स्त्री शक्ती प्रबोधन

त्रिदशकपूर्ती यशोगाथा १७

आशाताई सुर्वे यांचे सासर-माहेर शिवगंगा खोऱ्यातले. मुलगी २ वर्षाची झाल्यावर कामासाठी गरज म्हणून पदवीचे शिक्षण पूर्ण केलं. प्रत्येक बचत गटाचा हिशोब चोखच झाला पाहिजे यासाठी २ तपापेक्षा जास्त काळ त्या प्रबोधिनीचे प्रतिनिधीत्व करत आहेत. औपचारिक शिक्षण जेमतेम झालेल्या महिलांकडून कोट्यवधी रुपयांची उलाढाल करुन घेत आहेत. बचत गटाच्या कामासाठी स्वतः स्कुटर चालवत गावोगावी जाणारी खोऱ्यातील ही […]

त्रिदशकपूर्ती यशोगाथा १७ Read More »

त्रिदशकपूर्ती यशोगाथा १८

ज्ञान प्रबोधिनी स्त्रीशक्ती प्रबोधन विभागाचे ग्रामीण महिलांसाठी स्वयंरोजगार प्रशिक्षणाचे जे काम चालते ते सगळ्यात प्रभावी आणि परिणामकारक आहे… गेली १० वर्ष स्वयंरोजगाराचे काम करणाऱ्या भारतीताई यांनी आधी केले… मग सांगितले! काम करताना स्वतःच उदाहरण झाल्या… यशस्वी उद्योग करुन दाखवला… कर्ज घेऊन चोख फेडून दाखवलं…. अशी ‘कधीतरी’ लाभार्थी असणारी ताई स्वानुभवानंतर तेच काम करायचे ठरवते तेव्हा

त्रिदशकपूर्ती यशोगाथा १८ Read More »

त्रिदशकपूर्ती यशोगाथा १९

गेल्या आठवड्यात शिवापूरला असणाऱ्या राम सीता पुराणिक महिला तंत्रनिकेतनाची क्लिप पाहिली. तिथली प्रमुख स्वाती, गेली १५ वर्ष स्थिर राहून शिवण शिक्षिका म्हणून काम करते आहे. जेव्हा ती शिक्षिका झाली तेव्हा फँशन डिझाईन शिकवणारी शिक्षिकाही शिवापूरत नव्हती. मग प्रशिक्षक प्रशिक्षणापासून आपण सुरुवात केली !! तिने घर/ मुलं सगळं सांभाळून केलं आणि टिकली.. हजारो जणींना तिने कमवते

त्रिदशकपूर्ती यशोगाथा १९ Read More »

त्रिदशकपूर्ती यशोगाथा २०

ही सविता, बचत गटात आली आणि बदलूनच गेली. नियमित बैठकीला आल्यामुळे तिला सामाजिक कामाची संधी मिळाली… गट घेतले, कर्ज वाटप केले.. व्यवहार शिकली, मेळावे घेतले.. बोलायला शिकली, सहलींना गेली… कवाडे उघडली…प्रत्येक संधी तिने घेतली! गावातच राहून बचत गटामुळे तिचं बदलत गेलेलं आयुष्य आता अनेकींना प्रेरणादायी ठरलं आहे! एका उद्योगाच्या व्यवस्थापक गटात सविता आहे, अनेकींची पोषणकर्ती

त्रिदशकपूर्ती यशोगाथा २० Read More »

त्रिदशकपूर्ती यशोगाथा २१

ही विहीर गावची मंगल… ज्ञान प्रबोधिनीची कार्यकर्ती, गावात बचत गटाचं काम केलं. आरोग्यासाठी काम केलं… उपचार म्हणून अनेक महिलांची (गर्भाशयाशी निगडीत) दीनानाथला पूर्ण निःशुल्क ऑपरेशन करायला मदत केली. गावातल्या मुलींच्या शिक्षणाला मदत केली, काही नर्स झाल्या. विश्वास वाढत गेला तसं बँक कर्ज घेतलं त्यातून चिखलणीचा ट्रँकर घेतला.. हे सगळं करताना स्वतःमध्ये कुटुंबामध्ये विधायक बदल झाले…

त्रिदशकपूर्ती यशोगाथा २१ Read More »

त्रिदशकपूर्ती यशोगाथा २२

ही वैशाली.. अधुनिक biomass pellets वर चालणारी चूल तिने स्वतः वापरली. त्याचा फायदा बघून चुलीची प्रचारकच बनली. आज पर्यंत चुलीचे प्रात्यक्षिक दाखवून ३५० चुलींचे वाटप तिने केले… त्याचे इंधन पोच केले, त्यासाठी पाठपुरावा केला… चुलीचे प्रात्यक्षिक दाखवायला गावोगावी फिरली. यातून आत्मविश्वास वाढला, कुटुंबात विधायक बदल तर झालाच… आता गावातली कर्ती बनली!! हाक मारली तर महिला

त्रिदशकपूर्ती यशोगाथा २२ Read More »

त्रिदशकपूर्ती यशोगाथा २३

ही विद्या वेल्ह्यातल्या छोटाशा गावात रहाणारी… बचत गट सुरु केले. बाईला आंघोळीचे पाणी तापवायला सरपण कमी लागावे, धूर कमी व्हावा म्हणून गटाला कर्ज घेऊन त्यातून प्रत्येक सभासदाला बंब घेतला… अनेकींनी त्यावर स्वतःचं नाव घालून घेतलं! मग गटाच्यामुळे विद्याचा विश्वास वाढला, तसे आरोग्याचे काम केले.. रक्त पाहून घाबरणाऱ्या महिलांना हिमोग्लोबीनची माहिती देऊन रक्त तपासायला लावले. मग

त्रिदशकपूर्ती यशोगाथा २३ Read More »