संत्रिका सुवर्ण महोत्सव

मुस्लिम मनाचा शोध

लेख क्र. ४४ १८/०७/२०२५ राष्ट्रवाद अभ्यास मंडळाच्या सुरुवातीपासूनच ‘इस्लाम’ हा विषय पुन्हा पुन्हा चर्चिला गेला. इस्लामची मूलतत्त्वे – श्री. श्रीपाद जोशी, इस्लामी राज्याची संकल्पना – श्री. स. मा. गर्गे, मुस्लीम प्रश्नाची आंतरराष्ट्रीय बाजू – वैद्य ब. ल. वष्ट, स्वातंत्र्योत्तर काळातील मुस्लीम राजकारण – श्री. व. ग. कानिटकर याच्या सोबत डॉ. स. ह. देशपांडे यांनीही मुस्लिम […]

मुस्लिम मनाचा शोध Read More »

धर्मनिरपेक्ष पण संस्कृतिसापेक्ष शासनव्यवस्था – चर्चा (भाग २)

लेख क्र. ४३ १७/७/२०२५ डॉ. स. ह. देशपांडे यांच्या ‘धर्मनिरपेक्ष पण संस्कृतिसापेक्ष शासनव्यवस्था’ या विषयावरील प्रतिपादनातील प्रमुख मुद्दे – १) जगाच्या इतिहासात धार्मिक मूलतत्त्ववाद (Religious Fundamentalism माझ्या मते ‘पंथीय अभिनिवेश’) यामुळे सर्वाधिक प्रमाणात रक्तपात आणि हिंसाचार झाला असेल. यापुढील काळात त्याप्रकारच्या विचारसरणीला बळ मिळू नये यादृष्टीने भारताच्या राज्यघटनेच्या शिल्पकारांनी Secularism या तत्त्वाला घटनेत महत्त्वाचे स्थान

धर्मनिरपेक्ष पण संस्कृतिसापेक्ष शासनव्यवस्था – चर्चा (भाग २) Read More »

धर्मनिरपेक्ष पण संस्कृतिसापेक्ष शासनव्यवस्था – चर्चा (भाग १)

लेख क्र. ४२ १६/७/२०२५ संत्रिकेच्या कामातील पौरोहित्य उपक्रम थेट समाजाला भिडणारा असल्याने त्याबद्दल लिहावे तितके कमीच आहे. पण याच्याच बरोबरीने विभागात सामाजिक एकात्मता, राष्ट्रीय एकात्मता यावरही समांतर म्हणता येईल असे काम चालू होते. डॉ. स. ह. देशपांडे हे ज्येष्ठ अर्थशास्त्रज्ञ, त्यांच्या पुढाकाराने राष्ट्रवाद अभ्यास मंडळ व्याख्यान मालेचा आरंभ झाला. प्रा. पु. ग. सहस्त्रबुद्धे या थोर

धर्मनिरपेक्ष पण संस्कृतिसापेक्ष शासनव्यवस्था – चर्चा (भाग १) Read More »

पौरोहित्य : सामाजिक समुपदेशनाचे साधन

लेख क्र. ४१ १५/०७/२०२५ कटुता न ठेवता, राग लोभ दूर सारून पुरोहितांना संघटनाचे म्हणजेच जोडण्याचे काम करायला लागते. ‘पुरोहित’ या शब्दाचा अर्थच मुळी सर्वांच्या अग्रभागी राहून मार्गदर्शन करणारा असा असल्याने योग्य प्रसंगी स्वतःचा अधिकार वापरून काही गोष्टी करायला लागतात. जात-पात, प्रांत, पंथ-भेद बाजूला ठेवून प्रामाणिकपणे स्नेहसिंचन करीत पुरोहितांना वेगवेगळ्या भूमिका पार पाडाव्या लागतात. कधी लोकशिक्षक

पौरोहित्य : सामाजिक समुपदेशनाचे साधन Read More »

एकात्मतेचा अंतर्गत तरल प्रवाह…

लेख क्र. ४० १४/७/२०२५ संत्रिकेमध्ये निरंतर सुरू असलेले संस्कारसेवेचे काम विविध समाजगटात पोहोचविण्याचा प्रयत्न असतो. सुरुवातीच्या काळातील बुरुड समाजातील सामूहिक विवाह, सोमवंशीय क्षत्रिय समाजातील उपनयन, मातंगसमाजासाठी कलशारोहण, नागरवस्तीमध्ये जाऊन केलेले सत्यनारायण, ग्रामीण भागातील महिलांसाठी मार्गशीर्षातील गुरुवार, परीट समाजात मातृभूमिपूजन असे लहान-मोठे प्रयोग झाले आहेत. सध्या संत्रिकेचे जवळ-जवळ ५० पुरोहित देश-विदेशात विविध संस्कार करत आहेत. हे

एकात्मतेचा अंतर्गत तरल प्रवाह… Read More »

स्त्री-उपनयन : एक संस्कार, एक परंपरा

लेख क्र. ३९ १३/०७/२०२५ मुलींचे उपनयन अगदी अल्पप्रमाणात का होईना पुन्हा एकदा समाजमान्य होऊ लागले आहे. वास्तविक पाहता उत्तम शिक्षण व संस्कार हा प्रत्येक बालकाचा अधिकारच आहे. पूर्वी उपनयन म्हणजे शिक्षणासाठीचे द्वार! या द्वारातून प्रवेश करून मुलांचे शिक्षण सुरु व्हायचे. त्यामुळेच प्राचीन काळातील स्त्रीसुद्धा विद्या विभूषित होती असे संदर्भ वेदांपासून पुढे अनेक ग्रंथांत सापडतात. मुलींचे

स्त्री-उपनयन : एक संस्कार, एक परंपरा Read More »

खरा धर्म आणि आचारधर्म

लेख क्र. ३८ १२/०७/२०२५ मा. श्री. यशवंतराव लेले यांनी संस्कृती, संस्कार, धर्म या विषयांवर भरपूर अभ्यास केला आहे. येथे ‘धर्म’ या शब्दाचा सर्वांगीण अभ्यास करून त्यांनी केलेले विश्लेषण देत आहोत. धर्म म्हणजे हिंदू, शीख, ख्रिश्चन असे नसून आपले चांगले आचरण, तसेच समाजाची प्रगती होईल असे काम करणे होय. धर्माची ही व्याख्या यशवंतरावांनी सोप्या शब्दात पण

खरा धर्म आणि आचारधर्म Read More »

प्रबोधिनीचा आगळा-वेगळा ‘पौरोहित्य’ उपक्रम

लेख क्र. ३७ ११/७/२०२५ ज्ञान प्रबोधिनी : एक अभिनव शैक्षणिक प्रयोग, खंड ३ (१९८८) या ग्रंथात संस्कृत-संस्कृति-संशोधिका (संत्रिका) विभागाचे माजी विभागप्रमुख श्री. विश्वनाथ गुर्जर यांनी विभागात होणार्‍या संस्कार उपक्रमाबद्दल ‘संस्कार विभाग’ या लेखात माहिती दिली आहे. संस्कार का करावेत, कसे करावेत, संस्कारांसाठी कोणते साहित्य वापरावे, पौरोहित्य कोणी करावे या प्रश्नांची उत्तरे आपल्याला या लेखात मिळतील.

प्रबोधिनीचा आगळा-वेगळा ‘पौरोहित्य’ उपक्रम Read More »

गुरुपौर्णिमेनिमित्त शब्दांजली…

लेख क्र. ३६ १०/०७/२०२५ कै. वाच. विनायक विश्वनाथ तथा आप्पा पेंडसे ज्यांना मा. रामभाऊ ‘आमचे परात्पर गुरू’ म्हणून संबोधतात त्यांना अभिवादन करून संत्रिकेच्या कामावरती थेट प्रभाव असलेले सर्वांचेच गुरुस्थान म्हणजे मा. श्री. यशवंतराव लेले, मा. प्रा. विश्वनाथ गुर्जर, संस्कृत व तत्त्वज्ञानाचे गाढे अभ्यासक, प्रा. रामभाऊ डिंबळे, ज्यांना प्रबोधिनीचे आद्य पुरोहित म्हणून ओळखले जाते, कै. वाच.

गुरुपौर्णिमेनिमित्त शब्दांजली… Read More »

सार्थ, समंत्रक विवाहसंस्काराविषयी मनोगत

लेख क्र. ३५ ९/७/२०२५ संत्रिकेच्या पौरोहित्य उपक्रमाबद्दल आपण मागच्या काही लेखांमध्ये बघितले. पोथ्यांचे प्रशिक्षण देऊन विभागाने अनेक पुरोहित घडवले. हे पुरोहित फक्त पुण्यातच नाही तर महाराष्ट्र, भारत व परदेशीसुद्धा संस्कारांसाठी जातात. आता साधारण ५० पुरोहित संस्कारविधी करत आहेत. असे संस्कार जेव्हा सुरुवातीला होत होते तेव्हा त्यावर लोकांच्या प्रतिक्रिया आल्या, काही चांगल्या अन् काही वाईट. काहींना

सार्थ, समंत्रक विवाहसंस्काराविषयी मनोगत Read More »