ज्ञानप्रबोधिनी-प्रणीत धार्मिक विधींमागील तात्त्विक भूमिका

लेख क्र. ३२

६/७/२०२५

‘संत्रिका’ विभागात जसे संस्कृत संवर्धन व संशोधनावर काम चालू होते, त्यालाच समांतर ‘धर्मनिर्णय मंडळ, लोणावळा’ यांच्या परिवर्तनशील पौरोहित्य उपक्रमाचा प्रसार पण चालू होता.तुरळक प्रमाणात या नव्या पद्धतीने समाजात संस्कार होत होते. प्रा. रामभाऊ डिंबळे हे असे संस्कार करणार्‍यातले अग्रगण्य नाव. या उपक्रमाचा प्रसार व्हावा म्हणून १९९०-९१ पासून पौरोहित्य वर्गाचे सर्व समाजासाठी आयोजन होऊ लागले. ज्ञान प्रबोधिनीचा ‘संत्रिका’ विभाग अविरत जोमाने हा उपक्रम पुढे नेत आहे, लोकांना तो भावत आहे. आजपर्यंत भारतभरात एक लक्षापेक्षा अधिक संस्कार या पद्धतीने झाले आहेत. ज्ञान प्रबोधिनीची संस्कार पद्धत म्हणून वेगळ्या नावाने ती ओळखली जाते. ह्या पौरोहित्य उपक्रमात काय वेगळेपण आहे, ते कोणत्या तत्त्वांंमधून दिसत हे समजणं आवश्यक आहे. त्यासाठी संत्रिकेचे मार्गदर्शक मा. श्री. विश्वनाथ गुर्जर यांनी लिहिलेला ‘ज्ञानप्रबोधिनी-प्रणीत धार्मिक विधींमागील तात्त्विक भूमिका’ हा लेख समजून घेणे गरजेचे आहे. त्यांचा लेख मानसीताई जोशी-कसबेकर यांच्या आवाजात प्रसारित करीत आहोत.