वैचारिक

 गाव माझे कर्माचे मंदिर 

गाव माझे कर्माचे मंदिर देव आणि ग्रामस्थ हे स्फूर्तिचे सागर ।। ध्रु. ।। गावाचा करण्या सर्वांगीण विकास लहान थोर निष्ठेने करूया प्रयास एकमेका सावरूया देऊनि आधार ।।१।। गावाचा चालवूनी शिस्तबद्ध गाडा वाचू या सतत विकासाचा पाढा विकासाने फुलवूया सगळी घरदारं ।।२।। शाळा असावी विकासाची गंगा शिकावे लहान थोर हाचि मंत्र सांगा शिक्षणाने येईल गावाला बहर […]

 गाव माझे कर्माचे मंदिर  Read More »

गाव माझा मी गावाचा

गांव माझा माझा माझा माझा ऽ मी गांवाचा ।। ध्रु. ।। गांव पाहावयासी गेलो ऽ गांवकरी होऊनि ठेलो ऽ गांव राहावे निर्मळ ऽ अशी धरीन मी तळमळ ।।१।। गांवासंगे फुलली शाळा ऽ व्यसनांना ती घालील आळा ऽ गांवातील शेती भाती ऽ राहावी तिच्याशी दृढ नाती ।।२।। गांवातील हो ग्रामस्था ऽ असावी एकमेंका आस्था ऽ एकी

गाव माझा मी गावाचा Read More »

गाणे बचतगटाचे

मला गं बाई जाग आली । प्रबोधिनीने साथ दिली ।। अज्ञान दूर मी मी सारीते । बचतगटाला सुरवात करिते ।। ध्रु.।। आम्ही खेड्याच्या अडाणी बाया । कष्ट करोनी झिजती काया ।। आया बायांना जाऊन सांगते। बचतगटाला सुरवात करिते ।।१।। सर्व मिळोनी एकत्र येऊ। एकत्र येऊन विचार करू ।। वीस जणींचा गट मी बनवते । बचतगटाला

गाणे बचतगटाचे Read More »

एकीचा हिसका दाउ द्या कि रं…..

सोसायचं कुठवर या गरिबानं आता सुखाचं चार घास खाउ द्या की एकीचा हिसका दाउ द्या कि रं दारूला दणका देउ द्या की ।। ध्रु. ।। बाप आन् चुलता गुतलाय पुरता, मामा न् मेव्हना उलथापालथा सरपंच चेअरमन शाणासुरता, भावकी न् गावकीचा टेकलाय माथा मुळावर लाथा देउ द्या कि रं ।। १ ।। नशिबाशि टकरा, बळीचा बकरा,

एकीचा हिसका दाउ द्या कि रं….. Read More »

आता नाही मी एकटी

आता नाही मी एकटी, मला मिळाल्यात सख्या आता एकमेळ करू, नाही राहाणार मुक्या ।। ध्रु. ।। मी ग दारूड्याची बहीण, माझं माहेर तुटलं माझं दुःख झालं मुकं, पाणी नेत्राचं सुकलं माझं माहेर होतं मोठं, मोठी माया मोठा झोक भाऊ दारूत बुडाला, आता हासतात लोक ।। १ ।। मी ग दारूड्याची नारी, माझं कुंकू झालं फिकं

आता नाही मी एकटी Read More »

आज आक्रीत घडलं

सइबाई ग राहिबाई ग आज आक्रीत ऽ घडलं शिवगंगेच्या राहाळाचं गिऱ्हाऽण सुटलं ।। ध्रु. ।। कोण कुठला कंजारभाट त्यानं लाविला बाई नाट माझं शिवार हिरवा शालू त्याचा फाडीला जरीचा काठ घरोघरच्या माऊलीचं बाई नशीब फुटलं ।। १ ।। माझं माणूस माथेफिरू त्यानं आणली सवत दारू सुटं चौखूर हा वारू त्याला कसा ग आवरू सखि बहिणाबाई

आज आक्रीत घडलं Read More »

हिंदु ऐक्याची ध्वजा….

या निळ्या मोकळ्या अंबरी विहरते सूर्यकन्येपरी हिंदु ऐक्याची ध्वजा ।। ध्रु. ।। आर्षकालातुनी आर्यसंघातुनी मुक्त जे गाइले सूक्त तेजस्वि ते लहरताना दिसे या स्वरांच्या वरी ।। १ ।। दुष्टनिर्दालना सुष्टसंरक्षणा धर्मसंस्थापना चेतवी जी मना कल्पवृक्षापरी छत्र माथी धरी ।। २ ।। स्तंभिकेतळी हिच्या अखंड यज्ञ मांडिले घेतली महाव्रते सहस्र प्राण सांडिले ही असो महत्पदी वैभवाच्या

हिंदु ऐक्याची ध्वजा…. Read More »

शतकातुनि…

शतकातुनि द्रष्ट्यांचे स्वर निनादती ‘अग्रेसर हिंदुराष्ट्र हिंदुसंस्कृती’ असे स्वर निनादती ।। ध्रु. ।। इतिहासा ज्ञात असे शौर्य येथले यज्ञाग्नी सर्वप्रथम येथ चेतले देशास्तव प्रथम दिल्या इथुनि आहुती ।। १ ।। परदास्ये होते जधि राष्ट्र घेरले संतांनी सद्विचार येथ पेरले स्वत्वाची ठेवियली ज्योत जागती ।। २ ।। स्वातंत्र्यास्तव कितीक अथक झुंजले फाशीचे दोर कुणी हसत चुंबिले

शतकातुनि… Read More »

विश्वात सर्व शोभो

विश्वात सर्व शोभो हा हिंदुदेश अमुचा त्याच्याच पूजनाचा हा ध्यास अंतरीचा ।। ध्रु. ।। नादातही नद्यांच्या वेदान्तसूक्ति हसती इथल्या तरुलताही त्यागास पूजताती सत्यासमोर असणे हा सूर्यफूल बाणा नचिकेत निर्भयांचा हा हिंददेश अमुचा || १ || वारा सदैव गाई स्वातंत्र्यगीत येथे उत्तुंग पर्वतांचे उन्नत सदैव माथे भूमी कधी न साही अपमान खंडनाचा आसिंधुसिंधु अमुचा हा हिंदुदेश

विश्वात सर्व शोभो Read More »

या माझ्या भारतदेशी

एकजीव उमदे व्हावे जनजीवन गावोगावी या माझ्या भारतदेशी सुखस्वप्ने फुलुनी यावी ।। ध्रु. ।। शेतात कोरड्या किसान गाळी घाम पेरले उगवता हरखुन जाई भान भरगच्च पिकाने पिवळे होई रान बळिराजाची परि बाजारी धुळदाण या भारतभूपुत्राच्या कष्टाला किंमत यावी ।। १ ।। ही सागरवेष्टित भूमी सुजला सुफला रखरखीत झाली ओलावा ओसरला बोडके नागडे होता डोंगरमाथे आटले

या माझ्या भारतदेशी Read More »