वैचारिक

८. प्रबोधिनीचे प्रबोधिनीपण : सर्जनशीलता

नेतृत्वविकसनातील पहिला प्रयोग १९९२ साली प्रबोधिनीच्या त्रिदशकपूर्तीनिमित्त काढलेल्या स्मरणिकेत पुढील परिच्छेद आहे: “नेतृत्व म्हणजे त्या त्या क्षेत्रात नवे सुचून ते प्रत्यक्षात आणता आले पाहिजे अशी कल्पना केली. एखाद-दुसऱ्या गावाऐवजी पंचवीस गावांच्या खोरे विकसनाची योजना आखली ती त्यामुळे. आयुर्वेदिक सूक्ष्मौषधे बनवून त्यांच्या प्रसाराचा प्रयत्न केला तो त्यामुळे ! मराठीत शिकलेल्यांना सर्व विषय एकदम इंग्रजीतून देवनागरी लिपीचा […]

८. प्रबोधिनीचे प्रबोधिनीपण : सर्जनशीलता Read More »

७. प्रबोधिनीचे प्रबोधिनीपण : स्वावलंबन

स्थानिक संसाधनांचा वापर युवक विभागाच्या दलावर मार्गदर्शक म्हणून काम केलेला एक प्रबोधक सध्या आर्किटेक्ट म्हणून व्यवसाय करतो. व्यवसायाला सुरुवात केल्यापासूनच ‘मी स्वस्तातल्या इमारतींची आरेखने करतो व करणार’ असे तो म्हणायचा. त्याच्या सुरुवातीच्या ग्राहकांकडून मी त्याच्याबद्दल नाराजी व्यक्त झालेली पाहिली. ‘तो म्हणतो तसे त्याच्या आरेखनांप्रमाणे केलेले काम स्वस्त नसते’, ‘इतरांना येतो तेवढाच खर्च येतो’, ‘त्याच्याकडे गेलो

७. प्रबोधिनीचे प्रबोधिनीपण : स्वावलंबन Read More »

३. धुराच करोनि सोडणे I कार्यकर्ते अनेक II

सूर्याजी मालुसरे व आनंदराव गुजर : शिवकालातील दोन प्रसंगांवर अनेक पोवाडे आणि कविता लिहिल्या गेल्या आहेत. पहिला प्रसंग आहे कोंडाणा जिंकण्याचा आणि दुसरा प्रसंग आहे प्रतापराव गुजर आणि सहा सरदारांच्या बलिदानाचा. कोंडाणा जिंकण्याची जबाबदारी तानाजी मालुसरे यांची होती. पण लढाईत त्यांचा मृत्यू झाल्यावर मराठा फौजेची पळापळ सुरू झाली. त्यावेळी सूर्याजी मालुसरे यांनी पळणाऱ्या मावळ्यांना थोपवले,

३. धुराच करोनि सोडणे I कार्यकर्ते अनेक II Read More »

६. प्रबोधिनीचे प्रबोधिनीपण : सहविचार

संघर्षातून विचारविनिमय नर्मदा नदीवरील सरदार सरोवर प्रकल्प आणि त्या प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या गावकऱ्यांच्या पुनर्वसनासाठी संघर्ष करणाऱ्या श्रीमती मेधाताई पाटकर ही नावे महाराष्ट्र, गुजराथ, मध्य प्रदेशातील बहुतेक जणांनी ऐकलेली असतात. या आंदोलनामुळे मोठे प्रकल्प करावेत की नाहीत ? आणि मोठ्या प्रकल्पातील विस्थापितांचे पुनर्वसन कोणी ? कधी ? कुठे ? कसे ? करावे हे प्रश्न चर्चेमध्ये आले.

६. प्रबोधिनीचे प्रबोधिनीपण : सहविचार Read More »

५. प्रबोधिनीचे प्रबोधिनीपण : समग्रता

निरीक्षण आणि तुलना मागच्या आठवड्यात महेंद्रभाईबरोबर सोलापूरहून पुण्याला येत होतो. शेजारी दोन डच ज्येष्ठ नागरिक बसले होते. भारतातला दोन महिन्यांचा प्रवास संपवून परतीच्या मार्गावर होते. त्यातील एक जण वेळ घालविण्यासाठी ‘सुडोकू’ ची कोडी सोडवत बसला होता. महेंद्रभाईंनी चौकशी केल्यावर ‘हे डच भाषेतील शब्दांचे ‘सुडोकू’ कोडे आहे, आकड्यांचे नाही’, अशी माहिती त्याने पुरवली, वर जाता जाता

५. प्रबोधिनीचे प्रबोधिनीपण : समग्रता Read More »

४. कामाबरोबर बोधवाक्याचे चिंतन

निरर्थक रूढी आणि सार्थ प्रथा लोकमान्य टिळकांच्या ‘केसरी’च्या पहिल्या पानावर ‘स्वयमेव मृगेन्द्रता’ या श्लोकाची एक ओळ छापलेली असायची. सिंहाचे वनराज असणे त्याच्या कृतीतूनच सिद्ध होते, त्यासाठी इतरांनी राज्याभिषेक करायला लागत नाही, हा त्या श्लोकाचा भावार्थ. या ओळीप्रमाणेच लोकमान्यांच्या काळात ‘केसरी’ने महाराष्ट्राचे वैचारिक नेतृत्व केले. एखादे सुवचन ध्येय म्हणून शीर्षस्थानी छापणे ही ‘केसरी’च्या बाबतीत सार्थ प्रथा

४. कामाबरोबर बोधवाक्याचे चिंतन Read More »

३. प्रत्येक कृतीत ध्येयविचार

नवीन ग्रंथाचे मुखपृष्ठ दि. १७ ऑगस्ट २००८ या दिवशी ‘ज्ञान प्रबोधिनी : एक अभिनव शैक्षणिक प्रयोग, खंड ४’ या ग्रंथाचे प्रकाशन झाले. त्याचे मुखपृष्ठ कसे असावे या संबंधी चित्रकाराबरोबरची पहिली चर्चा सहा-सात महिन्यांपूर्वी झाली होती. साधारण महिन्यापूर्वी दोन चित्रांचे नमुने बघायला मिळाले. त्यातल्या अधिक उण्याची तुलना चालू असताना मुखपृष्ठासाठी आणखी एक कल्पना पुढे आली. देशातील

३. प्रत्येक कृतीत ध्येयविचार Read More »

२. उपक्रमातून उद्दिष्टाकडे

मिरवणुकीतील ध्वजधारी आठवड्यापूर्वीच गणेशोत्सव संपला. गणेशोत्सव म्हणजे उत्साह, आनंद, चैतन्य, विराट जनसमूहाचे दर्शन, हा अनुभव याही वर्षी आला. विसर्जन मिरवणुकांमधून सामूहिक शिस्तबद्ध नृत्याप्रमाणेच केवळ सामूहिक वाद्य-घोष करणारे ताफे या वर्षी आणखी वाढलेले दिसले. या वर्षी आणखी एक बदल दिसला तो म्हणजे प्रबोधिनीच्या बर्ची-नृत्य गटातील ध्वजधाऱ्यांप्रमाणे ध्वजदंड सरळ रेषेत वर-खाली नाचवणारे ध्वजधारी इतरही काही गटांमध्ये दिसले.

२. उपक्रमातून उद्दिष्टाकडे Read More »

“संस्थेच्या घटनेतील उद्देश” – प्रस्तावना

प्रस्तावना एखाद्या संस्थेचा संस्थानिर्मिती लेख (Memorandum of Association) आणि तिची नियमावली (Rules and Regulations) मिळून तिची कायदेशीर घटना होते. ज्ञान प्रबोधिनीच्या सदस्यांनी दर पंधरा वर्षांनी आपल्या घटनेचा आमूलाग्र आढावा घेऊन बदलत्या काळानुसार तिच्यात आवश्यक वाटल्यास समूळ बदल करावेत, अशी तरतूद ज्ञान प्रबोधिनीच्या नियमावलीत प्रथमपासूनच होती. त्यानुसार नियमावलीत व संस्थानिर्मिती लेखातील उपक्रमांच्या परिच्छेदात वेळोवेळी काही बदल

“संस्थेच्या घटनेतील उद्देश” – प्रस्तावना Read More »

२. आत्मिक शक्तीचे सामाजिक प्रकटीकरण म्हणजे नेतृत्व

भारताच्या भवितव्याचे कर्णधार : १) भारत हा समृद्ध देश व्हावा. प्रत्येक भारतीय कुटुंबात समृद्धी यावी. २) भारतात सर्व प्रकारची उत्पादने तयार करणारे उद्योग असावेत. या उद्योगांनी कोणाही व्यक्तीचे, समाज-गटाचे व निसर्गाचेही शोषण न करता उत्पादन करावे. ३) भारतातील शेती सर्वांना भरपूर अन्न, उद्योगांना कच्चा माल व अनेकांच्या हातांना सन्मानाचे काम देणारी असावी. ४) भारतात सर्वांना

२. आत्मिक शक्तीचे सामाजिक प्रकटीकरण म्हणजे नेतृत्व Read More »