परत फिरा रे
परत फिरा रे गावाकडती, घेउन नव विज्ञानविहंगमांनो ! तुम्हाला मायभूमिची आण ॥ध्रु॥ गावोगावी पिढ्यापिढ्यांची तीच दुर्दशा ठरलेलीदारिद्य्राचा शाप सनातन मुळी न आशा उरलेलीउजाड राने पाण्यावाचून भेगाळत ही पडलेलीकितीहि करूनी कष्ट आमची गणिते सारी चुकलेलीया रानांचा कायापालट, करील कोणी मांडून ठाणया भूमीला देइल जोडून, नव्या युगाचे तंत्रज्ञानवळविल पाणी, टिकविल माती, पिकविल मोती रानोरानपरत फिरा रे गावाकडती […]