वैचारिक

कार्यकर्त्याचा पहिला गुण‌ – ‘प्रतिसादी (रिस्पॉन्सिव्ह) असणे‌’प्रतिसाद देतो तो ‌‘माणूस‌’

काही देशांमध्ये अनोळखी माणसे सुद्धा सहज ‌‘सुप्रभात‌’ किंवा तत्सम प्रकारे साद-प्रतिसाद देतात. समोरच्या व्यक्तीला नुसते ‌‘माणूस‌’ म्हणून ओळखणे किंवा तिची दखल घेणे तिकडे मोलाचे मानले जाते. सभोवतालच्या व्यक्ती, त्यांच्या भावभावना, विचार, कृती यांना उचित आणि उत्स्फूर्त प्रतिसाद देण्याने माणसे जोडली जातात. गुणग्रहणाने जोडली जातात. अडचणीत तत्पर साहाय्य केल्याने जोडली जातात. अशा सहज केल्या जाणाऱ्या गोष्टींनी […]

कार्यकर्त्याचा पहिला गुण‌ – ‘प्रतिसादी (रिस्पॉन्सिव्ह) असणे‌’प्रतिसाद देतो तो ‌‘माणूस‌’ Read More »

कार्यकर्ते बनू या- प्रस्तावना

ज्ञान प्रबोधिनीचे संस्थापक कै. वि. वि. तथा आप्पा पेंडसे यांना 1975 मध्ये उपराष्ट्रपतींच्या हस्ते ‌‘एक्सलन्स्‌‍‌’ पुरस्कार मिळाला. तो स्वीकारताना उत्तरादाखल केलेल्या भाषणात त्यांनी प्रबोधिनीच्या उद्दिष्टांची तात्कालिक, मध्यंतर व दीर्घकालीन उद्दिष्टे अशी विभागणी करून प्रथमच प्रबोधिनीबाहेरील लोकांसमोर प्रकटपणे मांडली होती. क्रमिक अध्ययनातील उत्तम यशाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये एक तरी देशप्रश्न सोडवण्याची जबाबदारी स्वतःहून घेण्यासाठी प्रेरणाजागरण, वृत्तिघडण आणि नेतृत्वविकसन

कार्यकर्ते बनू या- प्रस्तावना Read More »

पद्य क्र. १३ अविरत श्रमणे हेच जिणे

निरूपण – प्रबोधिनीतल्या विद्यार्थ्यांच्या व कार्यकर्त्यांच्या भावनिक व प्रेरणात्मक विकासासाठी त्यांच्यामध्ये responsive, responsible, co-operative, creative आणि  regenerative  हे गुण विकसित झाले पाहिजेत असे कै. आप्पांनी म्हटले होते. ‌‘कार्यकर्ते बनूया‌’ या पुस्तिकेत या गुणांचे मराठी भाषांतर अनुक्रमे प्रतिसादी, उत्तरदायी, सहयोगी, नवनिर्मितीक्षम आणि प्रेरणासंक्रामक असे केले आहे. प्रेरणासंक्रामक म्हणजे इतरांमध्ये स्वतःच्या प्रेरणेचे संक्रमण करणारा. प्रेरणेचे संक्रमण म्हणजे

पद्य क्र. १३ अविरत श्रमणे हेच जिणे Read More »

सारे विचार – प्रवाह आमचेच – व्याख्यान

सारे विचार-प्रवाह आमचेच व्याख्यान ज्ञान प्रबोधिनीचे कार्याध्यक्ष मा. डॉ. प्र. ल. गावडे, ज्ञान प्रबोधिनीचे सर्व हितचिंतक, कार्यकर्ते, विद्यार्थी, युवक सदस्य आणि इथे जमलेल्या सर्व नागरिक बंधु-भगिनींनो, गेले दोन तास सतत आपण जे प्रात्यक्षिकपाहात होतो, ते युवकांच्या उत्साहाचे प्रात्यक्षिक पाहात होतो. त्याच्यामध्ये अनेक कौशल्यांचा समावेश होता, धाडसाचा समावेश होता, निर्भयतेचा समावेश होता. परंतु सतत जाणवत होता,

सारे विचार – प्रवाह आमचेच – व्याख्यान Read More »

सारे विचार-प्रवाह आमचेच

रूचीनां वैचित्र्याद्… प्रस्तावना ज्ञान प्रबोधिनीच्या युवक विभागाची क्रीडा प्रात्यक्षिके ही जणू प्रबोधिनीचे कार्य समाजापुढे सादर करण्याची एक पर्वणी असते. त्या त्या कालखंडातील युवक कार्यकर्त्यांनी शारीरिक कौशल्यांची कसून तयारी करावी आणि उपस्थितांमध्ये उत्साहाचे जोशपूर्ण वातावरण तयार व्हावे, असा त्यामागचा हेतू असतो. अशा वातावरणात शारीरिक बलोपासनेनंतर प्रबोधिनीच्या कार्याचे प्रयोजन कालोचित संदर्भासह प्रबोधिनीचे आदरणीय संचालक सर्वांपुढे दुहरतात. शालेय

सारे विचार-प्रवाह आमचेच Read More »

पद्य क्र. १२ – जननी जगन्मात की…

निरूपण – आजचे पद्य हे संकल्प-गीत आहे. ‘जगाने हम चले’ हे त्याचे पालुपद आहे. स्वतःमध्ये आणि इतरांमध्ये प्रेरणाजागरण करण्यासाठी आधी काय काय करायला हवे याच्या पायऱ्याच जणू काही त्यात सांगितल्या आहेत. जननी जगन्मात की, प्रखर मातृभक्ति की,सुप्त भावना जगाने हम चलें ॥धृ.॥ जगन्माता म्हणजे परमेश्वर. जननी म्हणजे जन्मदात्री आई. आपण परमेश्वरालाही जगन्माता म्हणजे जगाची आईच

पद्य क्र. १२ – जननी जगन्मात की… Read More »

पद्य क्र. ११ – नवीन पर्व के लिए …

निरूपण – प्रबोधिनीच्या दशवार्षिक वर्धापन दिनाच्या निमित्ताने ‘आम्ही जाऊच जाऊ’  हे पद्य लिहिले गेले. त्यात एक कडवे नवतेज, नवक्षितिजे, नवस्वप्ने, नवीन कवने, नव्या कहाण्या, नवस्फूर्ती असा नाविन्याचा पुरस्कार करणारे आहे. प्रबोधिनीतील कवींनी सुरुवातीच्या काळात लिहिलेल्या आणखी पाच पद्यांमध्ये एखाद्या कडव्यात नाविन्याचा उल्लेख आहे. मात्र अशा पद्यांमध्ये नाविन्यापेक्षा तेज, पराक्रम, राष्ट्रघडण, ध्येयाचा ध्यास, यशस्वी जीवन, विजयी

पद्य क्र. ११ – नवीन पर्व के लिए … Read More »

पद्य क्र. १० – आज तन, मन और जीवन

निरूपण – लौकिक जीवनात वाढदिवस, लग्न-समारंभ, सत्कार-समारंभ अशा प्रसंगी उत्तमातली उत्तम, सर्वात शोभिवंत, सगळ्यांपेक्षा वेगळी अशी भेटवस्तू उत्सवमूर्ती व्यक्तीला देण्याचा सर्वांचा प्रयत्न असतो. यासाठी केलेल्या कष्टांना, खर्चाला कोणी समर्पण किंवा त्याग म्हणत नाही. उत्सवमूर्तीला मोठा पुष्पगुच्छ, आकर्षक शुभेच्छापत्र किंवा सुंदर कलाकृती भेट देण्यासाठी जेवढे धडपडू, तेवढे स्वतःचे बलसंपन्न शरीर, सुदृढ मन आणि तरल बुद्धी समाजाकरता,

पद्य क्र. १० – आज तन, मन और जीवन Read More »

हे कर्मयोगिन्

हे कर्मयोगिन्, तुम्ही मानसी या असंख्यात ज्योतिर्दळे लावली जरी दाट अंधार आहे सभोती तरी आमुची वाट तेजाळली ॥ ध्रु. ॥दिली ध्येयनिष्ठा दिली कार्यनिष्ठा, मनी रेखलेली श्रमाची प्रतिष्ठा समाजार्थ निःस्वार्थ सेवा कराया तुम्ही त्यागदीक्षा आम्हाला दिली हे कर्मयोगिन्, तुम्ही मानसी या कृतीने नवी प्रेरणा कोरली ॥ १ ॥ जेथे घोर अन्याय थैमान घाली तिथे धावुनी जा

हे कर्मयोगिन् Read More »

हे ऋषिवर श्रीअरविंद

हे ऋषिवर श्रीअरविंद, हे चिन्मय मधुरा माते युवशक्ति हिंदुराष्ट्राची, वंदिते आज तुम्हाते ॥ ध्रु. ॥ वेड एक होते तुम्हा, मातृभूमिच्या मुक्तीचे उग्र खड्ग झाला तुम्ही, जागृत भारतशक्तीचे ‘व्हा सिद्ध संगरा’, वदला, ‘सांडूनि भ्रांति-मोहाते’ ॥ १ ॥द्रष्ट्या प्रतिभेने तुमच्या, स्वप्ने आम्हासी दिधली ‘ही अखंड होइल भूमी, जरि खंडित आता दिसली,संजीवन अध्यात्माचे, देईल तृषित विश्वाते’ ॥ २

हे ऋषिवर श्रीअरविंद Read More »