संत्रिका

काशूर भाषेतील रामावतारचरित–कश्मीरी रामायण

लेख क्र. ५३ १६/०८/२०२५ रामकथा भारतीयांसच नाही तर जगासही ज्ञात आहे. परंतू त्या कथेत स्थळ-काळानुसार काही बदल आपल्याला दिसून येतात. संत्रिकेत खूप मोठा व विविध रामायणे असलेला संग्रह आहे. त्या संग्रहातील पंप रामायण व मोल्ल रामायणाची माहिती आपण मागील लेखांमध्ये बघितली. आज आणखी एका वैशिष्ट्यपूर्ण रामायणाची माहिती येथे देत आहोत ते म्हणजे काशूर भाषेतील ‘रामावतारचरित’ म्हणजेच कश्मीरी रामायण. संत्रिकेच्या विभागप्रमुख डॉ. मनीषा शेटे यांनी या ग्रंथाचा अभ्यास केला व त्यावर माहितीपर लेख लिहिला आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून कश्मीर हे भारताचे नंदनवन धगधगते झालेले आहे. आजही तिथले राष्ट्रीयत्वाचे प्रश्न उसळी मारून वर येताना दिसतात. यासर्व पार्श्वभूमीवर भारतीय संस्कृतीचे प्रतिबिंब दर्शविणारे तिथले साहित्य नक्कीच अभ्यासायला हवे. ‘काशुर’ भाषेतील ‘रामावतारचरित’ हे अशा कश्मीरी संस्कृतीचे वहन करते. या रामायणातील भाषेवर नंतरच्या काळातील फारसीचाही प्रभाव दिसून येतो. शेरास लागाय पोश लवु हितयें सतिये वोतुये व्यवाह काल। शोक्लम करिथ ओम शब्दु सतिये वीद शास्त्र द्रायि रत्य रत्य गोन। वोलबा वरनख महागनुपतिये सतिये वोतुये व्यवाह काल ॥ – तुझ्या मस्तकावर दवबिंदूंनी मुक्त ताजी फुले माळूया, सीते तुझा विवाह काळ समीप आला आहे. या शुभयोगावर ओंकारासहित वेदशास्त्रांची मंगलवाणी निनादत आहे. वराची निवड करण्यास जणू महागणपती पण आले आहेत. हे सीते तुझा विवाह काळ समीप आला आहे. कश्मीरी संस्कृतीचे विलोभनीय चित्र रेखाटलेले हे राम सीतेचे विवाह गीत ‘रामावतारचरित’ या कश्मीरी रामायणातील आहे. वाल्मीकी रामायणाने भारतभर प्रवास केला तेव्हा त्यामध्ये साहजिकच जानपदीय संस्कृतीचे रंग मिसळत गेले व रामायणाचा गाभा जरी तसाच राहिला तरी रामायणाची अभिव्यक्ती बदलत गेली. मूळ वाल्मीकी रामायणात राम-सीतेच्या विवाहाचे वर्णन येते, तसे ते प्रादेशिक भाषांमध्ये भाषांतरित झालेल्या रामायणात येत नाही. स्थानिक प्रथा परंपरांचे आल्हादक मिश्रण भाषांतरित रामायणात पाहायला मिळते. ‘काशुर’ भाषेतील ‘रामावतारचरित’ हे कश्मीरी संस्कृतीचे वहन करते. १९व्या शतकापर्यंत कश्मीरी मध्ये रामकथेपेक्षा कृष्णकथा अधिक दिसते. त्यानंतर मात्र रामावतारचरित, शंकर रामायण, विष्णुप्रताप रामायण तथा शर्मारामायण असे ग्रंथ निर्माण झाले. यातील ‘रामावतारचरित’ हे अधिक प्रसिद्धीस पावले. कुर्यग्राम निवासी प्रकाशराम यांनी इ.स. १८४७ मध्ये या ग्रंथाची रचना केली. भगवती त्रिपुरसुंंदरीच्या कृपाप्रसादाने त्यांना वाक्चातुर्य प्राप्त झाले अशी कथा सांगितली जाते. रामावतारचरित एक प्रबंध काव्य आहे, ज्यामध्ये भक्तिरसपूर्ण रामकथा गायली गेली. हा ग्रंथ पद्यस्वरूपात आहे. वाल्मीकी रामायण व अध्यात्म रामायणावर आधारित या ग्रंथात सात कांंड आहेत व अंती लवकुश-चरित भाग जोडलेला आहे. अध्यात्म रामायणात रामकथा शिवपार्वतीच्या संवादाने सुरू होते. राम परमात्मा व सीता ही प्रकृती रूपात गौरविलेली आहे. ‘रामावतारचरित’मध्येही शिव-पार्वती संवादाने सुरुवात होते परंतु पहिल्या ५४ कडव्यांमध्ये रामायणातील व्यक्तिरेखा रूपकात्मक रंगविलेल्या आहेत. रामायण म्हणजे व्यक्तिजीवनाचा प्रवास उत्तम ध्येयाकडे घेऊन जाणारा मार्ग आहे. सत्याचरणी व्यक्तीची सु-इच्छा सीता आहे. सत्याचा सेतू राम व लक्ष्मण आहे, धीर किंवा हिंमत हनुमान आहे तर असत्य म्हणजे रावण आहे. म्हणून रावणाचे सारे वैभव इथेच राहिले. वैराग्यपूर्वक आत्मज्ञानरूपी धारदार तलवारीने असत्य असुररूपी रावण नष्ट करायचा आहे. रावणवध म्हणजे शुभवासनेने अशुभवासनेचा केलेला वध आहे. हे वर्णन करताना व्यक्तीचे जीवन म्हणजे ‘तुझे शरीर हे इष्टदेवतेचे गृह असून तू पूजारी होऊन त्याचे रक्षण कर म्हणजे राक्षस वृत्ती त्यावर आरूढ होणार नाही. अन्यथा रावण म्हणजे वाईट इच्छा वासना ह्या इष्ट देवतेचे गृह अपवित्र करेल. अहंकाराचा त्याग कर, मनरूपी मंदोदरी तुझी वाट पाहत आहे. मनाचा आरसा सत्यरूपी राखेने स्वच्छ कर तेव्हा तुला चतुर्भज रामाचे दर्शन होईल व मुक्ती मिळेल. गुरूने जो सत्पथ तयार केला आहे तो म्हणजे ‘रामावताराची’ ही कथा. या रामायणातील प्रकाशराम कुर्यग्रामी यांची कश्मीरी भाषा, कश्मीरी श्रुती परंपरा व भक्तिरस यांनी युक्त आहे. यात लयबद्धता आहे पण कश्मीरी भाषेचे प्रकटीकरण मात्र विशेष समजून घेण्यासारखे आहे. या भाषेची मूळ लिपी शारदा हळूहळू लुप्त होत गेली. १४ व्या शतकानंतर मुस्लिम शासनकाळात फारसी राजभाषा झाली व कश्मीरी भाषेसाठी फारसी लिपीचा उपयोग सुरू झाला. शारदा लिपी एका अर्थाने पंडित व पुरोहितांची राहिली. उर्दू, अरबी, पंजाबी, डोगरी या भाषांंचा प्रभाव वाढत गेला. कश्मीरमध्ये या भाषेला ‘कशीर’ अथवा ‘काशुर’ म्हटले जाते. डॉ. शिबनकृष्ण रैना या ज्येष्ठ अभ्यासक, अनुवादकाने मूळ लेखक प्रकाशराम यांच्यासंस्कृतनिष्ठ भाषेतील फारसी शब्दांची विपुलता व त्याला जोडून येणार्‍या ग्रामीण शब्दप्रभावाचा उल्लेख केला आहेच. पण रामावतारचरिताच्या हिंदी भाषांतरात सुद्धा गमख्वार, तदबीर, शमशीर असे शब्द सहज आले आहेत. उदा:- रावण ने कहा – “मेरी बात यदि मानते नहीं हो तो तुम्हे शमशीर से मार डालूंगा!” किंवा सीताहरण प्रसंगी सुरुवातीला लक्ष्मण रामाला शोधायला जाण्यास नकार देतो तेव्हा सीता उद्वेगाने लक्ष्मणाला म्हणते ‘अब मुझे मालूम हो गया कि तेरे दिल में खाम खयाल है। (तेरी नियत ठीक नहीं). शोर शराबा, गुलशन,बुरका, गुनाह बक्शना, तदबीर-उपाय, कारनामें, ईश्वर की मंशा (ईश्वरेच्छा), हनुमान को मुबारख बात देना अशा वाक्यांची व शब्दांची रेलचेल रामावतारचरितामध्ये दिसते व ते कुठेही वाचताना खटकत नाही. सूर्योदय होतोय व रात्र समाप्त होत आहे याचे वर्णन करताना, प्रभात रात्रीला म्हणते की आता तुझे मुख लपव (‘बुथिस तुम बुरक द्युत तमि लोग दरबार’) म्हणजे ‘वह मुहपर बुरका पहनकर कार्यकलाप करने लगी। या संमिश्र भाषेप्रमाणेच स्थानिक संस्कृतीचे दर्शन यात होते. याचे सुंदर उदाहरण म्हणजे राम-सीता विवाह संस्कार चित्रण. विवाहाचा दिवस आला आणि विवाहगीताने सुरुवात झाली. विवाहाच्या प्रसंगी अनेक सुंदर लोकगीते म्हणण्याची परंपरा भारतभर दिसते. ‘येनि दाल्युक ग्यबुन’ सगळे ‘बाराती’ जमले आणि त्यांनी गायला सुरुवात केली ‘शाम रूप राम गछि सीताये’ म्हणजे शाम रूप राम सीतावरण करण्यास निघाले. या गाण्यामध्ये कश्मीर मधील स्थानिक देवदेवतांची नावे आली आहेत. सरस्वती, हिंगुला, विजया, पिंगला, मंगला, शारदा, उत्रस गावची उमा, लक्ष्मी, रुपभवानी, कालिका, शीतला, तोतला, गायत्री, सावित्री, त्रिसंध्या, जलन गावाची देवी,पवनसंध्या, लोदरसंध्या, बरगुशिखा या देवतांनी रामाला आभूषणे दिली व विवाह सोहळ्यात सहभागी झाल्या. श्रीरामाची अशी भव्य वरात निघाली आहे आणि दुसरीकडे सीता विवाहासाठी तयार होत आहे. तिच्यासाठी सुद्धा लग्न गीते म्हणली जातात ‘लगनुक ग्यवुन’. तिच्या केसांमध्ये फुल माळत असताना ही गाणी म्हणली जात आहेत. ताज्या फुलांना फार सुंदर शब्द इथे वापरला आहे, ‘ओस-सिक्त’-दवबिंदूंनी सजलेली फुले. सीतेला ‘सतिये असे संबोधून सार्‍याजणी गातात, ‘विवाह वेळा जवळ आलीये सीते!’ तिला आशीर्वाद द्यायला महागणपती, विजया सरस्वती जमुना, शारदा, भूतेश्वर राज्ञी, हिंगुल, मंगला, भद्रकाली आल्या. कोणी तिच्या पावलात सुवर्ण पैंजण बांधत आहेत. ब्रह्माजींनी स्वतः द्वारपूजा केली, ज्वाला, लंबोदर, गणपत यांनी पाम्पोर गावात केसरची वाटिका लावली. विवाहाच्या निमित्ताने धान्य पेरणे, ते वराकडे घेऊन जाणे ‘अंकुरारोपण’ विधी किंवा तुळशीचे रोप अशा स्थानिक परंपरांचे पालन आजही केले जाते त्याचेच हे जणू प्रतीक… बालुहाम, अकिनगाम उत्रस, वासुकुर अशा सर्व ठिकाणाहून आलेल्या देवतांनी जनकाचे विवाहघर जणू गजबजून गेले आहे. कश्मीरी विवाहात शेवटी वधूवरांवर मंगलगान करत पुष्पवृष्टी करतात त्यासाठी राजकुमारीची फुलांनी पूजा करावी म्हणून देवता फुलांचे भांडार जमवीत आहेत.’ ‘लायबोय’ व ‘गंगव्यस’ हे कश्मीरी विवाहातील विशेष कृत्य वधूकडील बालक बालिका संपन्न करतात त्याही विधीचा येथे उल्लेख आला आहे. कश्मीरी रामायणातील रामविवाहानंतर येणारे रामचरित्र वाल्मीकी रामायणाप्रमाणे पुढे जात राहते. काही महत्त्वाच्या प्रसंगांचे चित्रण मात्र वेगळ्या रीतीने केलेले दिसते.

काशूर भाषेतील रामावतारचरित–कश्मीरी रामायण Read More »

मोल्ल रामायणाचा संक्षिप्त परिचय

लेख क्र. ५२ ९/८/२०२५ रामायणसंग्रहातील अजून एक विशेष रामायण म्हणजे तेलगू कवयित्री ‘मोल्ल’ने रचलेले रामायण. म्हणूनच याला ‘मोल्ल रामायण‘ म्हटले जाते. अशा ह्या एका कवयित्रीरचित रामायणाचा अभ्यास डॉ. सुजाता बापट यांनी करून सामान्यांना या रामायणाची थोडक्यात ओळख करून दिली आहे. या लेखाचे ध्वनिमुद्रणही सोबत जोडले आहे. श्रीराम कथा ही देश-विदेशांत, विविध भाषांमधून, संस्कृतींमधून, विचारांमधून, साहित्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचलेली आहे. अशाच एका तेलगू भाषेतील रामायणाचा परिचय ह्या लेखाच्या माध्यमातून करुन देण्याचा प्रयत्न केला आहे.  मोल्ल रामायण असे नाव असणारे हे रामायण तेलगू भाषिक असणाऱ्या मोल्ल नावाच्या एका  स्त्रीने लिहिलेले रामायण आहे. तेलगू हा शब्द त्रिलिंगवरुन आला आहे, असे मानले जाते. श्रीशैलावरचा मल्लिकार्जुन, महांकालेश्वर आणि द्राक्षरामम येथील भीमेश्वर ही ती तीन लिंगे होत. तेलगू या शब्दाचा अर्थ मधुर असाही होतो. या भाषेच्या माधुर्यामुळे तिला तेलगू म्हटले जाऊ लागले असावे. संस्कृत, प्राकृत आणि इतर काही भाषा यांच्या समन्वयातून तेलगू ही भाषा उत्पन्न झाली, असे उल्लेख साहित्यात आढळतात. तेलगू भाषेच्या इतिहासकारांनी तिच्या कालखंडाविषयी पुढीलप्रमाणे सांगितले आहे. अज्ञातकाल – इ.स. ५०० ते १०००, पुराणकाल – इ.स. १००० ते १४००, काव्य प्रबंधकाल – इ.स. १४०० ते १६५०, ऱ्हासकाल – इ.स. १६५१ ते १८५०, आधुनिककाल – इ.स.१८५१ ते आजतागायत. महाभारताप्रमाणेच रामायणाचा अनुवाद हा पुराणकाळात झालेला पहायला मिळतो. भास्कर हा कवी व त्याच्या अनेक शिष्यांनी यांनी मिळून चंपूपद्धतीने रामकथा लिहून पुरी केली. या रामायणाला भास्कर रामायण असेही म्हणतात. आंध्रात घरोघरी आणि मंदिरांमधून हे रामायण वाचले आणि गायले जाते. रंगनाथ या कवीने द्विपद छंदात लिहिलेले रामायण हे रंगनाथरामायण या नावाने प्रसिद्ध आहे. यानेच तेलगूत रामकथेची परंपरा सुरु केली. मोल्ल रामायणाची रचनाकार कुम्मर मोल्ल ही प्रबंधकाळातील प्रसिद्ध कवियित्री आहे, हिने रचलेले हे रामायण हे प्रासादिक आहे. मोल्ल कृष्णदेवरायाच्या कालखंडातील मानली जाते. हिच्याचबरोबर तंजावर येथील रामभद्रांबा, मधुरवाणी, पसुपलेटी, रंगाजन्म या सोळाव्या सतराव्या शतकातील काही कवयित्री देखील उल्लेखनीय आहेत. दंडक हा काव्यप्रकार संस्कृतातून केवळ तेलगू भाषेत आलेला आपल्याला दिसतो. ७०००० ओळींचे एक दंडकरामायणही तेलगू भाषेत रुपांतरित झालेले आहे. तेलगू भाषेतील काव्याचे स्वरुप कसे बदलले याचा विचार करता असे लक्षात येते की, या काळातील तेलगू बोलीचा तत्कालीन लोकगीतांत आणि नंतर काही शिलालेखांत गद्य-पद्यरुप उपयोग झाल्याचे दिसते. नन्नया या प्राचीन कवीने तेलगू काव्याचा पाया घातलेला दिसून येतो. सुरुवातीच्या काळात अनुवाद आणि अनुकरण यांच्याकडेच या सर्वांची प्रवृत्ती असलेली दिसून येते. महाभारत, रामायण, भागवत, यांवर अनेकांनी रचना केल्याचे उल्लेख सापडतात. संस्कृतातील अनेक पुराणें तेलगू भाषेत अवतरली. धार्मिक प्रबोधन किंवा प्रचार हे या वाङ्मयाचे प्रमुख उद्दिष्ट होते. त्यामुळे आशयापेक्षा अविष्कारपद्धतीत काही प्रमाणात प्रयोगशीलता दिसून येते. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत तेलगू साहित्य हे बहुतांश पद्यात्मक होते, नंतर मात्र अनेक अंगांनी या साहित्याची वाढ झाली. काव्याचे दोन मुख्य प्रवाह दिसू लागले, एकात जुनीच परंपरा चालू राहिली आणि दुसऱ्यात भाव, भाषा, मांडणी याबाबतीत स्वातंत्र्य आणि नाविन्याचा पुरस्कार केला गेल्याचे दिसून येते. पण मोल्ल रामायणाची रचना मात्र आधीच्या काळातील आहे. हे रामायण काव्यमय, प्रासादिक आणि साधे-सोपे आहे.     मोल्ल रामायणाची प्रमुख वैशिष्ट्ये – याची रचना कुम्हर किंवा आतुकोरि मोल्ल या एका स्त्रीकडून झालेली आहे. ती कुंभार होती असा काही ठिकाणी उल्लेख आढळतो. मोल्ल ही तेलगू साहित्यातील प्रथम कवयित्री आहे, जिने अशा पद्धतीची काही काव्य रचना केली आहे. तिचा जीवनकाल इ.स. १३२०-१४०० मानला जातो. पण तिच्या आयुष्याविषयी कोणतीही सविस्तर माहिती उपलब्ध होत नाही. ती ब्रह्मचारिणी होती, असे मानले जाते. हिचे पिता शिवभक्त होते आणि ती स्वतः रामभक्त मानली जाते. मोल्ल रामायणाची रचना करताना मोल्लने कुठेही अलंकारिक शब्दांचा वापर केलेला दिसत नाही, अतिशय साध्या सोप्या भाषेत तिने ही रचना केली आहे. भक्तीतून आनंद देणारे आणि मुक्ती देणारे असे श्रीराम आहेत, त्यांचे गुणवर्णन करायला कोणाला नाही आवडणार? मला जसे काही रामायण समजले, त्याचे वैशिष्ट्य जाणवले, ते लिहिताना जे काही सुचले, त्यातून मी रामायणाची रचना केली आहे, असे मोल्ल नोंदवते. श्रीरामांची भक्ती करताना त्यातून जी प्रेरणा किंवा स्फूर्ती मिळाली त्यावरुन ही रामायणाची रचना करावी असे सुचले, असे ती म्हणते. रामांच्याच प्रेरणेने हे रामचरित गुणगान मी करते आहे आणि त्यांच्याच चरणकमलांवर मी हे कथापुष्प समर्पित करते आहे, असे ती अत्यंत विनयाने सांगते. यावरुन तिचा विनयशील स्वभाव स्पष्ट होतो. वेदांप्रमाणेच ही रामकथा पवित्र आहे. परमानंदाच्या प्राप्तीसाठीच मी ही रचना करते आहे हे सांगायला ती विसरत नाही. एकूण सहा कांडांमध्ये मोल्लने  ही रामकथा मांडली आहे. बालकाण्ड – पहिल्या बालकाण्डात अयोध्येच्या वैभवाचे वर्णन ती करते आणि दशरथ महाराजांचा उल्लेख महापट्टण असा करते. बालकाण्डाचा शेवट तिने श्रीराम आणि सीता यांच्या (कल्याण वैभवमु) म्हणजेच विवाहाने केला आहे. अयोध्याकांड – यात श्रीरामांच्या वनवास गमनाचे वर्णन आहे. गुहाच्या अनन्यभक्तीचा उल्लेख येथे लेखिकेने केला आहे. त्यासाठी प्रपत्ति असा शब्द तिने वापरला आहे. अयोध्या कांड हे तुलनेने लहान आहे. अरण्यकांड – यात सुरुवातीलाच चेंचु जातीच्या आदिवासी स्त्रियांनी वनात श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांचे दर्शन घेतल्याचा उल्लेख आहे. त्यांना असे वनात पाहून या स्त्रियांना वाईट वाटल्याचा उल्लेख देखील ती करते. शूर्पणखा आगमन, रावणासमोर शूर्पणखेचे सीता सौंदर्य वर्णन, खर दूषण संहार, मारिच राक्षसाचा प्रवेश, सीताहरण, जटायू वर्णन, रामाचा विलाप, लक्ष्मणाकडून सांत्वन, जटायूचे रावण वर्णन आणि पुढे शबरी श्रीराम भेट याचासुद्धा उल्लेख आहे, तिच्या भक्तीचे उदात्त चित्र ‘मोल्ल’ने रंगवले आहे.     किष्किंधाकांड – यात हनुमान आगमन, श्रीराम-हनुमान भेट, सुग्रीवाशी मैत्री, वाली वध, सुग्रीवाचा राज्याभिषेक आदिंचे वर्णन आहे. सीतावियोगात श्रीराम वर्षाऋतूत देखील परितप्त होत आहेत, असे त्यांच्या मनःस्थितीचे वर्णन मोल्ल करते. सीताशोधासाठी समस्त वानरसेना चारही दिशांना पाठवली जाते आणि हनुमंताजवळ श्रीराम आपली अंगठी त्यांच्या परिचयासाठी जानकीला देण्यासाठी देतात. या कथाभागाबरोबरच हे कांड येथे संपते. सुंदरकांड – हे कांड  इतर कांडांच्या मानाने विस्तृत आहे. संपातिकडून सीतास्थान माहिती, लंकेचा मार्ग, लंका वर्णन, रावणाची सीतेकडे प्रार्थना, सीतेकडून रावणाची निंदा, श्रीरामांची स्तुती, रावणाचा क्रोध, सीतेला विचार करण्यासाठी काही अवधी, जानकीचा संताप, हनुमंतांचे सीतेसमोर ते कुशल असल्याचे निवेदन, मुद्रिका प्रदान, हनुमानाचे भव्य स्वरुप, हा कथाभाग आहे. माझ्या हृदयात श्रीरामांची प्रतिमा कोरलेली आहे. तिला कोणीच धक्का लावू शकत नाही. मी तुम्हांला उद्या सकाळी सूर्योदयापूर्वी श्रीरामांसमीप नेऊ शकतो असे हनुमंत म्हणताच, सीता म्हणते, ‘मला असे चोरासारखे पळून जायचे नाही. मी रामांना सोडून अन्य कोणालाही स्पर्श करु शकत नाही, त्यामुळे मी तुमच्याबरोबर येऊ शकत नाही.’ यातून सीतेचे बाणेदार व्यक्तिमत्व मोल्ल आपल्यासमोर उभे करते. हनुमंतांचा विक्रम विहार, राक्षसवीरांचा नाश, जांबुवालीचा वध, अक्षयकुमार आणि पवनसुताचा भीषण संग्राम, इंद्रजिताचे हनुमानावर आक्रमण, मेघनादाच्या ब्रह्मास्त्राने हनुमानाचे वश होणे, रावणाची निंदा आणि श्रीरामांचे गुणवर्णन, वालाग्रज्वालांनी त्याचे लंका दहन, दधिवनात वानरांचा उत्साह, अंगदाकडून दधिमुखाचा पराभव, हनुमंताकडून श्रीरामांना सीतेच्या कुशल असण्याविषयीचे निवेदन, सीतेकडून तिचे शिरोरत्न श्रीरामांसाठी देणे आणि शेवटी माल्यवान पर्वतावरुन प्रस्थान या गोष्टींसह हे कांड येथे समाप्त होते. युद्धकांड – या शेवटच्या कांडात संपूर्ण युद्धाचे, त्याआधीच्या तयारीचे वर्णन, रावणास बिभीषणाचा उपदेश, प्रहस्ताकडून समजुतीच्या काही गोष्टी रावणाला सांगणे, बिभीषणाची शरणागती, रावणाच्या बलसंपदेचा परिचय, नलाद्वारे सेतू निर्माण, लंकेत प्रवेश, युद्धास सुरुवात, वानरांनी मांडलेला उच्छाद, कुंभकर्णाकडून वानरांचा संहार, श्रीरामांकडून त्याचा वध, इंद्रजिताचा वानरसेनेवर हल्ला,

मोल्ल रामायणाचा संक्षिप्त परिचय Read More »

नागचंद्रकृत पंप रामायणाचा परिचय

लेख क्र. ५१ २/८/२०२५ १९९७ साली श्री. ग. न. साठे यांनी त्यांचा जवळजवळ ३७१८ ग्रंथे असलेला संग्रह संत्रिकेला दान दिला, त्यात रामचरित्रावर आधारित अनेक ग्रंथ होते. तेव्हा मा. श्री. यशवंतराव लेले व श्रीमती अमृता पंडित यांनी त्या पुस्तकांची सूची तयार केली. नंतर या संग्रहात वेळोवेळी भर पडत गेली. १९ – २२ जानेवरी २०२४ मध्ये अयोध्येत राममंदिर स्थापनेच्या पार्श्वभूमीवर संत्रिकेने रामायण संग्रहाचे ‘अक्षरराम’ प्रदर्शन भरविले. त्यात ३४ भाषा व १८ लिपी असलेले एकूण १९७७ रामायण ग्रंथ होते. या भव्य प्रदर्शनाला प्रतिसादही भरपूर मिळाला. सद्यस्थितीत २००० च्या वर रामायण ग्रंथ संत्रिकेत आहेत. ‘वाल्मीकी रामायण’ हे नाव आपल्या सगळ्यांना परिचयाचे आहे. ते सोडून विविध भाषा व लिपीमध्ये असलेली ही रामायण पुस्तके आपल्याला माहितही नसतात. त्यातील काही रामायणांची ओळख व्हावी म्हणून संत्रिकेतील संशोधकांनी सारांशरूपात माहिती लिहिली. आज डॉ. आर्या जोशी यांनी कन्नड भाषेतील ‘पंप रामायणावर’ लिहिलेला लेख व सोबत ध्वनिमुद्रण देत आहोत. भारतीय धर्म-संस्कृतीत रामायण या महाकाव्याचे वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे. वाल्मीकी रामायणाचा परिचय आबालवृद्धांना थोड्याफार प्रमाणात असतो. वाल्मीकी रामायणाच्या सर्वपरिचित कथानकाव्यतिरिक्त काहीसे वेगळे कथानक ‘पंप रामायणात’ अनुभवाला येते. रामचंद्रचरित पुराण अर्थात पंप रामायण हे कन्नड साहित्यप्रकारात येते. जैन परंपरेनुसार लिहिल्या गेलेल्या पंप रामायणाचा कर्ता आहे – नागचंद्र. याचा काळ इ.स. १०७५ ते ११०० असावा असे मानले जाते. चालुक्य व होयसळ राजांनी नागचंद्राचा सन्मान केला असे मानले जाते. नागचंद्र जैन परंपरेचे उपासक व गुरुभक्त असून जैन परंपरेविषयी निष्ठा व भक्ती त्यांच्या साहित्यातून दिसून येते. अभिनव पंप असेही नामाभिधान असलेले हे चम्पू काव्य आहे. चम्पू काव्यामध्ये गद्य आणि पद्य अशा दोन्ही पद्धतीने विषय मांडलेला असतो. भावनात्मक विषय पद्यात आणि वर्णनात्मक विषय गद्यात अशी याची रचना असते. याचे कन्नड नाव रामचंद्र-चरिते पुराण असे नाव आहे. उत्तर भारतातील घराघरात तुलसी रामायणाचे वाचन होते, ते सार्वजनिक आहे. परंतु पंप रामायणाचा परिचय समाजाला न झाल्याने ते लोकाभिमुख न होता केवळ साहित्य वर्तुळातच प्रसिद्ध पावले. कथेचा सारांश- मिथिलेचा अधिपती महाराज जनकाची पत्नी गर्भवती राहिली. पूर्वजन्मीच्या वैमनस्यातून एक निशाचर त्या गर्भाला नष्ट करण्याची वाट पहात होता. राणीने जुळ्या बालकांना जन्म दिला. या बालकांपैकी मुलाचे अपहरण निशाचराने केले. आकाशमार्गाने जात असता पूर्वजन्मीच्या तपस्येचे स्मरण होवून निशाचराने त्या बालकाला कोणतीही इजा न करता, अलगदपणे पृथ्वीवर उतरविले. ते बालक हळूहळू पुढे जात रथनुपुर चक्रवालपुरच्या महाराज इंदुगती यांना मिळाले. आनंदलेल्या राजाने त्या बाळाचे नाव प्रभामंडल ठेवले. जनकाने ज्योतिषांकडून आपले दुसरे बालक सुखरूप आहे असे समजून घेतल्यावर कन्येचे नामकरण केले व तिचे नाव सीता ठेवले. सौंदर्यवती सीता मोठी होवून शास्त्रादी कलांमध्ये निपुण झाली. (वाल्मीकी रामायणात राजा जनकाला सीता शेतामध्ये नांगराच्या फाळाशी सापडली अशी कथा आहे.) अनेक किरातांकडून होणार्‍या त्रासामुळे पृथ्वीवर अनाचार माजू लागला. या संकटातून सोडविण्यासाठी मदत करायला जनकाने राजा दशरथाला विनंती केली. त्यावेळी तरूण, अत्यंत पराक्रमी असे दशरथाचे पुत्र राम व लक्ष्मण यांनी त्या किरातांचा पराभव केला. या पराक्रमाने आनंदित झालेल्या जनकाने सीतेचा विवाह रामाशी करण्याचे ठरविले. ही बातमी समजताच नारद उत्सुकतेने पहायला गेले व स्वत:च मोहित झाले. त्यांनी सीतेचे एक चित्र तयार केले व मणीमंडपात ठेवले. प्रभामंडलाने (निशाचराने नेलेला तिचा जुळा भाऊ) ते सीतेचे चित्र पाहिले व त्याने आपल्या वडिलांना तिला मागणी घालायला सांगितले. जनक राजाने हा प्रस्ताव नाकारला. सीतेचा विवाह रामाशी करायचा असल्याचे जनक राजाने सांगितल्यावर इंदुगती राजा चिडला, त्याने त्याच्या कुलातील वज्रावर्त धनुष्यावर प्रत्यंचा चढवून दाखविण्याचे सामर्थ्य रामात असेल तरच सीतेचा विवाह रामाशी करावा असा युक्तिवाद केला. रामाच्या पराक्रमावर विश्वास असलेल्या जनकाने स्वयंवर योजले. देशोदेशीचे राजे हरले, पण रामाने मात्र हे आव्हान पेलले व सीतेने रामाला वरमाला घातली. सागरावर्त नावाच्या धनुष्यावर प्रत्यंचा चढवून लक्ष्मणानेही आपला पराक्रम सिद्ध केला. त्यामुळे चंद्रध्वज राजाने आपल्या अठरा कन्यांचे विवाह लक्ष्मणाशी करून दिले. (वाल्मीकी रामायणात लक्ष्मणाची पत्नी उर्मिला हिचाच उल्लेख सापडतो.) या पराक्रमामुळे प्रभामंडलाच्या मनात रामाविषयी ईर्ष्या व मत्सर निर्माण झाला. रामावर आक्रमण करण्यासाठी प्रभामंडल निघाला त्यावेळी आपल्या जन्माचे रहस्य समजल्यावर त्याला मूर्च्छा आली. शुद्धीवर आल्यावर त्याला शोक झाला कारण त्याने आपल्या बहिणीचाच लोभ धरला हे त्याला समजले होते! त्यानंतर प्रभामंडलावर राज्य सोपवून राजा इंदुगतीने जैन धर्माची दीक्षा घेतली. सीतेसह अयोध्येस येताना राजा दशरथाने संपूर्ण परिवारासहित भूतहितरत भट्टारकांचे दर्शन घेतले. अयोध्येस आल्यावर दशरथाने रामाला राज्यभार स्वीकारण्यास सांगितले. भरताने विरक्त होवून वडिलांसह तपस्येसाठी जाण्याची इच्छा व्यक्त केली. ते ऐकून कैकेयी दु:खी झाली व तिने दशरथाकडे भरतासाठी चौदा वर्षांपर्यंत राज्यभार मागितला. हे ऐकून सर्वजण व्यथित झाले, परंतु रामाने चौदा वर्षे दिग्विजयासाठी बाहेर पडण्याचे जाहीर केले. सीता व लक्ष्मणही रामासह निघाले. प्रयाणाला निघताना राम-सीता-लक्ष्मणाने रत्नभवनात जावून जिनदेवांचे आशीर्वाद घेतले. विविध नगरांमधून प्रवास करीत असताना वाटेवर आड आलेल्या शत्रूंचा नाश राम-लक्ष्मणाने केला तर विनयाने सामोरे आलेल्या राजांची मैत्री स्वीकारली. ज्या राजांना यांची मदत झाली त्यांनी राम व लक्ष्मण यांच्याशी आपापल्या कन्यांचे विवाह करून दिले. (वाल्मीकी रामायणात श्रीराम हा एकपत्नी आदर्श पती म्हणून मान्यता पावला आहे.) कर्णध्वज नावाच्या सरोवराकाठी शांतीच्या अपेक्षेने अणुव्रत स्वीकारलेल्या एका गिधाडाला सीतेने आपला पुत्र मानले – हा जटायू! दंडकारण्यात रहात असताना एक प्रसंग घडला- रावणाची बहीण चंद्रनखी हिचा मुलगा अरण्यात तप करीत होता. अनवधानाने राम-लक्ष्मणाकडून त्याची हत्या झाली. ते ऐकून खर व दूषण रामावर चालून गेले. सीतेला एकटी सोडून जाण्यापेक्षा लक्ष्मणाने युद्ध करावे व गरज भासल्यास लक्ष्मण रामाला बोलावून घेईल असे ठरले. युद्धभूमीवर लक्ष्मण पराक्रम गाजवीत असताना रावणाने एका शक्तीदेवतेला वश केले. लक्ष्मणाच्या मदतीसाठी रामाला खोटी हाक त्या देवतेने मारली व ती ऐकून; सीतेला एकटे सोडून राम युद्धासाठी आले. त्यानंतर राम-लक्ष्मणाला लक्षात आले की कोणी मायावी शक्तीने हा कट रचला होता परंतु तोपर्यंत रावणाने सीतेचे हरण केले होते. जटायूकडून त्यांना ही बातमी समजली. सुग्रीव, जांबुवंत, हनुमान यांच्या भेटीनंतर शोकाकुल राम-लक्ष्मणाने रावणाचे पारिपत्य करण्याचे ठरविले. त्यापूर्वी हनुमानाने लंकेत जावून सीतेची भेट घेतली व स्व-पराक्रमाने लंकेची नासधूस केली. ते सारे पाहून रावण अतिशय रागावला. नभोगमन-विद्या बलाने राम-लक्ष्मणासह सर्व सैन्य आकाशमार्गे लंकेच्या रणभूमीवर येवून पोहोचले. युद्धात लक्ष्मणाने वीरश्री गाजविली. रावणाने फेकलेल्या सुदर्शन चक्रानेच रावणाचा नाश करण्याची आज्ञा रामाने लक्ष्मणाला केली व त्यानुसार लक्ष्मणाने रावणाचा वध केला! (वाल्मीकी रामायणात श्रीरामानेच दशानन रावणाचा वध केला आहे.) रावणाच्या वधानंतर त्याची पती मंदोदरी हिने ४८,००० विद्याधर स्त्रिया व आपल्या कुटुंबासह जिनव्रताची दीक्षा घेतली. सीतेसह अयोध्येला सुखरूप परत आल्यावर; राम-लक्ष्मणाने ज्या ज्या कन्यांचे पाणिग्रहण केले होते त्यांनाही अयोध्येला बोलावून घेतले. एके रात्री सीतेला दोन स्वप्ने पडली. एका स्वप्नात दिसले की दोन बाण तिच्या मुखात प्रवेश करीत आहेत व दुसर्‍या स्वप्नात ती पुष्पक विमानातून खाली पडली आहे. पहिले स्वप्न शुभसूचक असून सीतेला दोन पराक्रमी पुत्र होतील पण दुसरे स्वप्न दु:खरूप ठरेल असे रामाने सीतेला सांगितले. कालांतराने सीता गर्भवती राहिली. तिच्या मनात जिनपूजेची तीव्र इच्छा जोर धरू लागली. त्याचवेळी काही ग्रामीण लोक रामाकडे आले  व दुराचारी रावणाकडे राहिलेल्या सीतेचा रामाने स्वीकार केल्याबद्दल टीका करू लागले. याविषयी लक्ष्मणाने सीतेची बाजू घेतली

नागचंद्रकृत पंप रामायणाचा परिचय Read More »

सुवर्ण महोत्सवानिमित्त वरिष्ठांची मनोगते

लेख क्र. ५० २४/०७/२०२५ संत्रिकेने २२ जुलै २०२५ मंगळवार या दिवशी ५० वर्षे पूर्ण केली. त्यानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन ज्ञान प्रबोधिनीत केले होते. या कार्यक्रमाला सर्वांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. प्रत्यक्ष व दूरस्थ पद्धतीने ३५० सदस्य या कार्यक्रमात सहभागी झाले. यामध्ये ज्ञान प्रबोधिनीमधील आजी व माजी सदस्य, आवर्जून निमंत्रित केलेले वेल्हा, नागरीवस्ती विभाग, जनता वसाहत व पुरोहितांनी आवर्जून निमंत्रण दिलेले यजमान/देणगीदार हे आनंदाने सहभागी झाले. मणिपुर, गुजरात, पंजाब या प्रांतांचे प्रतिनिधी परंतू कित्येक वर्षे महाराष्ट्रात स्थायिक झालेले निवडक सदस्यांच्या येण्याने कार्यक्रम वेगळ्या उंचीवर गेला. सुरुवात मातृभूमिपूजनाने करण्यामागचा हेतू आपण सर्व एक आहोत ही भावना पोहोचवणे हा होता. पद्य, ज्येष्ठांची मनोगते, प्रास्ताविक, प्रमुख भाषण, समारोप व शेवटी प्रार्थना म्हणून कार्यक्रमाची सांगता झाली. व्यासपीठावर संचालक मा. श्री. गिरीशराव बापट, श्री. सुभाषराव देशपांडे, मा. विश्वनाथ गुर्जर, मा. वाच. अजितराव कानिटकर, वाच. मनीषा शेटे (विभागप्रमुख) होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. चंदा पागे यांनी केले. ३ जून २०२५ पासून संत्रिकेचा इतिहास सर्वांपर्यंत पोहोचवावा या हेतूने ४९ दिवस रोज एक लेख/ध्वनिमुद्रण ज्ञान प्रबोधिनी, संत्रिकेच्या संकेतस्थळ व दोन्हीच्या Facebook पानावर प्रसिद्ध करण्यात आले. मा. सहकार्यवाह आशुतोषदादा बारमुख, पल्लवी भाटे, संध्या कामत, मृण्मयी पंडित, मानसी जोशी-कसबेकर व पुरोहित सदस्यांच्या उत्स्फूर्त सहभागाने हे काम यशस्वी झाले. २८७ जणांच्या WhatsApp गटावर सुद्धा हे लेख/ध्वनिमुद्रण पाठवले गेले. तिथे अनेकांनी विविध विषयांबद्दल आपल्या आठवणी व प्रतिसाद नोंदवले. आजचा पन्नासावा दिवस! यानिमित्ताने २२ जुलै २०२५ च्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमामध्ये वरिष्ठांनी केलेले मार्गदर्शन या ठिकाणी पाठवीत आहोत व थोडा विराम घेत आहोत. आतापर्यंत जे पोहोचविले ते पूर्ण नाही याची कल्पना आहे. इथून पुढे दर शनिवारी भेटत राहू. मा. श्री. यशवंतराव लेले यांचे मनोगत – https://drive.google.com/file/d/1Zq5f8rfvFJn9iJ3IjM5mh0NxxjUWAO4s/view?usp=sharing मा. रामभाऊ डिंबळे यांचे मनोगत – https://drive.google.com/file/d/1GabRzlu7si9FYER1J8ngWPfJ4jZAzAum/view?usp=drive_link मा. विसुभाऊ गुर्जर यांचे मनोगत – कै. लताताई भिशीकर यांची संत्रिकेकडून असलेली अपेक्षा सांगणारी जुनी चित्रफित – https://drive.google.com/file/d/1iKlaIogUWICgPPiHry1tXih_lSoU6X2J/view?usp=drive_link लवकरच संपूर्ण कार्यक्रमाचे प्रसारण YouTube वर होणार आहे. त्याची लिंक नक्कीच आपल्यापर्यंत पोहोचवू.

सुवर्ण महोत्सवानिमित्त वरिष्ठांची मनोगते Read More »

हिंदू बौद्ध समन्वय यात्रा

लेख क्र. ४९ २३/०७/२०२५ संत्रिकेचे आणखी एक महत्वाचे सामाजिक कार्य म्हणजे हिंदू बौद्ध समन्वय यात्रा. आग्नेय आशियात भारताचे स्थान मध्यवर्ती असून आर्थिक, सामरिक, राजनैतिक दृष्टीने अशासकीय प्रयत्नातून ते बळकट करण्याच्या दृष्टीने या कामाचा प्रारंभ २००५ साली विश्व बौद्ध संस्कृति प्रतिष्ठान, विश्व हिंदू परिषद, आरोग्य निकेतन व ज्ञान प्रबोधिनी या संस्थांनी एकत्र येऊन ‘हिंदू-बौद्ध एकता’ या संदर्भात विचार विमर्श केला. त्यासाठी नेपाळ, भूतान, बांग्लादेश व म्यानमार या बहुसंखीय बौद्धधर्मीय देशात दौरे केले. संत्रिकेशी संबंधित असलेले डॉ. संदीपराज महिंद या दौर्‍यात सहभागी झाले होते. तसेच पुढचे दोन टप्पे सुद्धा त्यांनी पूर्ण केले, त्यात सिंगापूर, इंडोनेशिया, मलेशिया, जपान, तैवान इ. २३ देशांमध्ये प्रबोधिनीचा परिचय देणे व त्या देशांत स्नेहभाव उत्पन्न करणे हे काम केले. डॉ. संदीपजी यांच्याकडून त्या दौर्‍याबद्दल ऐकूया. (डावीकडून) भदंत ज्ञान जगत महाथेरो, आ. महाराजाधिराज श्री. जिग्मे सिंगे वांगचुक् भूतान, डॉ. संदीपराज महिंद, स्वामी विज्ञानानंद, श्री. बाळकृष्ण नाईक

हिंदू बौद्ध समन्वय यात्रा Read More »

अर्धशतकाची प्रगतीशील वाटचाल

लेख क्र. ४८ २२/०७/२०२५ आजच्याच दिवशी संत्रिकेला ५० पूर्ण होत आहेत, म्हणून संत्रिकेत झालेल्या कामांचा थोडक्यात आढावा घेतला आहे. संस्कृत भाषेच्या कुशीत भारतीय संस्कृतीचा समृद्ध वारसा विकसित करणे, संस्कृत मधील संशोधन अधिक समाजोपयोगी व विस्तृत पायावर आधारित होणे, अभ्यासाच्या जुन्या परंपरा व नवीन पद्धती यांचा मेळ घालता येणे, संशोधनास व्यापक पायावर आधारित बनवून समाजाच्या गरजा आणि आकांक्षा पूर्ण करण्याची प्रेरणा निर्माण करणे या उद्देशाने संत्रिकेची निर्मिती झाली. ‘संस्कृती’ आधारित संत्रिकेचे महत्वाचे काम म्हणजे ‘पौरोहित्य’. सार्थता, सामुहिकता, शिस्त, समभाव या तत्त्वांवर आधारित पौरोहित्य उपक्रम सुरु आहे. या पौरोहित्य उपक्रमातील महत्वाचे काम म्हणजे स्त्री-पौरोहित्य व मुलींचे उपनयन. २००३ ते २०२१ या २५ वर्षात ८५ पुरोहितांनी संपूर्ण देशात एकूण १,२५,००० संस्कार संपन्न केले. पुरोहितांचे मुख्य कार्य म्हणजे व्यक्तीमध्ये गुणांचे संक्रमण करणे व दोषांचे निरसन करणे, उत्तमतेकडे वाटचाल करवणे, उत्तम व्यक्ती – उत्तम कुटुंब – प्रगल्भ समाज – सुद्रुढ राष्ट्र ही साखळी निरंतर जोडणे. राष्ट्रवाद अभ्यास मंडळ हा संत्रिकेच्या माध्यमातून झालेला देशप्रश्नावरील व्याख्यानरुपी व चर्चात्मक उपक्रम. पुढे जनतंत्र उद्बोधन मंच व मासिक वैचारिक योजना अशी नामांतरे झाली व थोडे स्वरूपही बदलले. यात अनेक विषयांचा, विविध विचारसरणींचा अभ्यास केला गेला. ऐतिहासिक घटनांकडे बघायचे दृष्टिकोन, तत्वज्ञानातील मुलभूत व अत्यावश्यक संकल्पना, तत्कालिक सामाजिक समस्या इ. विषयांवर ही व्याख्याने होत होती. याशिवाय काही स्मृती व्याख्यानेसुद्धा संत्रिकेत आयोजित होत होती. संत्रिकेत होणारे एक महत्वपूर्ण काम म्हणजे संशोधन. विविध विषयांवर येथे संशोधन झाले. उदा. पालकाप्यमुनी रचित हस्त्यायुर्वेद, Engineering Geometry of Yadnyakunda and Yadnyamandap. याशिवाय संत्रिकेत तीन विद्यार्थिनींनी वाचस्पती पदवी प्राप्त केली, १)पहिली परदेशी विद्यार्थिनी -Tan Kah Siew,     विषय – The path to Liberation : Nirvana Nibbana – Yoga in Bhagvad Geeta २) वा. आर्या जोशी – श्राद्धातील दान संकल्पना (संस्कृत) ३) वा. मनीषा शेटये – भारतीय संस्कृतीतील कासव ( भारत विद्या) या सर्व कामाला आवश्यक असते ते ग्रंथालय. संत्रिकेच्या ग्रंथालयात एकूण १५७५३ ग्रंथसंपदा आहे, त्यातील ६०८ हस्तलिखिते आहे, २०२५ विविध रामायणे आहेत, शिवाय उपनिषदे, पुराण, साहित्य, कोश इ. आता हा ग्रंथसंग्रह आपल्याला online सुद्धा बघता येतो. त्याची लिंक खालीलप्रमाणे – https://granthalay.jnanaprabodhini.org

अर्धशतकाची प्रगतीशील वाटचाल Read More »

संत्रिका-आयोजित व्याख्याने

लेख क्र. ४७ २१/०७/२०२५ आपण मागच्या काही लेखांमध्ये राष्ट्रवाद अभ्यास मंडळ, त्याचे बदललेले नाव व स्वरूप यांची माहिती घेतली. आजच्या लेखात संत्रिकेत होणार्‍या व्याख्यानमालांची थोडक्यात माहिती घेऊया. १९८७ पासून संत्रिकेत स्मृति व्याख्यानमाला सुरू झाल्या. कै. अरविंद मंगरुळकर स्मृती व्याख्यानमाला, कै. मंगलाबाई चितळे स्मृती व्याख्यानमाला (संत उपदेश-माला), कै. जानकीबाई चितळे स्मृती व्याख्यानमाला, कै. पांडुरंग आपटे स्मृती व्याख्यानमाला, कै. शांताबाई शिरोळे स्मृती व्याख्यानमाला या काही महत्वाच्या व्याख्यानमाला २०१५ पर्यंत झाल्या. त्यात अनेक विद्वान वक्ते संस्कृत, संत साहित्य, कला, इतिहास, स्थापत्य इ. विविध विषयांवर व्याख्यान द्यायला आले होते. कै. डॉ. जयश्री गुणे स्मृती पुरस्कार संस्कृत विषयात मोठे काम केलेल्या व्यक्तीला दिला जात असे, तेव्हा मान्यवरांचे व्याख्यान होत असे. याशिवाय दर महिन्याला ‘प्राच्य विद्या परिषद’ भरत असे. ही बैठक २००५ – २०१७ अशी बारा वर्षे झाली. पुरोहित बैठक सुद्धा दर महिन्याला होत आहे, त्यात कधी कधी व्याख्याने आयोजित होतात. काही विशिष्ट निमित्ताने सुद्धा व्याख्यान आयोजित होत होते जसे, विश्वकर्मा जयंती. डॉ. ग. बा. देगलूरकर, डॉ. सुचेता भिडे-चापेकर, डॉ. हेमा क्षीरसागर, प्रा. प्रभाकर धारणे, डॉ. गणपती स्थपती, ह. भ. प. पुष्पलताबाई रानडे इ. विद्वज्जनांनी व्याख्याने देऊन संत्रिकेला समृद्ध, संपन्न केले. कै. मंगलाबाई चितळे संत उपदेशमाला कै. अरविंद मंगरुळकर स्मृती व्याख्यानमाला

संत्रिका-आयोजित व्याख्याने Read More »

कै. डॉ. भीमराव गस्तींंचे सामाजिक कार्य

लेख क्र. ४६ २०/०७/२०२५ ज्ञान प्रबोधिनीमध्ये कार्यकर्त्याची वैचारिक जडण-घडण व्हावी यासाठी व्याख्यानांच्या योजना केल्या गेल्या त्याचप्रमाणे कृतिशील कार्याचे आदर्शही निर्माण झाले आहेत. संत्रिकेतून मा. यशवंतराव लेले यांनी केलेले असे कार्य म्हणजे बेरड-रामोशी समाजाच्या विकासासाठी आणि देवदासी महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी ध्यासपूर्व काम करणार्‍या कै. डॉ. भीमराव गस्ती या मनस्वी कार्यकर्त्याला त्यांनी समरसून केलेली आत्मीय मदत. या कामात फक्त संत्रिकाच नाही तर पूर्ण प्रबोधिनी सहभागी झाली. या आदर्श मैत्रीबद्दल… कै. डॉ. भीमराव गस्ती हे ‘उत्थान’ या सामाजिक संस्थेचे संस्थापक. बेरड-रामोशी समाजाच्या विकासासाठी आणि देवदासी महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र अशा विविध राज्यांमध्ये त्यांच्या कामाचा विस्तार होता. १९८७मध्ये त्यांचे ‘बेरड’ आत्मकथन प्रकाशित झाले. ते वाचून मा. श्री. यशवंतरावांनी त्यांना पत्र लिहिले. पुस्तक वाचून अनेकांनी पत्रे लिहिली होती. परंतु यशवंतरावांचे पत्र वेगळे होते. यामुळे त्यांची ओळख झाली आणि चळवळीला वेगळीच दिशा मिळाली. दोघांच्या या सामाजिक कामामुळे त्यांची अनेकदा भेट व्हायची व पत्राचारही होत असे. ह्या चळवळी दरम्यान यशवंतरावांची सौहार्दपूर्ण वृत्ती भीमरावांना दिसली तेव्हा त्यांनी यशवंंतरावांबद्दल शुभेच्छापर उद्गार लिहिले होते, ते येथे देत आहोत. कर्नाटक-महाराष्ट्र सीमाभागात भटक्या-विमुक्तांचे जगणे हे खूप वेगळ्या प्रकारचे. त्यांच्या समस्याही तितक्याच गंभीर स्वरूपाच्या. त्यांना गुन्हेगारी विश्वातून बाहेर काढण्यासाठी आमची चळवळ १९७४पासून अखंडपणे चाललेली. या समूहाची संख्या खूप मोठी असल्यामुळे राजकारणी मंडळी त्यांचा निवडणुकीसाठी उपयोग करायचे. आम्ही म्हणजे फुकटात वापरले जाणारे ! १९८७मध्ये माझे ‘बेरड’ आत्मकथन प्रकाशित झाले. ते वाचून प्रा. यशवंतरावांनी मला पत्र लिहिले. पुस्तक वाचून अनेकांनी पत्रे लिहिली होती. परंतु यशवंतरावांचे पत्र वेगळे होते. यामुळे त्यांची ओळख झाली आणि आमच्या चळवळीला वेगळीच दिशा मिळाली. १९८८पासून देवदासींच्या पुनरुत्थानासाठी सीमाभागात ‘उत्थान’ची चळवळ सुरू झाली. सुमारे दोन वर्षे खूप मोठ्या प्रमाणात सीमाभागात देवदासी भगिनींच्या पुनर्वसनासाठी आंदोलने झाली. या लढ्यात यशवंतरावांचे मार्गदर्शन खूप मोलाचे ठरले आणि देवीला मुली सोडण्याची ही प्रथा बंद झाली. उत्थानच्या या यशामागे यशवंतराव होते. यानंतर असे घडले की ही चळवळ मोडून काढण्यासाठी सीमाभागातील तथाकथित पुढारी (सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार) एकत्र आले आणि मी जीवनातून उठेन अशा बातम्या यायला लागल्या. यामुळे मी गोंधळून गेलो आणि माझी परिस्थिती खूप दयनीय झाली. वृतपत्रातून होणारी बदनामी इतक्या खालच्या थरातील होती की आता जगून काही उपयोग नाही असे वाटायला लागले. अशा वेळी यशवंतरावांनी माझी लहान मुलासारखी काळजी घेतली आणि मला त्या संकटातून सुखरूपपणे बाहेर काढले. त्यानंतर ‘आक्रोश’ हे पुस्तक लिहून घेतले आणि पुन्हा उत्थानची उभारणी केली. सीमाभागात आज शेकडो देवदासींचे उत्थानच्या माध्यमातून पुनवर्सन झाले आहे. या सर्वामागे यशवंतराव आहेत. यशवंतरावांमुळे उत्थान उभे राहिले; उत्थानच्या महिला कार्यकर्त्या उभ्या राहिल्या; आणि मी लेखक व कार्यकर्ता झालो. यशवंतराव आमच्या दृष्टीने सर्वकाही आहेत. त्यांच्या छायेखाली राहण्यात आम्हांला धन्यता वाटते आणि दुसरे महत्त्वाचे म्हणजे यशवंतरावांमुळे राष्ट्रीय स्वंयसेक संघाशी आमचे नाते जुळले हे ऋण मी केव्हाही विसरू शकणार नाही. यशवंतरावांचे मन जिंकणे म्हणजे सतत कामात असणे! यशवंतरावांना उत्तम आरोग्य लाभावे ही सदिच्छा ! कै. डॉ. भीमराव गस्ती व यशवंतराव यांच्या मैत्रीबद्दल व त्यांच्या कार्याबद्दल प्रा. शुभांगी देवरे-तांबट यांनी सविस्तर लेख लिहिला आहे. या लेखावरून आपल्याला दोघांच्या मोलाच्या कामाबद्दल निश्चितच आदर वाटेल. समाजातल्या सर्वांत वंचित, अंधश्रद्ध, अशिक्षित स्तरातून उदयाला आलेल्या कार्यकर्त्याला किती भीषण आणि अनेक पदरी संघर्षाला सामोरे जावे लागते, ते ‘बेरड’ आणि ‘आक्रोश’ या डॉ. भीमराव गस्ती यांच्या आत्मकथनातून आपल्याला समजते. १९८७मध्ये प्रकाशित झालेल्या ‘बेरड’ या भीमरावांच्या आत्मकथनाने विक्रीचे आणि पुरस्कारांचे उच्चांक गाठले. बेरड समाजाच्या चळवळीचे हे आत्मकथन वाचून यशवंतरावांनी भीमरावांना पत्र लिहिले नसते तरच नवल ! १९८७ साली लिहिलेल्या त्या एका पत्रामुळे सुरू झालेली यशवंतराव भीमरावांची ‘कार्यप्रवण मैत्री’ भीमरावांच्या अखेरच्या श्वासापर्यंत अधिकच दृढ होत गेली. या काळात डॉ. भीमराव गस्ती हे ज्ञान प्रबोधिनीचे सदस्य तर झालेच; पण लेले कुटुंबाचे आप्तही झाले. ज्ञान प्रबोधिनीच्या प्रत्यक्ष कामाचे दर्शन आणि यशवंतरावांनी दिलेली जीवनदृष्टी व कार्यप्रेरणा यांविषयीची कृतज्ञता भीमराव नेहमीच व्यक्त करत असत. बेरड रामोशी सेवा समितीतील सक्रिय सहभाग अल्पावधीतच भीमराव ज्ञान प्रबोधिनीत मुक्कामी येऊ लागले आणि यशवंतरावांचे बेळगावला जाणे-येणे सुरू झाले. ‘इंडाल’ या बहुराष्ट्रीय कंपनीने बेरड समाजाच्या जमिनी मातीमोल भावाने ताब्यात घेतल्यानंतर भीमरावांनी केलेला संघर्ष सर्वश्रुत आहेच. या संघर्षानंतर कंपनीने ज्या-ज्या बेरडांच्या जमिनी घेतल्या, त्यांच्या प्रत्येकाच्या कुटुंबातील एका व्यक्तीला कंपनीत नोकरी देण्याचे आश्वासन दिले. परंतु हे आश्वासन काही प्रत्यक्षात येईना. त्या वेळी यशवंतराव ‘इंडाल’ कंपनीच्या मॅनेजरसमोर दिवसभर जाऊन बसले आणि कंपनीच्या मॅनेजरला आश्वासनाची तात्काळ कार्यवाही करायला भाग पाडले. यशवंतरावांच्या या पहिल्या सक्रिय पाठिंब्याने भीमरावांच्या संघर्षाला खरेखुरे यश आले. त्यानंतर बेरड रामोशी सेवा समितीने केलेल्या प्रत्येक संघर्षाची दखल समाजाला आणि शासनाला घ्यावी लागली. कुठेही केव्हाही झालेल्या गुन्ह्यांसाठी पोलीस बेरड रामोशी यांची धरपकड करत असत. पोलिसांच्या अनन्वित अत्याचारांमध्ये स्वतःचे चौदा नातलग (जातभाई) गमावलेल्या भीमरावांविषयी यशवंतरावांच्या मनात अत्यंत कळवळा होता आणि अजूनही आहे. त्यामुळेच भीमरावांना कार्यकर्ते मिळवून देणं, त्यांच्यासाठी निधी उभा करणं, चळवळीच्या कामाला वैचारिक बैठक निर्माण करून देणं, हतबल व निराश होणाऱ्या भीमरावांचा आत्मविश्वास पुन्हा-पुन्हा जागा करणं; इतकंच नव्हे तर भीमराव व त्यांच्या पत्नी कमळाबाईंच्या आजारपणात पित्याच्या वत्सलतेनं त्यांची काळजी घेणं या सर्व कामांत यशवंतरावांनी स्वतःला झोकून दिलं. देवदासींचे उत्थान भीमरावांची मेहणी म्हणजेच कमळाबाईंची सख्खी बहीण ही देवदासी असल्याने या अमानुष आणि क्रूर प्रथेचं विदारक दर्शन भीमरावांना जवळून झालं. ही प्रथा बंद व्हावी यासाठी हजारो देवदासींचे मोर्चे काढण्यापासून ते देवदासी प्रथाबंदीचा कायदा प्रत्यक्षात येईपर्यंतच्या सर्व टप्प्यांवर यशवंतरावांनी भीमरावांना सहकार्य केलं. डॉ. बाबा आढाव, मा. यल्लाप्पा कावळे, यशवंतराव आणि भीमराव या चौघांच्या विचारमंथनातून देवदासींच्या प्रश्नावर काम करण्यासाठी १९९६मध्ये ‘उत्थान’ या स्वतंत्र संस्थेची स्थापना झाली. परंतु देवदासींच्या प्रश्नाकडे वळल्याने स्वतःच्याच समाजात होणारी मानहानी, घरातल्यांचा प्रखर विरोध आणि आर्थिक विवंचना या सगळ्याचा खूप ताण भीमरावांवर येत असे. अशा वेळी यशवंतरावांचा नैतिक व भावनिक आधार त्यांना अधिक मोलाचा वाटे. ‘काळ्याकुट्ट मेघांनी सगळीकडून अंधार केलेला असतानाच अचानक वीज चमकावी त्याप्रमाणे यशवंतरावांचं आशादायी पत्र येत असे’, असं भीमरावांनी ‘आक्रोश’मध्ये लिहिलं आहे. देवदासी प्रथेविरुद्धची चळवळ जसजशी प्रखर होत गेली, तशी तिची दखल तत्कालीन मुख्यमंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती आदी सर्वांना घ्यावी लागली आणि अखेर देवदासी प्रथाबंदी कायदा कर्नाटक शासनाने पारित केला. देवदासींसाठी शंभर कोटी रुपयांची भरघोस तरतूद जाहीर करण्यात आली. जवळ-जवळ तीस हजार देवदासींना घरकुल योजना आणि पाचशे रुपये महिना पेन्शन मंजूर झाली. या सर्व कामात यशवंतरावांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग होता. भीमरावांचं हे सर्व यश त्यांनी शब्दबद्ध करावं यासाठी यशवंतरावांनी भीमरावांना जवळ-जवळ अडीच-तीन महिने सक्तीने प्रबोधिनीत राहायला लावलं. संगीता बारणे आणि रोहिणी तेंडुलकर या ‘स्व’-रूपवर्धिनीतील युवती, तर अभया टोळ आणि कल्पना भालेकर या प्रबोधिनीतील युवती यांच्या मदतीने सर्व लिखाणाची मुद्रणप्रत यशवंतरावांनी तयार करून घेतली. अशा प्रकारे ‘आक्रोश’ प्रकाशनासाठी सिद्ध झालं. आपल्या आजूबाजूला समाजात काय घडतं आहे ते डोळे उघडे ठेवून पाहावं यासाठी, सुस्तावलेल्या समाजाला जागं करण्यासाठी यशवंतरावांनी भीमरावांकडून आक्रोशचं लिखाण पूर्ण करून घेतलं, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. दलित पँथर ते समरसता भीमरावांसारख्या चळवळीतल्या कार्यकर्त्याला वैचारिक बैठक देण्याचं मोलाचं काम ज्येष्ठ साहित्यिक डॉ. शंकरराव

कै. डॉ. भीमराव गस्तींंचे सामाजिक कार्य Read More »

तत्त्वज्ञानातील मूलभूत व अत्यावश्यक संकल्पना

लेख क्र. ४५ १९/०७/२०२५ नुसत्या व्याख्यानमाला घेण्यापेक्षा सखोल अभ्यास व्हावा, विषयांतील आंतरसंबंध समजत जावेत, प्रबोधिनी मध्ये काम करणाऱ्या सदस्यांची देशप्रश्नाकडे पाहण्याची भूमिका तयार व्हायला हवी म्हणून जनतंत्र उद्बोधन मंचाचेही रुपांतर २०१७ मध्ये ‘आंतरविद्याशाखीय अभ्यासगटात’ करण्यात आले. मा. विवेक कुलकर्णी आणि मा. सुभाषराव यांनी पहिल्या सत्रात बहुशाखीय अभ्यासाचे महत्व स्पष्ट करून त्याची काही उदाहरणे दिली होती. त्या आधी प्रबोधिनीतील वक्त्यांची व्याख्याने होत होती. वेगवेगळ्या विषयांवरील प्रबोधिनीतल्या कार्यकर्त्यांचे विचार ऐकलेले होते. यापुढे अभ्यास करताना बाहेरच्या तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळावे म्हणून त्यातले पहिले सत्र “तत्वज्ञानातील मूलभूत आणि अत्यावश्यक संकल्पना” या विषयावर डाॅ. सदानंद मोरे यांनी घेतले. या आंतरशाखीय अभ्यासगटाला अत्यंत बहुआयामी असे व्याख्याते लाभले. डॉ.सदानंद मोरे हे महाराष्ट्राचं राजकारण, समाजकारण व धर्मकारणाचे अभ्यासक, भाष्यकार, संशोधक आणि विचारवंत आहेत. त्यांनी पुणे विद्यापीठातून “गीता कर्माची उपपत्ती” या विषयावर वाचस्पती पदवी मिळवली आहे. त्यांनी तत्त्वज्ञानावर आधारित अनेक निबंध लिहिले आहेत, तसेच व्याख्यानेही दिली आहे. अशा ह्या तत्त्ववेत्त्याचे विचार संक्षिप्तरुपात येथे देत आहोत. डॉ. मोरे यांनी आपल्या व्याख्यानात ‘बहुशाखीय‘ (multidisciplinary) ऐवजी ‘आंतरशाखीय‘ (interdisciplinary) या शब्दाला प्राधान्य दिले. त्यांच्या मते, आंतरशाखीय अभ्यासात वेगवेगळ्या ज्ञान शाखांमधील ज्ञानाचा परस्पर संबंध लावता आला पाहिजे. त्यांनी तत्त्वज्ञानाची व्याख्या आंतरशाखीय अभ्यासाची पद्धत (methodology) अशी केली. त्यांच्या मते, तत्त्वज्ञान हा स्वतंत्र विषय नसून, तो वेगवेगळ्या विषयांची चिकित्सा करण्याची आणि त्यांचा एकमेकांशी संबंध जोडण्याची पद्धत आहे. आंतरशाखीय अभ्यासाची पद्धती आपल्याला तत्त्वज्ञानातूनच मिळते, असे त्यांचे ठाम मत आहे. या संदर्भात, त्यांनी सर कार्ल पॉपर या तत्त्वज्ञाचे वचन उद्धृत केले की, “विशेषीकरण (specialisation) हे वैज्ञानिकांसाठी नैसर्गिक आकर्षण असले तरी, तत्त्ववेत्त्यासाठी ते आत्म्याचा घात करणारे पाप (mortal sin) आहे“. हे स्पष्ट करण्यासाठी डॉ. मोरे यांनी डॉक्टरचे उदाहरण दिले – ‘एखादा डॉक्टर कान, नाक, घसा तपासतो, त्यात तो विशेषज्ञ असतो, पण तो डोळे तपासत नाही. त्यासाठी रुग्णाला डोळ्यांच्या डॉक्टरकडेच जावे लागते.’ पॉपर यांना असे म्हणायचे आहे की, तत्त्ववेत्त्याला सर्व शास्त्रांचे ज्ञान हवे, कारण ते ज्ञान एका सूत्रात कसे बांधायचे हे केवळ तत्त्ववेत्त्यालाच समजते. डॉ. मोरे यांनी जैन तत्त्वज्ञानातील लयवाद (perspective/point of view) आणि अनेकांतवाद या संकल्पनांचा उपयोग करून त्यांचे विचार स्पष्ट केले. ‘लय’ म्हणजे वस्तू किंवा घटनेकडे पाहण्याचा दृष्टिकोन. जैन तत्त्वज्ञानानुसार एकाच वस्तूचे अनेक पैलू (aspects) असू शकतात आणि तुमचे विधान एका लयातून सत्य असू शकते, तर दुसऱ्या लयातून ते चुकीचे असू शकते. ज्याला सर्व दृष्टिकोनांतून ज्ञान प्राप्त झालेले असते, त्याला ‘केवली’ असे म्हणतात. ‘हत्ती आणि सहा आंधळे’ या गोष्टीचे उदाहरण देऊन त्यांनी हे स्पष्ट केले. त्यांनी ही संकल्पना इतिहासाच्या अभ्यासाला कशी लागू होते हे सांगितले. ऐतिहासिक घटनांकडे पाहण्याचे अनेक दृष्टिकोन असू शकतात, जसे की: त्यांनी स्वतःचे लेखन आंतरशाखीय कसे आहे, हे अनेक उदाहरणांनी स्पष्ट केले. तत्त्वज्ञान हा त्यांचा मूळ विषय असल्यामुळेच त्यांना हे शक्य झाले. डॉ. मोरे यांनी काश्मिरी पंडित क्षेमेंद्रांच्या (बारावे शतक) ‘औचित्य विचार’ आणि ‘नीती’ या संकल्पनांचाही उल्लेख केला. क्षेमेंद्रांच्या मते, ‘नीती’ म्हणजे ‘सूक्ष्म दृष्टी’, जी धर्माच्या सामान्य चौकटीला अपवाद असलेल्या विशिष्ट परिस्थितीला ओळखते. कृष्णाने कर्णाला धर्म समजावताना याच सूक्ष्म दृष्टिकोनाचा वापर केला, असे त्यांनी उदाहरणासह स्पष्ट केले. शेवटी, डॉ. मोरे यांनी पुनरुच्चार केला की, तत्त्वज्ञानाने तुम्हाला mythology समजते, अभ्यासाचं पद्धतीशास्त्र समजते आणि ते जर समजलं तर मग तुम्हाला कुठलाही विषय चांगला समजू शकतो आणि त्या विषयांमधले आंतरसंबंध सुद्धा त्यामुळे तुम्हाला चांगलं समजू शकतात. त्यांच्या मते, तत्त्वज्ञान हेच मुळात आंतरशाखीय पद्धतीशास्त्र आहे. ज्ञान प्रबोधिनी मध्ये या प्रकारच्या अभ्यासाची सुरुवात झाली त्याबद्दल त्यांनी शुभेच्छा दिल्या.

तत्त्वज्ञानातील मूलभूत व अत्यावश्यक संकल्पना Read More »

मुस्लिम मनाचा शोध

लेख क्र. ४४ १८/०७/२०२५ राष्ट्रवाद अभ्यास मंडळाच्या सुरुवातीपासूनच ‘इस्लाम’ हा विषय पुन्हा पुन्हा चर्चिला गेला. इस्लामची मूलतत्त्वे – श्री. श्रीपाद जोशी, इस्लामी राज्याची संकल्पना – श्री. स. मा. गर्गे, मुस्लीम प्रश्नाची आंतरराष्ट्रीय बाजू – वैद्य ब. ल. वष्ट, स्वातंत्र्योत्तर काळातील मुस्लीम राजकारण – श्री. व. ग. कानिटकर याच्या सोबत डॉ. स. ह. देशपांडे यांनीही मुस्लिम प्रश्न मांडला. पाकिस्तानपेक्षा अधिक मुस्लिम लोकसंख्या असलेल्या भारतात हिंदू-मुस्लिम संबंध हा विषय नेहमीच कळीचा मुद्दा राहिला आहे. २०१७ पासून ‘भारतीय मुस्लिम स्त्रियांना शिक्षणामुळे मिळणारी संधी, प्रेरणा आणि आत्मविश्वास’ या विषयावरील एक अभ्यास संत्रिकेत झाला. कोविड मुळे अभ्यास दीर्घ काळ सुरू राहिला पण त्यातूनच कुरआन अभ्यासाची एक तासांची शंभर सत्रे व मशीद भेटीचा कार्यक्रमही झाला. आजचा लेख या विषयी .. भारतीय मुस्लिम स्त्रियांचे शिक्षण: संधी, प्रेरणा आणि आत्मविश्वास ‘भारतीय मुस्लिम स्त्रियांना शिक्षणामुळे मिळणारी संधी, प्रेरणा आणि आत्मविश्वास’ याचा अभ्यास करण्याच्या उद्देशाने वाच. मनीषाताई शेटे आणि मानसीताई बोडस यांनी सुरू केला. त्याला जवळपास पाच वर्षे लागली (२०१७ ते २०२३), ज्यात लॉकडाऊनमुळे दोन वर्षांचा खंड पडला. अभ्यासाची प्रेरणा आणि पार्श्वभूमी या अभ्यासाची प्रेरणा स्त्रियांच्या प्रश्नांवरील चिंतेतून आणि समाजात सलोखा निर्माण करण्याच्या उद्देशातून मिळाली. सोलापूरला जाताना भर उन्हात बुरखा घातलेल्या स्त्रियांना पाहून त्यांच्या जीवनाबद्दल प्रश्न निर्माण झाले, ज्यामुळे त्यांचा अभ्यास करण्याची गरज वाटली. स्वरूपवर्धिनीने ज्ञान प्रबोधिनीमध्ये आयोजित केलेल्या तीन दिवसीय इस्लाम अभ्यास वर्गात असे दिसून आले की, धर्म, तलाक, बुरखा, बहुपत्नीत्व, लव्ह जिहाद यांसारख्या विषयांवर अभ्यास होत असला तरी, या समाजाच्या जवळ जायचे असेल तर धर्मापेक्षा शिक्षणाच्या माध्यमातून लवकर संपर्क करता येईल व प्रबोधिनीच्या शिक्षणावरील कामाच्या कार्यदिशेशी सुसंगत असल्याने हा विषय निवडला. पूर्वाभ्यास (संदर्भ साहित्य) – अभ्यास सुरू करण्यापूर्वी काही महत्त्वाचे अहवाल आणि साहित्य तपासले. संशोधनाची उद्दिष्ट्ये – या अभ्यासाची विशिष्ट उद्दिष्ट्ये पुढीलप्रमाणे होती: कार्यपद्धती प्रबोधिनीच्या ‘अन्य समाजांबरोबर पूल बांधणे’ या संकल्पनेचा उपयोग करून मुस्लिम महिलांशी संपर्क साधण्यात आला. सुरुवातीला प्रतिसाद मिळेल का ?, त्या मोकळेपणाने बोलतील का ?, किंवा अभ्यासाचा वेगळा अर्थ लावला जाईल का ? अशा शंका होत्या. काही ज्येष्ठांनी ‘तुम्ही हा अभ्यास का करत आहात?’ असे प्रश्नही विचारले. तरीही त्यांच्या बद्दल असणारी उत्सुकता, वाटणारी तळमळ आणि कळकळ यामुळे हा विषय पुढे नेण्याचा निर्णय घेतला. मुलाखती आणि प्रश्नावली: सराव आणि प्रक्रिया – मुलाखत घेण्यापूर्वी संदर्भ साहित्य तपासले. प्रश्नावली वनिता ताईंकडून तपासून घेतली. प्रत्यक्ष मुलाखतीपूर्वी पत्राद्वारे किंवा ईमेलने संपर्क साधून अभ्यासाची ओळख आणि अपेक्षा स्पष्ट केली, तसेच लेखी परवानगी घेतली. मुलाखतींचे ध्वनीमुद्रण करण्यासाठीही लेखी परवानगी घेतली. प्रत्येक मुलाखत दीड ते दोन तास चालली. सहभागी महिलांचे गट आणि क्षेत्र: निरीक्षणे (Findings) अभ्यासात मिळालेली काही प्रमुख निरीक्षणे: इतर निरीक्षणे – निष्कर्ष (Conclusions) अभ्यासाचे प्रमुख निष्कर्ष असे होते: सहाय्य आणि पुढील वाटचाल – संत्रिकेच्या संशोधन संस्थेतून या प्रकल्पाला आर्थिक सहाय्य झाले. वनिताई पटवर्धनांनी या अभ्यासाला ‘लहान पातळीवरील अभ्यास’ असे म्हटले, परंतु तो कसा करावा यासाठी खूप मार्गदर्शन केले. संत्रिकेचे ज्येष्ठ आणि भूतपूर्व प्रमुख मा.विसूभाऊ / विश्वनाथ गुर्जर यांनी या संशोधनाला पाठिंबा दिला. तसेच डॉ. शमशुद्दीन तांबोळी, प्रतिभाताई रानडे, डॉ. रझिया पटेल, गौरीताई कापरे, सुनीताताई चकोत, डॉ. केतकी भोसले, राज्यश्री क्षीरसागर, उज्वला पवार आणि डॉ. अजित कानिटकर यांचे प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन आणि मदत मिळाली. या अभ्यासासोबतच, लॉकडाऊनच्या काळात ७-८ जणांनी मा.अनीस चिश्ती यांच्या ऑनलाइन मार्गदर्शनाखाली कुरआनचा अभ्यास केला. त्यांच्या साहाय्याने पुण्यातल्या तांडेल मशिदीला भेट देऊन माहिती करून घेतली. हा अभ्यास धर्मावर पूर्वग्रह न ठेवता समजून घेण्याच्या हेतूने केला गेला. हा अभ्यास सध्या दोन वर्षांपासून पुढे गेलेला नाही. सध्या एक व्हॉट्सॲप गट आहे, जिथे चर्चा होतात आणि अभ्यास मांडले जातात, परंतु ठोस पुढील पाऊल अजून उचलले गेले नाही. तरीही, हा विषय समाजात ‘पूल बांधणे’ या महत्त्वाच्या उद्देशाने पुढे लावून धरायचा आहे, जिथे एकमेकांबद्दलची असूया किंवा द्वेष न ठेवता, ‘दोन गुण पटतात ना, तर त्यावरच काम करा’ या आ.आप्पांच्या शिकवणीनुसार, एकत्र जाता येणारे समान धागे शोधून पुढे जायचे आहे. या उपक्रमात ‘पूल बांधणे’ हे मुख्य उद्दिष्ट काही प्रमाणात साध्य झाले असे वाटते. कुरआन अभ्यास गटाची मशिदीला भेट मार्गदर्शक – प्रा.अनिस चिश्ती, सदस्य – डॉ. मनीषा शेटे, मानसी बोडस, सायली आगाशे, आरती, अमोल फाळके, वामन पारखी, आशुतोष बारमुख, श्रेयश फापाळे, प्रथमेश कुलकर्णी, अखिलेश कसबेकर पूर्व पीठिका राष्ट्रीय एकात्मता व राष्ट्रीय सुरक्षा गटाचा एक उपक्रम म्हणून जुलै २०२० पासून प्रा.अनीस चिश्ती यांच्या बरोबर नियमित कुरआन वर्गाला सुरुवात झाली. कुरआन समजून घेत असताना इस्लामचे ५ स्तंभ रोजा, नमाज(सलात) ५ वेळा , हज, जकात, शहादा (कलमा पढणे) याविषयी पण माहिती घेतली. यामध्ये मशिदीत जाऊन ५ वेळा नमाज पढणे या विषयी चर्चा झाली, त्याच बरोबर त्यावेळी नक्की काय म्हंटले जाते, कृती काय असतात, महिलांना प्रवेश का नाही? असे प्रश्न चर्चिले गेले. त्यामुळे प्रत्यक्ष मशिदीला भेट देण्याचे निश्चित झाले. १० जानेवारी २०२१, रविवारी संध्याकाळी पुण्यातील कॅम्प भागातील तांडेल मशिदीला (अहले सुन्नत वाल जमात) भेट देण्याचे निश्चित झाले. ही मशीद १७७७ मधील पेशवेकालीन मशीद आहे. याभेटीसाठी प्रा. अनिस चिश्ती यांनी परवानगी घेतली होती. संध्याकाळी ५.३० वाजता आमच्या अभ्यास गटाचे ११ सदस्य मशिदीच्या दारात एकत्र झाले. महिलांनी डोके झाकून घ्यावे असा नियम सांगितला गेला. पाय धुवून सर्वजण मशिदीच्या मुख्य सभागृहात गेले. इक्बाल शेख (मे.इंजिनिअर) हे तिथे माहिती देण्यासाठी होते. सर्वप्रथम मशीद म्हणजे काय ? तिथले नियम काय असतात इ. समजावून सांगितले गेले. . इथे सांगितलेला महत्त्वाचा नियम होता की मशिदीत कोणताही भेदभाव केला जात नाही. राजा आणि नोकरही एकमेकांच्या शेजारी बसू शकतात. माणूसकी व मानवता हा इस्लामचा संदेश आहे असे चिश्ती सरांनी सांगितले. मशीद भेट – एक उत्सुकता आणि विशेष अनुभव मशीद भेटीसाठी आलेल्या आमच्या सदस्यांमध्ये वैविध्यपूर्णता होती. काहीजण युवक युवती गटातील होते तर काही प्रौढ सदस्य. मात्र या सगळ्यांच्या मनातील उत्सुकता सारखीच होती. सगळ्यांच्या मनात वेगवेगळे प्रश्न होते. उदा. मशीद म्हणजे काय? आणि नेमकं आत जाऊन करतात तरी काय? मशिदीत मुस्लिमेतर नमाजमध्ये सहभागी होऊ शकतात का? लहानपणापासून मुस्लिम, कुराण, मस्जिद अश्या गोष्टींबद्दल आपल्या मनात उत्सुकता भीती व एक प्रकारचे गूढ निर्माण केले जाते/ तयार होते. ह्याचे एक कारण असे असू शकते की या विषयांवर मोकळेपणाने कधी घरांमध्ये आपापसात चर्चा होत नाहीत. त्यामुळे मनात असेच काही गूढ आणि भीती मिश्रित चित्र ह्या सगळ्याबद्दल होते. एका युवतीने तिचा अनुभव नोंदवताना लिहिले की, “M.Phil करत असताना पहिल्यांदा मुस्लिमांबरोबर खूप जवळून वावरण्याची वेळ आली. अनेक मुस्लिम शिक्षक, सहाध्यायी, रुग्ण ह्यांच्याशी खूप जवळून संबंध आला व ‘मुस्लिम’ विषयक गूढ, भीती आपोआपच गेली. नंतर दिल्लीला पहिल्यांदा ‘जामा’ मस्जिद बघितली. तिथली पद्धत आणि वातावरण बघून हे काहीतरी वेगळे आहे असे जाणवले नाही. शांतता आणि प्रत्येकजण आपापली प्रार्थना करतोय असे काहीसे चित्र तिथे होते. मंदिरात दिसते तशी फक्त कुठली मूर्ती तिथे नव्हती. तेव्हापासून मस्जिदीबद्दलची उत्सुकता अजून वाढली.” एका युवकाने नोंदवले, “प्रशालेत असताना घरी जायच्या वाटेवर डेक्कन कॉर्नर जवळची मशीद रोज पहायचो. त्यामुळे मनात एक

मुस्लिम मनाचा शोध Read More »