अध्यात्म ते व्यवहार- एक सलग रेषा

आध्यात्मिक राष्ट्रयोग व्याख्यानमाला - भाग ३ - अध्यात्म ते व्यवहार- एक सलग रेषा

टीप – मा. श्री. गिरीश बापट यांच्या व्याख्यानाचे खाली दिलेले शब्दांकन स्वयंचलित पद्धतीने केलेले आहे. त्यात शुद्धलेखनाच्या व वाक्यरचनेच्या चुका असू शकतात. कृपया नोंद घ्यावी

 पहिला पुष्प जे होतं ते    राष्ट्र योगाची  संकल्पना या विषयावरती होतं. आणि त्याच्यामध्ये मुख्यतः राष्ट्रयोग म्हणजे राष्ट्र निर्माणात आपण सर्वांनी आपलं चित्त एकाग्र करणे अशी संकल्पना मांडलेली होती. दुसऱ्या    व्याख्यानामध्ये राष्ट्र निर्माण झालं तर  ते राष्ट्र टिकलं पाहिजे राष्ट्राचा निर्वाह चालू पाहिजे. त्यामुळे राष्ट्राच्या निर्वाहासाठी सामाजिक क्षेत्रात, तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात, आर्थिक  क्षेत्रात, पर्यावरणाच्या बाबतीत,    राजकारणाच्या बाबतीत, कायद्यांच्या बाबतीत,    लोकसंख्येच्या वयोगटांचा विचार कसा करायचा,    कालमानानुसार हे कसं करायचं, या सगळ्याचा    म्हणजे राष्ट्रयोगाचा व्यवहार याच्या संबंधी आपण बोललेलो    होतो. आणि आता आजचा विषय    व्यवहार ते अध्यात्म ही एक सलग रेषा कशी आहे? किंवा शीर्षकात म्हटले तसा अध्यात्म ते व्यवहार एक सलग रेषा कशी आहे? हे आज आपण बघणार आहोत . म्हणजे नंतर अध्यात्मिक राष्ट्रयोग त्याच्या संबंधी आपल्याला    आणखीन तपशीलात बोलता येईल.

भौतिक समृद्धी आणि आध्यात्मिक  प्रगती  एकत्र जाऊ शकते

अध्यात्म ते व्यवहार ही सलग रेषा असा विचार करायला सुरुवात केली की मला भगवद्गीतेची आठवण होते. भगवद्गीते मध्ये अर्जुन आणि श्रीकृष्णाच्या मधला संवाद आहे. अर्जुन हे व्यवहाराचे प्रतीक आहे आणि श्रीकृष्ण हे अध्यात्माचे प्रतीक आहे. आणि भगवद्गीतेच्या शेवटी असं म्हटलंय   

यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः। तत्र श्रीः-विजयो-भूतिः-ध्रुवानीतिः मतिःमम ||

गीतेचा समारोप म्हणूनअसं संजय  धृतराष्ट्रांना सांगतो  की जिथे योगेश्वर कृष्ण आहे आणि धनुर्धर अर्जुन आहे तर तिथे श्री: म्हणजे समृद्धी, विजय म्हणजे  यश, इतर वेळी भूती म्हणजे श्री किंवा समृद्धी असाच अर्थ घेतात. पण इथे हे    एकत्र आलेले आहेत त्यामुळे विशेष प्रकारची समृद्धी त्याच आपल्याला वर्णन कल्याण सर्वांचं कल्याणकारी राज्य असं करता येईल. आणि ध्रुव: नीती म्हणजे सर्वांचे सतत नैतिक आचरण जिथे चालू असते  असं राज्य तिथे तयार होईल. असं म्हटलेलं आहे. आता समृद्धी, यश, कल्याण किंवा नैतिक आचरण हे चारही शब्द जर  पाहिले तर त्याच्यामध्ये अध्यात्म हा शब्द कुठे आहे ?आणि मग श्रीकृष्णांनी अर्जुनाला तर अनेक वेळा तू योगी हो! तू योगी हो! तू योगी हो! असं    म्हटलेलं आहे. आणि योगी हो म्हणजे योगाचा आचरण करून प्रत्यक्ष जे परमतत्व आहे त्याचा    अनुभव घे असं सांगितलेले आहे. तेही सांगितले आणि युद्ध केलंस तर हे तुला सगळं मिळेल म्हणजे एकाच व्यक्तीला या दोन्ही गोष्टी मिळवणे शक्य आहे असं    गीतेमध्ये दिसतं. आणि हे फक्त शेवटच्या  अठराव्या अध्यायात नाही,  तर दुसऱ्या अध्यायामध्ये   हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम्  असं श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात. जिंकलास तर तुला स्वर्ग मिळेल आणि    जिंकलास तर पृथ्वीचा राज्य मिळेल, त्याचा  उपभोग तू घेशील . मग अकराव्या अध्यायात पुन्हा   गीता 11.33: तस्मात्मुत्तिष्ठ यशो लभस्व जित्वा शत्रुन् भुंक्ष्व राज्यं समृद्धम्  असं म्हटलेलं. आता तू उठ आणि यश मिळव शत्रूंना जिंक. त्यांच्यावरती विजय मिळव  आणि समृद्ध राज्याचा उपभोग    घे. आणि सोळाव्या अध्यायात दैवी संपत्तीचे वर्णन केल्यानंतर असं    सांगितलेले ,  ही सगळी दैवी संपत्ती मोक्षाला सहाय्यक ठरते आणि असुरी संपत्ती बंधनात घालते. पण तू काही काळजी करू नकोस मा शुच:,  सम्पदं दैवीमभिजातोऽसि पाण्डव  दैवी संपत्ती घेऊन  जन्माला आलेला पांडव आहेस, म्हणजे मोक्षाचा    अधिकारी आहेस, म्हणजे हा अध्यात्मिक अनुभव  घेण्याचा तू अधिकारी आहेस असं सांगितलेले. म्हणजे एकाच वेळी तू सगळं यश मिळव, समृद्धी मिळव, शत्रूंना जिंक कल्याण कर  सगळ्यांचं आणि असं राज्यामध्ये सगळ्यांचे    सतत नैतिक आचरण चालू राहील असे सगळं सांगितलेलं आहे आणि तू मोक्षाचा अधिकारी  आहेस असेही सांगितलेलं  आहे तर भौतिक समृद्धी आणि आध्यात्मिक  प्रगती हे एकत्र जाऊ शकते असं हे श्रीकृष्णांनी अर्जुनाला जो उपदेश केलेला    आहे त्याच्यावरून आपल्या लक्षात येतं .

अध्यात्म कल्पना विकसन

   अध्यात्म हा शब्द  आहे   त्याचं काही जणांना विलक्षण आकर्षण असतं आणि काही जणांना त्याची भीती असते  किंवा ऍलर्जी असते. नको आपल्याला त्याचा काही संबंध. आणि याचं कारण अध्यात्म हा शब्द आज वापरला जातो तो    वेगळ्या अर्थाने वापरला जातो.  तो वापरायला सुरुवात झाली ती वेगळ्या अर्थाने झाली आणि त्या अर्थात कशी प्रगती होत गेली असं आपण पाहिलं तर मग त्याची भीती किंवा विशेष आकर्षण वाटायचं काही कारण नाही. संस्कृत मधलं आत्मन हे सर्वनाम म्हणजे    “स्वतः”. अध्यात्म म्हणजे स्वतः संबंधी. स्वतःच खरं रूप ओळखण्यास स्वतःचे कुठल पहिलं रूप /आपल्याला दिसतं तर आपलं शरीर, मी म्हणजे शरीर. तैत्तिरीय उपनिषद म्हणून एक आहे. त्याच्यातलं पहिलं प्रकरण शिक्षावल्ली. आणि शिक्षा म्हणजे    वेदांचा उच्चार शास्त्र. तर त्याच्या संबंधी वर्णन करताना असं सांगितलं की आता उच्चार शास्त्राच अध्यात्म काय? तर वरचा जबडा खालचा जबडा दोन्हीच्या मधली जीभ आणि यांची    व्यवस्थित हालचाल झाली की वाणी निर्माण होते. हे उच्चार शास्त्राच अध्यात्म  असं    म्हटलेलं आहे. तर पूर्वीची जी कल्पना होती ती जे काही निर्माण झालेले त्याला भूत असा  शब्द होता आणि जे सगळं निर्माण झालेला आहे    जग त्या भूता संबंधी अधिभूत असा शब्द होता. त्या सगळ्या निर्माण झालेल्यातला मी वेगळा त्याच्यासाठी अध्यात्म असा शब्द    होता आणि आपल्या इंद्रियांना कळते जाणवते ते भूत सगळं आणि जे आपल्याला कळत नाही काय होते कसं होते त्याच्यासाठी दैव असा शब्द    वापरला जातो त्यामुळे अधिभूत अधिदैव आणि अध्यात्म असे शब्द होते. याचा पूर्वीचा पारंपारिक अर्थ लक्षात घ्यायचा असेल तर त्रिविध ताप म्हणून जे वर्णन केलेले आहेत की तीन प्रकारचे ताप लोकांना होतात. त्रास होतो आणि ते तिन्ही    प्रकारच्या ता तापाने जो पोळून  निघालेला आहे तो मग खऱ्या मोक्षाचा अधिकारी बनतो, अशी    पूर्वीची कल्पना. तर त्याच्यामध्ये आध्यात्मिक ताप  म्हणजे काय तर आपल्या शरीराच्या आतून निर्माण होणारे सगळे आजार आधी व्याधी सगळे ज्याला म्हणतात ते सगळे आध्यात्मिक ताप. बाहेरून    आपल्याला कोणीतरी येऊन    मारतं, सोसाट्याचा वारा येतो, वीज अंगावर कोसळते, पाण्यात आपण वाहून जातो, आगीत भाजतं  हे सगळे आधिभौतिक  ताप आणि आधिदैविक ताप म्हणजे काय म्हटले तर जे मृत्यूनंतर    तुम्हाला नरकामध्ये भोगावे लागतात. त्या आधीभौतिक ताप गुणिले शंभर    असं त्याचं सगळ्या आधिदैविक तापाचे वर्णन केलेले आहे.  जसं जसं कळत गेलं की निसर्गातल्या सगळ्या    शक्ती काय काय आहेत तर ज्याला आधी आधीदैविक ताप म्हटलं होतं ते आधिभौतिक    तापामध्ये येत गेले. आपल्या शरीराचे ज्ञान होत गेलं तर तसं आध्यात्मिक ताप सुद्धा अनेक  या वेगळ्या जंतूंमुळे होतात. मग ते जंतू हे आपल्यापेक्षा वेगळे त्यामुळे ते आधिभौतिक ताप. असं करत करत करत मी या शरीराच्या  पलीकडे आहे असं लक्षात येत गेलं. ज्या तैत्तिरीय उपनिषदामध्ये हे सुरुवातीला वरचा जबडा खालचा जबडा वगैरे म्हटलेले आहे त्याच्या  थोडं पुढे आणखीन आणखीन वर्णन करताना मग अध्यात्म म्हणून पुन्हा जे वर्णन केलेलं  आहे,  त्याच्यात पाच ज्ञानेंद्रिय पाच, कर्मेंद्रिय आणि पंचप्राण हे सगळं मिळून अध्यात्म असं म्हटलेलं आहे. इतरही दोन तीन  उपनिषद आहेत. त्याच्यामध्ये अशाच पद्धतीचं वर्णन केलेलं आहे की आता अधिभूताबद्दल बोलून झालं आता अध्यात्माबद्दल बोलतो. आणि  मग आपल्या शरीरातल्या सगळ्या अनेक गोष्टींमध्ये काय काय बदल होऊ शकतात त्या  सगळ्याच्या यादीच्या यादी त्याच्यामध्ये.  मास आहे, त्वचा    आहे, हाडं आहेत सगळ्याचा उल्लेख आहे. हे सगळं म्हणजे अध्यात्म. तर स्वतः संबंधीचा विचार करत असताना त्यातल्या अनेक गोष्टी या अभिभूत म्हणता येतील अशा आहेत. त्यामुळे  मी म्हणजे हे शरीर नाही त्याच्यापेक्षा आतमध्ये काहीतरी आहे असा विचार करत  करत मग अन्नमय, प्राणमय. मनोमय, विज्ञानमय,  आनंदमय आणि त्याच्या आतला आत्मा त्याच्या  संबंधीचा विचार म्हणजे अध्यात्म अशी अध्यात्म कल्पना विकसित होत गेलेली आहे.

अध्यात्म आणि व्यवहार ही एक सलग रेषा

 उपनिषदांमध्ये जेव्हा तुम्हाला हे आपलं आत्मतत्व काय आहे  हे कळतं, त्याचा अनुभव होतो, त्याच्यानंतर काय होतं तर तुम्हाला संततीचे सुख मिळतं. तुम्हाला भरपूर पशुधन मिळतं. कारण तेव्हा संपत्ती मोजायचा तो मार्ग होता. भरपूर अन्न मिळतं. कीर्ती मिळते. स्वर्गही मिळतो आणि तुमच्यामध्ये ब्रह्म तेज प्रगट होतं. असं सगळं सांगितलेलं आहे. त्यामुळे आत्म्याची ओळख झाली म्हणजे  व्यवहार सुटत नाही. व्यवहारात ज्याला लोक संपत्ती म्हणतात, समृद्धी म्हणतात, ती सगळी नंतरही मिळते. आणि त्याच्यामुळे अध्यात्म आणि व्यवहार ही एक सलग रेषा आहे. तुम्ही व्यवहारापासून सुरुवात करता आणि हळूहळू अध्यात्माकडे जाता अशी आपल्याला कल्पना करायला हरकत नाही.

राष्ट्रवादाला छेद देणाऱ्या विचारसरणी

मागच्या एक दोन व्याख्यानांमध्ये मी राष्ट्रवादाला छेद देणाऱ्या विचारसरणी, विचारधारा असा उल्लेख  केलेला होता. त्याच्यात पर्यावरणीय स्त्रीवाद असा एक सांगितला की “ही पुरुषी संस्कृती आहे. ते    पर्यावरणाचे शोषण करतात आणि स्त्रियांचे शोषण करतात त्यामुळे स्त्रियांचा आणि पर्यावरणाचा    एकत्र विचार करून ते शोषण थांबवलं पाहिजे“. त्याच्यामधली घेण्यासारखी कल्पना  काय? म्हणजे हे राष्ट्र विचाराला छेद  देणारी आहे कारण हे सगळं स्थानिक पातळीवरती विचार होतो राष्ट्राचा विचार त्याच्यात कमी होतो. पण घेण्यासारखी कल्पना काय? तर आज ज्याला आपण विकास विकास म्हणतो, तसा विकास शाश्वत होणे शक्य नाही असे या पर्यावरणीय स्त्रीवादामध्ये म्हटलेले आहे. प्रत्येकाच्या गरजेपुरत मिळेल प्रत्येकाची हाव पूर्ण इतक्या करण्या इतका मिळणार नाही. असं गांधीजींनी म्हटलेले तेच वेगळ्या पद्धतीने यांनी म्हटलेले की, शाश्वत निर्वाहाचा विचार करता येईल आपल्याला ते सुद्धा लोकसंख्या तुम्ही मर्यादेत ठेवली तर. पण मग शाश्वत निर्वाहाचा विचार आपण    करायला लागलो की मग आज सगळे जे विकासाच्या, भौतिक विकासाच्या मागे लागलो, त्यात सुखसोयीचे साधन निर्माण होतात, त्याचं काय? असा प्रश्न येतो.   

तर दुसरी विचारधारा सखोल पर्यावरणवाद अशी मी म्हटलेली होती. त्यांनी असं म्हटलेले की माणूस काही निसर्गातला काही विशेष कोणी नाही. निसर्गाचा एक घटक आहे. आणि सगळ्या निसर्गाचा एकत्र विचार करायला पाहिजे आपल्याला त्यामुळे माझं स्टॅंडर्ड ऑफ लिविंग कसं वाढेल? माझं राहणीमान कसं वाढेल? असा तुम्ही विचार करायला लागलात आणि  ते सुद्धा कॉस्ट ऑफ लिविंग इंडेक्स तुम्ही स्टॅंडर्ड ऑफ लिविंग मोजायला जर का लागलात त्याच्यातनं तुम्ही काय काय घेऊ शकता? त्याला फिजिकल क्वालिटी ऑफ लाईफ इंडेक्स असे शब्द वापरतात तर ते काही शक्य नाही. माणूस स्वतःचे नाश करून घेईल आणि पर्यावरणाचे नाश करेल त्यामुळे स्टॅंडर्ड    ऑफ लिविंग चा विचार करायच्या ऐवजी क्वालिटी ऑफ लाईफ चा विचार केला पाहिजे.    आणि ती फक्त फिजिकल क्वालिटी ऑफ लाईफ नाही तर ती इमोशनल क्वालिटी ऑफ लाईफ, सोशल क्वालिटी ऑफ लाइफ, स्पिरिचुअल क्वालिटी ऑफ लाइफ या सगळ्याचा विचार करायला पाहिजे असं या सखोल पर्यावरण वादामध्ये म्हटलेले आहे. त्यामुळे अध्यात्म म्हणजे स्वतःचे शरीर    याच्यापासून अध्यात्म जसं शरीराच्या  आतमध्ये आणखीन काहीतरी असा विचार करत गेल, तसं विकास म्हणजे काय तर फक्त शरीराची भौतिक सुखसोय वाढवणे म्हणजे विकास का आणखीन काही? राहणीमान वाढवायचे का जीवनमान जीवनाची गुणवत्ता वाढवायची? याचा विचार आपल्याला करायला पाहिजे आणि मग हा जेव्हा विचार येतो तेव्हा मला पूर्वीचा एक माझा लेख आठवला. उत्तमतेचा सोपान असा मी एक लेख लिहिलेला होता. त्याच्यामध्ये उत्तमता म्हणजे काय अशी  यादी म्हटलेली होती.  ज्याला लोक उत्तमता म्हणतात ते उत्तमता म्हणजे स्वच्छता, उत्तमता म्हणजे सौंदर्य दृष्टी, उत्तमता म्हणजे भेसळ नसलेली शुद्धता, उत्तमता म्हणजे शब्द पाळणे, उत्तमता म्हणजे वेळ पाळणे, उत्तमता म्हणजे अचूकता, तत्परता, तपशीलवार नियोजन, उत्तमता म्हणजे प्रत्येक संभाव्य अडचणीवर आधी शोधून ठेवलेले उत्तर, उत्तमता म्हणजे कमीत कमी वेळात काम करणे, उत्तमता म्हणजे कामगिरीतले सातत्य, प्रयोगशीलता, नवीन कल्पनांचे स्वागत, यंत्रणा ठप्प होण्यापूर्वीच देखभालीची व्यवस्था असणे उत्तम, उत्तमता म्हणजे सतत प्रशिक्षण, उत्तमता म्हणजे प्रत्येक कामाला पर्यायी व्यक्ती तयार होणे असं आज ज्याला  लोक उत्तमता म्हणतात त्या या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात आणि मग करुणा  म्हणजे काय अशी एक यादी पुन्हा त्याच्यामध्ये म्हटलेली होती की करुणा म्हणजे सामाजिक जाणीव, करुणा म्हणजे  इतरांच्या अडचणीने अस्वस्थ होणे, करुणा    म्हणजे आपल्या वाटचे इतरांसाठी सोडणे, करुणा म्हणजे संवेदनशीलता, करुणा म्हणजे इतरांसाठीची धडपड, इतरांच्या दुःखाने स्वतः दुःखी होणे.,इतरांच्या प्रश्नाने स्वतः  कासाविणे, करुणा म्हणजे बहुतालचे दारिद्र्य, अज्ञान, दुर्बलता, असहायता, पाहून कळवळा येणे. करुणा म्हणजे रांगेच्या शेवटी जाऊन थांबण्याची तयारी असणे, करुणा म्हणजे स्वतः उभे राहून इतरांना बसायला देणे करुणा म्हणजे रुग्णाची सेवा, करुणा म्हणजे जे भीतीने बोलत नाहीत त्यांच्या मनातले ओळखणे,    करुणा म्हणजे हातातले काम सोडून मदतीला,  करुणा म्हणजे अन्यायाला वाचा फोडणे, करुणा    म्हणजे अन्यायाविरुद्ध उभे राहणे, करुणा  म्हणजे  इतरांच्या हितसुखामध्ये    स्वतःचे हितसुख भोगणे असं करुणाचे वर्णन केलेलं होतं आणि याच्यापेक्षा सुद्धा जास्ती प्रभावी वर्णन अनेक जण करू    शकते.

उत्तमता, करुणा या दोन्हीची सांगड

आता या दोन्हीची सांगड येईल का?  उत्तमता आहे तो सगळा रोकडा व्यवहार आहे आणि त्या प्रकारची उत्तमता आपल्याला  अनेक ठिकाणी दिसत असते. तिचे आपल्याला आकर्षण असतं, हवी हवीशी वाटते. पण मग याच्यापेक्षा श्रेष्ठ व्यवहार काही असू शकतो का? समाजाच्या हितासाठी एखादा मोठा प्रकल्प उभा करायचा. मोठा प्रकल्प उभा करणे आणि तो उभा    झालेला पाहणं काहीतरी आपल्याला छान उत्तम झालं असं वाटतं. पण या प्रकल्पामध्ये ज्यांची जमीन जाणार आहे ज्यांची घर जाणार आहेत, तर प्रकल्पाला सुरुवात होण्यापूर्वीच त्यांचं पर्यायी जागा मिळून पुनर्वसन झालेल असेल आणि मग प्रकल्प झाला तर मग ही उत्तमता ही जास्ती समंजस    उत्तमता आहे. असं पण याच्यापेक्षा सुद्धा आणखीन काही वेगळं असतं का तर पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या आयुष्यावर जी कादंबरी आहे देह झाला चंदनाचा त्याच्यामध्ये एक प्रसंग आहे. ठाण्याजवळ त्यांनी तत्वज्ञान विद्यापीठ उभे करण्यासाठी जागा घेतली. मोठा परिसर होता. आणि त्या जागेला कुंपण घालण्याचे काम चालू होतं. आणि मग ते काम सुरू झाल्यावर लक्षात आलं की त्या जागेतून बरोबर पलीकडच्या टेकडीवर जे वनवासी राहत आहेत त्यांची येण्याजाण्याची वाट आहे. अनेकांनी पांडुरंग शास्त्रींना सांगितलं की तुम्ही आता हे विकत घेतलेले. तुमच्या नावावरती जमीन आहे. लोकांना पलीकडून जायला सांगितलं. तुम्ही कुंपण घालू शकता.  पांडुरंग शास्त्री आठवले म्हणाले की कुंपण घालू पण दोन्ही बाजूला दार ठेवू  आपण आणि या लोकांना त्याच वाटेने जाता    येता येईल अशी व्यवस्था करू. हे वाचल्यानंतर तत्वज्ञान विद्यापीठ पाहायला जायचा योग आला. मी ते प्रत्यक्ष  पाहून आलो. आता ही श्रेष्ठ उत्तमता आहे असं मला वाटतं. की जे स्वतःच्या हक्काचा आहे ते इतरांच्या वहिवाटीचे जे होतं त्याला धक्का न लावता सुद्धा आपल्याला कसं वापरता येईल? असा विचार करणे ही श्रेष्ठ उत्तमता. इथे जीवनाची गुणवत्ता, क्वालिटी ऑफ लाईफ वाढते. हे एका व्यक्तीच्या बाबतीत शक्य आहे. गटाच्या बाबतीत संस्थेच्या बाबतीत शक्य होतं का? मला प्रबोधिनीतला प्रसंग आठवला. प्रबोधिनीला साधारण ७३-७४  साली शिवापूरला शासनाकडून दहा एकर जागा बक्षीस म्हणून मिळाल्या आणि मग पुन्हा पांडुरंग शास्त्री आठवले यांचा जसं, तसं त्या जागेला कुंपण घालायचा प्रश्न निर्माण झाला. दोन कार्यकर्ते त्या कामावरती होते. एकाने शिवापूर ते रांझे रस्ता त्या जागेतून जात होता त्या रांझ्याच्या लोकांशी बोलायला सुरुवात केली. आणि दुसरे कडक शिस्तीचे. ठरलं म्हणजे ठरलं लगेच कामाला सुरुवात. असं म्हणून त्यांनी कुंपण घालायला सुरुवात केली. आणि गावकरी आडले. वादाचा प्रसंग निर्माण झाला. आधी सामोपचाराने कदाचित ते रस्ता बाजूने काढायला तयार झाले असते ते अडून राहिले. आणि मग ती दहा एकर जमीन असताना त्या  जमिनीचे दोन तुकडे झाले एक अगदी छोटासा त्रिकोण बाजूला मधून रस्ता आणि मग उरलेली    सगळी जागा आणि अशी दोन स्वतंत्र  तुकड्यांना मग कुंपण घातलं आपण आणि आता  पन्नास वर्ष ते कुंपण सुरक्षित आहे. पण मला तेव्हाचे संवाद, हा निर्णय कोणी कसा घेतला मला काय आठवते. तेव्हा मी लहान होतो, पण  संवाद आठवतोय.की असं झालं तरी आपल्या सगळ्या    कार्यकर्त्यांमध्ये    असंतोष. म्हणजे मी कुंपण घालायला निघालेलो होतो ते घालून झालं असतं. त्याच्या आत मला थांबवलं म्हणून एकाचा असंतोष. मी चांगलं गावकऱ्यांशी बोलत होतो. त्याच्या आतच हे असं कशासाठी केलं, बाजूने रस्ता काढला असता त्याचा असंतोष. म्हणजे गटाच्या बाबतीत एकाने निर्णय घेणे ही समंजस किंवा श्रेष्ठ उत्तमता दाखवणं आणि बाकीच्या सगळ्या गटापर्यंत ते न पोहोचणे, न समजणे. त्या गटाला याच्यामुळे मग अस्वस्थता राहते. आणि एका व्यक्तीचे कदाचित ते तत्वाप्रमाणे    वागणं होतं. पण बाकीच्या गटाला मात्र हे काहीतरी अव्यवहारी झालं असं वाटू शकतं. किंवा काही जणांना बरं झालं तडजोडीने प्रश्न मिटला असं वाटू शकतं. पण असमाधान तर तडजोडीचं त्याच्यामध्ये असतं थोडसं.

व्यक्तीच्या बाबतीत श्रेष्ठ उत्तमता सद्गुण वाटू शकतो तो राष्ट्राच्या बाबतीत दुर्गुण सुद्धा वाटू शकतो

आणि अगदी मोठं टोका उदाहरण मला एकदम सुचते. याच्यापेक्षा चांगलं उदाहरण सुचू शकेल इतरांना. पण भारताची फाळणी झाली. भारताच्या वाट्याचे इंग्लंडकडे असलेला  निधी किती? पाकिस्तानच्या वाटेचा इंग्लंड कडे असलेला निधी किती? आणि मग ते असं दिसलं की ते भारताकडे ५५ कोटी जास्ती होते की जे  पाकिस्तानला द्यायला पाहिजे. आता हे ५५ कोटी आपण पाकिस्तानचे तर आपण देऊन टाकूया. आपल्याकडे नको ते. ही भूमिका अगदी योग्य आहे. पण आपण इतके शांत चांगले उत्तम रीतीने वागतोय पण पाकिस्तान तसं वागत नाही, कुरापती काढतोय. तर त्यांनी निर्माण केलेले सगळे सीमेवरचे प्रश्न,    घुसखोरी सगळे आपण  थांबवूया आणि मग हे ५५ कोटी त्यांना देऊया असं राज्यकर्त्यांचे म्हणणं. ५५ कोटी लगेच दिले पाहिजे असं गांधीजींचे म्हणणं. आणि गांधीजींचे नैतिक तेव्हा वजन एवढं होतं की    शेवटी आपल्या राज्यकर्त्यांना मान्य करून  ते ५५ कोटी द्यावे लागले. बाकीच्या बऱ्याच समाजाला हे काही कळलंच नाही, काय नेमकं झालं? ते ज्यांना कोणाला कळलं त्या सगळ्यांना असमाधान. गांधीजी असा निर्णय का घेतात ते  शासनातल्या नेत्यांनाही कळलं नाही. पण गांधीजी आता असं म्हणतात तर काय करणार आपण? म्हणजे एका व्यक्तीला वाटलं की मी तत्वाप्रमाणे वागलं पाहिजे, श्रेष्ठ आचार माझा दिसला पाहिजे. पण तो जर का त्या गटाचे प्रतिनिधित्व करत असेल तर गटाला सुद्धा ते समजेपर्यंत त्याला थांबावं लागतं .गटाला ते समजून देण्याची व्यवस्था काहीतरी करावी लागते आणि त्यामुळे व्यक्ती ते राष्ट्र असा जेव्हा  आपण विचार  करतो तेव्हा व्यक्तीच्या बाबतीत श्रेष्ठ उत्तमता सद्गुण वाटू शकतो तो राष्ट्राच्या बाबतीत दुर्गुण सुद्धा वाटू शकतो    सावरकरांनी त्याला सद्गुण विकृती असा शब्द वापरलेला आहे आपण सद्गुण अविवेक असं  म्हणूया. म्हणजे व्यक्तीसाठी जो विवेक कदाचित योग्य असेल, की हे मी माझ्या तत्वाप्रमाणे वागलो. पण मात्र तो अविवेक झाला कारण राष्ट्रातल्या बऱ्याच घटकांना कळलंच नाही काय, कशासाठी करतोय ते? त्यामुळे व्यक्ती ते राष्ट्र ही सुद्धा  एक अखंड साखळी आहे. व्यवहार ते अध्यात्म ही सुद्धा एक अखंड साखळी आहे आणि व्यक्तीच्या बाबतीत जे अतिशय योग्य वागणं, आध्यात्मिक वागणं असू शकेल ते राष्ट्राच्या बाबतीत   व्यवहारच्या विरुद्ध असं सुद्धा वाटू शकेल आणि त्यामुळे या सगळ्यांमध्ये समन्वय निर्माण करणं हे सुद्धा एक राष्ट्र योगाचे काम आहे आणि म्हणून आपल्याला ही अध्यात्म ते  व्यवहार ही रेषा पूर्ण आपल्याला समजली    पाहिजे असं मला वाटतं. समजण्यासाठी आधार म्हणून   बोधवाक्य मागच्या एका व्याख्यानात    सांगितला होता की विद्याञ्चाविद्याञ्च यस्तद्वेदोभयं सह।अविद्यया मृत्युं तीर्त्वा विद्ययाऽमृतमश्नुते ॥  अविद्या म्हणजे भौतिक शास्त्र. भौतिक शास्त्राने हा सगळा मृत्यूलोक म्हणजे अधिभूत जे आहे त्याच्यावरती विजय मिळवू. ते समृद्धी  कल्याण यश हे सगळे जे मिळवायचे त्याच्यातून मिळवू. आणि विद्येच्या साह्याने म्हणजे अध्यात्म विद्येच्या  साह्याने अमृतत्वाचा अनुभव घेऊया. तर फक्त विद्या चालत नाही फक्त अविद्या चालत नाही. या दोन्हीच्या सह जेव्हा तुम्ही काम करता तेव्हाच तुम्हाला ते म्हणजे परब्रह्म काय ते समजते.  तर हे कोण जाणतो? विद्यांच्या    अविद्यांच्या दोन्हीसह जो काम करतो ते तो जाणू  शकतो.

व्यक्तीचा विकास कसा होतो?

 आता अविद्या आणि विद्या यांच्या मधला  समतोल कसा    साधायचा तर याच्यासाठी थोडसं    व्यक्तीचा विकास कसा होतो हे आपल्याला बघायला लागेल. कारण पांडुरंग शास्त्री  आठवले असतील. प्रबोधितला हा निर्णय घेणारे  कोणी असतील किंवा गांधीजी असतील त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास अधिक झालेला होता. पण सगळ्यांचा तेवढा विकास झालेला नसतो. आणि राष्ट्र म्हणजे सगळा समाज    समग्रता तर सगळ्या तिथे घेऊन जायचे तर  सगळ्यांची कुठे कुठे प्रगती कशी झाली  पाहिजे हे बघायला पाहिजे. तर याचा विचार मानसशास्त्रामधली मानवतावादी  मानसशास्त्राची शाखा आहे त्या शाखेमध्ये  सुरू झालेला आहे. हे सुद्धा प्रतिक्रियेत उभं राहिलेले शास्त्र आहे. त्याच्या आधीची मानसशास्त्राचे दोन  शाखा म्हणजे एक मनोविश्लेषण शास्त्र की  मनाचे विश्लेषण करत जा म्हणजे तुमच्या अबोध मनात किंवा नेणीवे मध्ये कुठल्या कुठल्या अतृप्त इच्छा आहेत वासना आहेत    त्याचा शोध घ्या आणि त्या वेगळ्या प्रकारे तुमच्या वर्तनात प्रकट होत असतात त्यामुळे  वर्तनातले    काही दोष काढून टाकायचे असतील त्याच्यात काही सुधारणा करायची असेल तर अबोध मनात    अतृप्त इच्छा काय काय आहेत त्याचा शोध  घ्या आणि त्याचा निचरा करायला शिकवा असं ते मनोविश्लेषण शास्त्र आणि दुसरी    मानसशास्त्र शाखा म्हणजे वर्तनवाद.  थांबवूया कुत्र्याची गोष्ट आहे की  कुत्र्याला घंटेचा आवाज आणि त्याच वेळी खायला काहीतरी मिळणार याची जर का सवय झाली तर खायला मिळणार म्हणून त्याला लाळ सुटते लगेच पण काही दिवसांनी त्याचबरोबर घंटाही वाजते हे लक्षात आल्यावर समोर खायला काही आलं नाही घंटा वाजली तरी सुद्धा त्याला लाळ सुटते. त्यामुळे  हे जसं  प्राण्यांच्या वरती तसं माणसाचं वर्तन सुद्धा अशा पद्धतीने प्रोग्राम करता येईल, शिकवता येईल की काय प्रकारचे चेतक दिल्यावर काय प्रकारचा प्रतिसाद माणसाने  दिला पाहिजे असं ते वर्तनवाद मानसशास्त्र या दोन्हीला प्रतिक्रिया माणसाला स्वतःची काही    जाणीवेतली इच्छा नसते का कायम सगळ्या    नेणीवेतल्या इच्छानुसार तो वागतो    का तर तसेही नाही आणि माणूस काय यंत्रवत    होणार आहे का असा की इतरांनी कोणी त्याला    शिकवा आणि त्याप्रमाणे त्यांनी वागावं तसे    ज्याला स्वतःला काहीतरी इच्छा असतात    याच्यातनं हे मानवतावादी मानस शास्त्र    निर्माण    झालं त्याच्यामध्ये स्वतःला आणि    इतरांना सर्व समावेशकपणे समजून    घेणे असं एक सूत्र आहे त्या मानवतावादी    मानसशास्त्राचं स्वतःचे समजून घ्या की आपण    काय करतोय आणि बाकीच्यांचे समजून घ्या की    असं का करता येत    ते केवळ अबोध मनातल्या    वासनानुसार आपण वागतो किंवा    शिकवल्याप्रमाणे वागतो असं नसून आपलं    सुद्धा काहीतरी हेतूपूर्ण जीवन असू शकतं    आणि हेतूपूर्ण जगण्याच्या साठी    अस्तित्वासाठी आपला आयुष्य आहे हे या    मानवतावादी मानसशास्त्राने मान्य केलेले    आहे आणि अंतिम ध्येय काहीतरी आपल्या    आयुष्यात असू शकतं त्या अंतिम ध्येयाचे    महत्त्व या मानवतावादी मानसशास्त्राने    ओळखलेले    आहे आणि आध्यात्मिक आकांक्षा ही व्यक्तीला    असू शकतात आता तिथे अध्यात्म शब्द नाही    वापरलेला ट्रान्सपर्सनल सायकॉलॉजी असं    म्हटलेले की आत्ताच आपले जे व्यक्तिमत्व    त्याच्या पलीकडे काहीतरी आहे त्याचा    आपल्याला विचार केला पाहिजे असा आहे ते    आपण भारतीय याच्यात भाषांतर करताना    सांस्कृतिक रूपांतर करताना आध्यात्मिक    आकांक्षा असतात असं म्हणू शकतो त्याला तर    या मानवतावादी    मानसशास्त्रामध्ये या एका मानसशास्त्राने    एक शिडी मांडलेली आहे प्रबोधित अनेक    जणांना ती वेगळ्या निमित्ताने शिक्षकांना    कार्यकर्त्यांना व्यवस्थापन शिकणाऱ्यांना    ती माहिती झालेली    आहे की    माणसाच्या शारीरिक गरजा असतात आणि त्या    पूर्ण होईपर्यंत तो बाकी काही त्याला सुचत    नाही मी भाकरी आणि स्वातंत्र्य असं    मागच्या वेळी बोललो होतो याच्या संबंधी    बोललेलो होतो तर शारीरिक गरजा पूर्ण करणे    ही पहिली प्रेरणा    असते मग सुरक्षिततेची    आश्वासन    मिळणं त्याच्यासाठी धडपड करणे ही दुसरी    प्रेरणा असते मग प्रेम मैत्री आपुलकी याचा    अनुभव मिळणं आपण कोणाला तरी हवे आहोत    कोणाला तरी आपले वाटतोय हा अनुभव ही    भावनिक गरज असते ती एक प्रेरणा असते की ते    मिळवण्यासाठी माणूस    धडपडतो मग आत्मसन्मान मिळावा माणूस म्हणून    मला काहीतरी किंमत मिळावी असे वाटतं    मागच्या व्याख्यानात जे गांधीजींचे होतं    की देशातल्या अगदी गरिबातल्या गरीब अशा    मूक जनतेला सुद्धा मला या देशात काय    व्हावं हे सांगण्याचा अधिकार आहे आणि मी    ते सांगितलं तर ऐकून घेतलं जाईल असं वाटलं    पाहिजे म्हणजे त्याला सन्मान मिळाला माणूस    म्हणून तसा हा आत्मसन्मान मिळावा अशी गरज    असते आणि मग स्ववास्तविकीकरण    आत्मवास्तविकीकरण असं म्हटलेलं आहे की    माझ्या सगळ्या ज्या काही सुप्त क्षमता    आहेत त्या सगळ्या मला प्रकट करण्याची संधी    मिळावी    आपण विवेकानंद वाचलेले असतात    त्यामुळे वगैरे मॅनिफेस्टेशन असे वापरायला    काय हरकत आहे की स्वतः मधल्या सुप्त    शक्तीचे प्रकटीकरण    होणे असं पहिल्यांदी पाच पायऱ्या मांडल्या    साधारण 43 44 साली मग वीस पंचवीस वर्षांनी    त्याच्यामध्ये त्याला आणखीन एक भर    घालावीशी    वाटली आत्म अतिक्रमण किंवा    स्वविस्तार की माझ्या स्वतःच्या क्षमता मी    प्रकट करतोय पण मी म्हणजे कोण तर मी जे    संकल्पना त्याची व्यापक होत जाते आणि अशी    व्यापक होत जायला पाहिजे या प्रेरणेने तो    आणखीन काही काम करतो अशी व्यक्तिमत्व    विकसनाची पुढची पुढची पायरी    लोकांच्या लक्षात येत    गेली प्रबोधनीत काम करताना    आपण अनुभव घेतो    की भूकंप झालाय पूर झालाय तर सुरुवातीला    काय लगेच औषध वाटा कपडे वाटा अन्न वाटा    शिधा वाटा जेवण वाटा असंच करावं लागतं    त्या शारीरिक गरजा असतात त्या झाल्या की    सुरक्षितता मग चांगलं घर बांधून    द्या तात्पुरती झोपडी तरी द्या किंवा    पत्र्याची शेड तरी द्या मग चांगलं घर    बांधून द्या    मग प्रेम मैत्री आपुलकी या गरजा सुरू    होतात आता पहिल्या दोन गरजा पूर्ण झालेले    विद्यार्थी प्रबोधनी शिकायला आले असा आपण    गृहीत धरतो आणि या सगळ्या विद्यार्थ्यांना    लव सेक्युरिटी आणि बिलॉंगनेस याचा अनुभव    मिळाला पाहिजे असा आपण म्हणतो हे आपल्या    शिक्षणाचे पहिलं तत्व बाकी वृत्ती घडण    प्रेरणा जागरण त्याच्यानंतर    सगळं मग प्रत्येकाला सन्मान मिळाला पाहिजे    प्रत्येकाची पद्धती वेगवेगळी असते आप्पा    प्रत्येक पाचवीच्या मुलांचे अहो म्हणायचे    आणि त्याला आपण कोणीतरी मोठे आहोत असं    वाटायचं तर फक्त नुसतं संबोधनातून नाही तर    प्रत्यक्ष वागण्यातून सुद्धा प्रत्येक    व्यक्तीला हा सन्मान मिळाला    पाहिजे आणि    मग स्ववास्तविकीकरण की माझ्या सगळ्या    क्षमता मला करून पाहिजे त्यामुळे मला    कुठली जबाबदारी दिली की सांगितल्याप्रमाणे    काम केलं तर मला समाधान वाटत नाही मला    काहीतरी नवीन सुचते ते मला करून पाहायचं    असं प्रत्येक खाते विभाग प्रमुखाला वाटत    असतं    कारण त्याची ती गरज असते की मला काहीतरी    वेगळं करून    दाखवायचं ते फक्त आत्मसन्मानासाठी नाही तर    माझ्या काय काय कल्पना आहेत त्या मला    प्रत्यक्षात आणून आणता येतात की नाही हे    मला पाहायचे अशा पद्धतीने तो विचार करत    असतो आणि आपण मात्र म्हणतो फक्त स्वतःचा    विचार करू नका आपल्याला सगळ्या समाजाचा    विचार करायचा आहे स्वतःचे प्रश्न काय    सोडवता आपल्याला देशाचे प्रश्न सोडवायचे    म्हणजे हे    स्वविस्तार त्या पुढच्या पायरीपर्यंत आपण    नेण्याचा सगळ्यांना प्रयत्न करत असतो पण    आधीच्या सगळ्या    पायऱ्या त्यांनी ओलांडल्या आहेत की नाही    हे प्रत्येकाच्या वतीत बघावं लागतं हे    प्रत्येकाचा वेग वेगवेगळा असतो प्रत्येक    जण वेगळ्या पायरी वरून सुरुवात करतो अगदी    गरीब घरातून जो आलेला असतो त्याला तुम्ही    काही किती सांगितलं तरी उद्या दहावी    झाल्याबरोबर मला माझ्या घरच्या अर्थ जणाची    जबाबदारी घ्यायची आहे असं आपल्या मधल्या    काही विद्यार्थ्यांनाही वाटू शकतं तेवढी    त्याची जाणीव असते की मला माझ्या    कुटुंबाची जबाबदारी घ्यायला पाहिजे मग    त्याला पुढचं सांगून काही उपयोग होत नाही    कारण ती गरज त्याची पूर्ण झाली की मी    माझ्या कुटुंबाची जबाबदारी घेऊ शकतो हे    कळल्याशिवाय तो पुढे जाऊ शकत    नाही हे व्यक्तीचे    सगळे व्यक्तीच्या विकासाच्या या पायऱ्या    आहेत आणि मग जशा व्यक्तीच्या विकासाच्या    या पायऱ्या    असतात तसं स्वविस्ताराचा विचार काही    लोकांनी वेगळ्या पद्धतीने केलेला    आहे जसं    स्ववास्तविकीकरण    आहे व्यक्तीला स्वतःच्या सगळ्या क्षमतांचा    प्रकटीकरण पूर्ण व्हावं असं    वाटते तसं    लोकसमूहाचं    वास्तविकीकरण कम्युनिटी    एक्चुअलायझेशन असा एक टप्पा    येतो एखाद्या लोक समूहाला वाटतं की असं    आम्हाला हे करून दाखवलं पाहिजे    लोकसमूहाच्या सन्मानाच्या काही अपेक्षा    असतात मागच्या वेळी मी जे उदाहरण    दिलं की आता टिळक पुण्यतिथी हळूहळू    विस्मरणात जायला लागली आणि अण्णाभाऊ साठे    जयंती त्याच दिवशी असते तिचं प्रमाण हे    वाढत चाललेले ते कशामुळे तर एका मोठ्या    लोकसमूहाला आपण त्यांचे प्रतिनिधी कोणीतरी    आहोत    याच्यातून सन्मान वाटत    असतो एक जानेवारीला कोरेगाव भीमाला जावं    आणि तिथे काहीतरी करावं राजकीय वेगळे वाट    असतात पण एका मोठ्या समूहाला आपला    त्याच्यात काहीतरी सन्मान आहे काहीतरी    विशेष परिक्रमा आमच्या लोकांनी केलेला आहे    असं वाटते इतिहासाचा अज्ञान वगैरे अनेक    गोष्टी आहेत त्याच्यामध्ये पण व्यक्तीच्या    जशा गरजा आहेत तशा लोकसमूहाच्या सुद्धा    सन्मानाच्या गरजा असतात    त्यांच्या स्व वास्तविकीकरणाच्या गरजा    असतात आणि एका व्यक्तीचा स्वविस्तार तो    बऱ्याच वेळा मग    लोकसमूहाच्या    वास्तविकीकरणासाठी    हा वापरावा लागतो वापरला जाऊ    शकतो जेव्हा राष्ट्र योगाचा विचार    आपल्याला करायचा तसा आपल्या देशात असे    किती लोकसमूह आहेत की ज्यांना अजून    राष्ट्राची कल्पना पूर्ण आलेली नाही किंवा    प्रासंगिक रित्या आणीबाणीच्या वेळी लष्करी    चढाईच्या वेळी ती होते इतर वेळी मात्र    त्यांनी त्यांच्या त्यांच्या    प्रश्नांमध्ये ते गुंतलेले असतात तर अशा    लोकसमूहाचे वास्तविकीकरण करणे याच्यासाठी    काय केलं पाहिजे असं बघायला पाहिजे मला एक    उदाहरण    आठवते 1980    साली मी महिसाळला तिथल्या    ज्या हरिजनांच्या सामूहिक शेतीचा प्रयोग    होता सहकारी सोसायटी होती ते एकाच गावात    होती तर इतर काही गावांमध्ये तशा    सोसायट्या सुरू कराव्यात    याच्यासाठी तिथे एक नेतृत्व प्रशिक्षण    शिबिर घ्यायला    गेलो माझ्याबरोबर सुहास होते इतरही    कार्यकर्ते आलेले होते येऊन जाऊन    होते आणि ज्यांनी आम्हाला बोलावलं होतं ते    मधुकरराव देवल आप्पांचे समवयस्क    आप्पांच्या सारखं स्वतंत्र वेगळं काही काम    आपल्याला करायला पाहिजे आता    स्वातंत्र्योत्तर काळात म्हणून त्यांनी ते    काम सुरू    केलं तर    त्या महिसाळ सारखं गाव मिर्जेपासून 17-18    किलोमीटर वर छोटसं खेडेगावच होतं तिथल्या    सहकारी शेती    सोसायटीतल्या पदाधिकाऱ्यांच्या    घरी समग्र सावरकर वाङ्मयाचे खंड मला    दिसले आणि मी त्यांना विचारलं हे तुम्ही    वाचलं का हो म्हणे वाचतोय हळूहळू दादांनी    सांगितलं म्हणजे मधुकरराव देवल दादांनी    सांगितले वाचा म्हणून म्हटलं का वाचायला    सांगितले तुम्हाला तर म्हणे आम्ही    नागालँडला गेलेलो    होतो आणि    तिथे जाण्याच्या पूर्वी सावरकरांनी    नागालँड बद्दल काय    म्हटलंय आणि तेव्हा सावरकरांचे कसं स्वागत    नागालँड मध्ये झालं हे जरा तुम्ही वाचा    असं त्यांनी सांगितलं आणि मग ते वाचता    वाचता मग बाकीचे सावरकर वाचा असं सांगितलं    म्हणून आम्ही हे    वाचतो तुम्ही तिथे गेल्यावर काय वाटलं    तुम्हाला ते म्हणाले की त्यांच्यापेक्षा    आमची स्थिती खूप चांगली आहे असं आमच्या    लक्षात    आलं आणि आपणही त्यांना काहीतरी मदत केली    पाहिजे असं    वाटलं मग याच्यावरती तुम्ही नंतर काय    करायचं ठरवलं नागालँड तर खूप दूर आहे    आम्ही तिथे जाऊ शकत नाही पण आमच्या सारखेच    आजूबाजूला आणखीन कोण लोक आहेत    महिसाळ मधले आम्ही सगळे दलित म्हणजे निदान    आम्हाला वतनी जमिनी आहेत आणि मी तिथे    राहतोय पण जे भटके विमुक्त लोक आहेत    ज्यांची स्वतःची जमीन नसते अशी गोसावी    लोकांची एक वस्ती होती त्यांच्यासाठी    आम्ही आता घर बांधायला मदत करतोय असं    त्यांनी सांगितलं म्हणजे एखाद्या    लोकसमूहाची आत्मसन्मानाची गरज पूर्ण झाली    स्ववास्तविकीकरण करायला लागले आम्ही    आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होऊ शकतो हे    त्यांना लक्षात आलं तर आपण इतरांनाही मदत    केली पाहिजे हे त्यांना सुचू शकतं    त्याप्रमाणे ते कृती करू शकतात त्यांना    मार्गदर्शन कोणीतरी करावं लागतं पण असं    80 साली सुद्धा बघायला मिळालं आज सुद्धा    असे भारतात अनेक ठिकाणी लोक आहेत की जे    स्वतःची परिस्थिती सुधारल्यानंतर    इतरांच्या मदतीला    जातात तर हे लोकसमूहाचे वास्तविकीकरण आहे    असं मला वाटतं की त्यांना आपली शक्ती    जाणवली किंवा लोकसमूह सुद्धा आपल्या    स्वकल्पनेचा विस्तार करायला    लागतो आणि मग त्याच्या पुढची पायरी    काय तर त्याच्या पुढची    पायरी म्हणजे सांस्कृतिक    चिरंजीवित्व

सांस्कृतिक चिरंजीवित्व

मागच्या वेळी म्हटलेलं होतं    की समाज हा कारण आहे कर्ता आहे आणि त्या    समाजाची जीवन पद्धती हा त्याचा परिणाम आहे    समाज जीवन पद्धती निर्माण    करतो मग ती जीवन पद्धती एकदा निर्माण झाली    की समाजाच्या पुढच्या पिढ्यांवर त्याचा    परिणाम होतोच पण त्या जीवन पद्धतीत बदल    करायचे की नाही हे कायम समाज ठरवत असतो    आपोआपने बदल होत नाही त्यामुळे समाज हा    कारण आहे त्याची जीवन पद्धती हा परिणाम    आहे आणि जीवन    पद्धतीमध्ये काही गोष्टी    या परिस्थितीच्या रेट्याने ओघाने झालेल्या    असतात पण काही ती मूल्य म्हणून    स्वीकारलेली असतात आणि म्हणून ती जीवन    पद्धती तशी घडलेली    असते    तर समाजच आपली मूल्य ठरवत असतो की कशासाठी    आपण तडजोड करायची नाही आणि कशामध्ये बदल    केलेले    चालतील आणि आपली जीवन पद्धती घडवत असतो तर    समाज जे ठरवतो की या मूल्यांमध्ये बदल    करायचा    नाही त्याप्रमाणेच आपण जगायचं तर    त्याच्यातनं संस्कृती ही टिकून राहते    संस्कृती चिरंजीवी    होते तर भारतीय    संस्कृती काहीशे वर्ष काही शतक का काही    हजार वर्ष टिकून राहिली असं आपण म्हणतो    तेव्हा ती जीवन पद्धती कदाचित बदलली    असेल पण जीवन मूल्य कुठली टिकून राहिलेली    आहेत हे बघायला पाहिजे आणि ही जीवन मूल्य    टिकून राहिली    पाहिजेत असं जेव्हा समाज प्रयत्न करतो    तेव्हा संस्कृतीचे चिरंजीवित्व आणि समाज    असा प्रयत्न करायला लागला म्हणजे तो    विकासाच्या आणखीन टप्प्यावर पुढच्या    टप्प्यावर गेला तो आपल्या जीवनाची    गुणवत्ता काय आहे ते ठरवायला    लागतो विवेकानंदांनी    त्यांच्या भारत परिभ्रमणाच्या काळातला    अनुभव सांगितलेला आहे की कुठल्याही गावात    गेलो तरी गरिबातल्या गरीब झोपडीच्या पुढे    उभं राहिलं तर दाराशी संन्यासी आलाय    म्हटलं की आपल्या भाकरीतला अर्धी भाकरी    देणारच असं अतिथीचे स्वागत करायचं हा    भारतभर    सगळीकडे सगळ्यांच्या अंगात मोरलेला अतिथी    देवोभव असा हा संस्कार आहे आणि ते म्हणाले    की हे भारतात त्याच्या अगदी विरुद्ध    अमेरिकेमध्ये अनुभवलं की तिथे असं मी कुठे    मागायला गेलो तर माझ्याकडे चोर लफंगा    म्हणूनच लोक    बघायचे आता हे विवेकानंद    1800 90 91 साली अनुभवलं ते आज 2020 साली    सुद्धा आपण अनुभवतो की    नाही शहरातले लोक जेव्हा दुसऱ्या    गावांमध्ये जातात किंवा एका गावातले लोक    जेव्हा दुसऱ्या गावात    जातात गावात आलेला पाहुणा हा उपाशी जाणार    नाही अशी काळजी आजही बहुतेक सगळ्या    गावांमध्ये घेतली जाते अनोळखी असला    तरी आपल्या विद्यार्थ्यांचा एकदा    शिबिर होता    दिवाळीत आणि जोरदार पाऊस झाला गावाच्या    बाहेर थोडेसे तंबू ठोकून शिबिर चाललेलं    होतं पाऊस आला आणि त्या दिवशी तिथे    शिबिरात स्वयंपाक करणे शक्यच    नव्हतं पण पाऊस थांबताच गावातले चार लोक    आले आणि ते म्हणाले की तुमचा जेवणात    तुम्ही काय करणार आहात असं करा दोन दोन    मुलं एकेका घरात जा गावाचा जेवणाची    व्यवस्था होईल आणि असं सहज होऊ शकतं हे    अतिथी देवोभव हे शब्द माहिती नसले तरी असं    करायचं असतं हे मूल्य म्हणून आपल्या    समाजात रुजलेलं आहे असं काय काय आपल्या    समाजात    रुजलेलं आहे असा आपण शोध घेतला की ते    संस्कृतीचे चिरंजीवित्व याच्यासाठी समाज    कसा प्रयत्न करतो हे आपल्या लक्षात येईल    आणि हे आई-वडील असं करतात ते मुलं पाहतात    आणि मुलंही तसंच वागायला लागतात नंतरच्या    काळामध्ये याच्यातनं ती संस्कृती पिढ्या    बदलल्या तरी टिकून    राहते आता हे जसं व्यक्तीच्या बाबतीत    विकासाचे टप्पे    पाहिले तसेच लोकसमूहाच्या बाबतीत सुद्धा    हे विकासाचे टप्पे    असतात आणि लोकसमूहामध्ये    सुद्धा आपल्या जातीचे आपल्या    गावातले याच्या पलीकडे जेव्हा लोक विचार    करायला जातात तेव्हा ती लोकसमूहाची भावना    ही    आपण सगळे राष्ट्र आहोत याच्यापर्यंत    विकसित होत जाते आणि त्या राष्ट्राची    सुद्धा काहीतरी संस्कृती असते त्या    संस्कृतीनुसार ते राष्ट्र त्याची वेगळी    ओळख तयार    होते तर असं हे जे सांस्कृतिक वैशिष्ट्य    आपल्या राष्ट्राचा    आहे किंवा प्रत्येक राष्ट्राचा    आहे तर त्याच्यावर विवेकानंदांना    त्या अमेरिकेत असताना हार्व विद्यापीठात    गेलेले होते आणि तिथल्या तत्वज्ञान    विभागातल्या विद्यार्थ्यांबरोबर    प्रश्नोत्तरांचा एक कार्यक्रम    झाला आणि त्यांना प्रश्न विचारला एका    विद्यार्थ्यांनी    की सिव्हिलायझेशनची    वेदांताची कल्पना काय गमतीशीर उदाहरण    दिलेली आहेत    विवेकानंदांनी की एका इस्माने विजेच्या    तारेतून वीज इकडून तिकडे पाठवली तर तुम्ही    त्याचे पुतळे उभे    करता पण निसर्ग हे त्याच्यापेक्षा कितीतरी    मोठ्या प्रमाणात वीज इकडून तिकडे पाठवत    असतो हे आपण पाठवत नाही आहोत का त्यामुळे    आपण वेगळं काय करतोय जे निसर्गात आहे तेच    आपण    करतोय पण जे निसर्गात आपोआप घडतं ते    आम्हाला आमच्या प्रयत्नाने घडवता    आलं याला आपण डेव्हलपमेंट    म्हणतो या डेव्हलपमेंट काय झालं    तर तुमचं ज्ञान वाढलं की बाहेर निसर्गात    जे होते ते का होते ते तुम्हाला तुम्ही    स्वतः जेव्हा तुमच्या बाजूने प्रयोग करून    पाहता तेव्हा तुम्हाला कळतं पण ज्ञान    वाढलं म्हणजे    तुमची मन बदलली    का तर ती बदललेली नसतात या सगळ्या    ज्ञानाचा उपयोग बहुतेक सगळेजण सत्ता आणि    पैसा जास्तीत जास्त मिळावी याच्यासाठी करत    असतात आणि याला आपण डेव्हलपमेंट म्हणतो    विवेकानंदांनी क्वालिटी ऑफ लाईफ शब्द नाही    वापरला पण सत्ता आणि पैसा वाढवत जाणे याला    स्टॅंडर्ड ऑफ लाईफ बहुतेक सगळेजण म्हणतात    त्यांनी असं    म्हटले की डेव्हलपमेंट साठी आपण जे    प्रयत्न    करतो ते एखाद्या व्यायाम शाळेत जाऊन वजन    वर खाली करण्यासारखे असतात त्याच्यामुळे    वजनांवरती काहीच परिणाम होत नाही तुमच्या    शरीराच्या स्नायूंचा आकार बदलतो त्यातली    ताकद कदाचित    वाढते तसं सगळं जग ही एक मोठी नैतिक    व्यायाम शाळा आहे आणि त्याच्यात तुम्ही    डेव्हलपमेंट साठी विकासासाठी जे काही सगळे    प्रयत्न    करता तर त्याच्यातून तुमच्या सुखसोयी    वाढतील ज्ञान वाढतील पण तुमची नैतिक पातळी    वाढली का हे बघायला    पाहिजे म्हणजे तुमच्या आयुष्यात काही    मूल्य निर्माण झाली का हे बघायला    पाहिजे तर त्या    त्याला आम्ही सिव्हिलायझेशन म्हणतो    वेदांताची कल्पना ही की जगात तुम्ही जो    काही व्यवहार करता त्याच्यातनं तुमची    नैतिक पातळी उंचावली का क्वालिटी ऑफ लाईफ    तुमची वाढली का त्याला आम्ही    सिव्हिलायझेशन म्हणतो आणि त्यांच्या    शिक्षणाच्या आणि धर्माच्या व्याख्या    आपल्याला माहिती आहेत एज्युकेशन इज द    मॅनिफेस्टेशन ऑफ परफेक्शन ऑलरेडी इन मॅन    रिलीजन इज द मॅनिफेस्टेशन ऑफ डिव्हिनिटी    तसे त्यांनी तिथे त्या उत्तराचा समारोप    करताना आणखीन एक व्याख्या केली    सिव्हिलायझेशन इज द मॅनिफेस्टेशन    ऑफिटी इन मॅन म्हणजे एका माणसांमध्ये आहे    ते सगळ्या मनुष्य जातीमध्ये हे दिव्यत्व    आहे आणि त्या दिव्यत्वाचे प्रकटीकरण ज्या    ज्या गोष्टीतून होईल त्याला आम्ही    वेदांताच्या दृष्टीने संस्कृती    म्हणतो संस्कृतीचा चिरंजीवित्व सांस्कृतिक    चिरंजीवित्व म्हणजे हे मनुष्यामधल्या    दिव्यत्वाचं    प्रकटीकरण मागच्या    व्याख्यानामध्ये मी असं म्हटलं होतं की    निर्वाहासाठी अनेक जण काम करतात आणि    राष्ट्र टिकण्यासाठी राष्ट्राचा    निर्वाहासाठी ज्या काही गोष्टी आपल्याला    करायला पाहिजेत त्या आपण केल्याच पाहिजे    त्या कालमानानुसार त्याच्यात बदल केला    पाहिजे    म्हणजे इतरांकडे अणुवस्त्र आहेत तर    आमच्याकडे अणुवस्त्र असली    पाहिजेत हे आमची अविद्येची उपासना झाली    आणि कोणी काही म्हटलेलं नसताना आम्ही नो    फर्स्ट पॉलिसी जाहीर करतो की आम्ही    स्वतःहून अणुवस्त्र वापरणार नाही पण    आमच्यावर हल्ला झाला तर त्याचा प्रतिकार    करायची आमची तयारी आहे असं 98 साली हे    पहिले दुसऱ्यांदा जेव्हा आपण अनुस्फोट    केले केल्या त्याच्यानंतर लगेचच अटल    बिहारी वाजपेयी घोषणा केली नो फोर्स    पॉलिसी आणि सगळ्या जगाने ती मानली म्हणजे    चीनने जाहीर केलं पाकिस्तान जाहीर केलं तर    मानतील असं नाही पण भारताने जाहीर केलं तर    सगळ्या जगाने मानलं आणि नंतर जे काही    निर्बंध घातलेले होते भारतावर त्यांचे    बाकी व्यापारी वगैरे कारण असतीलच परंतु हे    भारताने आश्वासन दिलं आणि ते मानलं याचं    कारण काय तर भारताच्या    या मूल्याच्या    वरती भारत चिकटून राहील याची जगाला खात्री    आहे कारण भारत या मुलाला कायम चिकटून    राहिलेले आजपर्यंत आम्ही कधीच बाहेर जाऊन    इतर देशांवर आक्रमण केलेलं    नाही त्यामुळे निर्वाहासाठी जे करायला ते    केलं    पाहिजे पण त्याच्याशिवाय काहीतरी उद्दिष्ट    असलं    पाहिजे हे जसं व्यक्तीच्या बाबतीत आहे    तसंच राष्ट्राच्या बाबतीत असलं पाहिजे आणि    आज त्यातल्या त्यात सगळ्या राष्ट्रांची जी    उद्दिष्ट आहेत ती म्हणजे शांततामय सहजीवन    असावं त्यामुळे व्यापार समृद्धी सगळी होईल    भरभराट    होईल आमच्या देशाचे जीवनमान    उंचावेल आणि हे शांततामय सहजीवनाच्या    बरोबर आमचं जीवनमान स्थिर    राहण्यासाठी जो काही विकास व्हायचा    आहे तो धारणाक्षम विकास झाला पाहिजे    सस्टेनेबल डेव्हलपमेंट झाली पाहिजे    याच्यापेक्षा दोन उद्दिष्टांपेक्षा वेगळं    आज बाकी कुठले राष्ट्र काही बोलत    नाहीत वसुदैव कुटुंबकम जी 20 च्या वेळी    आपल्या देशाने मांडलं ते सगळ्या लोकांना    नवीन होतं वन वर्ल्ड फॅमिली वन फॅमिली पण    भारताच्या दृष्टीने हे खूप जुनं मूल्य    आहे आणि तेच मूल्य आज आम्ही टिकून ठेवलेला    आहे असं झालं पाहिजे असं आम्ही म्हणतो    याच्यात संस्कृतीचं चिरंजीव    मग धारणाक्षम विकास सस्टेनेबल डेव्हलपमेंट    आणि शांततामय सहजीवन पीसफुल को    एक्झिस्टन्स याच्याशिवाय तिसरा उद्दिष्ट    काय असू    शकेल तर    भारतामध्ये आपण हे म्हटलेले    की समाजाची सुद्धा उत्क्रांती झाली    पाहिजे परवाच पंधरा ऑगस्ट झालेला आहे    अरविंदांचे भाषण अरविंदांचे भारताबद्दलचे    स्वप्न    हे त्याची उजळणी या निमित्ताने काही    जणांची झालेली    आहे    की स्वप्न सांगता सांगता भारत जगाला    अध्यात्म शिकवेल आणि इथे देव मानवांचा    समाज तयार होईल असं शेवटचे स्वप्न    अरविंदाने मांडलेले आहे आता हे अरविंदाने    नव्याने मांडलेले आहे का नव्या भाषेत    मांडलेला आहे वेगळ्या पद्धतीने मांडलेला    आहे पण वेदांमध्ये सुद्धा    मनुर्भुव माणूस    व्हा जनय दैव्यम    जना आणि दिव्य लोक तयार करा असं म्हटलेले    आहे म्हणजे आजपर्यंत आम्ही जे आहोत ते    अधिक चांगले माणूस बनू पण माणसांमध्ये    सुद्धा आणखीन काहीतरी उत्क्रांतीची क्षमता    आहे आणि दिव्य मानव दैवी गुणसंपन्न मानव    आपल्याला व्हायचं आहे असं वेदांत मध्ये    सुद्धा म्हटलेले आहे तेच अरविंदाने    वेगळ्या परिभाषेत म्हटलेलं    आहे तर हा हेतू    त्याच्यासाठी की एक एक व्यक्ती सुद्धा अशी    दिव्य जीवन जगली पाहिजे आणि सगळा समाज    सुद्धा असं दिव्य जीवन जगणारा झाला पाहिजे    म्हणजे धारणाक्षम    विकास एवढेच नाही धारणाक्षम समाज सुद्धा    झाला पाहिजे आणि धारणाक्षम म्हणजे समाजाची    धारणा कशी होते तर समाजात सतत जेव्हा    उत्क्रांती होत राहते तेव्हा समाजाची    धारणा होते प्रगतिशीर संतुलन असा त्याला    मी शब्द वापरलेला होता की संतुलन तर आहे    फार अव्यवस्था राजक समाजामध्ये मानत नाही    पण समाजाची प्रगती होते आणि ती प्रगती    कशात होते तर स्टॅंडर्ड ऑफ लिविंग मध्ये    होईल न    होईल शेवटी निसर्गाच्या ज्या काही    आपल्याला देणग्या आहेत त्या देणग्यांचा    कसा किती वापर करू शकतो आपण आणि ते सगळ्या    लोकांमध्ये कसे वाटून घेतो याच्यावरती    अवलंबून आहे पण क्वालिटी ऑफ लाईफ हे    सुद्धा वाढू शकेल तर ती वाढणे हा आमच्या    सगळ्या राष्ट्राचा हेतू    आहे आणि मग ह्याच्यासाठी या हेतूच्या पुढे    आपलं मूल्य हे निश्चित करावे लागते की    आम्हाला कसं जगायचं आहे आणि हे आपल्याला    जे जगायचे ते अध्यात्माच्या आधारित जीवन    जगायचे म्हणून अध्यात्मिक राष्ट्र योग असा    शब्द आपण वापरू इच्छितो

पुढच्या    व्याख्यानामध्ये अध्यात्मिक राष्ट्रयोग    आधी राष्ट्रयोग संकल्पना निश्चित केली    राष्ट्रयोगाचा व्यवहार पाहिला आपण व्यवहार    ते अध्यात्म ही एक रेषा कशी आहे हे आपण    पाहिलं आता अध्यात्मिक राष्ट्रयोग हे आपण    पुढच्या व्याख्यानामध्ये पाहू आणि या    व्याख्यानामध्ये शेवट जर का करायचं झालं    तर व्यक्तीने कसं वागायला पाहिजे    व्यक्तीने स्वतःच्या विकासाबरोबर समाजाचा    विकास करायचा    आहे    स्वतःच्या शक्तीच्या प्रकटीकरणाबरोबर    समाजाच्या शक्तीचे सुद्धा प्रकटीकरण    करायचे तर व्यक्तीने कसं वागलं पाहिजे    इतरांशी समाजातल्या इतर    व्यक्तींशी तर धागधपटशा न करता बोलता आलं    पाहिजे स्वयंस्फूर्तीने काम करता आलं    पाहिजे    सतत वर्धिष्ठ विचार केला    पाहिजे विचार केला पाहिजे इतरांशी वागताना    सौदेबाजी न करता देवाण घेवाणीची भाषा न    करता व्यवहार केला    पाहिजे आणि परस्परांशी त्यांच्या    त्यांच्या कामांमध्ये सहकार्य करत वागायला    पाहिजे हे    करताना आपली    पद्धत काय असली    पाहिजे तर डायलेक्टिक्स वादविवाद एक पद्धत    आहे आणि वादेवादे आहे ते तत्वबोध असं    म्हणतात पण त्याच्याशिवाय संवाद हे सुद्धा    एक पद्धत    आहे आणि स्वयंस्फूर्तीने काम करायचं झालं    तर याचा अर्थ प्रत्येकाला नेतृत्वाची काम    सुद्धा शिकली पाहिजेत हे सगळं अध्यात्मिक    राष्ट्र योगामध्ये कसं येतं हे आपण    पुढच्या व्याख्यानामध्ये पाहू.