Good Practices Article 9 – Smt. Shama Pawar Dhok, General Manager, MSRDC

नमस्कार,
ज्ञान प्रबोधिनी स्पर्धा परीक्षा केंद्राच्या त्रिदशकपूर्ती निमित्त आपण आपले अधिकारी आणि इतर क्षेत्रात उत्तम काम करणाऱ्या विद्यार्थ्यांचे Good Practices Document तयार करत आहोत.

स्पर्धा परीक्षेचा प्रवास हा प्रत्येकाचा वेगळा असतो. काही जण अगदी लहान वयापासून या क्षेत्राची निश्चिती करतात. तर काही जण नकळत किंवा काही घटनेमुळे या क्षेत्राकडे ओढले जातात. या लेखमालिकेतील पुढील लेख हा एका अशाच व्यक्तीचा आहे ज्यांना पुढील शिक्षण पूर्ण करून प्राध्यापक व्हायचे होते. शिकवण्याची तळमळ आणि खूप आवड होती. पण त्या वर्षी पदव्युत्तर शिक्षणासाठी अगदी मोजक्याच जागा निघाल्याने त्यांना हवी तशी संधी मिळाली नाही. म्हणून दुसरी संधी मिळेपर्यंत त्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरु केला आणि नंतर संधी मिळाली पण तोवर हा अभ्यास आवडायला लागला. या प्रवासातही अडचणी आल्या, मनाविरुद्ध निकाल आले. या सगळ्याने न डगमगता पण तरी गरजेनुसार सोबत इतर काम करत त्यांनी आपला अभ्यास सुरु ठेवला आणि पुढे जाऊन यश पादाक्रांत केलं.
ती विद्यार्थिनी म्हणजे राज्यसेवेतून २००७ मध्ये महाराष्ट्रात सर्वप्रथम आलेल्या आणि उपजिल्हाधिकारी म्हणून निवड झालेल्या, सध्या अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या सौ. शमा पवार ढोक .
सौ. शमा यांनी चारा छावणी असेल, अन्नधान्य पुरवठा असेल, जमीन आधिग्रहण असेल या सगळ्या कामातून आपला वेगळा ठसा उमटवला आहे. आज त्या मुंबईतील बहुचर्चित कोस्टल रोड, मुंबई – गोवा महामार्ग अशा महत्वाच्या दळणवळण प्रकल्पांची धुरा सांभाळत आहेत.

त्यांचे अनुभव, त्यांचे कार्य आणि जीवनप्रवास आपण सर्वानी जरूर वाचावा, अनुभवावा असे आवाहन आणि शुभेच्छा!

लेख वाचण्यासाठी: क्लिक करा

Namaskar,
On the occasion of the completion of three decades (Tridashakpurti) of the Jnana Prabodhini Competitive Examination Centre, we are preparing a Good Practices Document highlighting our officers and students who are doing exemplary work in various fields.

The journey to public service is unique for everyone. This featured article highlights Smt. Shama Pawar Dhok, who originally aspired to be a professor. When limited postgraduate seats diverted her path, she began preparing for competitive exams. Despite setbacks and balancing work with studies, her perseverance led her to top the 2007 State Civil Services Examination.
Currently serving as Additional Collector, Smt. Shama Pawar Dhok has left a significant mark through her work in food supply, land acquisition, and fodder camps. She now manages critical infrastructure projects like the Mumbai Coastal Road and the Mumbai-Goa Highway.
We suggest you to read her experiences, journey and her contributions in this sector.

To read full article: click here