संत्रिका सुवर्ण महोत्सव

संस्थेच्या घटनेतील उद्देश – प्रकट चिंतन ६

प्रस्तावना एखाद्या संस्थेचा संस्थानिर्मिती लेख (मेमोरॅण्डम ऑफ असोसिएशन) आणि तिची नियमावली (रुल्स रेग्युलेशन्स्) मिळून तिची कायदेशीर घटना होते. ज्ञान प्रबोधिनीच्या सदस्यांनी दर पंधरा वर्षांनी आपल्या घटनेचा आमूलाग्र आढावा घेऊन बदलत्या काळानुसार तिच्यात आवश्यक वाटल्यास समूळ बदल करावेत अशी तरतूद ज्ञान प्रबोधिनीच्या नियमावलीत प्रथमपासूनच होती. त्यानुसार नियमावलीत व संस्थानिर्मिती लेखातील उपक्रमांच्या परिच्छेदात वेळोवेळी काही बदल झाले, भर पडली, काही भाग वगळलाही गेला. परंतु १९६२ मध्ये स्थापना झाल्यापासून २०२४ पर्यंत गेल्या ६२ वर्षांमध्ये संस्थानिर्मिती लेखातील संस्थेच्या उद्देशांच्या परिच्छेदात काही बदल झाला नाही. या उद्देशांच्या परिच्छेदातील पहिल्या उप-परिच्छेदातील (परिच्छेद क्र. ३.१ पृष्ठ ७ आणि ४२) पहिलेच वाक्य ‘ज्ञान प्रबोधिनी म्हणजे केवळ पाठ्य पुस्तकांचे शिक्षण देणारी सामान्य प्रतीची शिक्षणसंस्था नव्हे’, असे नकारात्मक भाषेतील आहे. घटना-दुरुस्तीच्या वेळी अनेक वेळा ‘घटनेची सुरुवात नकारात्मक वाक्याने नको’ असा मुद्दा चर्चेत येऊनही ते पहिले वाक्य आजपावेतो बदलले गेले नाही. अनघड वाटांनी जायचे ठरवलेल्या कार्यसंघाला चाकोरीच्या वाटेने जाण्यासाठी आपल्या संघटनेची निर्मिती झालेली नाही याचे जणू काही स्मरण करून देण्यासाठीच वेळोवेळीच्या सदस्यांनी चर्चेनंतरही ते वाक्य तसेच ठेवले. प्रबोधिनीपुरते राष्ट्रघडणीच्या कामातील विधि-निषेध ठरविताना सुरुवात निषेधापासून झाली असली तरी उरलेला पुढचा भाग विधींचा आहे. उद्देशांमधील शेवटचा उपपरिच्छेद (परिच्छेद क्र ३.७ पृष्ठ क्र. ३६ आणि ४४) तर सकारात्मक, कृतिपर, आवाहनात्मक भाषेची एक उत्तुंग उंची गाठतो. प्रबोधिनीच्या घटनेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तिला दोन परिशिष्टे आहेत. त्यापैकी दुसऱ्या परिशिष्टात ‘भारतीय समाजाची धारणा करणारा जो धर्म, त्याची पुनर्संस्थापना करणे हे ज्ञान प्रबोधिनीचे अंतिम ध्येय आहे’, (पृष्ठ ४७) असे म्हटले आहे. त्याला संदर्भउद्देशांच्या या अंतिम उप-परिच्छेदाचा आहे. प्रबोधिनीच्या कामाचे स्वरूप निश्चित करण्यापासून प्रबोधिनीचे अंतिम ध्येय मांडण्यापर्यंत ‘प्रबोधिनी’ या संघटनेची व्याप्ती या सात उप-परिच्छेदांमध्ये आली आहे. पंचेचाळीस वर्षे त्यात बदल करण्याची गरज जाणवली नाही, यात त्या मांडणीची ताकद आहे. संघटनेचा संस्थानिर्मिती लेख बासनात बंद न राहता कार्यकर्त्यांच्या नित्य चिंतनाचा भाग व्हावा असे वाटत होते. मला असे चिंतन अनेक वेळा पर्यायांची निवड करताना उपयोगी पडले आहे. या चिंतनाची दिशा दाखविण्यासाठी फेब्रुवारी २००६ ते जानेवारी २००७ असे वर्षभर प्रत्येक महिन्याला एक या प्रमाणे घटनेतील उद्देशांच्या परिच्छेदावर बारा प्रकट चिंतने लिहिली होती. त्यापैकी एक पूर्णपणे नव्याने लिहून व इतरांमध्ये किरकोळ फेरफार करून ती या पुस्तिकेत संकलित केली आहेत. ही चिंतने विचाराला चालना देणारी व्हावीत असा या संकलनाचा हेतू आहे. हे काही प्रबोधिनीच्या उद्देशांवरचे अधिकृत किंवा एकमेव भाष्य नाही. उलट या प्रमाणेच अनेकांनी आपल्या संघटनेच्या म्हणजे प्रबोधिनीच्या उद्देशांचे चिंतन विविध दिशांनी करावे अशी अपेक्षा आहे. पहिल्या ६२ वर्षांमध्ये जे करावे लागले नाही ते, अंतिम ध्येय आहे तेच ठेवून उद्देशांची पुनर्मांडणी करण्याचे काम, प्रबोधिनीच्या स्थापनेच्या ७५व्या वर्षी आणि भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृतकाळात करता यावे, अशी मनीषा आहे. धर्मसंस्थापनेच्या अंतिम ध्येयाकडे जाणारे नव्या काळाच्या भाषेतील नवे उद्देश प्रबोधिनीच्या संस्थानिर्मिती लेखात यावेत यासाठी चिंतनाला प्रारंभ करण्याचे आवाहन म्हणून हे संकलन आहे.

संस्थेच्या घटनेतील उद्देश – प्रकट चिंतन ६ Read More »

यजुर्वेदातील राष्ट्रसंकल्पना

लेख क्र. २७ १/७/२०२५ वीस वर्षांपूर्वी मा. यशवंतराव यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. मनीषा शेटे यांनी केलेल्या अभ्यासातून ‘यजुर्वेदातील राष्ट्रसंकल्पना’ हा लेख तयार झाला. भारताला राष्ट्र संकल्पना ब्रिटिश आल्यानंतरच समजली असे म्हटले जाते. त्या पार्श्वभूमीवर यजुर्वेदातून दिसणार्‍या राष्ट्रीय जीवनाचा विचार इथे मांडला आहे. वेदत्रयींमधील ‘यजुर्वेद’ हा एक सामाजिक वेद, यज्ञ व त्याच्याशी निगडित सर्व कर्मकांड त्याच्यामध्ये येते. यजुर्वेद अभ्यासार्थ घेतला की त्यातील विषयांची व्यापकता पाहून मन स्तिमित होते. यजुर्वेदाच्या अनेक शाखा-उपशाखांचे अध्ययन व विवेचन आजपर्यंत झाले आहे. शुक्ल यजुर्वेद व कृष्ण यजुर्वेद हे दोन भाग व त्यांच्या वेगवेगळ्या शाखांच्या बाह्य स्वरूपाचा विचार न करता अंतर्गत मांडणीचा विचार केल्यास त्यातील सामाजिक संदर्भ लक्षात येतात. ज्या वेळी हा विषय अभ्यासार्थ घेतला तेव्हा यजुर्वेदातील अंतरंग पहात असतानाच त्यातील समाजजीवनाचा वेगळा रंग लक्षात आला. यजुर्वेद हा यज्ञसंस्थेमुळे दैनंदिन जीवनाशी निगडित होता. चातुर्वर्ण्य कल्पना, नीती-नियमांनी बद्ध समाजव्यवस्था, विविध व्यवसाय, जाती-जमाती, कृषी, वैद्यक, अनेक देवतारूपे या सर्वांचा समावेश यामध्ये होतो. परंतु या सर्वांपेक्षा यातील वेगळेपणा म्हणजे समाजाची दिसून येणारी एकात्मिक भावना. एका सुसंबद्ध समाज रचनेचे चित्र यजुर्वेदातून साकार होते. कोणत्या सूत्राने हा समाज बांधलेला होता? याचा विचार केल्यावर असे दिसते की ते सर्व एका भूमीवर राहणारे होते आणि राष्ट्र या संकल्पनेने बद्ध होते. एक राष्ट्रीयत्वाची भावना त्यांना ठाऊक होती. आजपर्यंतचा भारतीय इतिहास बघितला तर ही कल्पना सुसंगत वाटणार नाही कारण राष्ट्रीयत्व आम्हाला ब्रिटिशांच्या आगमनानंतर पारतंत्र्यात बुडल्यावरच कळले असा एक प्रवाद आहे. त्यामुळे यजुर्वेद व त्याचे तैत्तिरीय ब्राह्मण-आरण्यक यामध्ये राष्ट्र शब्द कोणत्या अर्थाने वापरला आहे, याचा विचार आवश्यक वाटतो. Vedik Index of Names and Subjects मध्ये राष्ट्र या शब्दाने राज्य किंवा Kingdom असे सूचित होते, परंतु यजुर्वेदातील राष्ट्रविषयक संदर्भ पाहिल्यास असे दिसते की हा अर्थ मर्यादित स्वरूपाचा आहे. यजुर्वेदात ‘राष्ट्र’ या संकल्पनेचा उदय व विस्तार दिसतो का हे बघण्याचा हा प्रयत्न आहे. वेदांमधील आद्य ग्रंथ म्हणजे ‘ऋग्वेद’. ‘राष्ट्र’ शब्द ऋग्वेदात फार थोड्यावेळा येतो. त्याचा विचार करताना असे दिसते की प्रत्यक्ष ऋग्वेदाच्या काळात ‘राष्ट्र’ या शब्दाने आज अभिप्रेत असलेली समाजरचना दिसत नाही. परंतु लोकमतानुवर्ती विस्तृत स्वराज्याची अपेक्षा मात्र दिसून येते. ऋग्वेद ५. ६६. ५ मध्ये या ऋचेचा अर्थ येतो तो असा- ‘हे सर्वव्यापी स्त्रोतसुत मित्रावरुणांनो, विस्तृत आणि लोकमतानुवर्ती स्वराज्याच्या आमच्या प्रयत्नांना तुम्ही यश मिळवून द्या.’ World Book of Encyclopedia मध्ये ‘राष्ट्र’ या शब्दाला समानार्थी शब्द Nation वापरला आहे. त्याची व्याख्या खालीलप्रमाणे केलेली आहे. “Nation means a large group of human beings who form an Independent political unity and are subjects to a single supreme Central Govt. usually occupying a clearly defined geographical area, and further united by an ancient community of race, customs, traditions and general spirit and feeling themselves to be united.” या व्याख्येचा सर्वसाधारण मराठी अनुवाद असा “राष्ट्र म्हणजे एक सुसूत्रपणे बांधलेला विस्तृत समाज जो राजकीय दृष्ट्या स्वतंत्र असतो व त्याची स्वतःची केंद्रीय शासन प्रणाली असते, तसेच त्यांनी एक विशिष्ट भूभाग व्यापलेला असतो. हा समाज पूर्वजांच्या समृद्ध वारशाने व परंपरेने जोडलेला असतो व त्याच्यामध्ये एकतेची भावना दृढमूल असते.” वरील अर्थ पाहता ‘राष्ट्र’ शब्दाची व्याप्ती स्पष्ट करण्यासाठी या लेखात ५ घटकांचा विचार केला आहे. १) सुसंघटित समाज – यजुर्वेदामध्ये चातुर्वर्ण्याबरोबरच पंचम वर्णाचाही उल्लेख येतो. समाजामध्ये या पंचवर्णीयांचे संबंध एकोप्याचे असावेत असे दिसते. कारण सर्वत्र आम्हाला भूमी प्राप्त होवो, सर्व देशांच्या अधिपत्यरुपाने असणारे राष्ट्र आम्ही संपादन करु, आमच्या राष्ट्रातील सर्व प्राणीमात्रांचा योग-क्षेम उत्तम प्रकारे चालो असे सकारात्मक विचार येतात. यज्ञ विधीमध्ये सर्वांचा समावेश असे. कृष्ण यजुर्वेद तैत्तिरिय ब्राह्मण व आरण्यकामध्ये ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय व शूद्र हे चार वर्णाचे पुरुष “ओदनसव” क्रतूचे अधिकारी आहेत असे म्हटले आहे. समाजाच्या परस्परानुवर्ती संबंधामुळेच राजा व प्रजा यांचे संबंधही दृढ होत असत. वाजपेय यज्ञामध्ये समाजाने राजाला मान्यता द्यावी म्हणून तो १६ रत्नींच्या घरी जाऊन अग्नी प्रज्वलित करत असे. हे १६ जण त्या त्या गटाचे प्रतिनिधी असत. राजा व प्रजेच्या अशा ऐक्याने सुसंघटित समाज निर्माण होत असे. राजा प्रजेवर व प्रजा राजावर अधिकार गाजवीत असे. या समाजव्यवस्थेमध्ये कुणबी, कोष्टी, साळी, परीट, न्हावी, सोनार, विणकर, कुंभार, फासेपारधी, बुरडीण, शिकलगार, ज्योतिषी, चाबूकस्वार, गोपाळ, वाणी, भिल्ल, वनवासी गायक, कोळी इ. भिन्न व्यावसायिक व जाती जमाती आपल्याला भेटतात. या सर्वावरून सर्वसमावेशक समाज दिसतो. २) एक मध्यवर्ती शासकीय / राजकीय सत्ता केंद्र – ज्यावेळी समाज सुसंघटित बनतो तेव्हा त्याच्या चलनवलनासाठी तिसऱ्या एका शक्तीची आवश्यकता निर्माण होते. ती म्हणजे शासनप्रणाली. शासनाद्वारे समाजाचे नियंत्रण केले जाते. इथे सुद्धा अशा तऱ्हेच्या मध्यवर्ती शासन प्रणालीचे चित्र दिसते. क्षत्रिय राजा हा मुख्य आधारस्तंभ तर ब्राह्मण पुरोहित त्याचा मार्गदर्शक आहे. या पुरोहिताचे स्थान स्पष्ट करण्यास ११ व्या अध्यायातील खालील भाग उपयुक्त ठरतो. पुरोहित स्वतः बद्दल म्हणतो, ‘माझे ब्राह्मण्य मी उत्तम प्रकारे तीक्ष्ण असे केलेले आहे. त्याप्रमाणें माझी इंद्रिय शक्ती व माझे शरीर सामर्थ्य हे मी स्वकार्यक्षम केले आहे. मी ज्या क्षत्रिय वर्गाचा पुरोहित आहे त्या वर्गाचे क्षात्रबल जयिष्णु होईल अशा प्रकारे मी ते तीव्र केले आहे.’ क्षत्रियांमध्ये शूर व अचूक बाण मारणारा, शत्रू शरीराचा चुराडा करणारा वीर, युद्धासाठी परराज्यात सैन्य घेऊन जाणारा व रथामध्ये बसण्यात शहाणा असा रथगुत्स नावाचा सेनानी, ग्रामाधिपती हे राष्ट्रसंरक्षक वीर दिसतात. शत्रूचे आक्रमण होण्याआधीच आपण सुसज्ज असावे असा विचार यात दिसतो. राजाच्या अधिकाराखाली वरील पदे असत. या राजाला समाजातील सर्व स्तरांनी पाठिंबा देणे अपेक्षित असे. यजुर्वेदात कांड ५-७-४ मध्ये म्हंटले आहे की, “ह्या यजमानासाठी सर्व देशांच्या आधिपत्यरूपाने  असणारे राष्ट्र आम्ही संपादन करू, हे सर्व मानवांनो, निरनिराळ्या प्रदेशातून तुम्ही एकत्र होऊन माझ्या या यजमानाच्या जवळ या तो, तुम्हा सर्वांना शिस्त लावणारा व तुम्हा सर्वांचा अधिपती होवो. याच्या आश्रयाखाली तुम्ही आपले जीवन सुखी करून घ्या. या सर्वांद्वारे राजा हा मध्यवर्ती सत्ताकेंद्र होता हे स्पष्ट होते. राजाच्या मध्यवर्ती सत्ताकेंद्रावर समाजाचा अंकुश असे. राज्याभिषेकाचा एक मंत्र असा आहे – ‘आत्वा हार्षमन्तर भूर ध्रुवास्तिष्ठा विचाचलन्। विशस्त्वा सर्वा वाञ्वन्तु मात्वद्राष्ट्र अधिभृशत॥ हे प्रजाश्रित राजन, राजा म्हणून प्रजाजन तुझा स्वीकार करोत. नित्य आणि स्थिर राहून तू चिरस्थायी राज्याचा स्वामी हो. दुसरीकडे म्हंटले आहे हे राजन, इंद्रसदृश अथवा पृथ्वीलोकीच्या पर्वतासदृश स्थिर राहून तू राष्ट्ररक्षण कर. तू अढळ रहा. आज ज्या लोकशाहीची अपेक्षा आम्हाला आहे ती लोकशाही त्या काळात असावी याचे एक उदाहरण वेण राजाच्या कार्यात मिळते. वेण राजाने जेव्हा प्रजाजनांच्या विरुद्ध काही दुखावणारे कृत्य केले तेव्हा त्याला त्या पदावरून दूर करून त्याच्या मुलाला राज्याभिषेक करण्यात आला. तेव्हा त्याला काही अटींचे पालन करण्यास सांगण्यात आहे. त्या अटी अशा – ‘यन्माम् भवन्ती वश्यन्ति कार्यम् अर्थ समन्वितम्। तदहं व: करिष्यामि नात्र कार्यविचारणा॥ – प्रजाजन जे म्हणतील तेच मी करेन ज्यामुळे प्रजाजनांना आनंद होईल असेच वर्तन माझ्या हातून घडेल. लोकशाही तत्त्वांचे पालन कसे केले जात होते हे या कथेतून दिसते. या राजाला राष्ट्रासाठी अन्न, पशुधन व द्रव्य प्राप्त करावे लागे. त्यासाठी युद्ध करणे आवश्यक

यजुर्वेदातील राष्ट्रसंकल्पना Read More »

सौर कालदर्शिकेचा प्रवास

लेख क्र. १४ १८/६/२०२५ कालदर्शिका निर्मिती व नंतर ती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी संस्थेला खूप खटाटोप करावे लागत. त्यासाठी विविध क्षेत्रातील विद्वान कालदर्शिका समितीमध्ये कार्यरत होते ज्यामध्ये पं. गोरेशास्त्री, श्री. मा. भ. पंत, श्री. वि. वि. मोडक, डॉ. अ. मा. साठ्ये, प्रा. अ. ग. पटवर्धन, प्रा. नी. र. पटवर्धन, प्रा. कृ. श्री. अर्जुनवाडकर यांची नावे येतात. प्रत्यक्ष कालदर्शिका (पंचांग) छापणे हा पुढचा उद्योग! ‘देसाई पटेल’ यांच्याकडून २११ रुपयांना पंचांगासाठी कागद खरेदी केली. ‘कलाभुवन’मधून ८३ रु. देऊन पंचांगातील कुंडल्यांची चौकट करून घेतली. पुढे प्रती वाढविण्यासाठी अर्थसाहाय्याची गरज भासत होती. जाहिरातीमार्फत अर्थसाहाय्य मिळविण्याचा प्रयत्न झाला. त्यासाठी एक आवाहन पत्र प्रसारित केले. तेव्हाच्या जाहिरातदारांमध्ये ‘पूना गेस्ट हाऊस, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, जनता सहकारी बॅंक लि., जनसेवा दुग्धमंदिर, युनायटेड वेस्टर्न बॅंक, ब्रिमा शुगर लि., किर्लोस्कर ऑईल इंजिन, उद्यान कार्यालय इत्यादींची नावे सापडतात. कालदर्शिका तयार झाल्यावर त्या वितरीत करणे यासाठी दुकानदारांना कालदर्शिका विक्रीस ठेवण्यासाठी निवेदन करणे, शाळेच्या मुख्याध्यापकांना शाळेत वापरावी म्हणून विनंती करणे व त्यासाठी कालदर्शिका कशी वाचावी त्यावर प्रशिक्षण देणे, ही प्रक्रिया अनेक वर्षे अशीच चालू होती. १९७८ मध्ये या कालदर्शिकेचे मूल्य होते अवघे १ रु. ६० पै. पुन्हा त्यावर १५% कमिशन द्यावे लागे. सुरुवातीला वेळेत कालदर्शिका तयार करणे अनेक कारणांनी जिकिरीचे झाले असे जुन्या पत्रांतून कळते. पण पुणे, सातारा, मुंबई, कोकण, हुबळी इ. गावांतून कालदर्शिका मागविल्या जात. ज्यांनी ज्यांनी सौर कालदर्शिका बघितली किंवा वापरली त्यांनी त्याबद्दलची स्वतःची मतेही पत्र लिहून प्रबोधिनीला पाठवली आहेत. आता ती वाचताना रमणीय वाटू शकतात पण तेव्हा ही कालदर्शिका किती काटेकोरपणे पाहिली जायची हे त्या पत्रांवरून कळते. त्यातल्या काही पत्रांचा सारांश पाहा. एक अभिप्राय असा – सातार्‍याच्या श्री. माटे यांनी नोंदविले आहे, “कालदर्शिका सर्व प्रकारच्या माहितीने पूर्णपणे भरलेली आहे. ती निव्वळ काळ दाखवीत नाही तर जीवन उज्ज्वल कसे करावे ते दाखवते. तिच्यात वैद्यक आहे, ज्योतिष आहे, धर्म आहे, शिक्षण आहे, आरोग्य आहे, जीवनात लागणार्‍या सर्व गोष्टी आहेत. म्हणून ती अत्यंंत उपयुक्त झाली आहे. पण तिचा आकार मात्र फार मोठा व बोजड झाला आहे. त्यामुळे हाताळण्याला जरा कठीण जाते. काही शंका व सूचना – १) संत फ्रांसिस झेव्हिअरचा सोहळा (३ डिसेंबर) हा गोव्यातीलच ना? त्याचा सोहळा हिंदुपंचांगात काय म्हणून? त्याने केलेले प्रताप आपणास माहित नाही काय? उद्या औरंगजेबाची पुण्यतिथीही हिंदुपंचांगात येणार काय? ख्रिश्चन सणांना वाजवीपेक्षा जास्त महत्व दिलेले दिसते. २) वधूने वराला सुहृद म्हणणे जरा चमत्कारीक वाटते. मूळ मंत्रातीलच हा शब्द घेतला आहे काय कोण जाणे? नाटकातील ‘आर्य’ कसा वाटतो? ३)सावरकर, ज्ञानेश्वर महाराज दिसले नाहीत. लालबहादूर शास्त्रीपर्यंत म्हणजे फारच खाली आलात असे वाटते.” अशा सूचना, शंका सांगून झाल्यावर ते म्हणतात,”कालदर्शिका विद्वान, तज्ञ माणसांनी काळजीपूर्वक केलेली असल्यामुळे तिच्यात चुका असणे शक्य नाही. पण मला एका सामान्य माणसाला ती पाहून काय वाटले ते लिहिले आहे. ते बरोबरच असेल असे नाही.” त्यांच्या ह्या पत्राला योग्य उत्तर दिले गेले त्याबद्दल त्यांनी समाधानही व्यक्त केले आहे. असे काही अपवाद असले तरी बर्‍याच जणांनी या उपक्रमाला प्रतिसाद दिला व चांगल्या सूचनाही दिल्या आहेत. उदा. श्री. नी. स. गोखले, पुणे यांनी १९७७ साली कालदर्शिका मिळाल्याचे आभार पत्र लिहिले, त्यात त्यांनी समाज-सुधारणेविषयी मत दिले – ‘सत्य व शास्त्र न सोडता परिवर्तनशीलता मात्र सतत स्वीकारायची व तिचा प्रसार करायचा हे तर मंडळाचे ध्येय व धोरण आहे. कालदर्शिकेच्या संपादक मंडळात एक सुविद्य महिला व मागास समजला जाणार्‍या वर्गातील प्राध्यापक अगर विद्वान घ्यावा या मताचा मी आहे. कोणतीही सुधारणा अगर परिवर्तन समाजातील सर्व थरांतील लोकांना बरोबर घेऊन करणे जरूरीचे असते.’ गोखले यांचे हे वाक्य ज्ञान प्रबोधिनीच्या व संत्रिकेच्या कामाविषयीचा विश्वास दर्शविणारे आहे. तेव्हाच्या कालदर्शिकेचे चित्र सोबत जोडले आहे.

सौर कालदर्शिकेचा प्रवास Read More »

संस्कृत सर्वांसाठी!

लेख क्र. १२ १६/६/२०२५ संत्रिकेमध्ये सुरुवातीच्या काळात संंस्कृत सर्वांपर्यंत पोहोचावे तसेच, संस्कृतीचे रक्षण व्हावे यासाठी अनेक प्रयत्न झाले. संस्कृत भाषेच्या रक्षणासाठी व वाढीसाठी संत्रिका विभागाने अनेक उपक्रम हाती घेतले व पूर्णत्वास नेले, काही मधेच बंद पडले. अशा उपक्रमांची माहिती येथे देत आहोत. संत्रिका विभागाचे पहिले विभागप्रमुख प्रा. कृष्ण श्री. अर्जुनवाडकर व त्यांचे सहकारी यांनी सुरुवातीस अनेक अभ्यास वर्ग घेतले. ते खालीलप्रमाणे – वरील अभ्यासपूर्ण उपक्रमांशिवाय दोन विशेष उपक्रम संत्रिका विभागाने राबविले. ते असे – १) मा. प्रा. कृष्ण श्री. अर्जुनवाडकर यांनी ‘वाग्विमर्शिनी’, हा दुकानांची नावे ‘शुद्ध’ मराठीत लिहिण्यासाठी आग्रह धरणारा, तसेच भाषा सुधारणेसाठी एक उपक्रम केला होता. “त्रिंबक मोरेश्वर” नको, “त्र्यंबक मोरेश्वर” हवे …पण दुकाने याच नावाने ‘रजिस्टर’ झाली असल्याने, नावे बदलता येणार नाहीत, म्हणून तो उपक्रम बारगळला. जरी दुकानांच्या नावांसंंबंधी हा उपक्रम बारगळला असला तरी भाषा-सुधारणेसाठीचे प्रयत्न सुरुच होते. ते दर्शविणारे एक जुने आवाहन पत्र येथे जोडत आहे, त्याची भाषा मात्र मजेशीर आहे. २) संस्कृतच्या सार्वत्रिक सोप्या उपयोगासाठी मा. प्रा. कृष्ण श्री. अर्जुनवाडकर यांनी केलेला अजून एक उपक्रम म्हणजे इंग्रजीतून शुभेच्छा देण्यापेक्षा संस्कृतमध्ये शुभेच्छा द्याव्यात, त्यासाठी त्यांनी नियमित वापरता येतील अशी शुभेच्छावाक्ये संस्कृतमध्ये अनुवादित केली. त्याची चित्रफीत सोबत जोडली आहे. जरूर सर्वांनी वापरून पाहा.

संस्कृत सर्वांसाठी! Read More »

धर्म सुधारक व गाढे विद्वान पंडित रघुनाथशास्त्री कोकजे यांचे महानिर्वाण

लेख क्र. ९ १३/६/२०२५ मागील दोन लेखात आपण बघितले की धर्म-परिवर्तनासाठी १९३८ सालापासून ‘धर्मनिर्णय मंडळ’ या संस्थेने अनेक कामे केली. १९३९ पासून पं. रघुनाथशास्त्री कोकजे संस्थेचे कार्यवाह होते. या महान धर्म-सुधारकाचा, विद्वानाचा मृत्यू १४ फेब्रुवारी १९७६ रोजी झाला. ‘देवर्षि-प्रकाश’ या त्रैमासिकाच्या मे १९७६ च्या अंकात ‘संपादकीय’मध्ये मो. वा. निमकर यांनी ‘पं. रघुनाथशास्त्री कोकजे’ यांच्या निधनानंतर त्यांच्या कार्याविषयी, विद्वत्तेविषयी लिहिले होते, तसेच पं. रघुनाथशास्त्री कोकजे यांचे घनिष्ठ मित्र प्रा. नी. शं. नवरे यांनी रचलेले काव्यसुद्धा छापले होते. संत्रिका विभागाच्या सुवर्ण-महोत्सवानिमित्त परिवर्तनाच्या वाटेवर चालणाऱ्या पं. रघुनाथशास्त्री कोकजे या द्रष्ट्या समाज-सुधारकाच्या कार्याचा परिचय करून देणारा लेख येथे सादर करीत आहोत.    लोणावळे येथील धर्मनिर्णय मंडळाचे संस्थापक, सुधारक व हिंदुधर्मशास्त्राचे गाढे विद्वान पं. तर्कतीर्थ रघुनाथशास्त्री कोकजे यांचे शनिवार दिनांक १४ फेब्रुवारी १९७६ रोजी सायंकाळी लोणावळे येथे आकस्मिक हृदय विकाराने देहावसान झाले, हे कळविण्यास आम्हांस अत्यंत दुःख होत आहे. मरण समयी त्यांचे वय ७० वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे हिंदुसमाजावर आधुनिकतेचे संस्कार व्हावेत व समाजामध्ये एकात्मता वाढीस लागावी यासाठी गेले अर्धशतक अव्याहत प्रयत्न करीत असलेला एक तळमळीचा धर्म सुधारक नाहीसा झाला आहे. आपल्या समाजातील ज्या व्यक्ती इतर समाजांतही ललामभूत झाल्या आहेत त्यांत कोकजे शास्त्री हे अग्रेसर होते, त्यामुळे त्यांच्या निधनाने समाजाचेही फार नुकसान झाले आहे.    त्यांचा जन्म १० मार्च १९०४ भोके (जि. रत्नागिरी) येथे झाला. धर्मशास्त्र व तत्त्वज्ञान यांची शास्त्रीबुवांना लहानपणापासूनच आवड होती. त्यामुळे रत्नागिरी व चिपळूण येथे मराठी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी इंग्रजी शाळेत नाव दाखल करण्याऐवजी वाई येथील प्राज्ञ पाठशाळेत प्रवेश केला व स्वामी केवलानंद सरस्वती यांचे मार्गदर्शनाखाली भारतीय तत्त्वज्ञानाचा सखोल अभ्यास केला. त्यानंतर काही वर्षे काशी येथे जाऊन त्यांनी धर्मशास्त्राचे अध्ययन केले व त्यामुळेच ते कलकत्ता संस्कृत असोसिएशनच्या तर्कतीर्थ आणि सांख्यतीर्थ ह्या परीक्षा उत्तीर्ण होऊ शकले. तर्कतीर्थ ह्या परीक्षेत त्यांनी पहिला नंबर मिळवला होता, ह्यावरून त्यांची बुद्धिमत्ता किती कुशाग्र होती हे दिसून येते. ह्या काळात त्यांनी संस्कृताप्रमाणे इंग्रजीच्या अभ्यासाकडेही लक्ष्य पुरविले.    वाई आणि काशी येथील अध्ययन पुरे केल्यानंतर लोणावळे येथील ‘कैवल्यधाम’ मध्ये दर्शनाध्यापक म्हणून काम करू लागले, पण बदललेले कालमान लक्षात घेऊन जुने तत्त्वज्ञान आणि आधुनिक आचार यांचा मिलाफ कसा घडवून आणता येईल याचा ते विचार करू लागले व ह्या विचारमंथनातूनच ‘धर्मनिर्णय मंडळा’चा जन्म झाला व हेच त्यांचे प्रमुख आणि समाजोपयोगी कार्यक्षेत्र झाले. हिंदुसमाजाने जुन्या अनिष्ट रूढीचा त्याग केला पाहिजे व विज्ञाननिष्ठ आचारधर्म आत्मसात केला पाहिजे या पुरोगामी सामाजिक जाणीवेतूनच कोकजे शास्त्री ह्यांनी ‘धर्म स्वरूप निर्णय’, ‘हिंदूच्या अवनतीची मीमांसा’, ‘नवा आचारधर्म’ आदि ग्रंथ लिहिले. शिवाय त्यांनी धार्मिक कृत्ये व आचार ह्यांवर पुष्कळ ग्रंथ लिहिले आहेत. ते धर्मनिर्णय मंडळातर्फे पंचांगही दरवर्षी छापत असत. विवाहविधी सुटसुटीत व्हावा यासाठी केलेल्या प्रयत्नांना त्यांना खूपच यश आले. जाती-जातीत विभागलेला हिंदुसमाज एकसंधी झाला पाहिजे यासाठी त्यांनी आंतरजातीय विवाहांचा पुरस्कार केला. इतकेच नव्हे तर हिंदूंच्या समाजरचनेत कालोचित बदल व्हावा म्हणून तयार करण्यात आलेल्या हिंदुकोड बिलालाही त्यांनी पाठिंबा दिला. गावोगावी प्रचार सभेत, परंपरा जतन करताना तिच्यात शिरलेल्या घातक प्रवृत्ती सोडून द्यायला हव्यात व त्याच बरोबर परिवर्तनाचे स्वागत करावयाची तयारी असली पाहिजे हेच शास्त्रीबुवांच्या भाषणांतील मुख्य प्रतिपाद्य विषय असत. पुरातन धर्मशास्त्राकडे आधुनिक दृष्टिकोनातून पाहणारा प्रगतीशील धर्मसुधारक म्हणून पं. रघुनाथशास्त्री कोकजे यांनी केलेल्या कार्याचे मोल आपण ओळखले पाहिजे. मुंबई व पुणे विद्यापीठाच्या एम्. ए. च्या विद्यार्थ्यांचे संस्कृत विषयातील परीक्षक म्हणूनही त्यांनी काही काळ काम केले होते. समाजातील वाईट प्रथा व रुढी बंद व्हाव्यात, त्याचप्रमाणे धर्माच्या नावावर वाटेल ते खपविले जाऊ नये ह्यावर त्यांचा कटाक्ष असे. विवाह विधीत होम, सप्तपदी प्रथम आणि मंगलाष्टके नंतर ही प्रथा त्यांनी सुरू केली; मुंजीच्या वेळी होणारे मातृभोजन हा धार्मिक विधीचा भाग नाही, म्हणून त्याला फाटा द्यावा असे त्यांचे मत होते. रोज सकाळ-संध्याकाळ आसने आणि संध्या त्यांनी कधीही चुकविली नाही. धूत वस्त्र हे सर्वोत्तम सोवळे असे त्यांचे मत होते. त्यांचे वागणे व आहार फार नियमित असे. त्यांना पोटाचा विकार होता, त्याची ते नेहमीच काळजी घेत असत. ते बहुतेक कधीही आजारी नसत. १४ फेब्रुवारी १९७६ ला ते सायंकाळी बाहेर पडले, चालताना एकदम रस्त्यावर कोसळले व त्यांनी कायमचा या जगाचा निरोप घेतला. बरोबर त्यांच्या पत्नी होत्या, पण कोणासच काहीही करता आले नाही. आयुष्यांत त्यांनी कुणाकडून सेवा करून घेतली नाही आणि स्वतःची मते दुसऱ्यावर लादली नाहीत. त्यांच्या मागे पत्नी, दोन कर्ते मुलगे. तीन विवाहीत मुली, जावई, नातू, बंधू, पुतणे, असा परिवार आहे. आम्हीच नव्हे तर अखिल समाज बांधव त्यांच्या दुःखात सहभागी आहे परमेश्वर त्यांचे आत्म्यास नक्कीच सद्गती देईल अशी आमची खात्री आहे.    पुणे, वाई, मुंबई, लोणावळे येथे त्यांच्या निधनानिमित्त शोक सभा झाल्या. पुण्याच्या ज्ञान प्रबोधिनी ह्या संस्थेत सभा भरून पं. रघुनाथशास्त्री कोकजे ह्यांना भावपूर्ण श्रद्धांजली सर्वांनी अर्पण केली. अध्यक्षस्थानी हिंदुमहासभेचे पुण्यातील जुने कार्यकर्ते श्री. मामाराव दाते होते. संस्कृतज्ञ प्राचार्य नीलकंठ शंकर नवरे यांनी व अनेक वक्त्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. धर्मनिर्णय मंडळाचा प्रमुख आधारस्तंभ व दुर्दम्य उत्साहाचा विद्वान कार्यकर्ता अचानक नाहीसा झाला याचा सर्वांना खेद झाला. पुण्यास आले की ते प्रा. नी. शं. नवरे ह्यांना प्रथम भेटत असत. त्यांचा व प्रा. नवरे यांचा गाढा स्नेह होता. मृत्युपूर्वी ८-१० दिवस ते श्री. नवरे ह्यांना भेटून गेले, पण ते विशेष उत्साही दिसले नाहीत. पण ह्या गंभीर आजाराची त्यावेळी कोणासच कल्पना आली नाही. श्री. नवरे ह्यांनी पं. कोकजेशास्त्रींवर एक छोटेसे संस्कृत काव्य केले आहे. आमच्याकडे त्यांनी पाठविले आहे, ते आम्ही प्रसिद्ध करीत आहोत. कोकजे, धन्यो धन्योऽसि। (४ मार्च ७६) सुधारको र. गो. कोकजे, हन्त! कालवशं गतः ॥ वृत्तमेतत् समाकर्ण्य दूयते मानसं मम ॥ १ ॥ अहो! अनाथं सज्जातम् धर्मनिर्णय-मण्डलम् ।। प्रवर्तकः चालकोऽपि एकलः एव कोकजे ॥ २ ॥ सार्थोपाधिः तर्कतीर्थः धृत्युत्साह-समन्वितः ॥ क्रियावान् पण्डितश्चासीत् सर्वेषाम् आदरास्पदम् ॥ ३ ॥ केवलानन्द-सच्छिष्यः सर्वानन्द-प्रदायकः ॥ यत् गृहीतं व्रतं तेन आमृत्यु परिपालितम् ॥ ४ ॥ -नी. शं. नवरे १० मार्च २००५ रोजी पुणे येथे ज्ञान प्रबोधिनी संस्थेने पं. रघुनाथशास्त्री कोकजे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा सांगता समारंभ साजरा केला. पं. कोकजे यांच्या छायाचित्रासोबत डावीकडून श्री. विश्वनाथ गुर्जर, मा. संचालक वाच. गिरीशराव बापट, प्रा. यशवंतराव लेले, प्रा. विवेक पोंक्षे, श्री. सुभाष देशपांडे

धर्म सुधारक व गाढे विद्वान पंडित रघुनाथशास्त्री कोकजे यांचे महानिर्वाण Read More »

योगी अरविंद यांचे महाकाव्य ‘सावित्री’

१० जून २०२५ लेख क्र. ६ मुळात महाभारतातील या कथेचा विस्तार लहान आहे. पण श्री अरविंदांचा असा विश्वास होता की सावित्रीच्या कथेमध्ये एक गहन अर्थ दडलेला आहे, जो कालांतराने हरवला आहे. त्यांनी हा अर्थ शोधण्यासाठी आणि मांडण्यासाठी सुमारे ४० ते ५० वर्षे मनन चिंतन केले व त्यांच्या या प्रदीर्घ चिंतनातून  ‘ ‘Savitri: A legend and a Symbol’ या महाकाव्याची निर्मिती झाली. Blank-verse (verse without rhyme, especially that which uses iambic pentameters. -oxford dictionary) मध्ये लिहिलेल्या या काव्याची  एकूण १२ पुस्तके (Books) आणि अंदाजे २४,००० ओळी (Lines) आहेत. मूळ महाभारतातील ही कथा संस्कृत ग्रंथामध्ये सुमारे ७०० ओळींची आहे. या कथेमागील गहन अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न केला की समजते अरविंदांची सावित्री ही महाभारतातील सावित्रीपेक्षा पूर्ण वेगळी आहे : सावित्रीची निवड: त्यांच्या शिष्यांनी त्यांना विचारले की महाभारतात इतर अनेक स्त्री पात्रे असताना त्यांनी सावित्रीची निवड का केली? यावर श्री अरविंद  म्हणाले की सावित्री हे एकमेव पात्र आहे जे आयुष्यात कधीही रडले नाही. ती कोणत्याही परिस्थितीत अत्यंत दृढनिश्चयी आणि परिस्थितीला सामोरे जाण्यास सज्ज होती, म्हणूनच त्यांनी सावित्रीची निवड केली. कथेतील प्रतीकात्मकता (Symbolism): श्री अरविंद यांनी या कथेला केवळ दंतकथा (Legend) न मानता एक प्रतीक (Symbol) म्हणून पाहिले आणि त्यामागील गहन प्रतीकात्मक अर्थ स्पष्ट केला. सावित्री: ती सर्जनशील निर्मात्याची  कन्या आहे, मानवी स्वरूपातील दैवी कृपा   (Divine Grace) आहे. ती आत्म्याची  ईश्वराशी एकरूप होण्याची आकांक्षा आणि प्रेम व भक्तीची परिवर्तनीय शक्ती (Transformative Power) दर्शवते. तिच्या प्रेमाने आणि समर्पणाने सत्यवानाचे आयुष्य वाढवले. सत्यवान: तो जन्म आणि मृत्यूच्या चक्रात (Cycle of Birth and Death) अडकलेला मानवी आत्मा दर्शवतो. सत्यवान नावाचा अर्थ ‘जो सत्याचा स्वामी आहे’ (The one who possesses the Truth) असा आहे. हे सत्य म्हणजे प्रत्येक मानवी अस्तित्वात असलेले ‘शाश्वत सत्य’ (Eternal Truth) ते म्हणजे आत्मा अमर आहे. परंतु जीवनात भौतिक गोष्टींच्या मागे लागून आपण हे सत्य विसरतो आणि त्यामुळे जन्म-मृत्यूच्या चक्रात फिरतो. द्युमत्सेन (सत्यवानाचे वडील) : ते मानवी दुःखे (Human Suffering) आणि मुक्तीची शक्यता (Possibility of Redemption) दर्शवतात. त्यांची दृष्टी जाणे म्हणजे आपण आपले शाश्वत सत्य विसरल्यामुळे अंध होणे, ज्यामुळे आपल्याला अनेक दुःख भोगावी लागतात. त्यांची दृष्टी परत येणे हे अंधकारावर प्रकाशाचा विजय आणि हरवलेले वैभव (Lost Glory) परत मिळवणे दर्शवते. हे आत्मसाक्षात्कारामुळे (Self-realization) शक्य होते, जेव्हा माणूस ‘अहं ब्रह्मास्मि’ (I am the God) याची जाणीव करून घेतो. यम (मृत्यूची देवता): ती मृत्यूची अटळता (Inevitability of Death) आणि आध्यात्मिक मार्गावरील आव्हाने (Challenges on Spiritual Journey) दर्शविते. सावित्रीने यमाचा पाठलाग करणे, हे मानवी आत्म्याचा अंतिम सत्यापर्यंत पोहोचण्यासाठीचा प्रवास दर्शवतो, ज्यामुळे त्याला मृत्यूपासून मुक्ती मिळू शकते. आध्यात्मिक विकास आणि साक्षात्कार: श्री अरविंद यांच्या सावित्रीतील प्रतीकात्मकता मानवी आत्म्याच्या मुक्तीची आणि उन्नतीची शक्यता दर्शवते. त्यांनी या प्राचीन कथेला एक नवीन आणि गहन आध्यात्मिक परिमाण दिले, जे मानवी जीवनातील संघर्ष, आध्यात्मिक प्रवास आणि अंतिम मुक्तीची शक्यता यावर प्रकाश टाकते.

योगी अरविंद यांचे महाकाव्य ‘सावित्री’ Read More »

नवीन कल्पनाविस्तार

दिनांक ८ जून २०२५ लेख क्र. ५ प्रा.अर्जुनवाडकर यांच्या संस्कृत विषयी प्रेम व आस्था दर्शविणारे संस्कृत मधील अभिनव वंदे मातरम् प्रमाणे त्यांनी विविध प्रसंगी देण्यासाठी केलेल्या संस्कृत शुभेच्छा पण सुंदर आहेत. अर्थात संत्रिकेच्या नावातील संस्कृत विषयाचे काही छोटे मोठे उपक्रम त्यांच्या काळात झाले . संत्रिका सुरू झाली तेव्हा तिला स्वतःची जागा नव्हती.दोन वर्ष हे काम प्रा.अर्जुनवाडकर यांच्या घरूनच व्हायचे.या कामातील एक महत्त्वाचा भाग म्हणजे ‘धर्म निर्णय मंडळाच्या’ कामाचा ज्ञान प्रबोधिनीने केलेला स्वीकार. प्रबोधिनी पद्धतीने होणाऱ्या संस्कारानी आता भारतात व भारता बाहेर चांगलेच मूळ धरले आहे. याच्या मागे असलेल्या तत्त्वनिष्ठ परिवर्तनवादी परिषदेचा परिचय आपण करून घेणारच आहोत. प्रा. अर्जुनवाडकर यांच्या संत्रिकेच्या कामात सुरवातीला असलेल्या दोन मदतनीस म्हणजे वीणा गद्रे व त्यानंतर वीणा करमरकर यातील वीणा करमरकर ताईंनी त्यांच्या त्या काळातील आठवणी येथे पाठवल्या आहेत त्याबद्दल, “🙏मी पूर्वाश्रमीची वीणा करमरकर. १९७८ ते १९८० या दोन वर्षात मी मा. कृ. श्री. अर्जुनवाडकर संत्रिकेचे प्रमुख , यांच्या हाताखाली काम केले आहे. त्या विभागात मी एकटीच मदतनीस होते . माझ्या आधी ‘वीणा गद्रे’ ही मदतनीस होती. लेखात उल्लेख केलेल्या लोणावळा येथील पं. कोकजे शास्त्रींची, ‘धर्म निर्णय मंडळा’ ची ‘उपनयन संस्कार’, ‘विवाह विधी’, ‘श्राद्ध विधी’ इ. पुस्तके पुण्यात ‘प्रबोधिनी’त आणण्याचे काम वीणा गद्रेने केले आहे., तर नंतर त्याच्या पुनर्मुद्रणाची व्यवस्था मी बघितली आहे. प्रभात रोड वरील ‘मा. गोडबोले’ यांच्या अफाट संग्रहातील पुस्तकांच्या नोंदी करून तीही संत्रिकेच्या ‘ग्रंथालयात आणण्याचे काम मी केले आहे.याच काळात मा.अर्जुनवाडकर सरांनी ‘वाग्विमर्शिनी’, हा दुकानांची नावे ‘शुद्ध’ मराठीत लिहिण्यासाठी आग्रह धरणारा एक उपक्रम केला होता. “त्रिंबक मोरेश्वर” नको, “त्र्यंबक मोरेश्वर” हवे …पण दुकाने याच नावाने ‘रजिस्टर’ झाली असल्याने, नावे बदलता येणार नाहीत, म्हणून तो उपक्रम बारगळला.खरे, प्रत्यक्ष मकर संक्रमण….. सध्या २२ डिसेंबर ला होत आहे, काही वर्षांनी ते २१ डिसेंबरलाच होईल आणि आपण ‘मकर संक्रांत’ १४ ऐवजी १५ जाने.ला साजरी करू….हा विरोधाभास आहे. प्रत्यक्ष ‘खगोलशास्त्रा’ला अनुसरून हे का नाही, कसे नाही याचा अभ्यास करण्यासाठी १०० वर्षांच्या जुन्या पंचांगांचे ‘वाचन’ केले, नोंदी केल्या..आणि मा. आप्पांनी ज्ञानप्रबोधिनीत २२डिसेंबरला ‘संक्रात’ साजरी करण्याची पद्धत सुरू केली.(सध्या ती पद्धत चालू आहे का कल्पना नाही)….थंडीची तीव्रता तेव्हाच असल्याने तेव्हाच तीळ-गूळ खाणे आरोग्यदायी आहे.“कालदर्शिका” काढावी असे ठरले., तेव्हा त्यासाठीचा ‘आराखडा’, खगोलशास्त्रीय माहितीचे संकलन, मजकूराचे लेखन, छपाई, नंतर विक्री व्यवस्था अशा अनेक गोष्टी मी हाताळल्या आहेत. या कामात ज्योतिषी पं वि.धों.गोरेशास्त्री, हवामानखात्यातील निवृत्त अधिकारी मा.वि.वि. मोडक, यांची खूप मदत झाली.लक्षात रहाणारी महत्त्वाची घटना म्हणजे “१६ फेब्रुवारी १९८०” चे “खग्रास सूर्यग्रहण” मा. वि.वि. मोडक यांनी त्याचे नियोजन केले होते. कर्नाटकातील ‘शिरहट्टी’ या गावातील एका मठाच्या विस्तृत मोठ्या मोकळ्या मैदानावर ज्ञानप्रबोधिनीचे काही विद्यार्थी, शिक्षिका आणि आम्ही गेलो होतो. ग्रहण बघण्यासाठी विशेष चष्मे दिले होते. विद्यार्थ्यांकडून विविध प्रयोग करून घेतले, त्यांना दाखवले. ग्रहणस्पर्श , पूर्ण ‘खग्रास’ग्रहण, ‘करोना’, पूर्ण ग्रहण सुटणे म्हणजे काय, त्या वेळेस हवेत होणारे बदल, पक्ष्यांचे आवाज कमी होत जाणे, थांबणे आणि नंतर एकदम किलबिलाट सुरू होणे, हे सर्वांनीच अनुभवले.आज ‘ग्रहण बघणे’ हा ‘टूरिझम’चा एक ‘इव्हेंट’ झाला असला तरी ४५ वर्षांपूर्वी असे प्रयोग करणे, याचे महत्त्व वेगळेच होते.”

नवीन कल्पनाविस्तार Read More »

अभिनव वन्दे मातरम् – संस्कृत गीत

७ जून २०२५ लेख क्र. ४ भारतीयत्वाचे चिरंतन, निष्पक्ष सूत्र : संस्कृत भाषा आणि वाङ्‌मय असे संस्कृत बद्दल अभिमानाने सांगताना प्रा. कृष्ण श्री. अर्जुनवाडकर यांनी संस्कृतची महती सांगणारे एक गीत रचले आहे. त्याची रचना व चाल ‘वन्दे मातरम्’ प्रमाणे आहे. त्यामध्ये कोटी कोटी मनांवर जिने चिरस्थायी संस्कार केले. जी गुणवती, रसवती, अलंकृता आहे अशा मातेला मी वंदन करतो. असे वर्णन केले आहे. प्रा. अर्जुनवाडकर यांनी केलेल्या या पद्याकडे पाहताना अतिशयोक्तीची भावना काहींच्या मनात येऊ शकते कारण संस्कृत भाषेला किती व कसे महत्त्व द्यावे याबद्दल अनेक मतमतांतरे आहेत. अर्थात असे असतानाही काही संस्कृतप्रेमी संस्कृतला व्यवहारोपयोगी व आनंदी भाषेचे स्थान देण्यासाठी प्रयत्नरत आहेत. समाजमाध्यमांद्वारा तंत्रज्ञान व संस्कृत यांचा सुसंगत मेळ घालत संस्कृतचा प्रचार व प्रसार करीत आहेत. श्री. अर्जुनवाडकर यांचे वन्दे मातरम् पद्य व त्याचे ध्वनिमुद्रण पाठवीत आहोत ते आवश्य ऐकावे. ज्ञान प्रबोधिनी : संस्कृत-संस्कृति-संशोधिका वन्दे मातरम् । मी मातेला वंदन करतो, वन्दे मातरम् ।सुवदां सुहितां जनगणपूजितांदेवभारतीं मातरम् ।। शास्त्रनिष्ठाकवचितधीबलांकाव्यभावनमधुरितमानसांशुचिस्मितां महितमनस्वितांसुखदां शमदां मातरम् ।।१।। कोटिकोटिकण्ठमुखरितपदार्थनिधानेकोटिकोटिधीविहितोत्कटसंस्कारेके ब्रूयुर् मातस् त्वमबला ?अमितबलान्वितां नमामि तारिणीम्अशुभनिवारिणीं मातरम् ।।२।। त्वं विद्या त्वमु भक्तिः,त्वं भुक्तिस् त्वं मुक्तिः,त्वं चैतन्यं शरीरे,त्वं प्रेरणा त्वं धृतिः, त्वं मनस् त्वं बुद्धिः,तवैव प्रतिमा ननु मानवे मानवे ।।३।। त्वं हि वाणी कोमलवीणावादिनीत्वं चोमा सकलकलाविलासिनीत्वं दुर्गा दारुणशस्त्रविधारिणीनमामि त्वां, नमामि कमलाम्,अतुलां सुवदां सुहितां मातरम् ।।४।। सगुणां सरसां सुपथां भूषितांकरुणां वत्सलां मातरम् ।।वन्दे मातरम् ।  कृष्ण श्री. अर्जुनवाडकर मी मातेला वंदन करतो,जी बोलण्याला सुखकर आहे, कल्याणकर आहे.समाजाला पूज्य आहे,अशा देववाणी मातेला मी वंदन करतो. बुद्धीच्या शक्तीला जिने शास्त्रनिष्ठेचे कवच घातले आहे,काव्यभावनेने जिने मनाला मधुरता दिली आहे,निर्मळ हास्य करणारी, स्वाभिमान उंचावणारी,सुखकरी, शांतिदायिनीअशा मातेला मी वंदन करतो. कोटी कोटी कंठांतूनशब्द आणि अर्थ यांचे भांडार जिने प्रकट केले,कोटी कोटी मनांवर जिने चिरस्थायी संस्कार केले,अशा हे माते, कोण म्हणेल तू अबला आहेस ?अमित शक्ती धारण करणारी, तारण करणारी,अशुभनिवारण करणारी,अशा मातेला मी वंदन करतो. माते ! तू विद्या आहेस, तू भक्ती आहेस,तू भोगदायिनी, तू मोक्षदायिनी,तू शरीरातला प्राण आहेस,तू प्रेरणा, तू धारणा, तू मन, तू बुद्धी,माणसामाणसांत खरोखर तुझीच मूर्ती वास करते. कोमल वीणा वाजवणारी वाणी तूच,सकल कलांचा विलास करणारी उमाही तूच,भीषण शस्त्रे धारण करणारी दुर्गाही तूच.तुला मी वंदन करतो, कमलेला वंदन करतो.अतुलनीय, मधुरभाषिणी, कल्याणकारिणीअशा मातेला मी वंदन करतो. गुणवती, रसवती, सुमार्गवती, अलंकृता, कारुण्यपूर्णा, प्रेमलाअशा मातेला मी वंदन करतो,मी मातेला वंदन करतो.

अभिनव वन्दे मातरम् – संस्कृत गीत Read More »

कृती संशोधन – ज्ञान प्रबोधिनी सोलापूर

ज्ञान प्रबोधिनी सोलापूर सोलापूरचा पूर्व प्राथमिक विभाग गेले ७७ वर्ष चालू आहे. मुलांच्या मूलभूत क्षमतांचा विकास करत आनंददायी शिक्षणाची रचना उभी करण्यात शाळेचे महत्त्वाचे योगदान आहे. याच अनुभवावर आपण शिशु अध्यापिका विद्यालय चालवले. सध्या विद्यालयाची ६६ वी तुकडी चालू आहे. पूर्व प्राथमिक शाळेत आपले अध्यापक प्रयोग करत असतातंच. कामाच्या नोंदीही ठेवल्या असतात. या वर्षी पूर्व प्राथमिक विभागाने असे ठरवले की आपले कृती संशोधन अन्य शाळेतील शिशु शिक्षकांसमोर मांडावे, ज्यायोगे शैक्षणिक गुणवत्ता विकास करण्यास मदत होईल. या हेतूने शिशु अध्यापकांनी जी मांडणी केली त्या गटांचा तपशिल खाली तक्त्यामध्ये देत आहे. बदलापूर, आंबेजोगाई, निगडी केंद्र व स्त्री शक्ती प्रबोधन ग्रामीण विभागाची याला मदत झाली. या निमित्ताने ६ गटातील २९१ शिशु शिक्षकांपर्यंत आपण पोचलो बाल शिक्षण कृती परिषद – २०२४-२५ अ. क्र. दिनांक विषय ठिकाण कोणासाठी संख्या १. २३/११/२०२४ भाषा विकास – (शब्द संग्रह वाढ), कारक कौशल्य   ज्ञान प्रबोधिनी पूर्व प्राथमिक विभाग सोलापूर  सोलापूर शहरातील २६ शाळांमधील शिक्षक १२६ २. १८/०१/२०२५ कारक कौशल्य विकास ज्ञान प्रबोधिनी पूर्व प्राथमिक विभाग सोलापूर  अंगणवाडी शिक्षिका २५ ३. २२/१२/२०२४ कारक कौशल्य विकास निवेदन निगडी पूर्व प्राथमिक गट १८ ४. ०७/०२/२०२५ भाषा विकास, कारक कौशल्य बदलापूर बदलापूर परिसरातील पूर्व प्राथमिक शिक्षक ४७ ५. ११/०४ व १२/०४/२०२५  भाषा विकास (शब्द संग्रह वाढ), कारक कौशल्य   मूधोळकर बालक मंदिर फलटण शिक्षक फलटण एज्युकेशन सोसायटीच्या पूर्व प्राथमिक विभागाच्या सर्व शिक्षिका ३५ ६. ०१/०३/२०२५ भाषा विकास, कारक कौशल्य अंबाजोगाई पूर्व प्राथमिक शिक्षक ४० एकूण २९१

कृती संशोधन – ज्ञान प्रबोधिनी सोलापूर Read More »