकिरणांची

जे कर्तृत्वाने जिंकतील ही धरती Read More »

उतरले आकाश पक्षी

शब्द – भावांच्या, सुरांच्या या मनोरम संगमी उतरले आकाश – पक्षी शारदेच्या अंगणी ।। ध्रु. ।। मायबोलीच्या घराची, आज हसरी दालने वेढती गुणगंध चित्ता, स्नेहसुंदर भूषणे आणि गाभाऱ्यात शोभे मातृभूमी पावनी ।। १ ।। अमित प्रतिभेचे फुलोरे, अमित रुपी उमलती ज्ञान – विज्ञानात रमती, दूर क्षितिजे शोधती गवसता सत्ये नवी, ती हर्ष – पुलकित पर्वणी

उतरले आकाश पक्षी Read More »

आम्ही जाऊच जाऊ

अदम्य अपुल्या आकांक्षांचे गीत आजला गाऊ जिथे जायचे ठरले तेथे, तेथे जाउच जाऊ, आम्ही जाउच जाऊ ।। ध्रु. ।। नवतेजाप्रत नवक्षितिजांच्या दौडत दौडत जाऊ क्षणभर सांगुनी मनिचे हितगुज स्वप्ने नव रंगवू नवीन कवने, नव्या कहाण्या नवस्फूर्तीने गाऊ ।। १ ।। नसति भाषणे जीवन ध्येये ही तर अमुची सारी यत्न शिंपुनी फुलवू क्षेत्रे कर्तृत्वाची न्यारी इतिहासाची

आम्ही जाऊच जाऊ Read More »