प्रवृत्तीपर अध्यात्म-विचारांच्या सिंचनातून राष्ट्रयोगाची साधना
आध्यात्मिक राष्ट्रयोग व्याख्यानमाला- भाग ४- प्रवृत्तीपर अध्यात्म-विचारांच्या सिंचनातून राष्ट्रयोगाची साधना https://youtu.be/gEmr9tqLM-E?si=KBv7gr15cwOz539s टीप – मा. श्री. गिरीश बापट यांच्या व्याख्यानाचे खाली दिलेले शब्दांकन स्वयंचलित पद्धतीने केलेले आहे. त्यात शुद्धलेखनाच्या व वाक्यरचनेच्या चुका असू शकतात. कृपया नोंद घ्यावी नमस्कार, आध्यात्मिक राष्ट्रयोग या व्याख्यानमालेतलं आजचं शेवटचं पुष्प आहे. मागच्या वेळचं व्याख्यान “आध्यात्मिक ते व्यावहारिक – एक सलग रेषा” या व्याख्यानानंतरही चॅट बॉक्समध्ये किंवा व्यक्तिशः काही प्रश्न आलेले नाहीयेत. त्यामुळे आजच्या भाषणाला लगेचच सुरुवात करतो. इष्ट – पंथ – संप्रदाय – धर्म – योग – आध्यात्मिक राष्ट्रयोग ‘राष्ट्रयोग’ हा शब्द वापरताना जो वेगळा विचार केलेला होता, त्याच्यामध्ये एक विचार असाही केला होता की, आपल्याकडे भारतामध्ये “इष्ट” अशी संकल्पना आहे. “इष्ट” म्हणजे प्रत्येकाचा आध्यात्मिक आदर्श आणि तो प्रत्येकाचा वेगवेगळा असू शकतो. प्रत्येकाने स्वतःचं इष्ट निवडायचं आणि त्या इष्टाची उपासना करायची, अशी कल्पना आहे. प्रत्येकाचं इष्ट वेगळं असलं तरी, तो उपासना कुठल्या पद्धतीने करणार, याचे अनेक प्रयोग झाल्यानंतर काही मार्ग निश्चित होत गेले. त्याला मार्ग किंवा पंथ असं म्हणता येईल आणि ज्ञानयोग, भक्तियोग, कर्मयोग, राजयोग असे मुख्य चार मार्ग आणि काही छोटे-छोटे इतर मार्ग अशी मार्गांची कल्पना आहे. मग इष्ट अनेक, मार्ग अनेक, प्रत्येकाने आपलं इष्ट निवडावं, आपला मार्ग निवडावा म्हणजे पद्धत निवडावी की, त्या इष्टापर्यंत कसं जायचं. पण अनेक लोकांना आपण सगळेजण एका मार्गाने चाललेलो आहोत, असं लक्षात आल्यानंतर एकत्र यावसं वाटतं आणि मग त्यातून संप्रदाय तयार होतात. मग त्यांचा स्वतःचा एखादा विशिष्ट पोशाख होतो, विशिष्ट पद्धत तयार होते, भोजनाची, भजनाची काही विशिष्ट पारिभाषिक शब्द येतात. त्यांचे काही आदर्श चरित्र ठरतात, काही वागायच्या पद्धती ठरतात, आणि त्या संप्रदायांना ठळक ओळख निर्माण होत जाते. पण इष्ट आणि मार्ग हे जास्त महत्त्वाचे. आपल्याला त्या मार्गाने जाण्यासाठी मदत होत असेल तर संप्रदायांचा उपयोग होतो. असे अनेक संप्रदाय समाजामध्ये असू शकतात, त्या सगळ्या संप्रदायांना कवेत घेणारा तो ‘धर्म’ अशी आपल्याकडची कल्पना आहे. आध्यात्मिक राष्ट्र्ययोग आध्यात्मिक ते व्यावहारिक सलग रेषा असं म्हटलं की, त्याच्यानंतर आपल्या इष्टापर्यंत पोहोचण्यासाठी ‘राष्ट्र’ हे एक सामुदायिक इष्ट सगळ्यांचे होऊ शकतं, अशी कल्पना विवेकानंदांनी मांडली. तुम्हाला व्यक्तिगत आपापल्या घरी पाहिजे त्या इष्टाची पूजा करा, परंतु सगळेजण बाहेर याल तेव्हा मातृभूमी हेच आपलं दैवत, हेच आपलं इष्ट असू द्या, सामुदायिक इष्ट असू द्या, अशी कल्पना मांडली. आणि म्हणून सगळे ज्ञानयोग, भक्तियोग, कर्मयोग यासारखाच ‘राष्ट्रयोग’ असा शब्द वापरावा असं सुचलं. आज ज्याच्या संबंधी बोलायचे ते म्हणजे आध्यात्मिक राष्ट्रयोग. त्याच्यामध्ये काय काय येतं, मुख्यतः त्याच्यात कुठल्या प्रकारचा आचार येतो आणि तो का करायचा याच्या संबंधी बोलायचं आहे. मग असा राष्ट्रयोगाचा आचरण कुठे होतंय, असा शोध घेतल्यानंतर मला असं वाटलं की, दूर कुठे जाण्यापेक्षा ज्ञानप्रबोधिनीतच या राष्ट्रयोगाचा आचरण कसं होतंय, याचा शोध घ्यावा आणि हा सगळ्यांच्या समोर मांडावा, असा विचार करायला सुरुवात केली. पथकाधिपती आणि साधन-साध्य/उद्धिष्ट मांडणी सगळ्यात पहिल्यांदा काय लक्षात आलं, की असा हा राष्ट्रयोग ज्ञानप्रबोधिनीच्या आधी कोणी मांडलाय का, वेगळ्या पद्धतीने त्या त्या काळाच्या परिभाषेमध्ये. आणि मग त्यांना विचारून आपण आपलं राष्ट्रयोगाचे आचरण करतोय का, आपल्याला काहीतरी स्वतंत्र सुचलंय. तर, अर्थातच मग प्रबोधिनीने जे आदर्श राष्ट्रपुरुष म्हणून स्वीकारलेले आहेत, त्यांची नावे डोळ्यासमोर येतात. त्याची गंमत अशी आहे की, हे प्रबोधिनीचे आदर्श राष्ट्रपुरुष म्हणून आपण नंतर प्रकटपणे मांडायला सुरुवात केली. सुरुवातीला ही चार नावे ज्ञानप्रबोधिनीची पुण्यातली प्रशाला सुरू झाल्यानंतर आप्पांचे नेतृत्व विकसनाचे प्रयोग सगळे पीएचडीच्या निमित्ताने अभ्यासून झालेले होते. त्याच्यात शाळेमध्ये कुलपद्धती किंवा पथक पद्धती असेल, तर त्यातून काही जणांना नेतृत्वाची संधी मिळते. आणि मग त्या पथकांना नाव काय असावं, तर ज्या नावातून काहीतरी स्फूर्ती मिळेल, प्रेरणा मिळेल, मार्गदर्शन मिळेल, अशी नावं असावीत. अशा कल्पनेतून आप्पांनी काही नावं काढली होती, त्यामध्ये नेहरूंचं, सावरकरांचं, नेताजी सुभाषचंद्र बोसांचं, जमशेदजी टाटांचे नाव होतं. अर्थातच ही नंतरची नावं निश्चित झाली – रामदास, दयानंद, विवेकानंद, अरविंद ही सगळी नावं निश्चित झाली. आणि मग आता या नावांमधून चार नावांची निश्चिती करताना, निवड करताना काहीतरी निकष लावले पाहिजेत. त्यात निकष लावले ते हे … सगळे पथकाधिपती जे निवडायचे, ते द्रष्टे म्हणजे राष्ट्रद्रष्टे असले पाहिजेत, आणि अर्थातच ब्रह्मद्रष्टे सुद्धा असले पाहिजेत. संन्यस्त वृत्तीचे असले पाहिजेत. संन्यासी असे म्हणायला हरकत नाही; पण रामदास आणि अरविंदांनी विधिवत संन्यास घेतलेला नव्हता. त्यामुळे संन्यस्त वृत्तीचे असे म्हणतो. तर अशा आदर्श राष्ट्रपुरुषांची, पथकाधिपतींची निवड करताना ते राष्ट्र राष्ट्रद्रष्टे असले पाहिजेत आणि संन्यस्त वृत्तीचे असले पाहिजेत, हे त्यांच्या निवडीसाठी निकष होते. मग या चौघांनी समान काय सांगितलेलं आहे, म्हणजे आणखीन नावांची भर घालायची झाली, निवड करायची झाली, तर मग हे पुढचे निकष सुद्धा विचारात घेता येतील. या चौघांनी विकसित व्यक्ती कशी असली पाहिजे, हे सांगितलेलं आहे. संघटक कसा असला पाहिजे, हे सांगितलेलं आहे. देशव्यापी संघटनेची आवश्यकता ही त्यांनी मांडलेली आहे आणि धर्मसंस्थापना हे उद्दिष्ट त्यांनी मांडलेले आहे. विकसित व्यक्तींनी संघटित होऊन किंवा अशा विकसित व्यक्तींना संघटित करून, अशी देशव्यापी संघटना करून काय करायचे? तर धर्मसंस्थापना करायची, हे उद्दिष्ट त्यांनी मांडलेले आहे. रामदासांनी धर्मसंस्थापना शब्द वापरलेला आहे. विवेकानंदांनी वापरलाय, दयानंदांनी वापरलाय, अरविंद त्यांच्या परिभाषेमध्ये धर्मसंस्थापना करायची म्हणजे काय करायचं? तर अतिमानस शक्तीचं अवतरण झालं पाहिजे. त्याच्यातून आजचा माणूस हा आणखीन विकसित देवमानव झाला पाहिजे आणि अशा देव मानवांचा समाज तयार झाला पाहिजे, अशी कल्पना वाढलेली आहे. प्रबोधिनीच्या संस्थापकांनी, म्हणजे आप्पांनी त्यांच्या प्रतिभेने या सगळ्याचे वर्णन “अतिमानस शक्ती अवतरो मानवतेमध्ये” अशा मंत्रांमध्ये केलेले आहे. हा मंत्र अजून कधी आपण उपासनेमध्ये म्हटलेला नाही. पण “माताजी अरविंद काय म्हणाले” हे पुस्तक आपण केले. त्याच्यात “अतिमानस शक्ती अवतरो मानवतेमध्ये” अशा मंत्राचा उल्लेख मुखपृष्ठावर आणि या प्रस्तावनेमध्ये सुद्धा केलेला आहे. पण ही खूप पुढची गोष्ट आहे. याच्या आधी काय करायला पाहिजे? तर त्या पूर्वी “परब्रह्मशक्ती स्फुरो हिंदुत्वामध्ये” हा मंत्र म्हटला पाहिजे. …’परब्रह्मशक्ती स्फुरो हिंदुत्वामध्ये’ हा मंत्र म्हटला पाहिजे म्हणजे काय तर हिंदू समाजामध्ये संघटना निर्माण व्हावी, हिंदू समाजातला पराक्रम वाढावा. हिंदू समाजातल्या सगळ्यांना स्वतःमधल्या आणि इतरांमधल्या ईश्वरी शक्तीची जाणीव व्हावी. हिंदू समाजाला, आपल्याला ही जी जाणीव झालेली आहे, ती सगळ्या जगाला करून देण्याची, विश्वविजयाची प्रेरणा निर्माण व्हावी, असं संघटना, पराक्रम, ईश्वरी शक्तीची जाणीव आणि विश्वविजयाची प्रेरणा ही हिंदू समाजातली वाढली, म्हणजे परब्रह्मशक्तीचे स्फुरण झालं, असं म्हटलेलं आहे. हे जर का व्हायचं असेल हिंदू समाजामध्ये, तर हे कोणी करायचं? तर हे ‘प्रबोधिनी’ या संघटनेने करायचं. आणि त्याच्यासाठी त्यापूर्वी सुद्धा ‘परब्रह्मशक्ती प्रबोधिनीमध्ये’ अशाही मंत्राची रचना केली. परब्रह्म शक्तीचे स्मरण प्रबोधिनीमध्ये व्हावं म्हणजे काय व्हावं तर प्रबोधिनीचा विस्तार अखिल भारतीय व्हावा. इथे प्रबोधिनी या संघटनेतल्या सगळ्या व्यक्तींमध्ये प्रतिभाशक्ती वाढावी. त्यांनी विज्ञानाचा उपयोग करावा, विज्ञानाची कास धरावी, वेदांत तत्वज्ञानाचा अभ्यास त्यांनी करावा, आपली नेतृत्वशक्ती वाढवावी, संघटना करावी, व्यक्तिगत आणि सामूहिक पराक्रम करावा. हे सगळं करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी. जे हिंदुत्वामध्ये आलं पाहिजे, ते आलंच पाहिजे: संघटना, पराक्रम, ईश्वरी शक्तीची जाणीव आणि विश्वविजयाची प्रेरणा. पण त्याच्यासाठी प्रबोधिनीने
प्रवृत्तीपर अध्यात्म-विचारांच्या सिंचनातून राष्ट्रयोगाची साधना Read More »