असति का ऐसे कुणी?…..
बहुत असती जे यशाचे मिरविती माथी तुरे वैभवाची शीग चढता म्हणती ना केव्हा पुरे यश-सुखाची मीठ मोहर मातृमुखी ओवाळुनी मुक्त झाले जीवनी या असति का ऐसे कुणी ।। ध्रु. ।। रेखिल्या परिघात ज्यांची रमुनी गेली मनमती बहुत ऐसे घरकुलाच्या सुखद स्वप्नी रंगती होऊनी निःसंग परि जे श्रमती विजनी काननी हिंदुराष्ट्रा जे समर्पित असति का ऐसे कुणी ।। १ ।। शिंपिती फुलबाग कोणी फुलविती वनवैभवे रम्य उद्याने कुणाची गंध भरले ताटवे बांधवांच्या आर्त हृदयी मेघसे ओसंडुनी शिंपिती जे प्रेम अपुले असति का ऐसे कुणी ।। २ ।। उजळती कोणी पसा अन् उजळती अंगण कुणी उजळती देवालये अन् उजळती नगरे कुणी त्रिभुवनाला उजळणारे प्रखर ते तेजोमणी प्राणदायी जे प्रचोदक असति का ऐसे कुणी ।। ३ ।।
असति का ऐसे कुणी?….. Read More »