यशवंतराव लेले

देवालय : समाजमनाचे प्रतिबिंब

‘श्रीसद्गुरू साईकृपा’ या मासिकात १९९५ साली प्रकाशित झालेला मा. यशवंतराव लेले यांचा हा लेख. यज्ञसंस्थेचा उदय झाला त्याकाळी निसर्ग देवतांना आकार दिला गेला नव्हता. अग्नीद्वारा त्या त्या देवतांना आहुती पोहोचतात या श्रद्धेने यज्ञाग्नीमध्ये हवन करण्यात येई. ७-८ हजार वर्षापूर्वी ही यज्ञसंस्था सुस्थिर झालेली होती. पुढे यज्ञात अतिरिक्त पशू बळी दिले जाऊ लागल्याने त्या हिंसेविरुद्ध जैन-बौद्धांनी […]

देवालय : समाजमनाचे प्रतिबिंब Read More »

इतकीच प्रार्थना माझी!

मा. यशवंतराव लेले यांनी लिहिलेला हा लेख छात्र प्रबोधन, २००९ या अंकात प्रकाशित झाला आहे. प्रार्थना म्हणजे विनंती, याचना किंवा मागणे असा सर्वसाधारण अर्थ! परंतु या शब्दातील ‘प्र’ म्हणजे विशेष, श्रेष्ठ किंवा उत्कृष्ट! म्हणून प्रार्थना शब्दाचा अर्थ झाला ‘महत्त्वाचे मागणे’ किंवा ‘विशेष याचना’. आरंभी आपल्या आईकडे मूल भूक भागवण्यासाठी दुधाची जी मागणी करते ती कुरकुरण्याच्या

इतकीच प्रार्थना माझी! Read More »

‘सप्त-सेविका’ भारताच्या 

सात ह्या संख्येत काय जादू आहे! रंगांची उधळण सप्त रंगात, आठवड्याची विभागणी सात दिवसात आणि सात सूरातून मधूर संगीत तयार होते. सात आश्चर्येसुद्धा सात आहेत. म्हणूनच आपण वेगळ्या वाटेवरून जाणार्‍या सातासमुद्रा पलिकडून भारतात आलेल्या सात तेजस्विनींची, सप्त सेविकांची ओळख येथे करून घेणार आहोत.  १. अ‍ॅनी बेझंट –  ह्या आयरिश होत्या. ‘बायबल’ परस्पर विसंगत तत्त्वाने भरले

‘सप्त-सेविका’ भारताच्या  Read More »

उपासनेला दृढ चालवावे…

जीवनात जे सहजपणे प्राप्त झाले त्यात समाधान मानून राहणार्‍यास शारीरिक वा बौद्धिक सामर्थ्य वाढवण्यासाठी विशेष काही साधना करण्याची आवश्यकता जाणवत नाही. याउलट आयुष्यात आपण आज आहोत त्यापेक्षा अधिक काही बनावे, खूप मोठे व्हावे, उत्तुंग व्यक्तिमत्त्व घडवावे अशी आस ज्याला असते ती व्यक्ती आपली निसर्गप्राप्त साधनसामग्री काय आहे याची नीट माहिती घेऊन शारीरिक, मानसिक, बौद्धिक व

उपासनेला दृढ चालवावे… Read More »

गायींचे विश्वातील योगदान

मा. यशवंतराव लेले यांनी २००९ साली लिहिलेला हा गायींविषयीचा लेख आहे. ‘वसुधैव कुटुंबकम्’ ही वेदांची जीव जगताकडे पाहण्याची व्यापक दृष्टी होती. त्यामुळे गवताच्या पात्यापासून ते वृक्षापर्यंत आणि कृमिकीटकांपासून मनुष्यमात्रांपर्यंत सर्वाविषयी ‘आत्मनः प्रतिकूलानि परेषां न समाचेरत्’ अशी सहानुभूतीची व स्वतःला दुःखद वाटणारी गोष्ट आपण दुसऱ्यांच्या बाबत करू नये अशी वागणूक वेदातील माणसांची होती. दर्भ म्हणजे पाणथळ

गायींचे विश्वातील योगदान Read More »

जलतत्त्वाची विविध रूपे

मा. यशवंतराव लेले यांनी २०१५ साली लिहिलेला हा लेख आहे. पृथ्वीवर कित्येक हिमयुगे येऊन गेल्याचा इतिहास आहे. पुढे ते हिम वितळून हा ग्रह पूर्ण जलमय होऊन गेला. क्रमाक्रमाने पाणी बाष्परूपाने कमी होत गेले. त्या भौगोलिक इतिहासाच्या आधारे ‘मनू आणि मासा’ या सारख्या पुराणकथा जगभर निर्माण झाल्या.  शतपथ ब्राह्मणामध्ये म्हटले आहे, ‘इयं वै पृथ्वी भूतस्य प्रलयात्

जलतत्त्वाची विविध रूपे Read More »

मोठं होणं!

मा. यशवंतराव लेले सर्वजण मोठे होत असतात. मनात असो की नसो, प्रत्येक दिवशी प्रत्येक जण मोठा होतच असतो! हे वयानं मोठं होणं सहजच असतं! त्याची जाणही फारशी आपल्याला नसते. वाढदिवस साजरा करणाऱ्यांना त्याची जाणीव बहुधा राहते. इतरांना त्याचं भान बरेच उशिरा येते. पण ज्ञानानं मोठं होणं हे मात्र प्रयत्नसाध्य असतं. त्यासाठी कष्ट सोसण्याची सिद्धता लागते.

मोठं होणं! Read More »

उत्तम उद्योजकत्व!

मा. श्री. यशवंतराव लेले मा. यशवंतराव लेले यांनी २२ जानेवारी २०१३ रोजी लिहिलेला ‘उद्योजकता’ संबंधी लेख. उद्योग, व्यवसाय करणे महत्त्वाचे आहेच, पण ते कोणत्या तत्त्वाने करावे ते त्यांनी या लेखात सांगितले. संतश्रेष्ठ जगद्‌गुरू श्री तुकाराम महाराज हे वाणसौद्याचा व्यवहार करीत असत. पण त्यांचे व्रत होते सचोटीचा धंदा करण्याचे! त्यामुळे धनसंग्रह करतानाही त्यांची दृष्टी कशी होती,

उत्तम उद्योजकत्व! Read More »

कै. डॉ. भीमराव गस्तींंचे सामाजिक कार्य

लेख क्र. ४६ २०/०७/२०२५ ज्ञान प्रबोधिनीमध्ये कार्यकर्त्याची वैचारिक जडण-घडण व्हावी यासाठी व्याख्यानांच्या योजना केल्या गेल्या त्याचप्रमाणे कृतिशील कार्याचे आदर्शही निर्माण झाले आहेत. संत्रिकेतून मा. यशवंतराव लेले यांनी केलेले असे कार्य म्हणजे बेरड-रामोशी समाजाच्या विकासासाठी आणि देवदासी महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी ध्यासपूर्व काम करणार्‍या कै. डॉ. भीमराव गस्ती या मनस्वी कार्यकर्त्याला त्यांनी समरसून केलेली आत्मीय मदत. या

कै. डॉ. भीमराव गस्तींंचे सामाजिक कार्य Read More »

खरा धर्म आणि आचारधर्म

लेख क्र. ३८ १२/०७/२०२५ मा. श्री. यशवंतराव लेले यांनी संस्कृती, संस्कार, धर्म या विषयांवर भरपूर अभ्यास केला आहे. येथे ‘धर्म’ या शब्दाचा सर्वांगीण अभ्यास करून त्यांनी केलेले विश्लेषण देत आहोत. धर्म म्हणजे हिंदू, शीख, ख्रिश्चन असे नसून आपले चांगले आचरण, तसेच समाजाची प्रगती होईल असे काम करणे होय. धर्माची ही व्याख्या यशवंतरावांनी सोप्या शब्दात पण

खरा धर्म आणि आचारधर्म Read More »