सुवर्णा गोखले

हिरकणी प्रकल्प

या अनुभवानंतर मुलांच्या विश्वातील अंगणवाडी ताई बरोबर मुलांच्या सर्वात जास्त संपर्कात येणाऱ्या त्यांच्या मातांसोबत काम केले तर मुलांच्या शैक्षणिक बौद्धिक विकासासाठी उपयुक्त होईल असे वाटल्याने सदर प्रकल्प करण्याचे ठरविले. मुलांच्या बुद्धीचा विकास ० ते ६ वयोगटात होतो. पैकी पहिल्या टप्प्यात ० ते ३ वयोगटातील मुलांच्या पालकांसाठी पूरक उपक्रम करून पर्यायाने मुलांसाठी काम करण्याचे ठरविले.१ यासाठी १० वी पास झालेल्या केव्हा १० वीच्या परीक्षेपर्यंत पोहोचलेल्या पालकांसाठी मुलांच्या संगोपनातून त्यांचा विकास कसा साधायचा याविषयी प्रशिक्षण देणे हे गरजेचे आहे पालकांना प्रशिक्षण दिले तरच त्या आपल्या पाल्यासाठी चांगला दर्जेदार वेळ देतील व पर्यायाने पाल्यांच्या विकासाकडे जातीने लक्ष देऊ शकतील. शेती करणाऱ्या आणि घरगुती कामातून जास्ती वेळ काढणे अवघड असलेल्या महिलांसाठी महिन्यातून दोन दिवसांचा वेळ या प्रशिक्षणासाठी योग्य वाटला या साठी त्यांना पुढील १५ दिवस घरी करण्यासाठी छोट्या छोट्या कृती व खेळांचे उपक्रम व ते का करायचे त्यामुळे मुलांच्या बुद्धीवर आरोग्यावर इंद्रिया क्षमतांवर कसा कसा परिणाम होईल हे समजावून सांगायचे व कृती रूप गृहपाठ द्यायचा तर मुलांच्या विकास प्रक्रियेतील त्या चांगल्या साधन बनवू शकतील .यासाठी हा कृती उपक्रम ठरविला. ० ते ३ वयोगटातील मुलांच्या पालकांसाठी मुलांच्या आरोग्य ,इंद्रिय विकास व बौद्धिक विकासासाठी उपयुक्त अशा कृती ,खेळ व उपक्रमांचे प्रशिक्षण घेणे. १)० ते ३ वयोगटातील मुलांच्या पालकांना मुलांच्या विकासाची संकल्पना स्पष्ट करणे. २) असा विकास व्हावा म्हणून बहुतांच्या परिस्थितीत उपलब्ध साधनांच्या साह्याने काही खेळ व कृती तसेच उपक्रम घेऊन मुलांच्या विकासामध्ये सकारात्मक बदल होऊ शकतो याचे प्रत्यक्ष प्रत्यक्ष सहभागातून पालकांना दाखविणे. ३) पालकांचा मुलांच्या विकासातील सहभाग हा जाणता सहभाग करणे.    हिरकणी प्रकल्प  स्वरूप

हिरकणी प्रकल्प Read More »

एकल महिला – आत्मविश्वासच मिळाला असं नाही तर हळूहळू आत्मसन्मान वाटू लागला

स्त्री शक्ती प्रबोधन ग्रामीणचे काम सुरु होऊन तीस वर्षे झाली. बचतगटा मार्फत कामाची सुरुवात झाली. ते खूप गरजेचे होते. तिने स्वतःच्या हिमतीवर चार पैसे बचत केले आणि चार पैसे मिळवले तर तिचा आत्मविश्वास वाढतो असे आमच्या लक्षात आले. अनौपचारिक शिक्षणातून आणि काळानुरुप अशा व्यावहारिक साक्षरतेतून ( Functional Literacy ) तर हा आत्मविश्वास काही पटीने वाढू शकतो हे देखील लक्षात आले.  तिने बँकेत खाते काढले, कर्ज घेऊन ते फेडले, घरातील दुरुस्तीची, घरावर कौले चढविण्याची, मुलीला शिकवण्याची, सावकाराचे कर्ज फेडण्याची, आधार कार्ड काढण्याची, pancard आणि आधारकार्ड लिंक करण्याची कामे केलीआणि तिलाही वाटू लागले कि ती देखील घराकरता महत्वाची आहे. तिला फक्त आत्मविश्वासच मिळाला असं नाही तर हळूहळू आत्मसन्मान वाटू लागला. आता तीस वर्षानंतर आत्मसन्मान वाटू लागून ती अनेक कामांमध्ये स्वतः पुढाकार घेऊन काम सुरु करणारी आणि स्वतःच्या पदरचे वेळ आणि पैसे खर्च करून विशिष्ट कामासाठी वेळ काढणारी झाली. आता घराघरातून त्या घरातली लक्ष्मी किंवा मुलगी ही  जशी आपल्या कामात आली तशी नंतरच्या काळात घरात माघारपणाला आलेली किंवा सासरी राहत आहे पण एकल आहे. माघारी आलेली नाही पण आपल्या मुलाला घेऊन सासरच्याच घरात राहते आहे. तिथे दिवसभर काम करून संपूर्ण घराचा आधार तर ती झाली आहे पण तिला म्हणावा तसा आत्मविश्वास नाहीये. म्हणावी तशी तिची दखल घेतली जात नाहीये. माहेरी राहत असली तरी भावाच्या मुलांचे मनापासून करत राहिली आहे त्याच्या मुलाबरोबर स्वतःच्या मुलाला सांभाळते आहे पण मोकळेपणी तिच्या तोंडून कधी चार शब्द ऐकायला आले नाहीयेत. तिचे खळाळते हसू ऐकू आले नाहीये. आपल्या कामाचा परिणाम असा की तिचा आवाज आपल्या भरल्या घरातल्या लक्ष्मीलाही ऐकू येऊ लागला आणि सर्व कार्यकर्त्यांनी ठरवले की अशा एकल महिले साठी प्राधान्याने काम करायचे. आपल्या कामात आज जबाबदारी घेऊन काम करण्याच्या ठिकाणी अनेक एकल महिलाच महत्वाचे योगदान करत आहेत. ज्ञान प्रबोधिनीचे स्त्री शक्ती प्रबोधनाचे काम स्त्रियांनी स्त्रियांसाठी करायचे असल्यामुळे ग्रामीण भागातील एकल महिलेला या ठिकाणी खूप सहज आणि सुरक्षित वाटते. आजूबाजूला सगळ्याच महिला काम करीत असल्यामुळे सासर माहेरचे सगळे वडील मंडळीही निश्चिंत असतात. वेल्हे तालुक्यांमधील दुर्गम भागातील मुलीचे शिक्षण खंडित होऊ नये म्हणून मुलींसाठी सहनिवास गेल्या १० वर्षांपासून एकल महिलाद्वारेच चालवले जाते. सरकार दरबारी एकल महिलेसाठी आयोजित केलेल्या योजना संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना अशा योजना योग्य महिलांपर्यंत पोहोचवण्याचे अत्यंत महत्वाचे आणि कागदपत्रांच्या पूर्ततेच्या अटीमुळे खूप कठीण असे हे काम सुद्धा स्वतः एकल असलेल्या ताई गेली १० वर्षे करीत आहेत. ३०० बचत गटांच्या संघाचा ४ कोटी रुपयांचा हिशोब पाहणे, आरोग्याच्या कामासाठी २० वर्षांपासून भागातील अनेक गावांमध्ये जाऊन जाणीव जागृती करणे ही आणि अशी अनेक कामे त्या वर्षानुवर्षे करत आहेत. ही सर्व कामे करताना संपूर्ण वेल्हे तालुक्यातील गावागावांमधून स्वतःच्या आयुष्याशी झगडत राहणाऱ्या एकल महिलेच्या अवघड परिस्थितीविषयी स्वतः एकल असलेल्या आणि गावोगावच्या महिलांना प्रेरणा देणाऱ्या कार्यकर्त्यांचे अनुभव .

एकल महिला – आत्मविश्वासच मिळाला असं नाही तर हळूहळू आत्मसन्मान वाटू लागला Read More »

आत्मसन्मानाच्या गोष्टी(परिषद )

स्त्रीशक्ती प्रबोधन ग्रामीण त्रीदाषक पुरती १९९५ मध्ये स्त्री शक्ती ग्रामीण विभागाचे काम सुरु झाले तेव्हा महिलांच्या संघटना साठी मेळावे हा आपल्या कामाचा एन्ट्री पोइंत ठरला .आजही मेळावा म्हंटले की आनंदाचे वातावरण असते .महिलांना एकत्र करणारा मेळावा हा मार्ग भारतीय असल्या मुळे शाश्वत ठरला . ग्रामीण महिलांना स्वताच्या वेळा जपून स्वयंरोजगार देणे ,म्हणजे एक संधी देणे. ती संधी म्हणजे स्वतः च्या पायावर उभे राहण्यास मदत होते . ग्रामीण भागातील महिलांसाठी शिक्षणा च्या हेतूने अभ्यास सहली काढल्या जातात त्यातून महिला शिकतात .आनंदासाठी किवा देवदर्शन साठी काढलेल्या सहलीतून व्यक्ती विकासासाठी चालना मिळते . माहिती

आत्मसन्मानाच्या गोष्टी(परिषद ) Read More »

About Stree SHAKTI GRAMEEN

Stree Shakti Probodhan ( Awakening Women Power) is a unit of Jnana Prabodhini established in 1995 . A series of constructive activities that began with the organisation of the rural women power through the anti-liquor campaign in Shivaganga-Gunjawani river valleys of Pune district. Currently 320 SHGs only for women members are existing and 5200 account holders are taking benefits. Guidance to the rural women through establishment of a local body called ‘Jijamata Prabodhan Kendra’. Personality development, health, self-employment and leadership training programmes for rural women across all age groups. 2000+ Adolescent girls were benefited with personality development programmes under Kishori Vikas. Young mothers 600+ have undergone the parenting sessions. 30+ age group of women experiencing Health awareness and check up programmes (2000+ per year) consistently for 10 years in collaboration with funding organizations, skill development( 1750 per year) for last 8 years, local leadership development. Different projects run by Stree Shakti Grameen are as follows- 1. Aarogya Sakhi- Health related project for 80 villages in Velhe Block. 8 awareness sessions + 6 Check-up camps in each village.( CSR Bajaj Finserv ) 2. Swayamrojgar- Ram Sita Puranik Kendra Shivapur, Dhanashree project for Nasrapur, Ambawane and Velhe Kendra.(CSR Electronica) 3. Telemedicine Project- with Rotary Pride. 4 Types of tests like Hb, BP, Dopler, Temprature are done  on the village level. We have trained ASHA workers from Karanjawane PHC to do all this tests with tablets given to them. Needy people are referred to PHC or Doctors from Sahyadri Hospital  consult them on telephonic conversation. 4. Navdisha leadership project- for 50 women from Velhe block. With the help of JPF we are conducting sessions for leadership development of these village representatives so they can contribute to the development of their villages. 5. Bachat gat- Currently 320 SHGs only for women members are existing and 5200 account holders are taking benefits. 6. Katkari Project- Currently we are working on the issues of children from 4 katkari vasties in Velhe. Mostly issues regarding their education and health awareness are taken care through this work. 7. Girikanya Sahanivas- From 2015 to 2024 , 111 girls from remote villages of Velhe Block are taking benefit of this facility in Velhe. Most of these girls are from Dhangar community who are living in the hilly area of Velhe Block. Most of them don’t have school in their villages. So they have to drop out from the schools and get marry in early age. But now because of Girikanya Sahanivas (hostel) girls in Velhe are getting opportunity to persue their dreams in education.

About Stree SHAKTI GRAMEEN Read More »

covid 19 relief

DONATION FOR COVID-19 RELIEF WORK Project Initiatives 1) Supplementing the PDS (Ration) given by the Government 2) Counseling for Covid affected families The work carried out is given below. 1) Supplementing the PDS (Ration) given by the Government: We carried out a pre-survey to find the really needy families. Forty five of our volunteers met the actual affected families themselves rather than depending on opinions or information of other people. They met Katkari families (fishermen caste), senior citizens, direct Covid affected families and single women families. This survey covering 53 villages was carried out within 4 days. It revealed to us that the number of families in desperation was significantly greater than what we had thought and in fact there were 526 needy families. (The proposal to B & K Securities was for 300 kits only and because of the discount 322 families received the kits from B & K Securities funding. Since there were more needy families, we approached more donors and provided kits to all the 526 families identified). After the survey we tabulated the required items as well as quantities. It turned out to be at least 2 Tons of material. We visited the wholesale market in Pune with this list and placed the orders. A couple of shops gave us a special 5 % discount when they came to know our cause. All this 2 Ton or more material was then transported to Prabodhini building and unloaded by our Young Volunteers. They also helped us with the tedious work of unpacking, sorting and packing into small kits. This work itself took 4-5 days. Because of such active support from our large volunteer base, we do save a lot of money in any project, so that most of the money goes to the beneficiaries. The kits were taken to the villages in various vehicles with help from teenagers from those villages. Once the kits reached various villages our village coordinators took custody and personally handed them over to the needy families. Village-wise kits Distribution Sr. No Village name Kits Sr. No Village name Kits Sr. No Village name Kits 1 Askavadi 16 15 Gelgani 10 29 Pali 1 2 Adavali 15 16 Guhini 2 30 bhordi 8 3 Ambavane 4 17 Ghisar 1 31 Asani 1 4 Ikhartimbi 3 18 Dhebewadi 4 32 Malekar Vadi 1 5 Katavadi 9 19 Chandavane 43 33 Margasani 10 6 Kumbale 9 20 Jorkarwadi 4 34 Velhe 17 7 Kusgav 4 21 Jadhavwadi 1 35 Raidandwadi 5 8 Kusarpeth 7 22 Dhanep 8 36 Vihir 7 9 Kelad 6 23 Nigade 3 37 Velhe Bud. 13 10 Kondavali 10 24 Pabe 11 38 Sakhar 14 11 Kondhavale 13 25 Nivi 2 39 Hirpodi 8 12 Kodapur 8 26 Bhatti 8 40 Sonde Mathana 2 13 Khambwadi 12 27 Pasali 4 41 Sonde Jadhav 2 14 Khopi 9 28 Bhaginghar 1 42 Hirve Vasti 6 Total 42  Villages. Kits Distributed 322 2) Counseling for Covid affected families: Usually counseling takes place in urban setting, but this time Covid made so many people so depressed and gloomy that we decided to provide counseling to those families who were directly affected by Covid (family members so Covid positive people or those who lost someone to Covid). As per the proposal we wanted to train 25 field workers in counseling and reach out to about 500 people. We appealed to 70 of our coordinators to take training and offer counseling. Forty of them came forward to take training. They were given counseling training on-line by professional counselors free of charge. After going through this intense, emotionally charged training, not a few felt that they could not bear to talk to people who were facing tremendous hardship. So out of the 40 who took training, 26 conducted the actual counseling. Among these 26, there were 6 Asha workers. (Asha workers are govt. approved health workers in villages). We realized that even they were not given any formal training as to how to counsel the Covid affected people. The actual counseling was conducted between 12th May and 24th June. Counseling in Numbers: Findings and effects of counseling sessions: Amongst the adults there were nearly 53 % women and 47 % men. In rural setting men talking to women and especially on such serious matters is itself an achievement! In almost all of the cases (88 %) the counselors noted that some further action/counseling was necessary. As was the case all over India, people were afraid of keeping contact with the Corona positive persons and their families. Many affected families were treated as outcasts even after a family member recovered from Covid and returned home from hospital/quarantine. So even getting ration or grocery was very very difficult for them. So under such circumstances our counselors and their work proved to be very useful. They were also locals, and unafraid to approach Covid affected families. So their presence and overall calmness created conducive atmosphere for the neighbours to approach affected families without fear. We also received feedback from the counselors that their counseling sessions helped many above age 60 gather courage to go and get vaccine shots. During counseling, many counselors felt that these were needy families and so we provided them with the ration kits, as per the First activity of this project. The counselors really took their work to heart and took ownership of this activity. The work they carried out was very very useful and people really appreciated their work. Thus it helped the counselors too. Not only their self-esteem enhanced but so was their prestige in the village. Details of the Initiatives Sponsor           : B & K Securities, Mumbai Period              : 3 Months, planned. Completed between May 10 to July 10 Budget             : Rs.12, 80,000/- We finished this Project within 2 months rather than 3 months as planned because the need was very sever and urgent and we were helped by a large number of young people.

covid 19 relief Read More »

आरोग्य सखी

 आरोग्य सखी प्रकल्प दि.१ जानेवारी २०१९ पासून आरोग्य सखी प्रकल्पाचे काम वेल्हे तालुक्यातील ५० गावांमध्ये बजाज फिनसर्व्ह कंपनीच्या आर्थिक सहाय्यातून सुरु झाला. गेली अनेक वर्षे बचत गटाच्या माध्यमातून या परिसरातील महिलांचे जीवन आपण जवळून पहात आहोत. यातूनच या महिलांमध्ये आरोग्य विषयक जाणीव जागृती व्हावी व त्यांना भेडसावणा-या आरोग्याच्या तक्रारींवर वैद्यकीय उपचार करून घेण्यासाठी त्यांची मानसिक तयारी व्हावी या हेतूने या प्रकल्पाची आखणी झाली. या प्रकल्पांमध्ये ७ प्रकारची आरोग्यविषयक जाणीव जागृती सत्रे व ५ प्रकारच्या आरोग्य तपासण्यांचा समावेश होतो. ते पुढील प्रमाणे- जाणीव जागृती सत्रे–                                               आरोग्य तपासण्या १, मासिक पाळी संदर्भात माहिती                        १. डोळे तपासणी २. स्त्री आरोग्यविषयक माहिती                             २. गर्भाशयाचा कर्करोग तपासणी  ३. जंत संसर्ग व निर्मुलन                                 ३. गरोदर माता तपासणी ४. सकस आहार                                ४. दात तपासणी ५. तंबाखू मुक्ती                                       ५. हिमोग्लोबिन तपासणी ६. मानसिक आरोग्य                                     ६. बाल आरोग्य तपासणी व लसीकरण ७. ओळख स्पर्शाची जानेवारी २०१९ ते मार्च २०२० या कालावधीत स्त्री आरोग्यातील महत्वाच्या विषयांची अशी एकूण ३६६ जाणीवजागृती सत्रे घेण्यात आली व ८५०४ लोकांना याचा प्रत्यक्ष फायदा झाला. चालू वर्षामध्ये वेल्हे तालुक्यातील ८० गावांमधील लोकांसाठी हा प्रकल्प चालू आहे. Stree Shakti Prabodhan (Rural)-

आरोग्य सखी Read More »

मागे वळून बघताना: ३०   एवढ्यासाठी केला होता अट्टहास…. !

 आजचा भाग लेखमाळेतील शेवटचा भाग ग्रामीण महिलांसाठी काम करताना सतत हे जाणवायचे की ‘कोणीतरी बाहेरून’ येऊन काम केले की कल्पना म्हणणून समजायला सोपे असते पण रुजण्याच्या दृष्टीने ते काम उपरेच रहाते! जेव्हा असे काम व्हावे असे स्थानिक महिलेला वाटते तेव्हाच ते टिकणारे होते असे आपण मागच्या भागातही पाहिले .. असेच हे मंगलचे मनोगत!       मंगल तोरण्याच्या पाठीमागच्या भागात म्हणजे पासली भागात लहानाची मोठी झाली, तिच्याच गावात शाळा होती तिथेच १० वी पर्यन्त शिकली, ११ वी पुढच्या शिक्षणासाठी निवासामुळे आपल्या संपर्कात आली आणि तीने सगळे काम ‘ती’च्या नजरेतून अनुभवले,. वाचूया तिच्याच शब्दांत! ग्रामीण भागातील गरजू मुलींच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून वेल्हे येथे जास्वंद गिरीकन्या सहनिवास सुरु केले आणि त्यामुळे माझ्यासारख्या अनेक मुलींना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी लागणारे मुलभूत शिक्षण घेता आले. खरंतर शिकत राहण्याची प्रक्रिया निवासात राहायला आल्याने सुरु झाली आणि वेगवेगळ्या प्रकल्पाच्या माध्यमातून नवीन विषयांपर्यंत पोहचण्याची संधी निवासातील अनेक युवती घेऊ शकल्या. बऱ्याच मुलींना स्वतःच्या खर्चासाठी लागणारी रक्कम आता पालकांकडे न मागता स्वतः ती कमावण्याची भावना निवासात एकत्र राहिल्याने निर्माण झाली. आणि त्यातूनच कॉलेज करता करता कमवा आणि शिका या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकल्पांमध्ये काम करून स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्याची हिम्मत मिळाली.        निवासात राहत असल्यामुळे निवासातील ताई या अनेक गावांमध्ये/शाळांमध्ये वेगवेगळ्या विषयांवर काम करत आहेत याची आम्हाला कल्पना होती. त्यामुळे वेळ असेल तेव्हा ताईसोबत किशोरी, युवती विकास तासिका कशी घेतात हे पाहायला जायचो आणि त्यातूनच मग आम्हीही प्रशिक्षण घेऊन तायांच्या मदतीने किशोरी, युवती, कातकरी या प्रकल्पांमध्ये काम करू लागतो. त्यामुळे मुलांना व्यक्तिमत्त्व विकासाचे महत्व पटवून देता देता आम्ही आमचा आत्मविश्वास वाढवू शकलो. व त्यासोबतच अनेक प्रकारची विविध कौशल्य शिकलो. निवासात असल्यामुळे आम्हाला वेगवेगळ्या प्रसंगांचा अनुभव दिला जायचा त्यातील एक अनुभव मला नक्की सांगावासा वाटतो. तो म्हणजे माझ्या बारावीच्या परीक्षेचा निकाल लागला त्याच्या दुसऱ्या दिवशीच मला सुवर्णाताईंनी सांगितले कि साताऱ्याला जायचे आणि तेथे असलेल्या BSW (Bachelor of Social Work ) कोर्सची माहिती एकटीने जाऊन घेऊन यायची. त्यासोबत अट अशी होती की मोबाईल सोबत न्यायचा नाही. असं सांगितल्यावर मी थोडी गोंधळून गेले. कारण साताऱ्याला कसं आणि कुठून जायचे? किती दूर आहे हेही माहित नव्हते आणि त्यात मी एकटीने प्रवास करणे हा माझ्यासाठी पहिलाच अनुभव होता. पण धाडस करून मी साताऱ्याला जावून माहिती घेऊन आले आणि त्यामुळे मी एकटी प्रवास करू शकते असा विश्वास निर्माण झाला. अशाप्रकारच्या वेगवेगळ्या संधींमधून एकटीने प्रवास करणे, आपले गाव सोडून इतर गावांमधील मुलांना शिकवणे त्यांचे मेळावे घेणे, बँक/ शासकीय कामे स्वतःची स्वतः करणे, मुलींच्या सहली घेऊन जाणे, गणेशोत्सवात ढोल वाजवणे अशा अनेक संधींचा लाभ घेण्यासाठीचे व्यासपीठ मिळाल्याने आम्ही चौकटी बाहेरचा विचार करायला शिकलो. आपल्यासोबत इतरांचाही विचार करायचा असतो हे समजले.       खरंतर निवास सुरु होण्यासाठी बचत गटातील ताईंनी मांडलेल्या प्रस्तावामुळे निवास सुरु झाले. आणि निवासामुळे आमचे पालक हे बचत गटाच्या कामात जोडले गेले. तसेच प्रत्येक गावामध्ये गटाचे काम सुरु होऊन गावात स्थानिक पातळीवर काम करणारी कार्यकर्ती तयार झाल्याने गावाचे चित्र बदलत आहे हे दिसत आहे. म्हणजे माझ्या गावात जेव्हा बचत गट सुरु केला तेव्हा सुरुवातीला महिलांचा सहभाग कमी होता परंतु हळूहळू महिलांचा सहभाग वाढत गेला आणि आता महिला कर्ज घेऊ लागल्या आहेत, मुलींना उच्च शिक्षण घेण्यास पाठींबा देत आहेत, वेगवेगळे उद्योग/ व्यवसाय करू लागल्या आहेत.   त्यामुळे तिचे तीच्या कुटुंबातील स्थान वाढत आहे. मी ज्या भागात राहते ज्याला पासली खोरे असे म्हटले जाते जेथे अजून बऱ्याच गावांमध्ये पायाभूत सुविधा पोहोचल्या नाहीत अश्या भागात आपली प्रबोधिका पोहचल्याने गावात शिक्षण, आरोग्य, आणि आर्थिक साक्षरता नांदू लागली आहे. अनेक महिला या त्यांच्या सुना लेकींना आता घरी बाळंतपण न करता दवाखान्यातच करूया या विचारापर्यंत पोहचल्या आहेत हे सर्व वेगवेगळ्या बैठकींच्या माध्यमातून गरोदर माता तपासणीची माहिती मिळाल्याने शक्य झाले आहे. आरोग्य सखी प्रकल्पाच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयाची जाणीवजागृती करण्याचे काम केले त्यात शाळेतील मुलांसाठी Good Touch Bad Touch या विषयाचे सत्र घेतल्यानंतर अनेक मुलांनी मनमोकळेपणाने त्यांचे अनुभव सांगितले त्यामुळे ग्रामीण भागातील मुलांपर्यंत असे विषय पोहचवले पाहिजेत ही बाब या प्रकल्पातून लक्षात आली. यातूनच गावांमध्ये दलाचे काम सुरु झाल्याने पारंपारिक खेळांची जपणूक करून गटाने एकत्र मुले आता मैदानावर खेळू लागली आहेत. पालकांचा मुलांकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे त्यांना असलेल्या वाईट सवयी, शिस्त दलाच्या माध्यमातून सुधारण्यासाठी काम करत राहण्याची उर्जा मिळत आहे. बऱ्याचदा पालक सांगतात कि ताई मुल आमच जितकं ऐकत नाहीत तेवढ दल घेणाऱ्या ताईचे ऐकतात, गावात कधी न साजरे केले जाणारे सण आत्ता दलामुळे साजरे होतात हे ऐकल्यावर आपण योग्य दिशेने जात आहोत असे वाटते. संस्थेच्या माध्यमातून मला माझ्या भागातील मुलांसाठी, लोकांसाठी काम करण्याची संधी मिळत असल्याने अजून काम करण्याची उर्जा टिकून राहण्यास मदत होत आहे.    सुवर्णा गोखले, ज्ञान प्रबोधिनी स्त्री शक्ती प्रबोधन (त्रिदशकपूर्ती लेखन) ९८८१९३७२०६

मागे वळून बघताना: ३०   एवढ्यासाठी केला होता अट्टहास…. ! Read More »

मागे वळून बघताना: २९ स्त्री शक्ती प्रबोधन सर्व वयोगटांसाठी !

बचत गटाच्या कामाने जेव्हा ग्रामीण स्त्री शक्तीच्या कामाला सुरुवात झाली तेव्हा साधारण ३५-४० वयाच्या महिला बचत गटात यायच्या. त्यांचे सरासरी शिक्षण ४थी पर्यंत झालेले असायचे .. सरासरी म्हंटले आहे म्हणजे ४थी पेक्षा कमी शिक्षण असणाऱ्या, शाळाही न पाहिलेल्याही असायच्या. जसजसे काम सुरू झाले तेव्हा शिक्षणाचे महत्व समजायला लागले. आधी महिला विचारायच्या, ‘शिकायचे कशासाठी? शेवटी भाकरीच तर करायची आहे ना?’ पण बचत गटमुळे समाजात वावरायला सुरुवात झाली तेव्हा कमी शिक्षणाने येणारा न्यूनगंड उठून दिसायचा.. अनुभवांनी महिलेला जसजसे शहाणपण येत गेले तसतशी ‘ती’ची शिकायची उर्मी वाढली .. थोडेसे वाचता येत होते त्या काहीतरी नियमित वाचायला लागल्या, आपल्या पोरी शाळेत जात आहेत ना? त्यावर लक्ष ठेवायला लागल्या. त्याकाळात प्रत्येक कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद असायचा. महिन्याच्या बैठकीला वर्षभरात एकही दांडी मारली नाही अशा अनेक असायच्या! पुस्तका पलीकडच्या शिक्षणाची त्यांना भूक होती, प्रबोधिनीच्या बचत गटांमुळे घराबाहेर पडायला मिळणे एवढा एकच विरंगुळा अनेकींच्या आयुष्यात होता…पण २-३ वर्षांतच तिच्या लक्षात यायला लागले की मोठ्या वयात शिकायला मर्यादा आहेत, तेव्हा अनेकींनी ८ वी- ९ वीत असणाऱ्या मुलींची हिशोब ठेवायला मदत घेतली. मग या नव्या दमाच्या खेळाडूंनी मनापासून कामाला मदत केली. अशी स्वेछेने नियमित मदत करण्यामुळे या छोट्या मुलींचाही आत्मविश्वास वाढला, मग तीला पुढे शिकावेसे वाटायला लागले. तेव्हा आपण या वयोगटांसाठी किशोरी विकास सुरू केला. अनेक किशोरींच्या ताई शिक्षणात रस नसल्याने शाळा सोडून घरीच होत्या आणि तेव्हा आत्तासारखे सदासर्वकाळ चालू असणारे रंगीत टि व्ही घरोघरी पोचले नव्हते, मग आपण युवतींसाठी कौशल्य प्रशिक्षण वर्ग सुरू केले, नर्सिंग, शिवण, पार्लर असे वर्ग सुरू केले. असे काही काही शिकून ज्यांनी लग्नापूर्वी नोकरी करून पैसे मिळवले, त्यांचे भविष्य बदलून गेले. युवती विकास उपक्रमातून अशी छोटी छोटी यशस्वी उदाहरणे गावागावात दिसायला लागली. मग मात्र गावातले वातावरण सुद्धा बदलले …. या युवतींच्या वर्गांसाठी प्रवास सुरक्षित व्हावा म्हणून गावागावांतून युवतींना आणायची-पोचवायची व्यवस्था केली, त्यानिमित्ताने आपला गावोगावचा संचार वाढला. आपले काम पारावरच्या पुरुष मंडळींसाठीही दाखलपात्र झाले. त्यामुळे महिलांना बैठकीला/ कार्यक्रमांना परवानगी काढणे सोपे होऊ लागले. आपण एवढी वर्ष युवतीसाठी काम करत असलो तरी आपल्यानावाने ‘भलतेच शिकून’, पळून गेलेली एकही युवती नाही अशी घटना नाही.. आपला शिक्षण विचार गावकऱ्यांना असाही समजतो! कामाच्या साधारण १५वर्षांच्या टप्प्यावर आपलेही बळ वाढले, कामाची गावे ७-८ वरून २५-३० पर्यंत पोचली. बचत गटांसोबत आरोग्याचे काम सुरू केले, महिलांना स्वयंरोजगार प्रशिक्षण देणे, त्यांनी उत्पादन केलेल्या मालाची विक्री करणे असे केले, नाबार्ड सोबत काम करून महिलांना बँकेपर्यंत पोचवले. आपणच बँक व्हायचे नाही आपले काम जनजागृती व लोकशिक्षण करायचे हे सगळ्या गटाला स्पष्ट होते. त्यामुळे लोकांना बँकेबद्दल शहाणे करायच्या कार्यक्रमात आपण सहभाग घेतला व रिजर्व्ह बँकेच्या कॉलेज सोबत आर्थिक साक्षरता विषयात महत्वाचा टप्पा गाठला! शिवापूर केंद्रात सुरू झालेले काम १० वर्षात एका टप्प्याला पोचले, तोच टप्पा अनुभवांमुळे वेल्हयाच्या कामाला ५ वर्षांतच आला, त्यांचे सूत्र लक्षात आल्यामुळे ३ वर्षात आंबवण्याला गट उभा राहिला.. जमले! द्विदशक पूर्ती झाल्यावर मात्र रोजच्या कामातले मनुष्यबळासाठी पुण्यावरचे अवलंबूनत्व जवळ जवळ संपले! तोपर्यन्त कामाला हाताशी आलेल्या युवतींना ‘मागणी’ येऊन त्या पुण्यात संसारी जात होत्या असे लक्षात आले मग सासूबाईच्या भरवशावर ‘भागात आलेल्या सूनांसाठी हिरकणी सुरु केले. त्या उपक्रमाची दशकपूर्ती झाली.. १० वर्षात ८२ गावातल्या ९८२ जणींपर्यंत पोचलो तर अकराव्या एका वर्षात २७ ठिकाणच्या ४६० जणींपर्यंत पोचलो.. मग त्याला नवी उमेद जोडले! या निमित्ताने नवमातेची सासरी गेल्यामुळे बदलावी लागणारी कागदपत्रे या वर काम सुरू झाले ते सुद्धा ‘ती’ने कागदोपत्री अस्तित्वात येण्यासाठी! आत्मविश्वासाची सुरुवातच अस्तित्वात येण्यापासून होते म्हणून.. काम जसजसे वाढत गेले तसतसे ‘ग्रामीण महिला’ हा गट सुद्धा एकसंध नाही, त्यात अनेक गट येतात जसे एकल, किशोरी, युवती, ज्येष्ठ महिला असे.. आणि त्या त्या गटांना त्यांचे त्यांचे दुर्लक्षित प्रश्न आहेत असे लक्षात आल्यावर आपण त्या त्या प्रश्नावर कामाला सुरुवात केली. सगळ्यात ज्येष्ठ महिलांचा वयोगट आपण पहिल्यांदा हाताळला तो मोतीबिंदूच्या ऑपरेशन निमित्ताने. आयुष्यभर घरासाठी खस्ता खाणारीच्या डोळ्यांचे जेव्हा फुकट ऑपरेशन होणार असते त्याला नेण्यासाठी घरच्यांना वेळ नसतो.. या वास्तव दर्शनाने काम सुरू केले, मग गर्भाशयासंबंधी उतार वयातल्या तक्रारी तर सांगायच्या कोणाला? असे प्रश्न ऐकून त्याची मासिक तपासणी सुरू केली, आपत्य सांभाळत नाही अशांना श्रावणबाळ निराधार योजनेचे लाभार्थी होण्यास मदत केली. या सगळ्या संपर्काचा उपयोग करोना काळात आधी ज्येष्ठ नागरिकांना केलेल्या लासिकरणात झाला. आपल्या कार्यकर्त्यांनी ज्येष्ठ नागरिकांचे १००% लसीकरण करून बक्षीस मिळवले कारण एरवीही त्या संपर्कात होत्या!तर गरोदरपणाची आरोग्य तपासणी गेली १८-१९ वर्ष दरमहा अखंडपणे चालू आहे. कोणी सोनोग्राफी करून ‘मुलगी आहे’ म्हणून ‘ती’च्या जन्माचा कोणताही निर्णय बदलू नका हे तर सांगतो आहोतच आपले बाळ सुरक्षित जन्मले पाहिजे, बाळ-बाळंतीण सुखरूप हवीत म्हणून गरोदरपणात औषधे घेतली पाहिजेत पासून आपले काम सुरू होते, म्हणजे मुलीचाही गर्भ जगावा हा आरंभ बिंदू !मुलीचा गर्भ जगावा असे ‘ती’ ने अस्तित्वात येण्याच्या उपक्रमाने सुरू होणारा स्त्री शक्ती प्रबोधनाचा प्रवास पुढे हिरकणी मातेने ०-६ वयोगटातील मुला-मुलींवर समानतेचे संस्कार करावेत मग ७-१२ या वयोगटात त्यांची गावोगावी खेळाची दले चालतील, मग किशोर-किशोरी विकास, मग युवती विकास, लग्नानंतर हिरकणी- नवी उमेद, बचत गट-स्वयंरोजगार तर आहेतच, नंतरच्या टप्प्यात गाव प्रतिनिधींत्व करायला नेतृत्व विकास, आणि ज्येष्ठ महिलांसाठी आरोग्य! या टप्प्यावर पोचतो. ग्रामीण महिलेच्या कुठल्याही वयोगटासाठी त्या त्या वयाला साजेशा उपक्रमाची साखळी आपण तयार केली, ती केवळ ‘ती’चा आत्मसन्मान वाढावा तिला माणूस म्हणून सन्मानाने जागता यावे म्हणून! आता त्रिदशकपूर्तीच्या या टप्प्यावर आपले काम भोर-वेल्हे-हवेली तालुक्याच्या ८२ गावात साधारण ६७००० लोकवस्ती पर्यन्त पोचले आहे! आता या कामाची धुरा स्त्री शक्ती प्रबोधनाच्या उपक्रमातून तयार झालेल्या कार्यकर्त्या, रूढार्थाने म्हणायचे तर आधी ज्या ‘लाभार्थी’ होत्या त्याच जबाबदारी घेऊन सांभाळत आहेत. जेव्हा स्थानिक कार्यकर्त्या त्यांनी अनुभवलेल्या प्रश्नावर काम करतात तेव्हा त्यांची कार्यपद्धती व परिनामकारकता वेगळीच असते .. काल जिच्यासाठी ‘एकल’ आहे म्हणून काम केले, तीच जेव्हा अन्य एकल महिलांसाठी काम करते तेव्हा तीला भाषण करता येते का? बोलताना प्रस्तावना-समारोप नीट करता येतो का? निवेदन करता येते का? हे अगदीच गौण होते.. जीच्यासाठी ती कामाला उभी राहिली ‘ती’ला उपयोगी पडणारे, नेमके, ‘ती’च्या आयुष्याला कलाटणी देणारे काम होते ना? एवढेच महत्वाचे उरते.. असे झाले की एखाद्या गावातल्या लग्नातच रक्त तपासणी जेवण्याआधी- नंतर करता येते.. तर गावच्या वरमाईला सुचते की आहेराच्या देण्या-घेण्याच्या एकसारख्या साड्या देऊन गावातल्या गटातल्या महिलांचा गणवेश करूया.. असे ‘बाहेरून येणाऱ्या माणसाला कधीच सुचणार नाही’ अशी कामात सहजता येते! त्यामुळे काम चालू रहाणार का अशी शंका सुद्धा मनात येत नाही! सुवर्णा गोखले, ज्ञान प्रबोधिनी स्त्री शक्ती प्रबोधन (त्रिदशकपूर्ती लेखन) ९८८१९३७२०६

मागे वळून बघताना: २९ स्त्री शक्ती प्रबोधन सर्व वयोगटांसाठी ! Read More »

मागे वळून बघताना२८: काही अनौपचारिक शिक्षण!

समाजात वावरायला लागणारे ज्ञान किंवा माहिती ग्रामीण महिलेला सहज उपलब्ध नसते. त्यामुळे स्वतःकडे कायमच दुय्यमत्व घेतले जाते. ‘ती’नेच स्वतःला दुय्यम ठरवले की इतरांकडूनही तशीच वागणूक मिळणे वावगे ठरत नाही. किमान माहिती कशी मिळवायची हे सुद्धा माहित नसते. त्यामुळे लहान मोठ्ठा निर्णय करायला जो आत्मविश्वास लागतो तो नसतो. निर्णय करायच्या विषयात ‘मी या विषयात माहितगार आहे!’ किंवा या विषयातले ‘मला कळते!’ असा जर स्वसंवाद झाला तर आत्मविश्वास येतो. ‘मला माहिती मिळवण्याचा मार्ग माहिती आहे!’ अशा जाणिवेतून सुद्धा ग्रामीण महिलांची स्वतःकडे बघण्याची दृष्टी बदलली आहे. जिची स्वतःकडे बघायची दृष्टी बदलली आहे ‘ती’ची समाजात दाखल घेतली जाते. त्यामुळे जर महिलेचा आत्मविश्वास वाढायला हवा असेल तर विविध प्रकारची योग्य माहिती उपलब्ध करण्याच्या सुरक्षित रचना उभ्या केल्या पाहिजेत ज्या अनौपचारिक शिक्षण देत राहातील; असे या ३० वर्षांचे फलित आहे असे लक्षात आले.‘मला ‘मुलीला’ शिकवायचे आहे, मुलीचे आयुष्य बदलायचे आहे, माझ्यासारखे तिने भरडले जायला नको!’ असे वाटणाऱ्या खूप आया असतात पण त्या स्वतः कधी शाळेत गेलेल्या नसतात किंवा उच्च शिक्षित नसतात त्यामुळे ‘मुलीचे शिक्षण!’ या वियशयावर त्या निर्णय करायला धजावत नाहीत .. पण मुलगी कुठे कुठे शिकू शकते, जवळ/ परवडणारी कॉलेज कुठली आहेत, कुठल्या अभ्यासक्रमाला साधारण किती शुल्क असते असे कळले की मग मुलीच्या शिक्षणाचे सर्व निर्णय गरज पडली तर कर्ज काढून शिकवायचा निर्णयाही ‘आई’ करू शकते!आरोग्याचेही तसेच आहे. दवाखान्यात गेले तरी समोर बसलेल्या डॉक्टरला स्वतःच्या आजारपणाची सर्व लक्षणे सांगितली तरी औषध घेण्यापूर्वी ‘मला काय झाले आहे?’ असे विचारण्याची हिम्मत होत नाही, अशी हिम्मत येण्यासाठी कधीतरी दवाखान्यात आजारी नसताना कोणासोबत तरी गेले पाहिजे, हॉस्पिटलमध्ये सुद्धा गेले पाहिजे, कुठल्या तपासण्या कशासाठी करतात ते माहिती करून घेतले पाहिजे ‘सगळेच आरोग्य महाग नसते!’ असे समजले की गावातली जाणकार म्हणून गावातल्या २-४ जणांना दवाखान्यात नेण्याची जबाबदारी तिच्यावर आपसूकच येते.. यालाच म्हणायचे तिची सामाजिक प्रतिष्ठा वाढली …. कारण कालपर्यन्त ‘तुला काय कळतंय’ असे तिने ऐकले, अनुभवले असते .. थोड्याशा माहिती घेण्याने तिची घेतली जाणारी दाखल बदलते.. पहिल्या टप्प्याला एवढेही पुरते!बचत गट दर महिन्याला घेऊन, नियमित व्यवहार करणाऱ्या महिला, जमा झालेली रक्कम मोजताना नोटा चोख मोजत आहेतच पण भराभरा मोजत आहेत असे गावातल्या पुरुषांनी नोट बंदीच्या कामांमध्ये पाहिले. गावातल्या ताईचे बँकेत जाणे येणे असल्याने तिच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांची कामे गावातच झाली असेही चित्र गावागावात होते.. त्यानेही आर्थिक बाबतीत महिलांना ‘कळते’ अशी गावात सार्वत्रिक पावती मिळाली.. एका दादाने तर मला सांगितले, ‘गावच्या अण्णासाहेबापेक्षा आमची बायडी शहाणी झाली! आता तिलाच सरपंच केले पाहिजे!’ लगेच ती सरपंच होईल असे नाही पण तिच्याबद्दलचे बदललेले मत मांडण्याचा कौतुकाचा तो प्रकार आहे.ग्रामीण महिलांच्या तालुक्याच्या शासकीय कार्यालयात काढलेल्या सहली असतील किंवा कार्यकर्त्यां सोबत त्यांनी व्यक्तीगत दिलेल्या भेटी असतील, त्यामुळे कुठले काम करणारे शासकीय कार्यालय कुठे आहे? अशी माहिती होते. बाजाराच्या दिवशी साधारणतः सगळे अधिकारी भेटलात, वेगवेगळी कार्यालयात वेगवेगळी कामे होतात. चालू योजनांचे बॅनर बहुतेक कार्यालयात लावलेले असतात. पुरुष पुढाऱ्यांनाही अशा मुळेच योजनांची माहिती होते. अशा किरकोळ माहितीने सुद्धा ग्रामीण महिला समृद्ध होते. त्यातून तीला व्यावहारीक शहाणपण येते. मग ‘पुढारी आपली कामे करायला असतात!’ असाही काहींना साक्षात्कार होतो.. मग मात्र राजकीय पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात ‘ती’ यायला लागते. केवळ महिला म्हणून मिळणारी संधी या टप्प्यानंतर ‘ती’ला गरजेची वाटत नाही एवढी ‘ती’ची भीड चेपते.ज्ञान प्रबोधिनीच्या स्त्री शक्ती प्रबोधन विभागाने इतक्या विविध विषयावर काम केले त्याचे कारण एकच होते.. काम केलेला प्रत्येक विषय ग्रामीण महिलेच्या प्रबोधनाचे ‘माध्यम’ होता. प्रत्येक माध्यमातून ‘ती’चा स्वतःवरचा विश्वास दुणावला, त्या त्या विषयात ‘ती’ला गावात सन्मान मिळाला. यामुळे घरातले तिचे स्थान बदलले, तिची घरात दाखल घेतली जायला लागली, घरातल्या /गावातल्या निर्णयाचे कर्तेपण सुद्धा तिच्याकडे येण्याची रचना बसली असे या कामाचे स्वरूप होते. प्रत्येक गावातली, घरातली परिस्थिती वेगळी होती त्यामुळे याची छोटी मोठी दिशादर्शक / पथदर्शक उदाहरणे तयार करणे असे काम या काळात झाले.एखादी नवीन गोष्ट म्हणजे ज्याची कल्पनाच कोणी केली नाही अशा कामाला सुरुवात करायची तर पहिल्या टप्प्याला कोणीतरी आधार देणारे लागते .. खरी माहिती देणारे लागते .. काम करताना पडेलच असे नाही पण पडले तर सावरायला कोणीतरी लागते. ‘मैं हू ना.. ‘ असा भरवसा देणारे लागते.कामाच्या त्रिदशकपूर्तीच्या टप्प्यावर असे म्हणावेसे वाटते की या सगळ्या प्रयत्नातून १५०-२०० जणी तरी अशा जाग्या झाल्या, स्वतः पुरत्या नाही तर इतरांनाही आधार देणाऱ्या तयार झाल्या. यातल्या प्रत्येकीच्या आयुष्यात ‘ती’ने कल्पनाही केली नव्हती असे स्वतः करून दाखवले! कधी आरोग्यासाठी ठाम उभी राहीली तर कधी बँकेची कामे लीलया केली, कोणी मुलीचे आयुष्य बदलले तर कोणी गावचे नेतृत्व ‘स्वच्छ’ असू शकते असे दाखवून दिले. अशा कायमच घेतलेल्या कर्ते पणानेही दमायला होते.. पण अशा आयुष्याच्या टप्प्यावर, आत्मविश्वास वाढल्यावर जर ती एखाद्या संधीला ‘नको’ म्हणाली तर ‘ती’चा नकार जमत नाही म्हणून नसतो तर त्या संधी सोबत येणारी जबाबदारी समजून ती जबाबदारी निभावायची तीची आता तयारी नाही म्हणून तिला खरंच ‘नकोय’ .. आता प्रश्न क्षमतेचा नाही .. ही भूमिका आपणही समजून घेऊ शकतो.अशी एखादी प्रबोधिका गावात असली, जरी रोजच्या कामात नसली तरी ‘गरज पडल्यावर’ ‘ती’चाच आधार पुढच्या पिढीला असतो हे पुन्हा पुन्हा दिसून येते. त्यामुळे वेल्हयात निवास काढला तर उरावर दगड ठेऊन पोरीच्या उज्ज्वल भविष्यासाठी मुलीला निवासात राहायला पाठवणारी पहिली ‘ती’च असते आणि ‘आता माझं ऱ्हाऊ द्या सुनेला शिकवा!’ म्हणणारीही ‘ती’च असते.. आता पुढच्या पिढीसाठी काम या सगळ्या करत आहेत असे नक्की म्हणावेसे वाटते! सुवर्णा गोखले, ज्ञान प्रबोधिनी स्त्री शक्ती प्रबोधन (त्रिदशकपूर्ती लेखन) ९८८१९३७२०६

मागे वळून बघताना२८: काही अनौपचारिक शिक्षण! Read More »

मागे वळून बघताना: २७  काही वेगळे प्रयोग!

ग्रामीण भागात आरोग्याचे काम करताना दूषित पाण्यामुळे होणारे आजार यावर अनेकदा चर्चा व्हायची त्यासाठी काय करावे याचे प्रशिक्षण महिलांना दिले जायचे. कारण पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे अनेकदा बचत गटातून कर्ज घेऊन दवाखाना करावा लागायचा. शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी आपण टाटांनी ज्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहेत असे सुजल फिल्टर दिले. हा फिल्टर म्हणजे स्टीलच्या पिंपाचे झाकट कापून तिथे प्लॅस्टिक भांडे बसवलेले असायचे ज्यांच्या तळाला फिल्टर बेड असायचा. ५-१० नाही तर भागात आपण ३०० पेक्षा जास्त फिल्टर वाटप केले. वेल्ह्यातील वरोती या दुर्गम गावातल्या प्रत्येक घराला सुजल फिल्टर दिला, एवढेच नाही तर फिल्टरचा वापर होत आहे ना हे तपासणारी यंत्रणा बसवली. दुर्दैवाने त्यावर्षीही पावसाळ्यात पूलावरून पाणी गेल्यामुळे अनेक दिवस गाव शासकीय संपर्कात नव्हते तरीही जेव्हा साथीच्या आजाराच्या उपचाराला प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर पूरानंतर पहिल्यांदा गावात पोचले तेव्हा त्यांना दूषित पाण्यामुळे आजारी पडलेला एकही रुग्ण आढळला नाही …. काही बदलाच्या गोष्टी महिलांना नीट समजून सांगितल्या की जमतात!      सुजल फिल्टर उत्पादन: सुजल फिल्टरचा मुख्य भाग म्हणजे फिल्टर बेड! हा बेड भाताचे तूस जाळून तयार होणाराय कोळसा व विविध आकाराच्या वाळू या पासून बनवलेला होता. या गोष्टी स्थानिक पातळीवर उपलब्ध होत्या. वेगवेगळ्या गावातील २ महिला गटांना फिल्टर बेड बनवायला शिकवले त्यानिमित्ताने भांड्याला ड्रिल करण्यापासून सगळी कामे महिला शिकल्या व ३ वर्ष दोन्ही गटांनी मिळून ३००-३५० फिल्टरचे फिल्टर बेड बदलण्यासाठी नवीन फिल्टर बेडचे उत्पादन केले. एखाद्या योजनेतून फिल्टर दिल्यावर वापरल्यामुळे बेड साधारण ८-९ महिन्याने बदलावा लागायचा, तो फिल्टर बेड या प्रशिक्षित २ बचत गटातील महिलांनी बनवले. आणि गावकऱ्यांनी पैसे देऊन विकत घेतले. त्यानंतर साधारण त्याच किमतीत मिळणारा फिल्टर सारखा दिसणारा, व्यावसायिक तत्वावर उत्पादन केलेला ‘स्वछ’ फिल्टर टाटांनी बाजारात आणल्यावर आपण उत्पादन थांबवले …. तो पर्यन्त ‘शुद्ध’ पाण्याचे आरोग्याच्या दृष्टीकोनातून असणारे महत्व महिलांपर्यंत पोचले होते.      असाच दुसरा एक प्रयोग: ज्येष्ठ नागरीकांसाठी केलेले काम: वेल्हे तालुका अविकसित! म्हणजे काय तर तर नवीन पिढी गावात राहायला तयार नाही. बरीच गावे अशी आहेत की ज्यात ज्येष्ठ नागरिकांची संख्या राहात्या लोकसंखेच्या ७५%-८०% किंवा त्याही पेक्षा जास्त आहे. ‘रहात्या’ असा वेगळा उल्लेख केला कारण ही नोंद शासकीय आकडेवारीत कधीही येत नाही. गावची लोकसंख्या म्हणजे रेशन मिळणारी किंवा मतदानासाठीची लोकसंख्या असते. अशी ज्येष्ठांची संख्या गावात जास्त असल्यामुळे काही प्रश्नांना मिळणारी कलाटणीच वेगळी असते. एका गावात ज्येष्ठ माहिलांचे प्रश्न काय आहेत ही समजून घेण्यासाठी बैठक घेतली तर पुरुष सुद्धा जमा झाले. आमचेही ऐकून घ्या असा आग्रह धरला. त्यात मुंबईहून नोकरी करून रिटायर्ड होऊन गावाकडे आलेला एक जण सांगत होता. स्वकमाईने हौसेनी गावाकडे बंगला बांधून राहायला आलो कारण गाव सोडले तेव्हाच ठरवले होते तसा तर माझ्या बरोबरीचे गावात कोणीच नाही! मी साठी उलटलेला. मग चर्चा सुरू झाली गावात त्याचे चुळते/ चुलत्या शेजारी सगळे आधीच्या पिढीचे फक्त रहात होते. हा राहायला आल्यामुळे त्यांच्या मुलांची सोय झाली कारण यांची शहरातली पोरे त्यांनाच फोन करायची, त्यांच्या आई वडिलांची चौकशी करायला.. कारण सत्तरी-पंच्याहत्तरी उलटलेल्या गावातल्या माणसाला मोबाईल कसा वापरायचा हे कसे शिकवणार? काहींना तर ऐकू सुद्धा येत नाही, काहींना नीट दिसत नाहीत…. तो संगत होता.. एखाद्याला काही झाले म्हणून उचलायची वेळ आली तर मला एकट्याला या वयात कसे जमणार?.. गाडीत घालून न्यायचे ठरवले तर गाडीवाल्याला फोन करताना तो आधीच सांगायचा २ पोरं मदतीला घेऊन ये.. इतकी गंभीर परिस्थिती. एखाद्याला शेवटचा खांदा द्यायची वेळ आली तर कधी कधी ४ जण जमायची वाट पहावी लागेल.. शासनाने महिन्याला १२०० रुपये दिले तरी पैसे खाता येत नाही त्यासाठी म्हातारीलाच राबावे लागते. बैठकीत चर्चा झालेल्या गावाच्या भाषेत बोलायचे झाले तर म्हातारी आधी देवाघरी गेली तर म्हाताऱ्याचे करणार कोण? मग म्हाताराही लगेचच जातो कारण एकट्याला त्याला राहाताच येत नाही. …. कधी कधी थकलेल्या म्हातारीला हळूहळू काम करताना बघवत नाही. गावामध्ये हॉटेल नाही.. गावात ‘बनवलेले ताजे अन्न’ पैसे असले तरी विकत मिळत नाही! असेच कोणी कधी जेऊ घालेल तर.. पण पैसे घेऊन नाही. असे कधीच विचारही न केलेले सगळे प्रश्न समजले.    गावातली ज्येष्ठ नागरिक महिला घरी स्वयंपाक करणार म्हणजे पारंपारिक चुलीवर स्वयंपाक करणार.. त्यासाठी लाकडे आणणार.. अनेक गावात नळपाणी पुरवठा नाही मग लांबून उचलता येईल असे थोडे थोडे पाणी आणणार .. कितीही वय झाले तरी यातून ‘ती’ची सुटका नाही! एवढाच प्रश्न वाटत होता पान चर्चे नंतर प्रश्नाचे वेगळेच गांभीर्य लक्षात आले.   बैठकीनंतर एक उपाय म्हणून एका गावात प्रयोग करायचा ठरवला. सगळ्या ज्येष्ठ नागरिकांची पुन्हा एकदा बैठक घेतली व त्यांना सांगितले की एकांना ‘अन्नदान’ करायचे होते म्हणून त्यांनी संस्थेला काही देणगी दिली आहे तर त्यातून संस्थेने ज्येष्ठ नागरिकांची २ महीने एकत्र जेवायची व्यवस्था करायची ठरवली आहे. उपयोगी वाटले तर चालू ठेऊ! मनात होते वेगळा वृद्धाश्रम काढण्यापेक्षा ज्येष्ठ नागरिकांचा प्रश्न जरा वेगळ्या प्रकारे हाताळून बघू. त्या निमित्ताने सगळ्या ज्येष्ठ नागरिकांचे एकत्र येणे होईल, सगळ्यांची आपोआप हजेरी घेतली जाईल, कोणी आजारी नाही ना ते रोजचे रोज तपासले जाईल, औषध घेणारे औषध घेतात ना? असे तपासले जाईल .. असेही काही मनात होतेच! या प्रयोगामुळे गावातलीच गरजू महिला सगळ्यांचा स्वयंपाक एकत्र करेल. त्यासाठीच्या लाकडाची व्यवस्थाही करेल आणि जेवणानंतर भांडीही धुवेल त्याच्यासाठी प्यायचे पाणीही भरेल. तिलाही गावातच रोजगार मिळेल! ज्या गावात प्रयोग केला त्या छोट्याशा गावात २२ ज्येष्ठ नागरिक होते. पहिल्या दिवशी १० आले. त्यांचा अनुभव म्हणजे स्वयंपाकाची चव काय होती, कुठला तांदूळ वापरला असे बघून हळूहळू संख्या वाढली सर्वच्या सर्व २२ जण यायला लागले .. आणि एक दिवस एकदम संख्या कमी झाली कारण काय तर या आनंदी ज्येष्ठांनी या योजनेची माहिती शहरातल्या मुलाला दिली. आणि तो म्हणाला ‘मी काय जेवण देऊ शकत नाही का?’ बास याचे येणे बंद! गावात साधे २ माणसांचे जेवण करायचे तरी त्यासाठी लाकूड आणण्यापासून भांडी घासे पर्यन्तची सर्व कामे ‘थकलेल्या बाईने’ करायची.. कारण ती कामे तिने आयुष्यभर केली आहेत! मुलगा महिन्यातून एकदाही गावाकडे येईल असे नाही पण ‘नाही’ म्हणायचं अधिकार पालकांनी त्याला दिला आहे! अशी प्रतिक्रिया एकाच गावात आली असे नाही तर आपण ३-४ गावात हा प्रयोग केला .. सर्व ठिकाणी ज्येष्ठांना असणारी मुलांची दहशत लक्षात आली! आपण प्रयोग थांबवला कारण गावात न राहाणाऱ्या मुलांचे प्रबोधन आधी करायची गरज आहे अशा निष्कर्षावर पोचलो! थांबवायला लागलेल्या या प्रयोगाबद्दल एवढेच म्हणावेसे वाटते की वय वाढल्यामुळे ग्रामीण भागात ज्येष्ठ नागरिकांचे निर्माण होणारे प्रश्न मग आरोग्याचे म्हणजे वेळेवर औषध घेण्याचे असोत किंवा जवळच्या गावाला जाऊन औषध आणायचे असोत, आर्थिकअसोत किंवा एकटेपणाचे असोत, ताकदीने करायच्या कामाचे असोत कुठलेही असोत हे प्रश्न आता कौटुंबिक राहिलेले नाहीत हे आता सामाजिक प्रश्न आहेत असे अजून समाज म्हणून आपण शिकलेलो नाही यांची खंत आहे! सुवर्णा गोखले, ज्ञान प्रबोधिनी स्त्री शक्ती प्रबोधन (त्रिदशकपूर्ती लेखन) ९८८१९३७२०६

मागे वळून बघताना: २७  काही वेगळे प्रयोग! Read More »