केंद्रस्तरावरील उद्दिष्टे
१. मणिपूर येथील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सोयीसाठी सहनिवास चालवणे.
२. चैतन्य भुवन येथे विविध शैक्षणिक व क्षमता विकसनाच्या उपक्रमांचे प्रयोग व स्थिरीकरण करणे.
३. शेळगी येथील प्रबोधिनीच्या जागेचा विकास करणे व तेथे विविध कार्यदिशांचे उपक्रम सुरू करणे.
४. सामाजिक उद्योजकता – किमान 100 विडी कामगार महिलांना आरोग्यास हानिकारक नसलेला रोजगार उपलब्ध करून देणे.
५. किशोरी विकास प्रकल्प – वंचित गटांतील विद्यार्थिनींची अध्ययनक्षमता अभिवृद्धी व व्यक्तिमत्त्व विकासासाठी नियमित उपक्रमांची योजना करणे.
इतर विभागांची उद्दिष्टे
६. पूर्व-प्राथमिक विभाग – शिक्षण संकल्पातील गुण विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यासाठी अभ्यासपूर्वक मांडणी करून पालक प्रबोधनाची योजना करणे.
७. शिशु अध्यापिका विद्यालय – माजी विद्यार्थिनींचे संघटन करणे व त्यांच्या माध्यमातून पूर्व प्राथमिक शाळांचे संपर्क जाळे तयार करणे.
८. प्राथमिक विभाग –
८.१ विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कार व मूल्ये जोपासण्यासाठी कृ ती कार्यक्रमाची रचना करणे.
८.२ बालशिक्षण या विषयातील संशोधनासाठी प्रोत्साहनात्मक रचना, क्षमता व व्यवस्था निर्माण करणे.
९. माध्यमिक विभाग – नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील आकृ तीबंधाला अनुसरून उच्च माध्यमिकच्या टप्प्याचे वर्ग सुरु करणे.