घडविता, मिळविता, विकसावे

१. गुणवत्तावाढ

विद्यार्थिदशा ओलांडलेल्या प्रौढ सदस्यांच्या, घडणीसाठी जे प्रयत्न होतात त्यांना आपण गुणवत्तावाढ म्हणतो.

दोन दिवस सोलापूरला गेलो होतो. दोन दिवसांत तीन वेगवेगळ्या गटांध्ये एकूण तेवीस शिक्षकांशी बोललो. विषय अगदी साधा होता. जूनमध्ये अध्यापक शिबिरात दोन पूर्ण दिवस प्रकल्पासंबंधी मार्गदर्शनाची सत्रे झाली होती. त्यानंतर प्रत्येक अध्यापकाने प्रकल्प करावा असे ठरले होते. त्यानंतरच्या पाच महिन्यांत प्रकल्पाचे जे काही काम झाले होते त्याची निवेदने आणि लेखी प्रकल्प वृत्त माझ्या सोलापूरच्या भेटीत प्रत्येक अध्यापकाने सादर केले. एखादे नवीन तंत्र शिकताना जी काही धडपड करावी लागते त्याचे प्रतिबब त्यांच्या निवेदनामध्ये जाणवत होते. प्रकल्प पूर्ण केल्याचा आनंद आणि त्याच वेळी हे नवीन तंत्र आपल्याला जमले आहे की नाही याबद्दलची धास्ती या दोन्ही भावनांचे मिश्रणही त्यांच्या निवेदनामध्ये डोकावत होते. एवढा आग्रह धरून सर्वांना प्रकल्प करायला लावण्याचे काय कारण होते? प्रबोधिनीच्या वेगवेगळ्या विभागांध्ये वेगवेगळी उद्दिष्टे ठेवून काम चालू असते. उद्दिष्टे वेगवेगळी असली तरी हेतू एकच आहे. राष्ट्रघडणीसाठी मनुष्यघडणीचे शिक्षण देणारी संघटना बांधणे हा आपल्या सर्व प्रयत्नांचा हेतू आहे. शालेय वयातील सदस्यांच्या घडणीसाठी जे सर्व प्रयत्न चालतात त्यांना आपण शिक्षण म्हणतो. विद्यार्थिदशा ओलांडलेल्या सदस्यांच्या घडणीसाठी जे प्रयत्न होतात त्यांना आपण गुणवत्तावाढ म्हणतो. सोलापूरच्या अध्यापकांनी विद्यार्थ्यांना प्रकल्प करायला सांगण्याआधी स्वत: प्रकल्प करणे हा गुणवत्तावाढीचा प्रयत्न होता.

याच महिन्यात उद्वाहक विभागात एका सदस्याने तारतंत्रीची परीक्षा उत्तीर्ण केली. उद्वाहक विभाग जेव्हा सुरू झाला तेव्हा तिथे प्रमाणपत्र धारण करणारे कुणीच नव्हते. आज या विभागामध्ये विद्युत पर्यवेक्षकाचा परवाना असलेले विभागप्रमुख आणि तारतंत्री म्हणून काम करण्याचा परवाना असलेले दोन सदस्य आहेत. या परीक्षा उत्तीर्ण होऊन परवाना मिळविण्याची धडपड प्रत्येकाला स्वत:लाच करावी लागली. अशा कौशल्यांच्या परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमधून त्यांची व्यावसायिक गुणवत्तावाढ झाली. परंतु त्यांनी गुणवत्ता- वाढीसाठी केलेल्या प्रयत्नांचा परिणाम म्हणून विभागाचे काम अधिक स्थिर झाले. व्यक्तिगत गुणवत्तावाढीमुळे अनेक वेळा आपल्या विभागाचीही गुणवत्ता वाढते.

व्यक्तिगत गुणवत्तावाढीमुळे अनेक वेळा आपल्या विभागाचीही गुणवत्ता वाढते.

आपल्या व्यवस्थापन महाविद्यालयाने प्रबोधिनीतील सदस्यांनी संगणक वापरायला शिकावे यासाठी 3-4 वेळा वर्ग योजले. यापूर्वीच्या सर्व वर्गांना बेताचा प्रतिसाद मिळाला. या महिन्यातल्या वर्गाला मात्र चांगला प्रतिसाद मिळाला. एखाद्या विषयाचे महत्त्व आणि उपयुक्तता कळायलाही वेगवेगळ्या लोकांना कमीजास्त वेळ लागतो. वर्ग न योजताही प्रशालेच्या भूतपूर्व प्राचार्यांनी संगणक वापराचे ज्ञान स्वप्रयत्नाने हस्तगत केले. तर नवनगर विद्यालयाचे संपूर्ण कार्यालयच विनाकागदाचे कार्यालय होण्याच्या मार्गावर आहे. या निमित्ताने तेथील कार्यालयातील सदस्यांचीही गुणवत्तावाढच होत आहे. गुणवत्तावाढीसाठी स्वत:ची प्रेरणा खूपच महत्त्वाची असते.

संशोधकांना आपल्या गुणवत्तावाढीसाठी वेगवेगळ्या विषयांवरील परिसंवाद किंवा चर्चासत्रांना उपस्थित राहावे लागते. अध्यापकांनाही स्वत:च्या गुणवत्तावाढीसाठी निबंधलेखन, निबंधवाचन, कृतिसत्रातील सहभाग असे प्रयत्न करावे लागतात. तंत्रज्ञ किंवा व्यवस्थापकांना प्रदर्शनांना भेटी, कृतिसत्रे, अभ्यासवर्ग याकरिता वेळ काढण गुणवत्तावाढीसाठी आवश्यक असते. एखादे कौशल्य शिकल्यावर त्याचा परिणाम कामामध्ये लगेच दिसतो. अध्यापक, संशोधक किंवा व्यवस्थापक यांच्यासाठी सुचविलेले पर्याय मात्र तसे नाहीत. अभ्यासवर्ग किंवा चर्चासत्र झाल्यावर त्यात समजलेला आशय दैनंदिन कामामध्ये कृतीत उतरवावा लागतो. नवीन कृती अंगवळणी पडल्यावरच गुणवत्तावाढ झाली असे म्हणता येते.

स्वत:चा आत्मविश्वास आणि प्रेरणा वाढल्याचा अनुभव ज्या ज्या कामांतून येईल ते सगळे गुणवत्तावाढीसाठीच केलेले प्रयत्न आहेत.

स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवी सप्ताहात निगडीला आणि गणेशोत्सवाच्या काळात पुण्याला त्या त्या ठिकाणच्या अध्यापकांनी वर्गातील अध्यापनापेक्षा वेगळी कामे केली. मुद्दाम ठरवून वेगळे अनुभव घेणे यातून गुणवत्तावाढ होते. वापरत असलेल्या कौशल्याचा किंवा तंत्राचा पुढचा टप्पा हस्तगत करण्याने गुणवत्तावाढ होते. स्वत:चा आत्मविश्वास आणि प्रेरणा वाढल्याचा अनुभव ज्या ज्या कामांतून येईल ते सगळे गुणवत्तावाढीसाठीच केलेले प्रयत्न आहेत.

नुकताच मान्यवर कार्यवाहांच्या पुढाकाराने संगीत परिचयाचा एक वर्ग योजण्यात आला. काही विभागप्रमुखही त्या वर्गात सहभागी झाले. वरवर पाहता नित्यकामाशी काहीही संबंध नसलेले असे उपक्रमही वातावरणातील बदलामुळे उत्साहवर्धक ठरू शकतात. परंतु मी याकडे आणखी थोड्या वेगळ्या दृष्टिकोनातून पाहातो. प्रबोधिनीत आपण प्रतिभा विकसनाला आणि नाविन्याला खूप महत्त्व देतो. कुठलीही गोष्ट वेगळ्या पद्धतीने करण्यासाठी वेगळ्या क्षेत्रातले अनुभव, वेगळ्या क्षेत्रातली तंत्रे आणि वेगळ्या क्षेत्रातली भाषा माहीत असेल तर जुन्या गोष्टींकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहाता येते. यातून नवीन सुचते. त्यामुळे संगीत परिचय वर्गाला स्वत:च्या पायांनी चालत जाणे हा गुणवत्तावाढीचाच प्रयत्न आहे.

संघटन प्रभागामध्ये चालणारे सर्वच उपक्रमआपल्यावर इतरांनी गुणवत्तावाढीसाठी चालू असतात. दैनंदिन दलांपासून साप्ताहिक बैठकी, सहली, शिबिरे आणि दौरे या सर्वांतूनच सहभागी विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि उपक्रम योजणाऱ्या मार्गदर्शक व प्रतोदांची गुणवत्तावाढ होत असते.

आपल्यावर इतरांनी सोपवलेली कामे जबाबदारी घेऊन स्वतंत्रणे करता येणे गुणवत्तावाढीमुळेच शक्य होते.

चार-पाच महिने पूर्वतयारी चालू असलेला कार्यकर्ता प्रशिक्षणाच्या दुसऱ्या टप्प्याचा वर्ग दोन आठवड्यांपूर्वी साळुंब्रे येथे पार पडला. काही वेळा गुणवत्तावाढीसाठी असे योजनापूर्वक प्रयत्न करावे लागतात. दोन टप्प्यांमध्ये कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग यापुढेही चालू राहणार आहेत. साळुंब्रे येथे नुकत्याच झालेल्या वर्गात तेथील विभागप्रमुख पूर्ण वेळ सहभागी झाले होते. वर्गाच्या सर्व तांत्रिक व्यवस्था त्यांनी सहकारी अध्यापकांवर सोपवल्या होत्या. इतरांवर विश्वासाने कामे सोपवता येणे व आपल्यावर इतरांनी सोपविलेली कामे जबाबदारी घेऊन स्वतंत्रपणे करता येणे हे दोन्हीही गुणवत्तावाढीमुळेच शक्य होते.

प्रबोधिनीच्या सर्व विभागांसाठी समान असलेला गुणवत्तावाढीचा प्रयत्न म्हणजे त्या त्या विभागात चालणारी सामूहिक उपासना. कौशल्य शिकण्याचा परिणाम काही दिवसांतच दिसू शकतो, तर सामूहिक उपासनेचा परिणाम काही वर्षांनंतर अनुभवता येतो. गुणवत्तावाढीच्या सर्व प्रयत्नांमध्ये या प्रयत्नांचा आपल्या विभागाला आणि संघटनेला उपयोग होतो आहे ना याकडे लक्ष ठेवणे महत्त्वाचे असते.

२. लवचिक चाकोरी

जे काम आपले मानले ते दर वेळी नव्या उत्साहाने, अधिक ताकदीने करणे म्हणजे तपाचे व्यसन लागले.

एका कारखान्यातील कामगार संघटनेने योजलेल्या बक्षीस समारंभाला अध्यक्ष म्हणून गेलो होतो. कामगारांच्या मुलांपैकी जे दहावी, बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाले त्यांचा सत्कार होता. त्याच वेळी गेल्या वर्षभरात सेवानिवृत्त झालेल्यांचाही सत्कार झाला आणि एका कामगाराचा, त्याच्या पत्नीसह, आदर्श पालक म्हणून सत्कार झाला. जे सेवानिवृत्त झाले त्यांचा वयोवृद्ध म्हणून सत्कार करणे उचितच आहे. ज्यांचा आदर्श पालक म्हणून सत्कार झाला, त्यांंना मी तपोवृद्ध म्हटले. गरीब मुस्लिम घरातून आलेला कामगार, अठराव्या वर्षी कारखान्यात कामाला सुरुवात केली. त्याला पाच अपत्ये. तीन मुली व दोन मुले. सत्कारापूर्वी त्याचा परिचय करून देताना एकेका मुलाचे शिक्षण किती झाले हे निवेदक सांगत होता. पहिल्या मुलीचे दहावीपर्यंत. दुसऱ्या मुलीचे पदवीपर्यंत. तिसरी मुलगी द्विपदवीधर होऊन मुख्याध्यापिका म्हणून काम करत असलेली. पहिला मुलगा डिप्लोमा झालेला. दुसरा इंजिनिअरिंगची शेवटची परीक्षा दिलेला. सर्वांचे शिक्षण उत्तम पार पाडले म्हणून त्याचा सत्कार. हेच त्याचे तप. सत्कारानंतर मी म्हटले की पहिल्यापेक्षा पुढच्या मुलीचे अधिक शिक्षण झाले पाहिजे असे व्यसनच जणू त्याला लागलेले दिसते. साध्या आयुष्यातही आलेली जबाबदारी सर्व शक्तिनिशी झोकून देऊन त्याने पार पाडली. हे तपच झाले. ‌‘तपविता तपविता तपवावे‌’ म्हणजे अधिकाधिक तप करत जाणे. जे काम आपले मानले ते दर वेळी नव्या उत्साहाने, अधिक ताकदीने करणे म्हणजे तपाचे व्यसन लागले. जे काम आपले मानले

चाकोरी बनल्यावर यश बेचव होते. त्याचे महत्त्व जाणवेनासे होते आणि यशस्वी होऊनही कण्हणे- कुंथणे चालू होते.

गेल्या महिन्यात निगडी व सोलापूर येथे तिथल्या विद्यार्थ्यांचा शालान्त परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल कौतुक- समारंभ झाला. दोन्ही ठिकाणी मी तिथल्या अध्यापकांना म्हटले की एकदा निर्णय शंभर टक्के लागायला लागला, विद्यार्थी गुणवत्ता यादीत यायला लागले की त्यानंतर आणखी काय करायचे? आहे ते यश टिकवायचे? की आणखी मिळवायचे? समजा, एखाद्या वर्षी सर्वजण गुणवत्ता यादीत आले. पुढेकाय? समजा, पुण्याच्या प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांनी सर्व विषयांत ‌‘अ-1‌’ श्रेणी मिळवली. पुढे काय? आहे ते यश टिकविण्यासाठी काम करायचे? की‌ ‘तपविता तपविता तपवावे‌’ म्हणत आणखी काम करायचे? शिक्षकांना तपाचे व्यसन लागले तर असे शिक्षक काय करतील?

आपल्यापैकी प्रत्येकाच्या कामाचा एक ठराविक साचा बनू शकतो. चाकोरी बनू शकते. रक्षणाचे काम असो, परिरक्षणाचे (मेंटेनन्स्‌‍चे) काम असो; लेखनाचे, हिशेब ठेवण्याचे, धारिण्या सांभाळण्याचे काम असो; प्रकल्प प्रस्ताव करण्याचे, प्रकल्प राबवण्याचे काम असो, अभिनव उपक्रम करण्याचे काम असो; नवीन विषय शिकवण्याचे, नवीन विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम असो; विविध कौशल्यांचे प्रशिक्षण करण्याचे, औषधे देण्याचे, संशोधन करण्याचे काम असो; प्रत्येक कामाची चाकोरी बनू शकते.

चाकोरी बनल्यावर यश बेचव होते. त्याचे महत्त्व जाणवेनासे होते. आणि यशस्वी होऊनही कण्हणे-कुंथणे चालू होते. चाकोरी बनल्यावर अपयशाची टोचणी जाते आणि अपयशातही ‌‘आजचा आणखी एक दिवस कसा यशस्वीपणे ढकलला?‌’ अशी ‌‘अखेर मीच जकली‌’ वृत्ती बनते. चाकोरीतून जात राहणे म्हणजे मनुष्याचा दगड बनणे.

चाकोरीतून जात राहणे म्हणजे मनुष्याचा दगड बनणे. चाकोरी मोडणे म्हणजे मनुष्याचे मनुष्यपण टिकून राहाणे.

चाकोरी मोडणे म्हणजे मनुष्याचे मनुष्यपण टिकून राहाणे. एक साचा मोडून दुसरा साचा बनवणे, नवनवीन साचे करत राहाणे म्हणजे आपला प्रवास उत्तमोत्तम मनुष्यपणाकडे चालू राहिला. ‌‘तपविता तपविता तपवावे‌’ असे आपले काम चालू असेल तर आपले शरीर तपपुनीत झाल्याचे आपण अनुभवतो का? आपले आरोग्य, आपला उत्साह, आपली कार्यशक्ती वाढते आहे का? तर शरीर तपपुनीत झाले. आपल्याला नवीन सुचते का? बारीकसा जरी नवीन बदल सुचत असेल तरी त्यातून आपल्या प्रतिभेला तपामुळे उजाळा मिळतो आहे हे कळते. आपल्या सहकाऱ्यांसह काम करून आपण अधिक मोठी जबाबदारी स्वीकारतो आहोत का? तर आपले तप चालू आहे. आपण तपाच्या गुणाने ‌‘मन मना मिळवत‌’ आहोत. असे तप सर्वांना रोज आपापले काम करतही करता येते

३ महत्कार्याचे कंकण

सर्व राष्टीय नेते देशप्रश्नांपेक्षा – शेळीच्या प्रश्नांना महत्त्व देणारे गांधीजी विलक्षणच दिसतात, अशा नजरेने एकमेकांकडे बघत हताश होऊन गांधीजींची वाट पाहू लागतात.

महात्मा गांधींच्या जीवनावरील ‌‘गांधी‌’ या चित्रपटात एक दृश्य आहे. गांधीजींच्या आश्रमात नेहरू, पटेल, राजाजी, आझाद अशी सर्व पुढारी मंडळी महत्त्वाच्या राजकीय प्रश्नांवरती चर्चा करण्यासाठी एकत्र जमली आहेत. बोलणी सुरू होणार तेवढ्यात आश्रमातील एक लहान मुलगी गांधीजींकडे तिच्या शेळीच्या प्रकृतीबद्दल सांगायला येते. सर्व पुढारी मंडळींना ‌‘आलोच‌’ असे सांगून गांधीजी त्या मुलीबरोबर शेळीच्या समाचारासाठी जातात. आणि सर्व राष्ट्रीय नेते देशप्रश्नांपेक्षा शेळीच्या प्रश्नांना महत्त्व देणारे गांधीजी विलक्षणच दिसतात, अशा नजरेने एकमेकांकडे बघत हताश होऊन गांधीजींची वाट पाहू लागतात. गांधीजींनी देशप्रश्नांना कमी महत्त्व दिले? की शेळीच्या प्रश्नांना फार महत्त्व दिले? प्रत्येकाचे मत वेगवेगळे असू शकेल. चित्रपटातल्या या प्रसंगाची आठवण होण्यासारखी परिस्थिती गेल्या महिन्यात पुण्यात निर्माण झाली.

आपल्या सहनिवास-प्रमुखांना कौटुंबिक अडचणींमुळे अचानक गावी जावे लागले. सहनिवासातला दिनक्रम अंगवळणी पडल्यामुळे आठमाही परीक्षा चालू असताना देखील प्रमुखांच्या अनुपस्थितीत विद्यार्थी सर्व कार्यक्रम पार पाडत होते. एक-दोन दिवस दुरूनच चौकशी करत होतो. विद्यार्थीच मला धीर देत होते ‌‘आम्ही सर्व बघतो. तुम्ही काळजी करू नका‌’ त्यानंतर रात्री झोपण्यासाठी एकेका कार्यकर्त्याला पाठवायला सुरुवात केली. शेवटी चार दिवसांनंतर एका अध्यापकांना सहनिवास-प्रमुख येईपर्यंत सहनिवासाची जबाबदारी घ्यायला सांगितली. असा प्रसंग ही जशी विद्यार्थ्यांना शिकायची संधी तशीच कार्यकर्त्यांना पण शिकायची संधी असते. विद्यार्थ्यांनी तर जबाबदारी घेतलीच. परंतु ज्या कार्यकर्त्यांना जेवढी जबाबदारी दिली त्यांनीही ती पाळली. सहनिवास-प्रमुखाचे काम, म्हटले तर शैक्षणिक आहे म्हटले तर व्यवस्थापकीय आहे. उद्योग, ग्रामविकसन, संघटन प्रभागात काम करणाऱ्या एकेकाने आणि नंतर एका अध्यापिकेनेही सहनिवासातले व्यवस्थापकीय काम केले.

सर्व कामे सारख्या महत्त्वाची मानणे हा एक दुर्मिळ गुण आहे. ‘किरकोळ‌’ कामे करायची लाज वाटणे आणि ‌‘महत्त्वाची‌’ कामे करण्यात सन्मान वाटणे यात काहीतरी घोटाळा आहे.

या सर्वांना सहनिवासातील काही जबाबदारी एकेक दिवसाकरिता घेण्यास सांगताना मला सतत सुरुवातीला दिलेला प्रसंग आठवत होता. सर्वांनीच आपापली ‌‘महत्त्वाची‌’ कामे बाजूला ठेवून हे किरकोळ ‌‘व्यवस्थापकीय‌’ काम आनंदाने केले. बऱ्याच वेळा असे घडताना दिसत नाही. प्रत्येकाचे काम इतके ‌‘महत्त्वाचे‌’ असते की ‌‘किरकोळ‌’ कामे करण्यात वेळ घालवणे त्यांना आवडत नाही. आपण सर्वच कामे महत्त्वाची मानून करू शकतो का? सर्व कामे सारख्या महत्त्वाची मानणे हा एक दुर्मिळ गुण आहे. ‘किरकोळ‌’ कामे करायची लाज वाटणे आणि ‌‘महत्त्वाची‌’ कामे करण्यात सन्मान वाटणे यात काहीतरी घोटाळा आहे. ‌‘कारकुनी‌’ कामे, ‌‘हमाली‌’ कामे, ‌‘हेलपाट्यांची‌’ कामे, ‌‘संस्थात्मक‌’ कामे, ‌‘विकासाची‌’ कामे, ‌‘संघटनाची‌’ कामे, ‌‘मनुष्यघडणीची‌’ कामे, ‌‘संपत्ती निर्माण करण्याची‌’ कामे, ‌‘प्रभावी‌’ कामे, ‌‘झंझावाती‌’ कामे, ‌‘देशव्यापी‌’ कामे,‌ ‘क्रिएटिव्ह‌’ कामे अशी कामांची जाति-व्यवस्था काही काहीजणांच्या मनात असते. परिस्थितीनुसार सर्व कामे करता येणे, सहजपणे करता येणे, कौशल्याने करता येणे म्हणजे आपली गुणवत्तावाढ झाली. व्यक्तीच्या गुणवत्तावाढीचा संघटनेला उपयोग व्हायचा असेल तर कोणत्याही एक विशिष्ट कामातील आपले कौशल्य वाढवताना, इतर सर्व कामे करण्याची आपल्या मनाची तयारी प्रयत्नपूर्वक टिकवून धरावी लागते. ही मनाची लवचिकता आणि कौशल्ये वाढणे एकत्र गेले पाहिजे.

विविध प्रकारची कामे करणाऱ्या सर्व व्यक्तीकडे सारख्या आदराने आणि आपुलकीने बघता यावे लागते

सर्व कामांकडे सारख्याच आदराने आणि आपुलकीने बघता यायचे असेल तर विविध प्रकारची कामे करणाऱ्या सर्व व्यक्तींकडे सारख्या आदराने आणि आपुलकीने बघता यावे लागते. प्रबोधिनीच्या एका कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून निमंत्रित करण्यासाठी मी एका मोठ्या संस्थेच्या प्रमुखांकडे गेलो होतो. त्यांच्या पंचतारांकित कार्यालयात प्रवेश केल्यावर ते खुर्चीत बसून आणि मी टेबलासमोर उभा राहून आमचा संवाद झाला. त्यांनी अध्यक्ष म्हणून येण्याचे मान्य केले आणि दिवस, वेळ डायरीत नोंदवून घेतली. शेवटी मला म्हणाले, ‌‘सांगा डॉ. बापटांना मी नक्की येईन‌’. गेल्या गेल्या मी त्यांना माझे नाव सांगितले होते. ते त्यांनी ऐकलेच नव्हते. मी म्हटले‌ ‘मीच बापट, तुम्हाला माझे कार्ड मी दिले आहे आणि आल्यावर माझे नावही सांगितले होते‌’. ते भले गृहस्थ होते. लगेच म्हणाले, ‌‘माफ करा, मला स्टाफमधले कोणीतरी वाटलात, त्यामुळे मी कार्डही पाहिले नाही. तुम्ही काय बोलत होता तिकडेही लक्ष दिले नाही‌’. प्रबोधिनीत कार्यक्रमाला आल्यावर हा प्रसंग त्यांनी कार्यक्रमातही सांगितला. हा सगळा घोटाळा माझ्या साध्या कपड्युांळे झाला. हे दुसऱ्या संस्थेत जसे घडले तसे अनेकदा प्रबोधिनीतही घडते. गोऱ्या कातडीचा पाहुणा मोठा, सुटातला पाहुणा मोठा, मोटारीतून येणारा पाहुणा मोठा, मोठी देणगी देणारा पाहुणा मोठा असे नकळत होते. असा पाहुणा आला की आपण चपापून बसतो. लगबग वाढते. स्वागताची धावपळ सुरू होते. पायी येणारा, साध्या वेशातला, मोठ्या वास्तूला बुजलेला, विभागांच्या वैविध्याने गोंधळलेला असा पाहुणा आला तर बऱ्याच वेळा त्याची विचारपूस व्हायलाही वेळ लागतो. काहीजण जाणीवपूर्वक अशा लोकांचीही दखल अगत्याने घेतात. पण त्यांच्या बाबतीतही झकपक पाहुणा

आला की ‌‘का रे भुललासि वरलिया रंगा‌’ असे होतेच. अशा पाहुण्यांना अधिक अगत्याचे स्वागत मिळते.‌ ‘चोखा डोंगा परी भाव नोहे डोंगा‌’ असे मानून, आपल्याकडे येणारे सर्वच जण आपल्या बरोबरीचे आहेत हे ओळखून, आपण त्यांच्याशी आस्थेने वागतो आहोत असे खरे व्हायला पाहिजे. असे झाले तर सगळ्या कामांकडे – देशप्रश्नांकडे आणि शेळीच्या प्रश्नांकडे – आपण बरोबरीच्या नजरेने बघू शकू. आपल्या गुणवत्तावाढी चा आपल्या विभागाला आणि प्रबोधिनीला लाभ व्हायचा असेल तर कौशल्यांची आणि तज्ज्ञतेची उंची वाढवताना समानतेचा पाया रुंद व्हायला पाहिजे. म्हणजेच‌ ‘किरकोळ‌’ कामे आणि ‌‘किरकोळ‌’ माणसे ‌‘आपल्या‌’ इतकीच आणि ‌‘आपल्या‌’ कामाइतकीच ‌‘महत्त्वाची‌’ आहेत याचे भान राआला की ‌‘का रे भुललासि वरलिया रंगा‌’ असे होतेच. अशा पाहुण्यांना अधिक अगत्याचे स्वागत मिळते.‌ ‘चोखा डोंगा परी भाव नोहे डोंगा‌’ असे मानून, आपल्याकडे येणारे सर्वच जण आपल्या बरोबरीचे आहेत हे ओळखून, आपण त्यांच्याशी आस्थेने वागतो आहोत असे खरे व्हायला पाहिजे. असे झाले तर सगळ्या कामांकडे – देशप्रश्नांकडे आणि शेळीच्या प्रश्नांकडे आपण बरोबरीच्या नजरेने बघू शकू. आपल्या गुणवत्तावाढी चा आपल्या विभागाला आणि प्रबोधिनीला लाभ व्हायचा असेल तर कौशल्यांची आणि तज्ज्ञतेची उंची वाढवताना समानतेचा पाया रुंद व्हायला पाहिजे. म्हणजेच ‘किरकोळ‌’ कामे आणि ‌‘किरकोळ‌’ माणसे ‌‘आपल्या‌’ इतकीच आणि ‌‘आपल्या‌’ कामाइतकीच ‌‘महत्त्वाची‌’ आहेत याचे भान राहिले पाहिजे.

‌‘किरकोळ‌’ काम आणि किरकोळ‌’ माणसे ‌‘आपल्या‌’ इतकीच आणि ‘आपल्या‌’ कामा इतकीच ‌‘महत्त्वाची‌’ आहेत.

४. बुद्धी सूक्ष्म – मन व्यापक

विद्रोहाची आग विझविण्याचे काम जसे एकात्मतेसाठीचे तसे विद्रोहाची गरजच राहाणार नाही असे काम करणे राष्टीय एकात्मतेसाठीचेच काम आहे.

विवेकानंद केंद्राचे अरुणाचल प्रदेशातील एक कार्यकर्ते मध्यंतरी दोन महिने पुण्यात राहात होते. अरुणाचल प्रदेशातील इद्रु जमातीच्या रीति-रिवाजांचे चित्रण केलेली एक चित्रफीत त्यांनी तयार केली आहे. चित्रफितीच्या संकलन-संपादनाच्या कामात प्रबोधिनीतील काही सदस्यांनी लक्ष घातले होते. नॉर्थ-ईस्ट स्टुडंट्स्‌‍ सोसायटीचे कार्यालय प्रबोधिनीत असणे व चित्रफीत संपादनाच्या कामातील साहाय्य या दोन्ही गोष्टी राष्ट्रीय एकात्मतेसाठीचे आपले अप्रत्यक्ष काम आहे. या वर्षाच्या सुरुवातीला काश्मीरच्या दौऱ्यावर आपल्या दोन विद्यार्थिनी सरहद्द संस्थेतर्फे गेल्या होत्या. ते ही अप्रत्यक्ष कामच झाले. प्रत्यक्ष काम जाणीवपूर्वक करणे आपल्याला जमले पाहिजे.


साखरशाळा चालविणे हे असे राष्ट्रीय
एकात्मतेसाठीचे काम आहे. विद्रोहाची आग विझविण्याचे
काम जसे एकात्मतेसाठीचे तसे विद्रोहाची गरजच राहाणार
नाही असे काम करणे राष्ट्रीय एकात्मतेसाठीचेच काम आहे.
आपण व आपल्यासारखे म्हणजेच आपला समाज असा
आपल्याला भ्र होत असतो. आपल्यापेक्षा वेगळ्या
परिस्थितीत राहाणारेही आपल्या समाजाचे घटक आहेत
हे प्रयत्नपूर्वक बबवावे लागते. स्थलांतरित ऊस-तोडणी
कामगारांच्या काही कुटुंबांना तरी आपल्या मुलांच्या
शिक्षणाची काळजी कोणीतरी करते आहे हे समाधान आपण
देऊ शकतो. हे शिक्षणाप्रमाणेच एकात्मतेसाठीचे प्रत्यक्ष
काम आहे.


आपली समाजाबद्दलची कल्पना त्यात नवीन
नवीन गटांची भर घालत व्यापक करत जाणे म्हणजे