मी परावलंबी नाही
मी माझ्या पायावरती ही उभी नव्याने बाई मी परावलंबी नाही, मी परावलंबी नाही ।। ध्रु. ।। या जिण्यास बाईच्या गं हे दळीत होते जोते माझ्याच घराच्या आत मी बंदिवान का होते?मी मुक्या गुराच्यावाणी या घरात जखडुन होते मी कधीच नव्हते बाई ओलांडुन गेले जोते पण कुणा ठावकी कैशी मी बदलुन गेले बाई ।। १ ।। […]